Police Bharti 2024 : पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट!! अर्जदारांना SEBC चे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारच्या दप्तर दिरंगाईमुळे मराठा (Police Bharti 2024) समाजातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी SEBC चे दाखले वेळेत मिळत नव्हते. या भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत दि. 31 मार्च निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे दाखल्याअभावी अनेक तरुण- तरुणी या भरतीला मुकणार; असं चित्र निर्माण झालं होतं. या समस्येची दखल घेत शासनाने भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. एसईबीसी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी या भरतीत आरक्षण देण्यात आले असून देखील दाखले मिळत नसल्याने या उमेदवारांना अर्जच करता येत नव्हता.

SEBC चे दाखले देण्याची कार्यवाही सुरू (Police Bharti 2024)
SEBC चे दाखले देण्यासाठीची कार्यवाही आजपासून सुरू करण्यात आली आहे त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाची मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतले होते. यावेळी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचा लाभ शिक्षण व नोकरीत होईल; असेही जाहीर करण्यात आले. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीत SEBCतील तरुणांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन संकेतस्थळावर SEBC चा पर्याय उपलब्ध
एसईबीसी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी या भरतीत आरक्षण देण्यात आले असूनही दाखले मिळत नसल्याने त्यांना अर्जच करता येत नव्हता. परिणामी, राज्‍य शासनाने ही भरतीच पुढे (Police Bharti 2024) ढकलावी, अशी मागणी होत होती. याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर याची दखल शासनाने घेतली आणि शासनाने आता पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर एसईबीसाचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने दाखले मिळण्याचे काम सोपे होणार आहे.

२६ फेब्रुवारीपासून आरक्षण लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मराठा समाजातील अनेक तरुण- तरुणींनी एसईबीसी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले मात्र २५ मार्चपर्यंत उमेदवारांना (Police Bharti 2024) दाखले मिळाले नव्हते. शासनाच्या जात प्रमाणपत्र वितरित होणाऱ्या संकेतस्थळावर २०१४ मधील आरक्षणाचाच संदर्भ दिसत होता. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदारांनी त्यासंदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांच्‍याकडून मागवले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते. याच दरम्यान राज्याच्या गृह विभागाने सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च देण्यात आली होती.

एसईबीसीचे प्रमाणपत्र शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून मिळण्यास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून दाखले घेण्याची कार्यवाही करावी. दाखले लवकरात लवकर देण्यासाठीची कार्यवाही सुरू करत आहोत; असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com