Home Blog Page 362

Sports Success Story : जिद्द यालाच म्हणतात!! वडिलांनी जमीन विकून रायफल आणली; मुलानं जिद्दीनं मैदान मारलं

Sports Success Story Devansh Priya

करिअरनामा ऑनलाईन । यशाच्या मार्गात अडथळे येणं अटळ आहे. पण जो (Sports Success Story) हार न मानता अडथळे पार करतो, तोच निश्चित ध्येय गाठू शकतो. पंजाबचा रायफल शूटर देवांश प्रियने उत्तुंग कामगिरी करुन दाखवली आहे. देवांशने अखिल भारतीय विद्यापीठ रायफल नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. देवांशच्या या यशानंतर आता त्याच्या घरी त्याचं अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

देशात आज अनेक खेळाडू प्रतिकूल परिस्थितीतवर मात करत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचं नाव उंचावत आहेत. कोणत्याही खेळाडूच्या यशात प्रशिक्षकांसोबत (Sports Success Story) पालकांचा मोठा वाटा असतो. आपल्या मुलांची खेळाची आवड जोपासण्यासाठी अनेक पालक मोठ्या कष्टाने किंवा प्रसंगी कर्ज काढून त्यांच्या मुलांची खेळाशी निगडीत गरज भागवतात. आपल्या मुलानं त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी व्हावं; ही त्यांची भूमिका असते. विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या देवांश प्रियची कहाणी अशीच आहे.

सरावासाठी रायफल नव्हती (Sports Success Story)

सराव करण्यासाठी देवांशकडे रायफल नसल्याचे समजताच त्याच्या वडिलांनी जमीन विकून देवांशसाठी महागडी प्रोफेशनल रायफल खरेदी केली. देवांशनेदेखील वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं.

जिंकले सिल्व्हर मेडल

देवांश प्रियने दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय विद्यापीठ 2023 स्पर्धेत 50 मीटर 3p स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या टुर्नामेंटमधील शूटींग स्पर्धांमध्ये देशातील टॉप 77 विद्यापीठांना (Sports Success Story) आमंत्रित करण्यात आले होते. यात प्रतिभावान ऑलम्पिक स्तरावरील खेळाडूंचा ही समावेश होता. यामध्ये देवांशने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसोबत देवांश या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ‘खेलो इंडिया गेम्स’साठी पात्र ठरला आहे.

वडिलांनी जमीन विकून रायफल खरेदी केली

सहरसा येथील रहिवासी असलेले देवांशचे वडील बी.एन. सिंह म्हणाले; “हे यश मिळवण्यासाठी त्याने घेतलेल्या कष्टाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. एक वेळ अशी होती की देवांशला रायफलची गरज होती. पण ती खरेदी करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी शहरी भागातील जमीन (Sports Success Story) विकून माझ्या मुलाला रायफल खरेदी करून दिली.” देवांश प्रिय पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. या पूर्वी तो केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या नॅशनल 50 मीटर थ्री पी अँड प्रोन साइड रायफल शूटिंग स्पर्धेत तो पात्र ठरला होता. त्यानंतर त्याची नॅशनल रिनाउंड शूटर म्हणून निवड झाली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Forbes Richest Women : या महिलेच्या घरात नांदतेय श्रीमंती!! आहे 21 हजार कोटींची मालकीण; भेटा सेल्फ मेड वुमन राधा वेंबू यांना

Forbes Richest Women

करिअरनामा ऑनलाईन । राधा वेंबू या भारतीय महिलेची संपत्ती 21,000 कोटी (Forbes Richest Women) रुपये आहे असं सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणं थोडं अवघडच आहे. पण ही गोष्ट खरी आहे. राधा वेम्बू या सध्या भारतामधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. खांद्यावर अडकवलेली पर्स, हलक्या रंगाची साडी आणि कपाळावर लावलेली टिकली अशा पेहरावात त्यांना पाहिल्यास कोणीही म्हणेल की ही एखादी सर्वसाधारण महिला आहे. पण सत्य काही वेगळेच आहे.  स्वत: संपत्ती कमवलेल्या म्हणजेच सेल्फ मेड माहिलांच्या यादीमध्ये राधा या तिसऱ्या स्थानी आहेत. पूर्वी या स्थानावर किरन मुझूमदार-शॉ आणि फाल्गुनी नायर यासारख्या महिला होत्या.

