करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती संदर्भात राज्य शासनाने नुकताच नवीन (Police Bharti Update) GR प्रकाशित केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे. क्रमांक – सेप्रनि-१८१८/प्र.क्र.३१३(भाग-२)/पोल-५अ.-महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा मुंबई अधि.२२) याच्या कलम ५ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याच्या वतीने त्यास समर्थन करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता पुढील नियम करीत आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघा.
- या नियमास, “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (पहिली सुधारणा) नियम, २०२२” असे म्हणावे.
“महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ४ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल.
शारीरिक चाचणी (50 गुण) – (Police Bharti Update)
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण 50 गुणांची असेल –
(अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
(ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील :
(१) अंकगणित
(२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (Police Bharti Update)
(३) बुध्दीमत्ता चाचणी
(४) मराठी व्याकरण
(क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.
(ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- महत्वाचे – (Police Bharti Update)
शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलाविण्यास पात्र असतील. उदाहरणार्थ, जर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये 10 रिक्त पदे व अनुसूचित जमाती (Police Bharti Update) प्रवर्गामध्ये 5 रिक्त पदे असतील तर, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार 100 (10×10=100) उमेदवार, सूचीबध्द करण्यात येतील आणि अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार 50 (1045-50) उमेदवार, सूचीबध्द करण्यात येतील. तथापि, अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणानुक्रमे 100 व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलवण्यास पात्र असतील. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील (Police Bharti Update) गुणानुक्रमे 50 व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलावण्यास पात्र असतील.
GR डाउनलोड – https://bit.ly/39SbiE
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com