Home Blog Page 407

Career News : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं पुढे काय? केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका

Career News

करिअरनामा ऑनलाईन । रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे युक्रेनमध्ये (Career News) शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या मुलांना भारतात शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी पुढील सुनावणी

या प्रकरणात केंद्र सरकारनं आपली बाजू मांडून धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुलै 2022 नंतर परदेशात अर्धवट शिक्षण सोडून आलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देता येणार नाही, असं सुनावणीवेळी केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. तर शुक्रवारी या प्रकरणात (Career News) पुढील सुनावणी आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ मेनका गुरूस्वामी यांनी बाजू मांडली. त्या म्हणाल्या की, आपल्याकडे इतकी जिल्हा रुग्णालयं आहेत. विद्यार्थ्यांचं मेडिकल करिअर वाचवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाहीत का? देशात आधीच डॉक्टरांची कमतरता आहे. माणुसकीच्या नात्याने या प्रश्नावर विचार करून आपण त्यांना मदत करायला हवी.

भारतातील शिक्षण व्यवस्थेत हस्तक्षेप न करता आम्ही विद्यार्थ्यांची मदत करू इच्छितो, असा युक्तिवाद एएसजी ऐश्वर्या भाटी यांनी केला.

युक्रेनमधून मिड सेमिस्टरचे अर्धवट शिक्षण सोडून आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मेडिकल परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती. त्यामुळे त्यांना परदेशात शिक्षणासाठी जावं लागलं. ही बाब लक्षात घेत भारतात रुग्णांचे उपचार करण्याची परवानगी त्यांना मिळू शकत नाही, असं वकीलांनी म्हटलं आहे.

चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं काय (Career News)

चीनमधून ज्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आलं आहे, त्यांना मेडिकलचं शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या वकीलांनी केली. चीनमध्ये कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असून, मेडिकलचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सातव्या सेमिस्टरदरम्यान भारतात परत पाठवण्यात आलं आहे. तर तीन सेमिस्टरचा अभ्यास फिजिकल मोडमध्ये विद्यार्थी करू शकणार नसल्याचंही वकिलांनी निदर्शनास आणून दिलं.

चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या वकिलांनी (Career News) बाजू मांडताना म्हटलं की, देशातील अनेक राज्यांनी चीनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची परवानगी दिली आहे. परंतु, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांनी परवानगी दिलेली नाही. त्यांच्याकडे क्लिनिकल ट्रेनिंग फिजिकल होत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. दुसरीकडे मद्रास हायकोर्टानं चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची परवानगी दिली आहे.

शिक्षणाची टांगती तलवार 

दरम्यान, रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुमारे आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दोघांतील संघर्ष थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आहे. त्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या (Career News) आठवड्यात रशियानं या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याची ऑफर दिली आहे. परंतु, युक्रेनमधून मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मिळेल की नाही याबद्दल काही सांगता येत नसल्याचं चित्र सध्यातरी दिसत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : आईच्या मेहनतीचं लेकीनं फळ मिळवलं; परिस्थितीशी दोन हात करत MPSC परीक्षेत यश खेचून आणलं

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी अधिकारी होण्याची अनेक (Success Story) तरुण-तरुणींची इच्छा असते. MPSC परीक्षेत यश मिळवणीसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराश येते.  पण परिस्थितीला कारण न बनविता सातत्यापूर्ण प्रयत्न केले तर यश मिळतंच. याचं एक उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलगी विद्या यांचं. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

संपूर्ण राज्यात 6 वा क्रमांक 

विद्या कांदे असं त्यांचं नाव आहे. त्यांनी फक्त स्पर्धा परीक्षाच पास केली नाही तर संपूर्ण राज्यात कर निरीक्षक म्हणून 6 वा क्रमांक पटकवला आहे. विद्याचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2021 च्या (Success Story) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्याला 277.5 मार्क मिळाले आहेत. या गुणांसह विद्याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. 2021 साली विद्याने ही परीक्षा दिली होती. विद्याच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नोकरी करत केला अभ्यास (Success Story)

विद्याने सुरुवातीचे शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. 10 वी नंतर 11 वी व 12 वी चे शिक्षण तिने परभणी येथील नवोदय विद्यालयत पूर्ण केले व सध्या ती साखरा येथे ग्रामीण डाक सेवक या पदावर कार्यरत आहे. ही नोकरी करत असताना त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. या मेहनतीचे फळ त्यांना मिळालेच. महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक पदावर त्यांची निवड झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मुलींमधून त्यांनी 6वा क्रमांक पटकावला आहे.

