Home Blog Page 434

Success Story : छत्तीसगडच्या सरकारी शाळेतील आदिवासी मुलीची नासामध्ये निवड; वडील चालवतात सायकलचे दुकान

Success Story Ritika Dhruva

करिअरनामा ऑनलाईन । छत्तीसगडच्या महासमुंदची मुलगी रितिका ध्रुव हिची नासाच्या (Success Story) प्रकल्पासाठी निवड झाली आहे. सिरपूरची रहिवासी असलेली रितिका, नयापारा येथील स्वामी आत्मानंद गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 11वीत शिकते. या प्रकल्पावर काम करण्यासाठी ती श्री हरिकोटा येथील इस्रोच्या केंद्रात पोहोचली आहे. या प्रकल्पासाठी देशभरातून 6 मुलांची निवड करण्यात आली आहे. एका आदिवासी विद्यार्थिनीने पुन्हा एकदा महासमुंद जिल्ह्यासह संपूर्ण छत्तीसगडचे नाव मोठे केले आहे.

Success Story Ritika Dhruva

लघुग्रह शोध मोहिमेसाठी झाली निवड (Success Story)

रितिकाची ही निवड नासाच्या सिटीझन सायन्स प्रोजेक्ट अंतर्गत लघुग्रह शोध मोहिमेसाठी करण्यात आली आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय अन्वेषण सहकार्य कार्यक्रमांतर्गत इस्रोसोबतच्या भागीदारीचा एक भाग आहे. सोसायटी फॉर स्पेस एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (एसएसईआरडी) ने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये रितिकाचे प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात ती नोव्हेंबरमध्ये बेंगळुरू येथे इस्रो येथे होणाऱ्या लघुग्रह प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे.

Success Story Ritika Dhruva

अनेक टप्प्यांनंतर झाली रितिकाची निवड

रितिकाला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड आहे. तिने ८वीच्या वर्गात प्रथमच अवकाश विज्ञान स्पर्धेत भाग घेतला. तेव्हापासून ती सातत्याने विज्ञानाशी संबंधित स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. नासाच्या प्रकल्पासाठी अर्ज केल्यानंतर रितिकाने सर्वप्रथम बिलासपूर येथे या विषयावरील स्पर्धेत भाग घेतला. यानंतर (Success Story) तिने आयआयटी भिलाई येथे प्रेझेंटेशन दिले. यानंतर रितिकाला इस्रोच्या श्री हरिकोटा (आंध्र प्रदेश) केंद्रात प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.

Success Story Ritika Dhruva
Cape Canaveral: An astronaut suit at the NASA Kennedy Space Center in Cape Canaveral Florida USA. It is part of a region known as the Space Coast, and is the site of the Cape Canaveral Air Force Station. Many U.S. spacecraft have been launched from both the station and the Kennedy Space Center on adjacent Merritt Island

ब्लैक होल मधून ‘ध्वनीचा शोध’ यावर प्रेझेंटेशन दीले 

या प्रकल्पात रितिकासोबत देशातील इतर सहा शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये व्होरा विघ्नेश (आंध्र प्रदेश), वेमपती श्रीयार (आंध्र प्रदेश), ओल्व्हिया जॉन (केरळ), के. प्रणीता (महाराष्ट्र) आणि श्रेयस सिंग (महाराष्ट्र). अवकाशातील निर्वात ब्लैक होल मधून आवाजाचा शोध यावर त्यांनी सादरीकरण केले. यामध्ये रितिका ध्रुवने तिच्या टीमचे नेतृत्व करत अतिशय उत्तम सादरीकरण केले. न्यायाधीशांच्या पॅनेलमध्ये डॉ. बेलवर्ड (नासा), डॉ. जोनाथन (इस्रो) आणि डॉ. ए. राजराजन (सतीश धवन स्पेस सेंटर).

