करिअरनामा ऑनलाईन | राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानंतर आता गृह विभागाच्या वतीने राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यांत लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती 10 हजार पदांसाठी आहे.
कोरोनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात आली नाही. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे राज्य सरकारकडून पुन्हा लवकरच पोलीस भरतीचा निर्णय जारी केला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस भरती प्रक्रियेची तयारी केली जात आहे.
गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
कोरोना काळात राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते.
अखेर महाविकास आघाडीने कोरोना काळानंतर उशिरा का होईना पण 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com