Pravin Nikam : साताऱ्यातील शेतकरी पुत्राचा अटकेपार झेंडा; ब्रिटनमधल्या 75 महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये झाला समावेश

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शेतकरी घरातून येणाऱ्या प्रवीण निकम (Pravin Nikam) याचा लंडनमध्ये एका सोहळ्यात सन्मान झाला आहे. ब्रिटनमधल्या 75 महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये त्याचा समावेश झाला आहे. लंडनमध्ये ब्रिटिश कॉन्सिलतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱ्या देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल आणि नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अॅलूम्नी युनियन माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. यावेळी प्रवीण यांनी नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली आहे.

Pravin Nikam

यामध्ये महाराष्ट्रातील प्रवीण निकम याचाही समावेश आहे. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्रवीण सध्या समता सेंटर या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी (Pravin Nikam) काम करत आहे. महाराष्ट्रातून प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे आणि विवेक गुरव यांचाही लंडनमध्ये सन्मान करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावीपणे काम (Pravin Nikam) करणाऱ्या 75 प्रतिभावान युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अॅलूम्नी युनियन माध्यमातून करण्यात आला. या 75 युवकांमध्ये पुण्याच्या प्रवीण निकमची निवड झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लंडन येथे हा गौरवसोहळा पार पडला.

Pravin Nikam
प्राविणने केली ही कामगिरी (Pravin Nikam)

शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विदेशात असणाऱ्या उच्चशिक्षणाच्या संधीबाबत मार्गदर्शन, 53 देशांची समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम इ.ची दखल ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन यांनी घेतली. भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, ब्रिटिश कौन्सिल शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड (Pravin Nikam) फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी भारतातील ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या 75 युवकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.

Pravin Nikam
परिणीती चोप्राचाही झाला सन्मान

ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 75 वर्षात ब्रिटन मध्ये शिकलेल्या भारतातील (Pravin Nikam) 75 माजी विद्यार्थी ज्यांचं वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा  सत्कार करण्यात आला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा सत्कार होणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

जोडधंदा करून मुलांचं शिक्षण केलं पूर्ण 

मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील असणारे प्रवीण यांचे वडील शेती सोडून नोकरीच्या शोधत पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत (Pravin Nikam) कामगार तर आई गृहिणी. या जोडप्याने आर्थिक संकटांना न घाबरता, दिवाळीतील उटणे, फिनेल विकून, जोडधंदे करून आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवलं. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली आहे.

Pravin Nikam
समता केंद्राची स्थापना (Pravin Nikam)

प्रवीण यांनी परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण करून सहजासहजी मिळणारी मोठ्या पगाराची नोकरी स्वीकारली नाही. तर भारतात पूर्णवेळ ग्रामीण आणि वंचित (Pravin Nikam) बहुजन समाजातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी त्यांनी समता केंद्राची स्थापना केली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com