Police Bharti 2023 : नवरा-बायको एकाचवेळी झाले पोलीस भरती; शेतात कांदे काढत असताना हाती आली मेरीट लिस्ट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिरूर तालुक्यातील दाम्पत्याने (Police Bharti 2023) कामालच केली. या जोडप्याने पोलिस भरती होण्याचा ध्यास घेतला आणि पूर्णही केला. विशेष म्हणजे शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि या जोडप्याची पोलिस भरतीसाठी निवड झाल्याची बातमी हाती आली. आनंदाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला उचलून घेऊन आनंद साजरा केला. यावेळीत्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

समाजासाठी झटणारं शेलार कुटुंब
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील चांडोह येथे राहणारे शेलार कुटुंब. म्हातरबा शेलार यांचा मुलगा तुषार आणि सून भाग्यश्री हे दोघेही पोलिसात भरती झाल्याने त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या आनंदात पतीने पत्नीला उचलून घेऊन कांद्याच्या शेतात आनंद (Police Bharti 2023) उत्सव साजरा केला. शेलार यांचे कुटूंब हे गावाच्या सामाजिक विकासासाठी झटणारे कुटुंब आहे. शेलार कुटुंबातील त्यांची आई कुसूम शेलार यांनी गावचं सरपंच पद भूषवताना अनेक विकास कामे करुन गावाला वेगळी ओळख निर्माण करुन देण्याचे काम केले आहे.
कष्टाचं चीज झालं (Police Bharti 2023)
2020  मध्ये तुषार आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. दोघांनी पोलिसात भरती व्हायचे अशी शपथच घेतली होती. या दोघांनाही पोलिस भरतीचे वेध लागले होते. तुषार आणि भाग्यश्री यांनी गेल्या चार वर्षांपासून पोलिस भरती होण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. अभ्यासाबरोबरच दररोज व्यायाम करणे, शेतीतील काम करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांना हे सर्व करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला; मात्र कष्टाचे चीज झाल्याची भावना तुषार यांनी व्यक्त केली आहे.

यशस्वी दाम्पत्याने व्यक्त केल्या भावना…
शिरुर तालुक्यातील जांबूत येथील पोलिस अकादमीतून प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण परीक्षेत पास झाले आहेत. असे असले तरी या जोडप्याला मिळालेल्या यशाचे महत्त्व आगळेवेगळेच आहे. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना भाग्यश्री शेलार यांनी सांगितले की; “सासरी नांदायला (Police Bharti 2023) आल्यावर मला सासूने मुलीप्रमाणे अन् थोरल्या जावेने बहिणीप्रमाणे वागणूक दिली. सासरे आणि भावाने खुप सहकार्य केले. दररोजचा व्यायाम व अभ्यास या परीक्षेसाठी कामी आला. जिद्द अन चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाले आहे. आई-वडीलांच्या आशीर्वादाने पोलिस दलात भरती झाले.”
या घवघवीत यशानंतर तुषार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की; आई, वडील व भाऊ, वहिनीच्या आशीर्वादाने हे यश मिळाले आहे. गेल्या चार वर्षात (Police Bharti 2023) चार वेळा या भरतीसाठी जिवाचं रान केलं; अखेर यावर्षी हे यश मिळवता आले. यासाठी पत्नी भाग्यश्रीने मोलाची साथ दिली. त्यामुळेच आम्ही दोघेही पोलिस भरती झालो. भविष्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढेन. कायदा आणि सुव्यवस्था राखताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com