Home Blog Page 48

Law CET Admission 2024 : भावी वकिलांनो!! नॅशनल लॉ स्कूल्स प्रवेशासाठी अर्ज सुरू; 1 डिसेंबरला होणार परीक्षा

Law CET Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशात विविध न्यायालयांमध्ये (Law CET Admission 2024) कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज नव्याने खटले दाखल होण्याच्या संख्येत भर पडत आहे. या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी वकिलांची गरज सातत्याने वाढत आहे. विधी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना म्हणजेच वकिलांना वित्तसंस्था, संरक्षणदले, सरकारी व निमसरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, विधी महाविद्यालयात अध्यापन, वकिली व्यवसाय, पत्रकारिता, लिगल प्रोसेस आऊटसोर्सिंग अशा अनेक क्षेत्रांत संधी आहे. कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही गुण असणे आवश्यक आहे जसे उत्कृष्ट मसुदा लेखन, सादरीकरण व संवाद कौशल्य, चातुर्य, आत्मविश्वास व उत्तम आकलन क्षमता आदि. या पार्श्वभूमीवर लॉ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर 3 वर्षांचा किंवा बारावीनंतर 5 वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते. अशा वकील होवू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे.

लॉ स्कूल्स मधील CET साठी 15 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज
लॉ शिक्षणासाठी देशात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या 24 नॅशनल लॉ स्कूल्स मधील 12 वीनंतर पाच वर्षांच्या पदवी कोर्सच्या प्रवेशासाठी दि. १ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय स्तरावर सीईटी (CET) परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने www. consortiumofnlus. ac. in या संकेतस्थळावर दाखल करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२४आहे. लॉ पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या नॅशनल लॉ स्कूल्समध्ये एक वर्षाच्या एल एल एम पदवीसाठी प्रवेश मिळू शकतो. त्यासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा हेच आहे. या २४ नॅशनल लॉ स्कूल्स पैकी तीन महाराष्ट्रात असून ती मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आहेत.

असं आहे परीक्षेचं स्वरूप (Law CET Admission 2024) –
1. लॉ शिक्षणासाठी देशात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या २४ नॅशनल लॉ स्कूल्स मधील बारावीनंतर पाच वर्षांच्या पदवी कोर्सच्या प्रवेशासाठी १ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय स्तरावर सीईटी परीक्षा होणार आहे.
2. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
3. 120 मार्कांच्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन तासात 120 प्रश्न सोडवावे लागतात.
4. यामध्ये लॉजिकल रीझनिंगवर २० टक्के प्रश्न, लीगल रीझनिंगवर २५ टक्के प्रश्न, सामान्यज्ञानावर २५ टक्के प्रश्न व इंग्रजीवर २० टक्के प्रश्न व गणितावर १० टक्के प्रश्न असतील.
5. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची असते आणि चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण (पाव गुण) वजा होईल.
6. ही परीक्षा इंग्रजी भाषेतच देता येते. यंदा बारावीत असलेले विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : लंडनमधून शिक्षण; UPSC देवून मिळवली सलग 3 पदे; कोण आहे जिल्हाधिकारी अदिती गर्ग

UPSC Success Story of IAS Aditi Garg

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी खात्यात अधिकारी होणं प्रत्येकासाठी (UPSC Success Story) सोपं नसतं. सरकारी नोकरीत रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या या ना त्या कारणाने बदल्या होत असतात. बदली झाली की त्या अधिकाऱ्याला आपल्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावं लागतं. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतर एका IAS अधिकाऱ्याचे नाव खूप चर्चेत आले आहे. ही महिला अधिकारी आयएएस अदिती गर्ग (IAS Aditi Garg) आहे. ज्यांना मंदसौरचे जिल्हाधिकारी बनवण्यात आले आहे. याआधी त्या मुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मंदसौर येथील पशुपतीनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. परिसरात भरभराटीसाठी त्यांनी भगवान पशुपतीनाथ महादेवाची प्रार्थना केली.

2015 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अदिती गर्ग या कटनी जिल्ह्यातील धारवारा गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील ओपी गर्ग हे मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालकही राहिले आहेत.

UK विद्यापीठातून घेतले शिक्षण (UPSC Success Story)
IAS अदिती गर्गने 2024 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी यूकेला गेली. 2006 मध्ये त्यांनी वॉरविक विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी UPSC परीक्षेसाठी प्रयत्न सुरू केले. UPSC परीक्षा पास होण्यासाठी किती कठोर मेहनत घ्यावी लागते हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. या कठीण परीक्षेत अदिती यांनी सलग 3 वेळा यश मिळवलं आहे.