Success Story Ritika Dhruva

वडील चालवतात सायकलचे दुकान

महासमुंद मुख्यालयापासून 18 किमी अंतरावर गुडरुडीह हे आदिवासी बहुल गाव आहे. देवसिंग ध्रुव हे रितीकाचे वडील. रितिकाचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय. देवसिंग यांना दोन मुली आणि दोन (Success Story) मुलगे आहेत. देव सिंग यांच्याकडे चार एकर शेती असून ते तुमगाव येथे सायकलचे दुकान चालवतात. यातून मिळणारे उत्पन्न त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वापरले जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : Cyber Security मध्ये करिअर करण्यासाठी UGC नं लाँच केले UG आणि PG कोर्सेस

Education Cyber Security Course

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी (Education) सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षण या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. सायबर अवेअरनेस डे 2022 च्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून UGC ने हे कोर्सेस सुरू केले आहेत. सायबर सिक्युरिटी या विषयावर आणलेल्या अभ्यासक्रमांचा उद्देश तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही प्रवाहातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेच्या समस्यांबद्दलची समज विकसित करण्यात मदत करणे हा आहे.

हे अभ्यासक्रम सर्व प्रवाहातील विद्यार्थ्यांसाठी निवडक किंवा पर्यायी श्रेणी अंतर्गत विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सुरू केले जातील. या विषयी माहिती देताना UGC प्रमुख एम जगदेश कुमार म्हणाले, “या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट अधिक जागरूक, प्रतिसाद देणारे आणि जबाबदार डिजिटल (Education) नागरिक तयार करणे हा आहे, जेणेकरून संपूर्ण निरोगी सायबर सुरक्षा स्थिती आणि इकोसिस्टममध्ये प्रभावीपणे योगदान देता येईल”. “UG आणि PG स्तरावरील या अभ्यासक्रमांच्या वर्गांसाठी, उच्च शिक्षण संस्था (HEIS) सायबर सुरक्षा/संगणक/IT पात्र शिक्षक किंवा उद्योग/विषय तज्ञांना व्याख्याने, प्रॅक्टिकल किंवा ट्यूटोरियल आयोजित करण्यासाठी बोलावले जाऊ शकते. ”

असा आहे UG कोर्स (Education)

यूजीसीने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमानुसार, पदवीपूर्व विद्यार्थी मूलभूत आणि मध्यम-स्तरीय संकल्पनांचा अभ्यास करतील. त्याच वेळी, पदव्युत्तर विद्यार्थी मध्यम आणि प्रगत स्तराच्या संकल्पना कव्हर करतील. अभ्यासक्रमातील इतर गोष्टींबरोबरच पदवीधर सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे आणि कायदा, सोशल मीडिया विहंगावलोकन, ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट आणि डिजिटल उपकरण सुरक्षा यांचा अभ्यास करतील.

“हे मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना संगणक आणि मोबाईलशी संबंधित मुलभूत सुरक्षा बाबी समजण्यास सक्षम होतील. ते त्यांच्या डिव्हाइसचे संरक्षण करण्यासाठी मूलभूत साधने आणि तंत्रज्ञान वापरण्यास सक्षम असतील.

असा आहे PG कोर्स

पदव्युत्तर स्तरावर ज्या विषयांचा समावेश केला जाईल त्यात सायबर सुरक्षा, सायबर कायदा, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा, सायबर सुरक्षा व्यवस्थापन आणि अनुपालन (Education) आणि प्रशासन यांचा समावेश आहे. हे मॉड्युल पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना वैयक्तिक डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेशी संबंधित पैलूंसह सायबर गुन्ह्यांसाठी भारतातील कायदेशीर फ्रेमवर्कची माहिती मिळेल. त्यांना डेटा संरक्षण विधेयक, 2019 आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित डेटा गोपनीयता आणि सुरक्षा समस्यांबद्दल देखील माहिती मिळेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : जॉबसाठी अप्लाय करताना ‘या’ वेबसाइटपासून राहा सावध; सरकारनं दिले आदेश

