Home Blog Page 877

[Gk Update] युनिसेफच्या ‘मुलांच्या हक्क’ मोहिमेसाठी अभिनेता आयुष्मान खुराणाची नियुक्ती

करीअरनामा । युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंडने (युनिसेफ) बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा यांची मुलांच्या हक्क मोहिमेसाठी “प्रत्येक मुलासाठी” या थीमनुसार सेलिब्रेटी अ‍ॅडव्होकेट म्हणून नेमणूक केली आहे.

अभिनेता आयुष्मान खुराणा भारतात या उपक्रमासाठी काम करणार आहे.  तो मुलांवर होणारा हिंसाचार संपविण्यासाठी युनिसेफला पाठिंबा देईल.  विशेषत: सद्य परिस्थितीत कोविड -19 च्या वाढीव लॉकडाऊन आणि सोबतच्या सामाजिक-आर्थिक परिणामामुळे मुलांवर होणारा हिंसाचाराचा धोका वाढत असल्याने, आयुष्मान खुराणा हे थांबवण्यासाठी प्रयत्न करेल.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:-

युनिसेफ मुख्यालय: न्यूयॉर्क, USA
युनिसेफचे कार्यकारी संचालक: हेनरीटा एच. फोर.

——————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-


मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन ।  मध्य रेल्वे, मुंबई विभागामध्ये विविध  पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-11-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

Mumbai Central Railway Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैद्यकीय चिकित्सक

पद संख्या – 14 जागा

पात्रता –Degree in Medicine, MBBS

वयाची अट –53 वर्ष , (SC / ST – 5 वर्षाची सूट, OBC – 3 वर्ष सूट )

वेतन – 75,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई    Mumbai Central Railway Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटच तारीख – 30-11-2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –  [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

IBPS अंतर्गत 1557 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।  इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mahabharti.co.in/ibps-bharti-2020/

IBPS Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – लिपिक

पद संख्या –  1557+ जागा

पात्रता – पदवीधर उमेदवार असावा.

वयाची अट – 28 वर्षापेक्षा जास्त नसावे.        IBPS Recruitment 2020

शुल्क – SC/ ST/ PWBD/ EXSM – 175 रुपये , इतर – 850 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात –  https://drive.google.com/file/d/1xTWZCL828Nq0_YmrKgcGnVuRmoIP_3X8/view?usp=sharing

ऑनलाईन अर्ज करा – https://www.ibps.in/crp-clerical-cadre-x/?doing_wp_cron=1598961729.0874950885772705078125

अधिकृत वेबसाईट – https://mahabharti.co.in/ibps-bharti-2020/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

 

राज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेला सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्र शासनाच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत केंद्राने नुकतेच निर्देश दिले. त्याबाबतची एसओपीही (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर करण्यात आली.

परंतु महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या बघता २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडली. दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घ्यावी अशी मागणी केली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने २१ सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्यास पालकही संमती देणार नाही. निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीत सुरु करु नये. मागील वर्षी आलेले वेतनेतर अनुदान परत गेले आहे. हे अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली. संस्था चालक महामंडळाच्या मागणीची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेऊन २१ सप्टेंबरपासून कोणतीही शाळा सुरु होणार नसल्याचं स्पष्ट केले. दरम्यान, शाळेच्या शुल्काबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. आता शासनाने तसे लेखी निर्देश देणे आवश्यक आहे. विनाअनुदानित शाळांची फी भरण्याबाबत शासनाने निर्देश द्यावे अशी मागणी या बैठकीत संस्था चालकांनी केली.

२१ सप्टेंबरपासून शाळा ९ ते १२ वी पर्यंत सुरू करण्याचे केंद्र सरकारचे होते निर्देश

केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणजेच एसओपी जारी केली होती. याअंतर्गत केवळ ९ वी ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थीच्या शाळा सुरु होणार होत्या. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका वेळी शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलवावे, ज्या शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावण्याची पद्धत आहे, तेथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी इतरही काही व्यवस्था असणे आवश्यक आहे. जर शाळा विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करीत असेल तर दररोज नियमितपणे वाहनाची स्वच्छता करावी लागेल असे नियम दिले होते. त्याचसोबत शाळांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने खबरदारीदेखील घ्यावी लागेल. शाळांमध्ये थर्मल स्कॅनर आणि नाडी ऑक्सिमीटरची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसह संपूर्ण कर्मचार्‍यांचे थर्मल स्कॅनिंग शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी करावे लागेल. याशिवाय त्यांचे हातही स्वच्छ करावे लागतात. शिक्षक व इतर कर्मचार्‍यांना शाळेमार्फत फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्स देण्यात येतील. शाळा दररोज उघडण्यापूर्वी संपूर्ण परिसर, सर्व वर्ग, प्रॅक्टिकल लॅब आणि बाथरूम सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनद्वारे स्वच्छ केले जातील असंही केंद्राने सांगितले होते.

चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 14 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2020/05/CMC.pdf

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1) ANM – 28 जागा

पात्रता – ANM Course.

2) Lab Technician – 14 जागा

पात्रता – B.Sc आणि DMLT

3) Pharmacist – 3 जागा

पात्रता – D. Pharma / B. Pharma

वेतन – 17,000 रुपये

वयाची अट – 38 वर्ष

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 14 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – https://www.majhinaukri.co.in/wpcontent/uploads/2020/05/CMC.pdf

अधिकृत वेबसाईट – http://ccmcchandrapur.com/indexEng.html#

मुलाखतीसाठी ठिकाण – Corona Room, 2nd Floor, Gandhi Chowk, Municipal Corporation Chandrapur

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MBA प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात

करिअरनामा ऑनलाईन ।एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल दिनांक २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी होऊन २३ मे रोजी निकालही जाहीर झाला मात्र त्यानंर सीईटी सेलने प्रवेशाबाबतीत काहीच सूचना न दिल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. एमबीएची प्रवेश परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रावर झाली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेत चार विद्यार्थ्यांना २०० पैकी १५० हून अधिक गुण मिळाले आहेत तर १२६ ते १५० पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३९२ आहे. ५१ ते १०० पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत.

सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिलीची सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या कॉलेजांमध्ये सुमारे ३६ हजार ७६५ हजार जागा आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careenama.com

JEE Main’s Results 2020 | असा पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. जेईई मेन परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ६.३५ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. कोविड – १९ महामारी काळात देशपातळीवर मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेली ही पहिली परीक्षा आहे.परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर आज जाहीर होईल.

कसा पाहाल निकाल ?

जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.

View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.

अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.

सिक्युरिटी पिन नंबर टाका

लॉग इन करा.

तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

अधिकृत वेबसाईट –http://jeemain.nta.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

 

 

स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! MPSC ची पुर्वपरिक्षा आॅफलाईनच होणार

करिअरनामा आॅनलाईन | कोरोनामुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) ऑनलाईन परीक्षेच्या (सीबीआरटी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाईन परीक्षा (सीपीबीटी) घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आयोगाने निविदा काढल्या तरी सेवा पुरवठादारांकडून निविदेला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. पर्याप्त संख्येने निविदा न आल्यामुळे शेवटची मुदतवाढ देत आलेल्या निविदा मंजूर करण्याचा तयारी आयोगाने ठेवली आहे.

या स्थितीत मोठ्या संख्येने उमेदवार असलेल्या पूर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्यात येणार असून पूर्व परीक्षा सोडून इतर परीक्षांसाठी सीपीबीटीच्या पर्यायाचा विचार आयोगाकडून सुरू आहे. कोणत्याही स्थितीत पूर्व परीक्षा सीपीबीटीद्वारे घेण्याचा विचार आयोग करत नसल्याचे आयोगाचे (एमपीएससी) सहसचिव सुनिल औताडे यांनी स्पष्ट केले.

युपीएससीकडून अनेक वर्षापासून कमी उमेदवार असलेल्या परीक्षेसाठी संगणकावर आधारित भरती परीक्षा (सीबीआरटी) घेण्यात येते. कोरोनामुळे एमपीएससीने काही परीक्षांसाठी या पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. यातूनच गेल्या महिन्यात सीपीबीटीची निविदा काढण्यात आली. सेवा पुरवठादारांनी या निविदेला म्हणावा तेवढा प्रतिसाद दिला नाही. परीक्षेचे काम जबाबदारीचे असल्याने कोणी पुढे येत नसल्याची तसेच युपीएससीच्या तुलनेत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या तुलनेने जास्त असल्याने निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याची सुरू होती. कारणे काहीही असले तरी काही पुरवठादारांनी निविदा दाखल केल्या आहेत. केवळ त्या पर्याप्त संख्येने नसल्याने आयोगाने निविदेला मुदतवाढ दिल्याचे श्री. औताडे यांनी सांगितले.

