Home Blog Page 39

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने (7th Pay Commission) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. सध्या या नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून सुधारित होणार आहे.

जुलैपासूनच्या महागाई भत्त्यात एवढी वाढ होणार
एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरवला जातो. जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरवला जाणार आहे. जुन 2024 पर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून नुकतीच जाहीर (7th Pay Commission) करण्यात आली आहे. यामुळे आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता कितीने वाढणार हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जारी झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार जुलैपासूनचा महागाई भत्ता हा 53.44% एवढा होणार आहे. मात्र प्रत्यक्षात महागाई भत्त्यात तीन टक्क्यांचीच वाढ होणार आहे म्हणजे हा भत्ता 53% एवढा होणार आहे. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय हा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत होणार निर्णय (7th Pay Commission )
ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकार कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक घेईल आणि यामध्ये महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

जानेवारी ते जून महिन्याची SICPI आकडेवारी अशी आहे
– जानेवारी महिन्यात एआयसीपीआयचे निर्देशांक 138.9 होते अन महागाई भत्ता दर 50.84% होते.
– फेब्रुवारीमध्ये हे निर्देशांक १३९.२ अन (7th Pay Commission) महागाई भत्ता दर 51.44% होते. मार्च महिन्यात हे निर्देशांक 138.9 अन महागाई भत्ता दर 51.95% होते.
– एप्रिल महिन्यात हे निर्देशांक 139.4 अन महागाई भत्ता दर 52.43% होते.
– मे महिन्यात हे निर्देशांक 139.90 अन DA दर 52.91 एवढे होते.
– जून महिन्यात निर्देशांक 141.4 अन महागाई भत्ता दर 53.44% एवढे होते.

फरकाची रक्कमही मिळणार
हा भत्ता जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने ऑक्टोबर (7th Pay Commission) महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ‘इथे’ होतेय ड्रायव्हर पदावर भरती; थेट द्या मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र, अमरावती (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून ड्रायव्हर / इन्स्ट्रक्टर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र, अमरावती
भरले जाणारे पद –
1. ड्रायव्हर
2. इन्स्ट्रक्टर (Job Alert)
3. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
पद संख्या – 6 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 ऑगस्ट 2024
मुलाखतीचा पत्ता – RDTC, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जवळ, मासोद, मार्डी रोड, अमरावती – ४४४६०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
ड्रायव्हर / इन्स्ट्रक्टरप्रमाणित ITI (मोटर मेकॅनिक) / अभियांत्रिकी / डिप्लोमा (मेकॅनिकल इंजी.), HMV (ट्रक / बस) / LMV (कार) ५ वर्षांच्या अनुभवासह परवाना
मार्केटिंग एक्झिक्युटिव्हकोणताही पदवीधर (मार्केटिंगचे चांगले ज्ञान)

अशी होणार निवड (Job Alert) –
1. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.
4. मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://rdtcamt.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिका आणि NHM अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी

BMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा (BMC Recruitment 2024) असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरली जाणारी पदे – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई
पद संख्या – 05 पदे

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
भरतीचा तपशील – (BMC Recruitment 2024)

पदपद संख्या 
वैद्यकीय अधिकारी01
स्टाफ नर्स02
सहाय्यक कर्मचारी01
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS degree
स्टाफ नर्सGNM/ Basic B.Sc Nursing/M.Sc Nursing
सहाय्यक कर्मचारी10th Pass
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षकAny Medical Graduate/ BSc Home Science Food & Nutrition/ BSc Nursing

मिळणारे वेतन –

पदवेतन
वैद्यकीय अधिकारी60,000/‐ दरमहा
स्टाफ नर्स20,000/‐दरमहा
सहाय्यक कर्मचारी15,500/‐ दरमहा
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक40,000/‐ दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वरील पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये सर्व आवश्यक (BMC Recruitment 2024) पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahapareshan Recruitment 2024 : 10 वी पास असणाऱ्यांसाठी महापारेषण अंतर्गत नवी मुंबई येथे नोकरीची संधी

Mahapareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि 10 वी (Mahapareshan Recruitment 2024) पास असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी नोकरी संदर्भात आनंदाची बातमी आहे. महापारेषण, नवी मुंबई अंतर्गत ‘शिकाऊ’ (अपरेंटिस विजतंत्री) पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – महापारेषण, नवी मुंबई
भरले जाणारे पद – शिकाऊ (अपरेंटिस विजतंत्री)
पद संख्या – 64 पदे (Mahapareshan Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊमहाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उर्तीण.राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उर्तीण.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी येथे दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Mahapareshan Recruitment 2024) सूचना काळजीपूर्वक वाचावी.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HUDCO Recruitment 2024 : गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रा. लि. येथे विविध पदांवर भरती सुरू

HUDCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गृहनिर्माण आणि नागरी विकास (HUDCO Recruitment 2024) वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी निदेशक, कार्यकारी निदेशक, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक, सहायक महाप्रबंधक, वरिष्ठ प्रबंधक, प्रबंधक, प्रशिक्षु अधिकारी पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी येथे दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ कार्यकारी निदेशक
2. कार्यकारी निदेशक
3. महाप्रबंधक
4. उप महाप्रबंधक
5. सहायक महाप्रबंधक
6. वरिष्ठ प्रबंधक
7. प्रबंधक
8. प्रशिक्षु अधिकारी
पद संख्या – 66 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 52 वर्षे
भरतीचा तपशील – (HUDCO Recruitment 2024)

पदपद संख्या 
वरिष्ठ कार्यकारी निदेशक01
कार्यकारी निदेशक01
महाप्रबंधक01
उप महाप्रबंधक02
सहायक महाप्रबंधक11
वरिष्ठ प्रबंधक12
प्रबंधक05
प्रशिक्षु अधिकारी33

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. फी भरण्यापूर्वी आणि (HUDCO Recruitment 2024) ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता निश्चित करावी.
4. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://hudco.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : पुरुष आणि महिलांसाठी स्टाफ नर्स पदावर भरती सुरू; ‘इथे’ पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष) पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – जळगाव महानगरपालिका, जळगाव
पद संख्या – 45 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टाफ नर्स (पुरुष) – 03 पदे
पात्रता : GNM / B.Sc Nursing
2. स्टाफ नर्स (महिला) – 18 पदे
पात्रता : GNM / B.Sc Nursing
3. MPW (पुरुष) – 24 पदे
पात्रता : 12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१

मिळणारे वेतन (Job Notification) –
1. स्टाफ नर्स (पुरुष)- Rs.20, 000/- दरमहा
2. स्टाफ नर्स (महिला) – Rs.20,000/- दरमहा
3. MPW (पुरुष)- Rs.18,000/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : शिक्षक सेवक पदावर भरती; ‘इथे’ करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक डायोसेसन कौन्सिल अंतर्गत (Job Alert) भरती निघाली आहे. शिक्षक सेवक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – नाशिक डायोसेसन कौन्सिल
भरले जाणारे पद – शिक्षक सेवक
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नाशिक डायोसेशन कौन्सिल, पी.टी.आर.डी.-२, नाशिक

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार एच.एस.सी.डी.एड. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज दिलेल्या नमुन्यात (Job Alert) परिपूर्ण भरलेला असावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : कॅन्सरशी लढा… एका आयडियाने केली कमाल… उभारली विमान भाड्याने देणारी कंपनी

Business Success Story of Kanika Tekriwal

करिअरनामा ऑनलाईन । एखादं ध्येय साध्य करण्याची जिद्द मनामध्ये (Business Success Story) ठाम असेल तर मेहनत आणि धाडसाने अशक्यही गोष्ट शक्य होते. भारतीय महिला व्यावसायिक कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal) या तरुणांपूढे आदर्श उभा करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. कनिका यांनी तरुण वयातच कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराला यशस्वी लढा दिला. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांनी आपल्या व्यवसाय कल्पनेच्या जोरावर करोडोंचा बिझनेसही उभा केला. कनिका यांनी सुरू केलेल्या जेटसेटगो स्टार्टअपला देशभरात ओळख मिळाली आहे. कनिका यांनी आपल्या क्षेत्रात कसा ठसा उमटवला आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत….