सलग 3 परीक्षा पास केल्या
आदिती गर्ग यूकेमधून भारतात परत आल्या. त्यांनी UK विद्यापीठातून (UPSC Success Story) शिक्षण घेतलं आहे. भारतात येवून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्या प्रथम IES आणि IRS अधिकारी बनल्या. यानंतर यूपीएससीमध्ये ५४ वा क्रमांक मिळवून त्या IAS झाल्या. 2020 मध्ये त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे; “पाच वर्षांपूर्वी यूपीएससीUPSCच्या निकालाने माझे आयुष्य बदलले. यापूर्वी मी लंडनमध्ये व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे. भारतात परतल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून प्रथम IES, नंतर IRS आणि त्या नंतर IAS सेवेत प्रवेश घेतला. या प्रवासात मला खूप काही शिकण्याचा अनुभव मिळाला आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच करा Apply

MMRCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (MMRCL Recruitment 2024) नवीन भरती जाहीर करण्यात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य दक्षता अधिकारी (Chief Vigilance Officer) पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. पहा सविस्तर…

संस्था – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – मुख्य दक्षता अधिकारी / Chief Vigilance Officer
पद संख्या – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – संघटित गट-अ सेवेतील (MMRCL Recruitment 2024) अधिकारी किंवा 2) रेल्वेच्या गट अ अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेत काम करण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – Chief General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Ltd, MMRCL Transit Office, E Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01.04.2024 रोजी 56 वर्षे असावे.
परीक्षा फी – फी नाही (MMRCL Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (MMRCL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment 2024 : मोठी बातमी!! अग्निवीर वायुसेना अर्ज भरण्यास मुदत वाढ

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्याची (Agniveer Recruitment 2024) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अग्निवीर वायुसेना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केला नसेल, तर तुम्हाला या भरतीमध्ये सामील होण्यासाठी संधी वाढवून देण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अग्निपथ एअर सिलेक्शन टेस्टसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 28 जुलैपर्यंत अर्ज भरायचे होते. पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 04 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

काय आहे आवश्यक पात्रता –
– अग्निवीर वायुच्या या भरतीसाठी केवळ अविवाहित महिला आणि पुरुष उमेदवार सहभागी होऊ शकतात.
– अर्ज पूर्ण झाल्यानंतर अग्निवीर भरती लेखी परीक्षा 18 ऑक्टोबर 2024 रोजी घेतली जाईल.
– अग्निवीर एअर रिक्रूटमेंटसाठी अर्ज करण्यासाठी (Agniveer Recruitment 2024) उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, इंग्रजी, गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष पदवी अभ्यासक्रम केलेला असावा.
– अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारचे किमान वय 17.5 वर्षे आणि कमाल वय 21 वर्षे असावी.
– या शिवाय पुरुष उमेदवारांची उंची 152.5 सेमी आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेमी असावी.
– उमेदवारांचे वजन त्यांच्या उंचीनुसार असावे. तसेच सर्व श्रेणीतील उमेदवारांना 550 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अशी होणार निवड (Agniveer Recruitment 2024) –
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी इत्यादीद्वारे केली जाईल. भरतीशी संबंधित इतर तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अर्ज कसा करायचा –
1. भारतीय हवाई दलाची अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जा.
2. यानंतर अग्निवीरवायू सेवा ०२/२०२५ वर जा.
3. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील सबमिट करा.
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज शुल्क जमा करा.
5. अर्जाची अंतिम प्रिंट आउट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bharati Vidyapeeth Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! भारती विद्यापीठात नवीन भरती सुरू; त्वरा करा

Bharati Vidyapeeth Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत (Bharati Vidyapeeth Recruitment 2024) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विद्युत अभियंता, कनिष्ठ विद्युत अभियंता, MEP अभियंता, वरिष्ठ स्थापत्य अभियंता, कनिष्ठ वास्तुविशारद सह संपर्क अधिकारी, उद्यान अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ, पुणे
भरली जाणारी पदे – वरिष्ठ विद्युत अभियंता, कनिष्ठ विद्युत अभियंता, MEP अभियंता, वरिष्ठ स्थापत्य अभियंता, कनिष्ठ वास्तुविशारद सह संपर्क अधिकारी, उद्यान अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन|
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 35 ते 40वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Bharati Vidyapeeth Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ विद्युत अभियंताB.E. (Electrical)
कनिष्ठ विद्युत अभियंताDiploma / B.E. Electrical
MEP अभियंताDegree in Mechanical Engineering
वरिष्ठ स्थापत्य अभियंताDiploma / B.E. Civil
कनिष्ठ वास्तुविशारद सह संपर्क अधिकारीB Arch.
उद्यान अधीक्षकB.Sc. / M.Sc. Degree in Horticulture
प्रशासकीय अधिकारीMasters Degree with higher second class, preferably M.B.A./M.P.M

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (Bharati Vidyapeeth Recruitment 2024) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
http://bvp.bharatividyapeeth.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Anganwadi Bharti 2024 : अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती सुरू; ‘इथे’ करा अर्ज

Anganwadi Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । महिलांसाठी नोकरीची उत्तम संधी (Anganwadi Bharti 2024) निर्माण झाली आहे. अंगणवाडी पारनेर, अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – अंगणवाडी पारनेर, अहमदनगर
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 32 पदे (Anganwadi Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वीकृतीचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर जुनी पंचायत समिती पारनेर, जि. अहमदनगर