Career News

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल जॉब शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही. जॉब (Career News) शोधण्यासाठी फोन किंवा लॅपटॉपवरून अप्लिकेशन पाठवण्याची सुविधा असते. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावरून तुम्हाला ज्या फिल्डमध्ये जॉब हवा आहे तसा जॉब मिळू शकतो. मात्र जिथे सुविधा आली तिथे त्या सुविधांचा गैरफायदा उचलणारे लोक आलेच. अशाच काही FAKE जॉबसाइट्स बनवून तरुणांची आणि बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एका वेबसाईट्सचा पर्दाफाश झाला आहे. सरकारनं या वेबसाइट्संबंधी सावधान राहण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या संपूर्ण शिक्षा अभियानाच्या अधिकृत वेबसाइटच्या नावाने बनावट वेबसाइट चालवली जात आहे. या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या पोस्टवर सरकारी नोकरी मिळवून देण्याचा दावा केला जात आहे. समग्र शिक्षा या वेबसाईटच्या नावाखाली ही बनावट वेबसाईट लोकांची दिशाभूल (Career News) करण्याचे काम करत आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) ही माहिती दिली आहे. PIB ने सांगितले की samagrashiksha.org नावाची एक बनावट वेबसाइट समग्र शिक्षा अभियान बनून नोकऱ्या मिळवण्याचा दावा करत आहे.

या वेबसाइटचा भारत सरकारशी काहीही संबंध नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. योग्य माहितीसाठी, लोक संपूर्ण शिक्षा अभियानाच्या अधिकृत वेबसाइट samagra.education.gov.in ला भेट देऊ शकतात. पीआयबीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या संदर्भात एक फोटोही शेअर केला आहे.

वास्तविक, या बनावट वेबसाइटला भेट दिल्यावर, येथे नोकरीच्या रिक्त जागांचा तपशील दिला जात असल्याची माहिती आहे. शिक्षक भरती ते Answer Key अशी माहिती (Career News) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाइटवर लाखो नोकऱ्या रिक्त असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत लोकांनी या वेबसाइटद्वारे कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे समग्र शिक्षा अभियान?

खरं तर, केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये, प्री-नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शिक्षणाची विभागणी न करता संपूर्णपणे विचार करण्याचा प्रस्ताव होता. या अंतर्गत, समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश प्री-स्कूल ते इयत्ता 12 वी पर्यंत शालेय शिक्षण तयार करणे हा होता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी! कंटोनमेंट बोर्डमध्ये मिळवा आकर्षक पगाराची नोकरी

Job Alert cantonment board recruitment

करिअरनामा ऑनलाईन। कंटोनमेंट बोर्ड कामठी, नागपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती (Job Alert) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, माळी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – कंटोनमेंट बोर्ड, कामठी, नागपूर

भरली जणारी पदे –

  1. सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)
  2. माळी (Mali)

पद संख्या – 02 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

  • सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मराठी भाषा (Job Alert) लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • माळी (Mali) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. (Job Alert)

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – 29,200/- – 92,300/- रुपये दरमहा

माळी (Mali) – 15,000/- – 47,600/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्रमांक 40, टेम्पल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट, जिल्हा – नागपूर, राज्य – महाराष्ट्र पिन 441001.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://kamptee.cantt.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : बंपर ओपनिंग!! एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये नोकरीची मोठी संधी

Job Alert Air india Air Services

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Alert) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमन या रिक्त पदांच्या 427 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

पद संख्या – 427 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई & गोवा

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखत दिनांक – 15,16,17 ऑक्टोबर 2022

मुलाखत वेळ – सकाळी 9 ते  दुपारी 12 पर्यंत

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (Job Alert)

  1. ग्राहक सेवा कार्यकारी – 381 पदे
  2. रॅम्प सेवा कार्यकारी – 3 पदे
  3. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 3 पदे
  4. हॅंडीमन – 40 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

  1. ग्राहक सेवा कार्यकारी – पदवीधर.
  2. रॅम्प सेवा कार्यकारी – डिप्लोमा किंवा ITI आणि अवजड वाहन चालक परवाना असावा.
  3. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 10 वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना असावा.
  4. हॅंडीमन – 10 वी उत्तीर्ण.

मिळणारे वेतन – 

ग्राहक सेवा कार्यकारी: 21,300/- दरमहा

रॅम्प सेवा कार्यकारी: 19,350/- दरमहा (Job Alert)

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर: 16,530/- दरमहा

हॅंडीमन: 14,610/- दरमहा

वय मर्यादा –

जास्तीत जास्त: 28 वर्ष.
(वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹500/-
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही

(ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.

PDF मध्ये दिलेला अर्जाचा नमूना Download करा. (Job Alert)

अर्जामधील संपूर्ण माहिती भरा.

दिलेल्या तारखेनुसार अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर रहा.