१९९० मध्ये एका मारवाडी कुटुंबात कनिका यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रिअल इस्टेट आणि रसायन क्षेत्रात व्यवसाय करतात. वयाच्या 20 व्या वर्षी कनिका यांना कर्करोगाचे (Business Success Story) निदान झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी फक्त कर्करोगावर मात केली नाही तर करोडोंचा व्यवसायही उभा केला.

सुरू केली विमान भाड्याने देणारी पहिली कंपनी (Business Success Story)
कनिका यांनी देशातील विमान भाड्याने देणारी पहिली कंपनी सुरू केली. ‘जेटसेटगो’ असं या कंपनीचं नामकरण करण्यात आलं. भारतातील या पहिल्यावहिल्या कंपनीच्या कनिका टेकरीवाल संस्थापक आहेत. कॅन्सरशी लढा जिंकण्यापासून ते करोडोंचे साम्राज्य उभारण्यापर्यंतची कनिका यांची कहाणी खूप रंजक आहे. यामधून त्यांच्या जिद्दचे प्रदर्शन होते.

कनिका यांनी २०१२ मध्ये गेमचेंजर स्टार्टअप सुरू केला होता. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांना व्यवसायाची कल्पना सूचली आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी आजाराविरुद्धची लढाई तर जिंकलीच शिवाय आपली कंपनी सुरू करून एका वेगळ्या उंचीवर नेली आहे.

काय आहे जेटसेटगो स्टार्टअप
३३ वर्षीय कनिका यांनी अगदी कमी वयात सुमारे ४२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे. जेटसेटगो हे त्यांचे स्टार्टअप भाडेतत्वावर चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टर उपलब्ध करून देणारे एक आघाडीचे एअरक्राफ्ट एग्रीगेटर म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे कंपनीने (Business Success Story) आतापर्यंत एक लाख प्रवाशांसाठी तब्बल 6 हजार उड्डाणे केली आहेत.

व्यवसायाची कल्पना कशी सुचली?
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढा देत असताना कनिका यांना आगळावेगळा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. कनिका यांनी जेटसेटगो सुरू करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी प्रथम त्यांच्या वडिलांना विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यावसायिक कल्पनेबद्दल सांगितले. ही कल्पना त्यांच्या वडिलांना फारशी पसंत पडली नाही. वडिलांच्या नाकारानंतरही कनिका आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंत जाणून घेतल्यानंतर व्यवसायाला मूर्त स्वरूप द्यायचे ठरवले.

‘सेल्फ मेड’ महिला
कनिका यांचा व्यवसाय वेग घेत होता. जिद्द आणि चिकाटीच्या (Business Success Story) जोरावर त्यांच्या व्यवसायाची घोडदौड सुरू होती. विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याची त्यांची कल्पना यशस्वी ठरली होती. भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक कनिका टेकरीवाल यांना ‘हुरुन रिच’ लिस्टमध्ये देशातील सर्वात श्रीमंत ‘सेल्फ मेड’ महिलांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आलं आहे तसंच त्यांना भारत सरकारकडून राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, उद्योजक मासिकाने ‘द स्काय क्वीन’ या पदवीने त्यांना सन्मानित केले आहे. आज कनिकाची स्वतःची 10 खासगी विमाने आहेत. त्यांनी हैदराबाद येथील एका मोठ्या व्यावसायिकाशी लग्न केलं आहे. कुटुंब सांभाळण्यासह त्या अगदी कौशल्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मुलाखतीत विचारले जातात ‘असे’ 8 प्रश्न

GK Updates 10 Aug.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : तमिळनाडू
2. एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी (GK Updates)
3. भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट
4. नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश

5. भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर
6. आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान
7. ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
8. प्रत्येक घरात एलपीजी गॅस (GK Updates) जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NABFID Recruitment 2024 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

NABFID Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग (NABFID Recruitment 2024) इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट
भरले जाणारे पद – उपाध्यक्ष
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
25 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – 21 ते 32 वर्षे (NABFID Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपाध्यक्षGraduate
Postgraduate
Degree

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक माहिती द्या.
4. सर्व आवश्यक पात्रता (NABFID Recruitment 2024) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
6. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nabfid.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com