नोकरी करण्याचे ठिकाण – पारनेर, अहमदनगर
वय मर्यादा – किमान १८ व कमाल ३५ वर्षे

असा करा अर्ज – (Anganwadi Bharti 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://ahmednagar.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEEPCO Recruitment 2024 : नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन येथे नोकरी; ट्रेनी पदासाठी मिळेल तब्बल 1 लाख 60 हजार पगार

NEEPCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NEEPCO Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee)
पद संख्या – 30 पदे (NEEPCO Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – 30 ते 63 वर्षे
मिळणारे वेतन – Rs. 50,000/- ते 1,60,000/-

असा करा अर्ज – (NEEPCO Recruitment 2024)
१. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
२. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
३. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
४. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.
५. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://nhsrcindia.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : ‘या’ सहकारी बँकेत अधिकारी, व्यवस्थापक पदावर भरती होण्याची संधी

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । वसई विकास सहकारी बँक अंतर्गत (Banking Job) नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य अनुपालन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक पदांच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – वसई विकास सहकारी बँक
भरली जाणारी पदे –
१. मुख्य अनुपालन अधिकारी
२. शाखा व्यवस्थापक
३. सहायक शाखा व्यवस्थापक
पद संख्या – 11 पदे
अर्ज करणाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, (शेड्युल्ड बँक), मुख्य कार्यालय, समोर. चिमाजी आप्पा मैदान, वसई डेपो जवळ, वसई (प), जि.-पालघर 401 201.
वय मर्यादा – 50 वर्षे

भरतीचा तपशील – (Banking Job)

पदपद संख्या 
मुख्य अनुपालन अधिकारी०१
शाखा व्यवस्थापक०८
सहायक शाखा व्यवस्थापक०२

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य अनुपालन अधिकारीGraduate/ Post Graduate, CA/ CAIIB/ LLM in banking.
शाखा व्यवस्थापकGraduates/Postgraduates
सहायक शाखा व्यवस्थापक Graduates/Postgraduates

असा करा अर्ज –
१. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
२. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
३. उमेदवारांनी सर्व आवश्यक (Banking Job) कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
४. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://vasaivikasbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Engineering Admission 2024 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी चुरस; CET CELL कडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात इंजिनीअरिंग पदवी (Engineering Admission 2024) अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत १ लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

3 ऑगस्टला जाहीर होणार तात्पुरती गुणवत्ता यादी
MHT CETचा निकाल जाहीर झाल्यानंतर CET CELLकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली (Engineering Admission 2024) आहे. विद्यार्थ्यांना आता ३० जुलैपर्यंत नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी 3 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे, तर अंतिम गुणवत्ता यादी आठ ऑगस्टला जाहीर होणार आहे. यानंतर प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे; असे सीईटी सेलने सांगितले आहे.

इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
प्रवेशा संदर्भात महत्वाच्या तारखा (Engineering Admission 2024) –
१. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी – दि. ३० जुलैपर्यंत
२. कागदपत्रांची पडताळणी : दि. ३१ जुलैपर्यंत
३. प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी – दि. ३ ऑगस्ट
४. यादीवर हरकती व तक्रार – दि. ४ ते ६ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
५. अंतिम गुणवत्ता यादी – दि. ८ ऑगस्ट
( टीप – पसंतीक्रम आणि गुणवत्ता फेरींचे वेळापत्रक नंतर जाहीर होणार आहे.)
गेल्या वर्षी राज्यातील ३५० कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी एक लाख १७ हजार ५८५ जागांवर प्रवेश झाले होते. नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने, प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ होऊ शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2024 : पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर; पहा सुधारित तारखा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यासह पुणे शहरात होणाऱ्या (Police Bharti 2024) जोरदार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान आता या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दि. २९ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत मैदानी चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यापूर्वी मैदानी चाचणी दि. ९ ते २७ जुलै या (Police Bharti 2024) कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, संततधार पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. ते पुढीलप्रमाणे..
1. पूर्वीची तारीख – 9 आणि 10 जुलै : नवीन तारीख – 29 जुलै
2. पूर्वीची तारीख – 11 जुलै : नवीन तारीख – 30 जुलै
3. पूर्वीची तारीख – 12 जुलै : नवीन तारीख – 31 जुलै
4. पूर्वीची तारीख – 13 जुलै : नवीन तारीख – 1 ऑगस्ट
5. पूर्वीची तारीख – 15 जुलै : नवीन तारीख – 2 ऑगस्ट
6. पूर्वीची तारीख – 25 जुलै : नवीन तारीख – 5 ऑगस्ट

सुधारित वेळापत्रकानूसार उमेदवरांनी महाआयटी विभाग, मुंबई यांचेकडून देण्यात आलेले पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर रहायचे आहे; असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com