मुलाखतीचा पत्ता – 

Mumbai: System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.

Goa: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa 403802.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठीजाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10वी पासना नोकरीची मोठी संधी!! इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक अंतर्गत भरती सुरु

Job Alert Indian Security Press

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे लवकरच काही जागांसाठी (Job Alert) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

भरले जाणारे पद – (Job Alert)

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician)

पद संख्या – 85 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Alert)

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

मिळणारे वेतन – Rs. 18,780/- – 67,390/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume (Job Alert)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ispnjtwnov20/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : UPSC पास होण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करणाऱ्या उम्मुल खेरची कहाणी

IAS Success Story of Ummul Kher

करिअरनामा ऑनलाईन। जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अडचणी येत (IAS Success Story) असतात. या अडचणींवर मात करत जी व्यक्ती यश मिळवते ती खरी विजेता ठरते. तसं पाहायला गेलं तर संघर्षाचा ठराविक काळ असतो, परंतु आयएएस झालेल्या उम्मुल खेर यांच्या आयुष्यात संघर्षाशिवाय दुसरं काहीचं नव्हतं. पण त्यांनी कलेक्टर होण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्न इतकं मोठ होतं की, त्याच्यासमोर उम्मुल यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. बालपणापासून दिव्यांग असताना झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं, कुटुंबापासून त्या दुरावल्या गेल्या, शरीरावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही अन् IAS होऊनच यशाला गवसणी घातली. उम्मुल यांची यशोगाथा खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.IAS Success Story of Ummul Kher

राजस्थानच्या पाली येथील रहिवासी

उम्मुल या राजस्थानच्या पाली येथील रहिवासी आहेत. बालपणापासून (IAS Success Story) त्या दिव्यांग होत्या. एक काळ असा होता, की त्यांचं कुटुंब त्यांच्यापासून दूर झालं. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी स्वत:चा मार्ग निवडला व त्यात आलेले अडथळेही त्यांनी स्वत: पार केले आणि यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. अनेक फ्रॅक्चर आणि शस्त्रक्रिया झाल्या, पण उम्मुल यांनी थांबण्याचं नाव घेतलं नाही.

IAS Success Story of Ummul Kher

16 फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रिया

उम्मुल या राजस्थानच्या पालीतील एका गरीब मारवाडी कुटुंबातील आहेत. त्यांना ‘बोन फ्रजाईल डिसऑर्डर’ हा आजार आहे. यात शरीरातील हाडं कमकुवत बनतात. उम्मुल यांच्या हाडात नेहमी फ्रॅक्चर होत असे. उम्मुल यांना आतापर्यंत 16 वेळा फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रियांना सामोरे जावं लागलं.

राहतं घर अचानक सोडावं लागलं (IAS Success Story)

उम्मुल यांच्या कुटुंबात आई-वडिल आणि तीन भाऊ-बहिण आहेत. उम्मुल लहान असताना त्यांचे वडिल कुटुंबासह दिल्लीतील निझामुद्दीन भागात झोपडपट्टीत राहत होते. कुटुंब चालवण्यासाठी ते गाडीवर कपडे विकत असत. त्यावेळी सरकारच्या आदेशानं झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर हे कुटुंब त्रिलोकपुरी झोपडपट्टीत राहायला आलं.

IAS Success Story of Ummul Kher

एकटं राहण्याचा घेतला निर्णय

उम्मुल खेर यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखीची होती. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी सातवीत असतानाच ट्युशन घेणं सुरू केलं. नववीत असताना (IAS Success Story) त्यांच्या आईच निधन झालं व वडिलांनी दुसर लग्न केलं. उम्मुलनी शाळेत जाणं हे त्यांच्या सावत्र आईला पसंत नव्हतं. परंतु कुठल्याही स्थितीत शिक्षण सोडणं त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी कुटुंबच सोडलं आणि त्या एकट्या राहू लागल्या.

