करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कॉस्ट (Pilots Recruitment) कटींग केले जात असताना एअर इंडियाने 470 विमान खरेदी करण्याचा जगातील सर्वात मोठा करार केला आहे. या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियामध्ये काही पदांसाठी तब्बल 2 कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. एअर इंडिया B777 विमानासाठी पायलटची भरती करणार आहे. त्यासाठी वार्षिक 2 कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. यामुळे अनुभवी पायलटेसाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे.
असं असेल भरगच्च पॅकेज
अनुभवी पायलटला 17 लाखांपेक्षा जास्त पगार एअर इंडिया देणार आहे. 17 लाख 39 हजार 118 रुपये वेतन दर महिन्याला पायलटला दिले जाणार आहे. हवाई क्षेत्रात चांगल्या (Pilots Recruitment) पायलट्सची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. यामुळे चांगले पॅकेज देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी पाच हजार ते सात हजार तास विमान उड्डाण करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. एअर इंडियात केबिन क्रू आणि ग्राऊंड स्टाफ, सिक्योरिटी आणि अन्य तांत्रिक पोस्टसाठीही भरती केली जाणार आहे.
विमान खरेदीची मोठी ऑर्डर (Pilots Recruitment)
एअर इंडियाने नुकतीच विमान खरेदीची मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरनुसार आता येत्या दशकात एअरबस आणि बोइंगकडून 470 विमान खरेदी करण्यात येतील. तसेच यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे.
टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले. त्यानंतर (Pilots Recruitment) एअर इंडियाच्या विस्ताराची मोठी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी 840 विमानांच्या खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे. आतापर्यंत एखाद्या विमान कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. सध्या एअर इंडियाकडे 113 विमान आहेत. सध्या कंपनीकडे 1,600 पायलट आहेत.
विविध विमाने आणि पायलट्सची गरज
एअर इंडियाला प्रति विमान अंदाजे 30 पायलट्सची आवश्यकता भासेल. ए350 या विमानासाठी 1,200 पायलटची गरज आहे तर बोइंग 777 साठी 26 पायलट लागतील. अशा 10 विमानांचा (Pilots Recruitment) समावेश केल्यास 260 पायलट लागतील. 20 बोइंग 787 विमानांसाठी 400 पायलटची गरज आहे. अजून इतर विमानांचा विचार करता कमीत कमी 4,800 पायलटची गरज भासेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com