Home Blog Page 40

IBPS Recruitment 2024 : नोकरी संदर्भात मोठी बातमी!! IBPS SO अंतर्गत 896 पदांसाठी भरती सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर तपशील…

संस्था – बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS)
भरली जाणारी पदे –
1. आयटी अधिकारी
2. कृषी क्षेत्र अधिकारी
3. राजभाषा अधिकारी
4. कायदा अधिकारी
5. एचआर/कार्मिक अधिकारी
6. विपणन अधिकारी
पद संख्या – 896 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 20 ते 30 वर्षे
अर्ज फी (IBPS Recruitment 2024) –
1. रु. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 175/- (GST सह).
2. रु. 850/- (जीएसटीसह) इतर सर्वांसाठी

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
आयटी अधिकारी170
कृषी क्षेत्र अधिकारी346
राजभाषा अधिकारी25
कायदा अधिकारी125
एचआर/कार्मिक अधिकारी25
विपणन अधिकारी205

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारी4 year Engineering/ Technology DegreePost Graduate Degree
कृषी क्षेत्र अधिकारी4 year Degree (graduation)
राजभाषा अधिकारीPost Graduate Degree
कायदा अधिकारीA Bachelor Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with Bar Council
एचआर/कार्मिक अधिकारीGraduate
विपणन अधिकारीGraduate

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज (IBPS Recruitment 2024) भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Exam Date 2024 : UPSC मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!! पहा परीक्षेची तारीख आणि वेळ

UPSC Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Date 2024) मुख्य परीक्षा 2024 देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने IAS मुख्य परीक्षेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.

परीक्षेची तारीख आणि वेळ
ज्या उमेदवारांनी प्राथमिक परीक्षेत यश मिळवले आहे आणि आता ते मुख्य परीक्षेला बसणार आहेत असे उमेदवार UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अधिसूचना डाउनलोड करून परीक्षांच्या तारखा पाहू शकतात. CSE मुख्य परीक्षा UPSC द्वारे दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार असून पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत घेतली जाईल.

असं डाउनलोड करा वेळापत्रक (UPSC Exam Date 2024)
1. उमेदवारांनी विषय, तारीख आणि शिफ्टनुसार वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी प्रथम UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यायची आहे.
2. वेबसाइटच्या होम पेजवर नवीन काय आहे, या विभागात परीक्षा वेळापत्रक नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2024 वर क्लिक करा. यानंतर PDF उघडेल.
3. आता तुम्ही समोर दिसणारे वेळापत्रक डाउनलोड करून प्रिंट काढून घेऊ शकता.

प्रवेशपत्रा संदर्भात महत्वाचे..
प्रवेशपत्रे फक्त अशाच उमेदवारांना दिली जातील जे पूर्व (UPSC Exam Date 2024) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची प्रवेशपत्रे UPSC CSE मुख्य परीक्षा २०२४ परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : जिद्द मनात होती.. अंधत्वावर मात करायची होती..; लढली.. धडपडली अखेर IAS बनलीच

UPSC Success Story of IAS Poorna Sundari

करिअरनामा ऑनलाईन । आपण असे अनेक लोक (UPSC Success Story) पाहतो जे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या नशिबाला दोष देत असतात. पण खरे पाहता माणसाने ठरवले तर स्वतःचे नशीब तो स्वतःच लिहू शकतो. तमिळनाडूतील मदुराई येथील रहिवासी असलेल्या पूर्णा सुंदरी हे तरुण पिढीसाठी उत्तम उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पूर्णाने आपली दृष्टी गमावली, पण तिने हार मानली नाही आणि IAS अधिकारी बनून ती सर्वांसाठी प्रेरणा बनली.

वडील होते सेल्स एक्झिक्युटिव्ह
पूर्णाने 2019 मध्ये UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून 286 वा क्रमांक मिळवला आहे. तिने तिच्या कर्तबगारीने हे सिद्ध केले आहे; की एखादी व्यक्ती तिच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कठोर (UPSC Success Story) परिश्रमाने काहीही करू शकते. पूर्णाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरखर्च चालवण्यासाठी वडील एका खाजगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचे. पूर्णाच्या जन्मानंतर ते खूप आनंदी होते. त्यांना आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची होती आणि तिला खूप शिकवायचे होते.

वयाच्या 5 व्यावर्षी गमावली दृष्टी (UPSC Success Story)
पूर्णा लहान होती. ती 5 वर्षाची असताना तिची दृष्टी गेली. तिच्या कुटुंबीयांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. पण पूर्णाने ठरवलं होतं की ती तिच्या वडिलांना अभिमान वाटेल; असे काहीतरी करुन दाखवेल. मदुराई येथील पिल्लिमर संगम उच्च माध्यमिक विद्यालयातून तिने प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर फातिमा कॉलेज, मदुराई येथून तिने इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

IAS बनून स्वतःचं नशीब बदललं
पूर्णा दृष्टिहीन होती; त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तिच्या या प्रवासात प्रत्येक पावलावर तिला तिच्या आई-वडिलांनी साथ दिली. यूपीएससीच्या (UPSC) तयारीदरम्यान, असे अनेक प्रसंग आले जेव्हा काही अभ्यास साहित्य ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत पूर्णाच्या आई-वडिलांनी तिच्या काही मैत्रिणींसह अनेक पुस्तकांचे ऑडिओ स्वरूपात रूपांतर करण्याचे काम केले. पूर्णाच्या मेहनतीला फळ मिळाले आणि तिने IAS होऊन स्वतःचं नशीब पालटलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2024 : जिल्हा परिषद, सातारा येथे ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदावर भरती सुरू; असा करा अर्ज