यशामध्ये भावाचा सिंहाचा वाटा

विद्या यांच्या यशामागे त्यांच्या भावाचा सिंहाचा वाटा आहे. विद्या लहान असतांना त्यांचे वडील मृत्यू पावले. आई ने काबड कष्ट करू मुलाबाळांना शिकवले मात्र जसे मुले मोठी (Success Story) होत गेली तसा शिक्षणाचा खर्च वाढत होता. विद्याचा भाऊ विकास कांदे यांनी स्वतःच्या शिक्षणावर होणार खर्च कमी करून आपल्या बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल विद्या यांचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVS Recruitment 2022 : 12वी/D.Ed/B.Ed. उमेदवारांसाठी ‘ही’ पदे रिक्त; KVS ची 13,404 जागांवर मेगाभरती

KVS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी (KVS Recruitment 2022) एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत तब्बल 13,404 पदांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 डिसेंबर पासून सुरु होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – केंद्रीय विद्यालय संगठन

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

भरतीचा तपशील आणि आवश्यक पात्रता – (KVS Recruitment 2022)

प्राथमिक शिक्षक : 6414 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + D.Ed/ JBT/ B.Ed + CTET

प्राथमिक शिक्षक (संगीत): 303 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + D.Ed (Music)

सहाय्यक आयुक्त: 52 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.

प्राचार्य: 239 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.

उपप्राचार्य: 203 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.

TGT: 3176 पोस्ट
शैक्षणिक पात्रता : Graduate + B.Ed + CTET

PGT: 1409 पदे (KVS Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता : PG in Related Subject + B.Ed

ग्रंथपाल: 355 पदे
शैक्षणिक पात्रता : Degree/ Diploma in Lib. Science

सहाय्यक अभियंता: 02 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Tech in Civil Engg.

सहाय्यक: 156 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate

हिंदी अनुवादक: 11 पदे
शैक्षणिक पात्रता : PG in Hindi/ English

स्टेनोग्राफर ग्रेड-II: 54 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Steno

वित्त अधिकारी: 06 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Com/ M.Com/ CA/ MBA

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक: 322 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: 702 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Typing

पद संख्या – 13,404 पदे

वय मर्यादा – (KVS Recruitment 2022)

  1. या भरती प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
  2. काही श्रेणींसाठी वयातही सूट देण्यात आली आहे.
  3. PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
  4. TGT आणि ग्रंथपालांसाठी- कमाल वय 35 वर्षे
  5. PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे

अर्ज फी –

या भरती प्रक्रियेसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.

निवड प्रक्रिया –

  1. लेखी परीक्षा
  2. कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
  3. मुलाखत
  4. दस्तऐवज पडताळणी
  5. वैद्यकीय तपासणी

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (KVS Recruitment 2022)

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. KVS Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना पहा.
  3. अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. फॉर्म भरा.
  5. कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  6. अर्ज फी भरा.
  7. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.kvsangathan.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharati 2022 : तृतीय पंथीय करू शकणार का पोलीस भरतीसाठी अर्ज? न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज्य (Police Bharati 2022) सरकारला गृह विभागांतर्गत पदांसाठीच्या अर्जामध्ये ट्रान्सजेंडरसाठी तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने या आदेशाला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेची माहिती मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर देण्यात आली. ज्यामध्ये न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. 30 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.

पोलीस कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ट्रान्सजेंडर आर्य पुजारीने ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्जात स्त्री-पुरुष असे दोनच लिंग नमूद करण्यात आले असून, तृतीय लिंगाचा उल्लेख नसल्याने पुरोहितांना ऑनलाइन फॉर्म भरता आला नाही. पोलीस हवालदार (Police Bharati 2022) बनण्याची इच्छा असलेल्या ट्रान्सजेंडर आर्या पुजारीने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (MAT) संपर्क साधला होता. यानंतर, MAT ने 14 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला गृह विभागांतर्गत सर्व भरतीसाठी अर्जामध्ये पुरुष आणि महिला या दोन पर्यायांनंतर तृतीयपंथीयांना तृतीय पर्याय बनवण्याचे निर्देश दिले होते.