शालेय जीवनात केले एक ना अनेक विक्रम

उम्मुल यांना दहावीत 91 टक्के आणि बारावीत 90 टक्के गुण मिळाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील गार्गी महाविद्यालयातून मानसशास्त्र म्हणजेच सायकॉलॉजीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर जेएनयूमधून इंटरनॅशनल स्टडिज स्कूलमधून एम.ए आणि एम फिलचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 2014 मध्ये जपानच्या इंटरनॅशनल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी त्यांची निवड झाली. 18 वर्षांतील इतिहासात अशी निवड होणाऱ्यांमध्ये उम्मुल एकमेव भारतीय होत्या. एम फिलनंतर उम्मुल जेआरएफ उतीर्ण झाल्या. इथूनच त्यांची आर्थिक स्थिती बळकट व्हायला लागली.

IAS Success Story of Ummul Kher

समाजासमोर निर्माण केला आदर्श 

उम्मुल यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त आर्थिक अडचणींचाच सामना केला नाही तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांना दूरही व्हावं लागलं. परंतु, त्यांनी परिस्थितीसमोर पराभव न मानता स्वत:चा मार्ग स्वत: निवडला व आयएएस होऊन समाजासमोर एक प्रेरणा निर्माण केली. जेआएफ करत असतानाच त्यांनी (IAS Success Story) यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. सीएसई 2016 परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 420 वी रँक मिळवली. सामाजिक कार्य आणि लोकांच्या अडचणी सोडवण्याचे स्वप्न  स्वप्न नागरी सेवा परीक्षेद्वारे साकार होईल असे त्या म्हणतात.

IAS Success Story of Ummul Kher

IAS Topper Marks

UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात उम्मुल खेर यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. त्यांनी संपूर्ण भारतातून 420 वी रॅंक घेतली आहे. त्यांनी मिळवलेल्या मार्कवर एक नजर टाकूया..

Written Total 795
Interview 206
Final Total 1001

Ummul Kher Facts (IAS Success Story)

Rank: 420

CSE: 2016

Attempt: First

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career : Air Force मध्ये होणार महिला अग्निवीरांची भरती; हवाई दल प्रमुखांनी केली मोठी घोषणा

Career Agniveer Women Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। तरुणांना देशसेवेची संधी मिळावी, तसंच पुरेसं मनुष्यबळ (Career) उपलब्ध व्हावं या उद्देशानं भारतीय सैन्य दलात अग्निवीरांची भरती केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. तसंच त्याबाबतची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आता भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दि. 8 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आज वायुसेना दिनाचे औचित्य साधून दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यानुसार भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेतून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. तसंच हवाई दलात एक नवीन शाखा सुरू केली जाणार आहे.

‘वेपन सिस्टीम ब्रांच’

देशभरात दि. 8 ऑक्टोबर हा वायुसेना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Career) यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, आता हवाई दलात पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. तसंच नवीन ‘वेपन सिस्टीम ब्रांच’ अर्थात शस्त्र प्रणाली शाखा सुरू केली जाणार आहे. वायुसेना दिनानिमित्त चंडीगडमध्ये फुल डे रिहर्सलचं आयोजन करण्यात आलं आहे.

या दोन्ही घोषणांबाबत चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टीम ब्रांच तयार करण्यास मान्यता दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच नवीन ऑपरेशनल शाखा तयार होणार आहे. ही शाखा मूलतः हवाई दलातली सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली हाताळेल. यामुळे 3400 कोटी रुपयांची बचत होईल. तसंच पुढील वर्षापासून हवाई दलात महिला अग्निवीरांची भरती करण्यासंदर्भात योजना आखली जात आहे.”

3000 अग्निवीरांची होणार भरती (Career)

“भारतीय हवाई दलात करिअर करण्यासाठी प्रत्येक अग्निवीराकडे योग्य कौशल्य आणि ज्ञान असावं यासाठी आम्ही आमच्या ऑपरेशनल प्रशिक्षण पद्धतीत बदल केला आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही 3000 अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी हवाई दलात समाविष्ट करणार आहोत. पुरेसा कर्मचारी वर्ग असावा यासाठी येत्या काही वर्षांत ही संख्या वाढवण्यात येईल. पुढच्या वर्षीपासून महिला अग्निवीरांना सहभागी करून घेण्याचाही आमचा विचार आहे. या संदर्भातल्या पायाभूत सुविधांचं काम प्रगतिपथावर आहे;” असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.