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत भरती (ZP Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – डेटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (ZP Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सातारा जिल्हा परिषद, सातारा

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे
मिळणारे वेतन – रु. 20,650/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
डेटा एन्ट्री ऑपरेटर1. किमान इ. 12 वी पास (पदवीधर 4 उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल)
2. मराठी टंकलेखन 30 शब्द प्र. मि.
3. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्र.मि.
4. MS-/CIT किंवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण

असा करा अर्ज (ZP Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करताना सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांना कॉन्स्टेबल पदावर नोकरी; इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरतीची मोठी संधी

ITBP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी (ITBP Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि वेतनाविषयी सविस्तर…

संस्था – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल
पद संख्या – 51 पदे (ITBP Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 21,700 ते 69,100/- दरमहा
असा करा अर्ज – (ITBP Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 20 जुलै 2024 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
7. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती जोडा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://recruitment.itbpolice.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत (Banking Job) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी, साहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.
भरली जाणारी पदे –
1. व्यवस्थापक (Banking Job)
2. उपव्यवस्थापक
3. वरिष्ठ अधिकारी
4. कनिष्ठ अधिकारी
5. साहाय्यक कनिष्ठ अधिकारी
पद संख्या – 35 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय, 516/2, शनिवार पेठ, कराड, जि. सातारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, सातारा, सांगली, पुणे
वय मर्यादा (Banking Job) – 40 वर्षे

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक10
वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी10
साहाय्यक कनिष्ठ अधिकारी15

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक/ उपव्यवस्थापकपदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB, CAIIB, ICWA, CA असल्यास प्राधान्य
वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारीपदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB, CAIIB, असल्यास प्राधान्य
साहाय्यक कनिष्ठ अधिकारीपदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB असल्यास प्राधान्य

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर सादर करा.
3. अर्जासोबत आवश्यक (Banking Job) कागदपत्राची प्रत जोडा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.karadurbanbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Maritime University Recruitment 2024 : भारतीय सागरी विद्यापिठात ‘या’ पदावर नोकरीची संधी

Indian Maritime University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University Recruitment 2024) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक
पद संख्या – 27 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – ६४ वर्षे (Indian Maritime University Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidate should have completed Graduation from any of the recognized boards or Universities.

असा करा अर्ज (Indian Maritime University Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.imu.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEET PG 2024 : NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । नीट पीजी (NEET PG) परीक्षेबाबत महत्वाची (NEET PG 2024) अपडेट हाती आली आहे. नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी घ्यावी; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ NEET PG परीक्षा आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाईल. NEET PG परीक्षा दि. 11 ऑगस्ट 2024 (रविवार) रोजी होणार आहे.

NEET PG प्रकरणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले आहे?
NEET PG प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी हा निकाल दिला आहे. खंडपीठाने सांगितले की NEET PG परीक्षेच्या काही दिवस आधी ते पुढे ढकलण्याचे आदेश देऊ शकत नाही. ही याचिका विशाल सोरेन नावाच्या उमेदवाराने दाखल केली आहे. यामध्ये असे लिहिले होते की NEET PG उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागेल.

सर्वोच्च न्यायालयाने NEET PG प्रकरणी सुनावणी पूर्ण करताना म्हटले आहे की, आजकाल लोक फक्त परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतात. पण आम्ही 5 याचिकाकर्त्यांसाठी 2 लाखांपेक्षा (NEET PG 2024) जास्त उमेदवारांशी खेळू शकत नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेची आधीच तयारी केली आहे आणि परीक्षेच्या २ दिवस आधी पुढे ढकलल्याने त्यांचा वेळ वाया जाईल. NEET PG 2024 परीक्षेशी संबंधित प्रत्येक तपशील nbe.edu.in आणि natboard.edu.in वर तपासला जाऊ शकतो.

170 शहरांमध्ये 416 केंद्रांवर होणार परीक्षा (NEET PG 2024)
NBEMS 11 ऑगस्ट 2024 रोजी देशातील 170 शहरांमध्ये स्थापन केलेल्या 416 केंद्रांवर NEET PG परीक्षा आयोजित करेल. NEET PG परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. यावर्षी NEET PG परीक्षेसाठी 2,28,542 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळाने NEET PG प्रवेशपत्र देखील जारी केले आहे. NEET PG परीक्षेस बसलेले सर्व उमेदवार NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : कमांड हॉस्पिटल, पुणे येथे विविध पदांवर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । कमांड हॉस्पिटल, पुणे अंतर्गत विविध (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष), माळी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – कमांड हॉस्पिटल, पुणे
भरले जाणारे पद – हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष), माळी
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक रजिस्ट्रार, कमांड हॉस्पिटल (SC) वानवरी, पुणे – 411 040

वय मर्यादा – 40 वर्ष
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – कमांड हॉस्पिटल (SC), वानोरी, पुणे 411 040
मुलाखतीची तारीख – 23 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Government Job) –
1. House Keeping Staff – Experience in Housekeeping.
2. Gardener – Experience in gardening.

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष)02 पदे
माळी01 पदे

मिळणारे वेतन –

पदवेतन
हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष)Rs 12,953/-
माळीRs. 12,953/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचा केला जाणार नाही.
अशी होणार निवड –
1. या पदांसाठी निवड (Government Job) मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
4. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट –
https://afmc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GAIL India Recruitment 2024 : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 पदांवर भरती; अर्जासाठी त्वरा करा

GAIL India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध (GAIL India Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गैर-कार्यकारी पदांच्या एकूण 391 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – गेल इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – गैर-कार्यकारी
पद संख्या – 391 पदे (GAIL India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
6. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (GAIL India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://gailonline.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com