सरकारने ट्रान्सजेंडर्ससाठी शारीरिक मानके आणि चाचण्यांसाठी एक बेंचमार्क सेट करावा असे उच्च न्यायालयाकडून न्यायाधिकरणाचा आदेश रद्द करण्याची मागणी करताना ट्रिब्युनलने म्हटले. सरकारने आपल्या याचिकेत दावा केला आहे की, न्यायाधिकरणाच्या निर्देशाची अंमलबजावणी करणे “अत्यंत कठीण” आहे. कारण राज्य सरकारने अद्याप ट्रान्सजेंडर्सच्या भरतीसाठी विशेष तरतुदींबाबत कोणतेही धोरण तयार केलेले नाही. पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

न्यायाधिकरणाचा आदेश बेकायदेशीर आणि कायद्याने (Police Bharati 2022) चुकीचा असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी याचिकेत उच्च न्यायालयाने केली होती. ही प्रक्रिया “किचकट काम आणि लांबलचक प्रक्रिया” होती याचा विचार करण्यात न्यायाधिकरण अपयशी ठरले, असे याचिकेत म्हटले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment 2022 : सायंटिस्ट होण्याची संधी सोडू नका; ISRO मध्ये ‘या’ पदांवर बंपर भरती

ISRO Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन येथे लवकरच (ISRO Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian Space Research Organisation)

भरली जाणारी पदे –

  1. शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 21 पदे
  2. शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) – 14 पदे
  3. शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) – 33 पदे

पद संख्या – 68 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (ISRO Recruitment 2022)

  • शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.
  4. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. (ISRO Recruitment 2022)
  3. उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.
  4. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.
  4. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) – 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) – 250/- रुपये

असा करा अर्ज –

  1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज 29.11.2022 ते 19.12.2022 दरम्यान ISRO वेबसाइटवर होस्ट केला जाईल.
  3. नॅशनल करिअर सर्व्हिसेस (NCS) पोर्टल अंतर्गत नोंदणीकृत आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणारे उमेदवार नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून रीतसर अर्ज करू शकतात.
  4. अर्ज फक्त ऑनलाइन प्राप्त होतील.
  5. नोंदणी केल्यावर, अर्जदारांना एक ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल, जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे. (ISRO Recruitment 2022)
  6. अर्जामध्ये अर्जदाराचा ई-मेल आयडी अनिवार्यपणे द्यावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –https://apps.ursc.gov.in/CentralBE-2022/advt.jsp 

अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; राज्यातील ‘या’ शासकीय महाविद्यालयात भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Job Notification) यवतमाळ येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, सांख्यिकी अधिव्याख्याता, आवासी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे मुलाखतीची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

भरली जाणारी पदे –

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 17 पदे

संख्यिकि अधिव्याख्याता (Lecturer in Statistics) – 2 पदे

आवासी.(Resident) – 4 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • संख्यिकि अधिव्याख्याता (Lecturer in Statistics) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान M.B.B.S. MD P. S. M. / M. S. C Numerical पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (Job Notification)

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • आवासी (Resident) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS/MD/MS/DNB with M. M. C, Certificate of Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो
  7. मुलाखतीला येताना मुळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक.

अर्ज फी – 200/- रुपये (रोख)

मुलाखतीची तारीख – 08 डिसेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 वाजता

मुलाखतीचा पत्ता –

महाविद्यालय परीषद हॉल, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.vngmcytl.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : MAHA PREIT मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु; काय आहे पात्रता?

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा फुले नूतनीकरण योग्य ऊर्जा (Job Notification) आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे / ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – महात्मा फुले नूतनीकरण योग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित, मुंबई (MAHA PREIT)

भरली जाणारी पदे – (Job Notification)

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer ) – 11 पदे

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – 2 पदे

पद संख्या – 13 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  •  सहाय्यक अभियंता / Assistant Engineer –

शैक्षणिक पात्रता : ०१) (सिव्हिल) कोणत्याही शाखा मध्ये बी.ई./एम.टेक किंवा बी.ई. (विद्युत/ यांत्रिक/ /इलेक्ट्रॉनिक) ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव (Job Notification)

  • सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager –

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी (शेती) / एम.एस्सी (शेती) सह शेती-व्यवसाय व्यवस्थापन मध्ये एमबीए ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वय मर्यादा – 30 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 30,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director (Operations). Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd. (MAHAPREIT). B- 501, 502, Pinnacle Corporate Park, Next to Trade Centre, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

अर्ज पाठवण्याचा E-Mail ID – [email protected]

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahapreit.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : VNIT नागपूर येथे होणार मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना ‘या’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर (Job Alert) येथे रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून 124 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर

भरली जाणारी पदे – 

1) सुपरिंटेंडेंट – 06 पदे

2) पर्सनल असिस्टंट – 02 पदे

3) टेक्निकल असिस्टंट – 20 पदे

4) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 02 पदे

5) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 02 पदे

6) लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – 04 पदे

7) SAS असिस्टंट – 01 पद (Job Alert)

8) ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट – 20 पदे

9) ज्युनियर असिस्टंट – 13 पदे

10) सिनियर असिस्टंट – 05 पदे

11) स्टनोग्राफर – 03 पदे

12) सिनियर स्टनोग्राफर – 01 पदे

13) टेक्निशियन – 30 पदे

14) सिनियर टेक्निशियन – 15 पदे

पद संख्या – 124 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022

ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

1) सुपरिंटेंडेंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान उदा., वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट.