अग्निपथ योजनेद्वारे हवाई दलात हवाई योद्ध्यांचा समावेश करणं हे आव्हानात्मक काम असू शकतं; पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हवाई दलाला भारताच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्याची ही संधी असेल. विशेष म्हणजे यावर्षी जूनमध्ये घोषित करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेवरून (Career) देशभरात वाद निर्माण झाला होता. यावरून अनेक ठिकाणी जाळपोळही झाली होती; मात्र जेव्हा सरकारने या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली, तेव्हा मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Exam : IBPS PO 2022 परीक्षेचे Admit Card जारी; असं करा Download

Exam IBPS Po Exam

करिअरनामा ऑनलाईन। IBPS PO ची प्रिलिम परीक्षा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार (Exam) आहे. यासाठी प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइट ibps.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे बँक PO ची एकूण 6432 पदे भरली जातील.

परीक्षेच्या तारखा –

IBPS PO मॅनेजमेंट ट्रेनी प्रिलिम्स परीक्षा 15, 16 आणि 22 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. परीक्षेत एकूण 100 गुणांचे 100 प्रश्न असतील. यासाठी उमेदवारांना (Exam) 60 मिनिटांचा वेळ असेल. पात्र उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील. मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना तिसरा टप्पा म्हणून मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (Exam)

सर्वप्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

PO साठी तुमचे ऑनलाइन प्राथमिक परीक्षेचे कॉल लेटर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एक नवीन पृष्ठ उघडेल, लॉगिन तपशील भरा आणि सबमिट करा.

IBPS PO Prelims 2022 चे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

ते डाउनलोड करा आणि तपासा.

परीक्षा केंद्रावर नेण्यासाठी कॉपीची प्रिंट आउट घ्या.

IBPS म्हणजे काय?

IBPS म्हणजे Institute of Banking Personnel Selection. IBPS ही अशीच एक संस्था आहे, जी बँकेतील नोकरीसाठी परीक्षा घेते. या संस्थेद्वारे भारतातील 11 सरकारी बँकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. मात्र यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा सामील (Exam) होत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची परीक्षा वेगळी घेण्यात येते.

या बँकांमध्ये मिळते नोकरी –

बँक ऑफ इंडिया

कॅनरा बँक

इंडियन ओव्हरसीज बँक

युको बँक

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ बडोदा

पंजाब नॅशनल बँक (Exam)

युनियन बँक ऑफ इंडिया

इंडियन बँक

पंजाब अँड सिंध बँक

बँक ऑफ महाराष्ट्र

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Exam Fever : UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोबाईल App लाँच; असं करा Download

Exam Fever

करिअरनामा ऑनलाईन। UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खूशखबर (Exam Fever) आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने एक Android मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. हे App विद्यार्थ्यांना UPSC परीक्षा आणि भरतीशी संबंधित माहिती प्रदान करेल. UPSC App अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि ते Google Play store वरून डाउनलोड करता येणे शक्य आहे.

अधिकृत निवेदनानुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुगल प्लेस्टोअरवर UPSC अँड्रॉइड अॅप सादर केले आहे, ज्याद्वारे परीक्षा आणि भरतीशी संबंधित सर्व माहिती मोबाईलवर मिळू शकते. मात्र हे अॅप मोबाईलवर अर्ज भरण्याची आणि सबमिट करण्याची सुविधा देणार नाही.

UPSC परीक्षेचे 3 टप्पे (Exam Fever)

UPSC केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेसह अनेक परीक्षा घेते. दरवर्षी हजारो उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करतात. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी अधिकारी निवडण्यासाठी नागरी सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यांत म्हणजेच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या स्वरूपात घेतली जाते.

या चुका करू नका

तुम्ही जर एकदा UPSC परीक्षेला बसला असाल तर तुम्हाला पेपर आणि इतर गोष्टींची कल्पना आली असेल. त्यामुळे आता तुमच्या चुकांमधून धडा घ्या आणि त्यांची पुनरावृत्ती (Exam Fever) करणे टाळा. मॉक टेस्ट मध्ये झालेल्या चुकांकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकलात तर पुन्हा ती चूक तुमच्याकडून कधीच होणार नाही.

Current Affairs कडे विशेष लक्ष द्या

सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत Current Affairs विषयी माहिती खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घेणं महत्वाचं आहे. वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारा संपादकीय स्तंभ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com