करिअरनामा ऑनलाईन । आकाशसला गवसणी घालणे म्हणजे नेमके काय असते तर, असे काहीतरी करणे ज्याची अपेक्षा कोणी केली नसेल. जिद्द असेल तर माणूस दगडाचेही पाणी करू शकतो अशी म्हण आहे! असेच एक उदाहरण बिहारमधून समोर आले आहे. बिहारमधील एका 17 वर्षाच्या मुलीची ही कहाणी! जिचे नाव आहे सीमा कुमारी. या मुलीने असे काही करून दाखवले आहे की, त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तिचे बारावी नंतरच्या शिक्षणासाठी तिची निवड हार्वर्ड युनिव्हर्सिटीसाठी झाली आहे.
अतिशय काठीण परिस्थितीवर मात करत सीमा कुमारी ही उच्च शिक्षणासाठी साता समुद्रापार चालली आहे. तिचे वडील हे मजुरी करतात. आणि तिची आई हातगाडीवर लाकडी वस्तूंची विक्री करते. या कष्टामुळे तिची निवड हार्वर्ड युनिव्हर्सिटीसाठी झाली आहे. दाहो गावची सीमा ही 17 वर्षाची आहे. तिने 12वी ची परीक्षा पास केली आहे आणि पुढील शिक्षणासाठी ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहे. त्यासाठी तिला 61 लाखांची स्कॉलरशिप देखील मिळणार आहे.
मजुरी करणाऱ्या आई-वडिलांची मुलगी सीमा म्हणते की, “मी आमच्या गावाच्या बाहेर पाणी भरण्यासाठी गेली होती. तेव्हा मला तिथे मैदानावर काही मुली फुटबॉल खेळतांना दिसल्या. आणि त्यांना बघून मला पण फुटबॉल खेळण्याची इच्छा झाली. घरच्यांची परवानगी घेऊन मी खेळायला गेली तेव्हा समजले की, ती सर्वजण एका स्वयंसेवी संस्थेच्या युवा शिबीराचा भाग आहेत. मी पण त्यांच्यात सामील झाले आणि काही दिवसात तिथे नवीन येणाऱ्या मुलींना फुटबॉल शिकवू लागली. यामुळे मला आत्मविश्वास आला की मी काहीतरी करू शकते! मला बारावी नंतरच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधल्या शिक्षणाबाबत समजले आणि मी खूप जोमाने तयारी केली. यशही मिळाले आणि आता परदेशात शिकक्षणासाठी माझी निवड झाली आहे”.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com