नियमानुसार दोनवेळा मुदतवाढ देऊनही पुरवठदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यास आलेल्या निविदांचा विचार आयोगाकडून होणार आहे. या स्थितीत विविध स्पर्धा परीक्षांतील पूर्व परीक्षांही या पद्धतीने ऑनलाईन होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, उमेदवारांची संख्या कमी असलेल्या परीक्षांसाठीच कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट (सीपीबीट) या ऑनलाईन परीक्षेचा मार्ग अनुसरण्याचा विचार आयोग करत असून कोणत्याही परिस्थितीत पूर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार नाहीत.

त्या पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे सहसचिव औताडे यांनी सांगितले. ऑनलाईन परीक्षेसाठी जिल्हा पातळीवरील उपलब्ध व्यवस्था पहाता आम्ही पंचेवीस हजार उमेदवारांचीही ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाहीत. यामुळे ऑनलाईन परीक्षेची तयारी सुरू असली तरी त्या पद्धतीने कोणत्या परीक्षा घ्यायच्या याचे नियोजन अद्याप झाले नसल्याचेही श्री. औताडे यांनी स्पष्ट केले.

PNB बँकेत नोकरीची मोठी संधी; मॅनेजर पदाच्या 535 जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

करिअरनामा । पंजाब नॅशनल बँककडून PNB स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी pnbindia.in वर ऑनलाईन अर्ज करु शकतात. पीएनबीच्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.
PNB SO Recruitment 2020 अर्ज भरण्यासाठी SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर इतर वर्गातील उमेदवारांना अर्ज करताना 850 रुपये फी भरावी लागणार आहे.

पीएनबी बँकेच्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी वयोमर्यादा –
मॅनेजर पदासाठी 25 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. तर सिनिअर मॅनेजर पदासाठी 25 ते 37 वर्ष वयोमर्यादा आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.

मॅनेजर पदासाठी रिक्त जागा –
एकूण जागा – 535
मॅनेजर (Risk)- 160 पद संख्या
मॅनेजर (Credit)- 200 जागा
मॅनेजर (Treasury)- 30 जागा
मॅनेजर (Architect)- 25 जागा
मॅनेजर (Civil) – 2 जागा
मॅनेजर (Economic)- 10 जागा
मॅनेजर (HR)- 10 पदं

सिनिअर मॅनेजर पदासाठी रिक्त जागा –
सिनिअर मॅनेजर (Risk) – 40 पद संख्या
सिनिअर मॅनेजर (Credit)- 50 पदं

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदांनुसार, वेग-वेगळी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरुन अधिक माहिती घेऊ शकतात. निवड प्रक्रिया ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.

MPSCने निगेटीव्ह मार्किंग पद्धतीत केल्या ‘या’ मोठ्या सुधारणा

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांकरिता नकारात्मक गुण देण्याच्या पद्धतीत (Negative Marking) सुधारणा केल्या आहेत. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. म्हणजेच यापुढे निकाल अपुर्णांकात लागणार आहे.

यापूर्वी, विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता (multiple choice questions) ४ चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पद्धत (निगेटिव्ह मार्किंग) २००९ मध्ये प्रथम लागू करण्यात आली होती. त्यानंतर नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्धती काही बदलांसह अबलंबिवण्यात आली. या कार्य पद्धतीचा आढावा घेण्यात आला आणि पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला.

१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन गुणपद्धतीनुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत.,’ अशी माहिती ‘एमपीएससी’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजले जाईल आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामधून २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
३) हा नियम लागू करताना अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकांत आली, तरीही ती अपूर्णांकांतच राहील.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, त्यास नकारात्मक गुणपद्धत लागू होणार नाही.

नवीन गुणपद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असेल, असे ‘MPSC’च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.