Police Bharti 2024 : पोलीस भरतीसाठी सोमवारपासून होणार मैदानी चाचण्यांना सुरुवात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी देशभर सुरु असलेल्या (Police Bharti 2024) लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली होती. परंतु आता या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणूक संपल्या आहेत त्यामुळे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. येत्या सोमवारी दि. 10 जूनपासून नाशिक शहर आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पोलीस भरतीसाठीची उमेदवारांची चाचणी परीक्षा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील 118 रिक्त जागांसाठी (Police Bharti 2024) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी डिसेंबर महिन्यांपासून उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. परंतु मुदतवाढ करून फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज घेतले होते. परंतु त्यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आणि ही भरती प्रक्रिया रेंगाळली.

118 जागांसाठी 8 हजार 325 अर्ज (Police Bharti 2024)
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील 118 रिक्त जागांसाठी एकूण 8 हजार 325 अर्ज आले आहेत. यामध्ये पुरुष गटासाठी 6 हजार 75 तर महिला गटासाठी 2 हजार 248 अर्जाचा समावेश आहे. या पोलीस भरती संदर्भात शेवटचे नियोजन सुरू झालेले आहे. येता 10 तारखेपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांना हॉल तिकीट मेसेज आणि ई-मेल मोबाईलद्वारे कळवलेले आहे. त्यानुसार आता उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे.

अशी होणार मैदानी चाचणी
धावणे, गोळा फेक, शारीरिक पात्रता मोजणी, पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर तर फुगून 84 सेंटीमीटर, महिला उमेदवारांना 155 सेंटिमीटर अशी आवश्यक शारीरिक पात्रता असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com