पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती होणार आहे. याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी आज काढले आहेत. उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीसाठी ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.
पोलीस भरतीसाठी ३ सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील मुख्य वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसारीत करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर व लोहमार्ग मुंबई या ठिकाणच्या जागांची जाहीरात निणार आहे.
तर ग्रामीणमध्ये रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगांव, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, जालना, भंडारा आणि लोहमार्ग पुणे या ठिकाणच्या जागांसाठी जाहिरात प्रसारीत कराव्यात असे परिपत्रकात म्हटले आहे.
परिपत्रकाची प्रत पोलीस महासंचालक, लाचलुचप प्रितिबंधक विभागाचे महासंचालक, अपर पोलीस महासंचालक लोहमार्ग, अपर पोलीस महासंचालक व कारागृह निरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, नाशिक परिक्षेत्र, कोल्हापूर परिक्षेत्र, औरंगाबाद परिक्षेत्र आणि नागपूर यांना पाठवण्यात आले आहे.