करिअरनामा ऑनलाईन । युजीसी- नेट (UGC-NET) परीक्षेच्या गुणांच्या (Ph.D Pet Exam 2024) आधारे पीएच.डी.साठी प्रवेश देण्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली जाणार की नाही याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता. विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 10 जूनपर्यंत संलग्न संशोधन केंद्रातील रिक्त जागांची माहिती जमा केली जाणार आहे; त्यानंतर पेट परीक्षा घेतली जाणार आहे; असे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने युजीसीकडे पेट परीक्षेबाबत पत्रव्यहार (Ph.D Pet Exam 2024) केला होता मात्र विद्यापीठाला युजीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशातच युजीसीकडून काही विषयांची नेट परीक्षा घेतली जात नाही. परिणामी या विषयांसाठी पेट परीक्षा घेणे आवश्यक होते. उशीरा का होईना विद्यापीठाने पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून संलग्न संशोधन केंद्रांकडून रिक्त जागांची माहिती मागवली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवून पीएच.डी.पेट परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे.
रिक्त जागांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक (Ph.D Pet Exam 2024)
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यापीठातील विभागप्रमुख, व सर्व संशोधन केंद्रांचे प्राचार्य/संचालक यांनी आगामी पीएच्.डी. प्रवेश परीक्षा (PET) आयोजित करण्याच्या अनुषंगाने पीएच्.डी. मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडे रिक्त जागांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. जागा अद्ययावत करताना संशोधन केंद्र व संशोधन मार्गदर्शकांनी मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावी. ज्या संशोधन मार्गदर्शकांनी यापूर्वी त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत केल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांकडे सद्यस्थितीत जागा रिक्त झाल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांना नव्याने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. अशा मार्गदर्शकांना पुनःश्च किंवा (Ph.D Pet Exam 2024) नव्याने जागा अद्ययावत करावयाच्या आहेत, त्या संशोधन मार्गदर्शकांनी त्यांच्या लॉगीनमधून त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत कराव्यात. त्यानंतर संबंधित संशोधन केंद्रांनी त्यांच्या मार्गदर्शकांकडील पुनःश्च किंवा नव्याने अद्ययावत केलेल्या रिक्त जागांना प्रवर्गनिहाय ऑनलाईन पध्दतीने मान्यता द्यावी. ही सर्व प्रक्रिया येत्या 10 जून, 2024 पर्यंत पूर्ण करावी; अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
टीप – ज्या संशोधन मार्गदर्शकांनी यापूर्वी त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत केल्या आहेत.परंतु त्यांना जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता वाटत नाही, अशा संशोधन मार्गदर्शकांनी रिक्त जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com