करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेने विविध क्षेत्रातील (PMC Internship Programme 2022) इंटर्न पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. विधी, अभियांत्रिकी, पर्यावरण, संगणक विज्ञान, सामग्री, फलोत्पादन, जीवशास्त्र, बी.कॉम आणि शॉर्ट हँड टायपिंग इंटर्न्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.
काय आहे Urban Learning Internship Program
पीएमसीने ही भरती महाराष्ट्राच्या शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयाने आयोजित केलेल्या अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत घेतली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, द्विपक्षीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत, पदवीधरांना शिकण्याचा अनुभव मिळेल, तसेच नवीन ऊर्जा आणि कल्पना स्मार्ट सिटी आणि शहरी विकासासाठी मदत करतील.
या पदांच्या इंटर्न्ससाठी भरती (PMC Internship Programme 2022)
विधी, अभियांत्रिकी, पर्यावरण, संगणक विज्ञान, सामग्री, फलोत्पादन, जीवशास्त्र, बी.कॉम आणि शॉर्ट हँड टायपिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये इंटर्न नियुक्त केले जातील.
एकूण जागा – 330
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित विषयाबाबत आणि पदाबाबत किमान माहिती असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
किती मिळणार पगार –
या इंटर्नशिपसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 10 हजार ते 15 हजार प्रति महिना स्टायपेंड दिला जाणार आहे. (PMC Internship Programme 2022)
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 15 जून 2022
अधिक माहितीसाठी येथे CLICK करा
अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/mr
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com