2) पर्सनल असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि.

3) टेक्निकल असिस्टंट 20
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech/MCA किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Sc किंवा 50% गुणांसह M.Sc

4) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (सिव्हिल) किंवा प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल) किंवा प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6) लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट 04 (Job Alert)
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी विज्ञान/कला/वाणिज्य पदवी (ii) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी

7) SAS असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात प्रथम श्रेणी पदवी

8) ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट 20
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण /12वी (विज्ञान) उत्तीर्ण

9) ज्युनियर असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.

10) सिनियर असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.

11) स्टनोग्राफर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.

12) सिनियर स्टनोग्राफर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 100 श.प्र.मि.

13) टेक्निशियन 30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

14) सिनियर टेक्निशियन 15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Job Alert)

वय मर्यादा –

27 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 33 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी – जनरल/ओबीसी: ₹400/- [SC/ST/PWD/EWS: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (Job Alert)

The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur 440 010.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharati 2022 : पोलीस भरती होणाऱ्या तरुणांसाठी दिलासा; अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवले

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन। नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती (Police Bharati 2022) प्रक्रियेसाठी शासनाच्या वेब साईटवर उमेदवारांकडून अर्ज भरले जात आहेत. मात्र ती वेबसाईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरातून 11 लाख 80 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मोठ्या संख्येने पोलीस भरती होत असल्याने लाखो तरुणांकडून ऑनलाईन अर्ज केले जात आहेत. मात्र, वेबसाईटवरील तांत्रिक बिघाडामुळे (Police Bharati 2022) त्यांना अर्ज भरता येत नाहीत. परिणामी तरुणांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत अजून 15 दिवस वाढवत आहोत. तसेच तरुणांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी केली होती मागणी (Police Bharati 2022)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्जांबाबत एक मागणी केली होती. “राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी, या तरुणांच्या भविष्याचा विचार करून, फॉर्म भरण्याची मुदत वाढवून द्यावी. यासोबतच सदर फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील दूर कराव्यात. या तरुणांच्या भविष्यासाठी राज्य सरकार 15 दिवस तरी नक्की मुदतवाढ देईल अशी खात्री आहे.”असे आव्हाड यांनी म्हटले होते.

नॉन क्रिमिलीयअर विषयी…

उमेदवारांना अर्ज भरताना नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मागील वर्षाचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र या वर्षी मिळतं. त्यामुळे मागील (Police Bharati 2022) वर्षीचं हे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. पोलीस भरती संदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी 

राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने ते डाऊन झाले आहेत. एक अर्ज सबमिट करण्यासाठी 4 ते 5 दिवस (Police Bharati 2022) लागत आहेत. 30 नोव्हेंबर ही अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरण्यासाठीची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवल्याची माहिती दिली. त्यामुळे 15 डिसेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCL Bharti 2022 : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘या’ पदांवर भरती; लगेच करा Apply

NCL Bharti 2022 1

करिअरनामा ऑनलाईन। नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये रिक्त (NCL Bharti 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’, सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) पदांच्या 405 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड

भरली जाणारी पदे – 

माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’

सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2022

पद संख्या – 405 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – खाजगी

निवड माध्यम – परीक्षा

भरतीचा तपशील – (NCL Bharti 2022)

  1. माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ – 374 दे
  2. सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) – 31 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’: १० वी उत्तीर्ण आणि माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र आणि गॅस परिक्षण प्रमाणपत्र आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा ३ वर्ष माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी आणि ओवरमन प्रमाणपत्र.
  2. सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग): १० वी उत्तीर्ण आणि सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा ३ वर्ष खाण/खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी आणि सर्व्हेअर प्रमाणपत्र. (NCL Bharti 2022)

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS: ₹१०००+१८०/-.

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.coalindia.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २२ डिसेंबर २०२२ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.coalindia.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com