करिअरनामा ऑनलाईन । ठाणे ग्रामीण पोलीस विभागाने (Police Bharti 2024) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मार्च 2024 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे.
पोलिस विभागातील भरती ही नेहमीच ग्रामीण भागातील तरुणांसाठी पर्वणी ठरते. याच पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिस विभागाने पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून एकूण 119 पदे भरली जाणार आहेत. 12 वी पास तरुण या पदासाठी अर्ज करू शकतात. पाहूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…
विभाग – ठाणे ग्रामीण पोलीस विभाग, ठाणे
भरले जाणारे पद –
1. पोलीस शिपाई – 81 पदे
2. पोलीस शिपाई चालक – 38 पदे
पद संख्या – 119 पदे (Police Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 05 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे. (PDF पहा)
वय मर्यादा – (Police Bharti 2024)
1. 18 ते 28 वर्षे
2. मागासवर्गीय- 33 वर्षे
3. अपंग- 45 वर्षे
परीक्षा फी – 450/- रुपये
(मागास प्रवर्ग – 350/- रुपये)
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.thaneruralpolice.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com