Forbes Richest Women

जागतिक श्रीमंताच्या यादीत मिळवलं स्थान

राधा यांची एकूण संपत्ती 2.6 कोटीअमेरिकी डॉलर्स म्हणजेच 21 हजार 455 कोटी रुपये इतकी असल्याचा उल्लेख ‘फोर्ब्स’च्या ‘रियल टाइम रिच’च्या यादीत आहे. राधा या जागतिक स्तरावरील श्रीमंतांच्या यादीमध्ये 1176 व्या स्थानी आहेत. राधा यांची झोहो कॉर्प कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक (Forbes Richest Women) असून या हिस्सेदारीचाच त्यांच्या संपत्तीचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. झोहो कॉर्प ही एक खासगी आयटी कंपनी असून ती राधा आणि त्यांच्या भावांनी स्थापन केली होती. या कंपनीमधील सर्वात मोठा वाटा हा राधा यांच्या नावावर आहे.

Forbes Richest Women

‘अॅडवेन्टनेट’ नावाने भावांबरोबर स्थापन केली कंपनी

राधा यांचा जन्म 1972 साली झाला. त्यांचे वडील मद्रास हायकोर्टामध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करायचे. त्यांनी आयआयटी मद्रासमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटपर्यंतचं पदवी शिक्षण आयआयटी मद्रासमधून घेतलं. 1996 साली राधा यांनी त्यांचे (Forbes Richest Women) भाऊ श्रीधर वेम्बू आणि शेखर वेम्बू यांच्या मदतीने अॅडवेन्टनेट नावाने कंपनी सुरु केली. श्रीधर हे या कंपनीचे संस्थापक म्हणून लोकप्रिय आहेत तर शेखर हे पडद्यामागील सर्वात मोठ्या आधारस्तंभांपैकी एक आहेत.

अमेरिकेत आहे तब्बल 375 एकरांवर ऑफिस (Forbes Richest Women)

राधा या स्वत: ‘झोहो मेल्स’च्या प्रोडक्ट मॅनेजर आहेत. त्या 250 जणांची टीम संभाळतात. त्या सध्या चेन्नईमधून काम करतात. झोहोच्या मुख्य कार्यालयांपैकी एक चेन्नईमध्येच आहे. तसेच झोहोचं 375 एकरवर पसरलेलं मुख्यालय अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे आहे.

Forbes Richest Women

Wappला देणार चॅलेंज

झोहो कंपनीचे एकूण युझर्स हे 6 कोटींच्या आसपासून असून जगातील 9 देशांमध्ये याचे युझर्स आहेत. याच कंपनीच्या मालकीची झोनो नावाची कंपनी असून ती क्लाऊड (Forbes Richest Women) बिझनेस सॉफ्टवेअरमध्ये कार्यरत आहे. सध्या ही कंपनी व्हॉट्सअपला आव्हान देणाऱ्या ‘अरत्ताई’ या सॉफ्टवेअरच्या बीटा व्हर्जनची टेस्टींग करत आहे. ‘अरत्ताई’चा तमिळ भाषेतील अर्थ संवाद असा होतो.

Forbes Richest Women

या कंपन्यांमध्ये आहेत डायरेक्टर

राधा या जानकी हाय-टेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कृषी आधारित एनजीओमध्ये डारेक्टर आहेत. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील हायलॅण्ड व्हॅली कॉर्पोरेशन प्रायव्हेट (Forbes Richest Women) लिमिटेड या कंपनीमध्येही राधा या डायरेक्टर आहेत. राधा या विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : MPSCची मोठी अपडेट!! 8169 पदांच्या भरतीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या सरकारी सेवेत दाखल होवू इच्छिणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढे उल्लेख केलेल्या संवर्गातील एकूण 8169 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता आयोगाकडून या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 असणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी त्वरीत अर्ज करा.

संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पद संख्या – 8169

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)

  1. सहायक कक्ष अधिकारी:- 78 पदे
  2. राज्यकर निरीक्षक :-159 पदे
  3. पोलीस उपनिरीक्षक:- 374 पदे
  4. दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-49 पदे (MPSC Recruitment 2023)
  5. दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) :- 6 पदे
  6. तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) :- 1 पदे
  7. कर सहाय्यक, गट-क (वित्त) :- 468 पदे
  8. लिपिक-टंकलेखक :- 7034 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कर सहाय्यक, गट-क (वित्त)
उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

उमेदवराकडे  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. कौशल्य असणे आवश्यक आहे.

लिपिक-टंकलेखक –

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. (MPSC Recruitment 2023)

उमेदवराकडे  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. कौशल्य असणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या तारखा –

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येतील.

  1. महाराष्ट्र अराजपत्रित गट व सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ – ०२ सप्टेंबर २०२३
  2. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३  – ०९ सप्टेंबर २०२३

महत्वाची सूचना –

1. पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे.
2. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
3. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा (MPSC Recruitment 2023) करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच समाजाच्या उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याबाबत (नॉन क्रीमीलेअर) (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

4. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

आवश्यक शारीरिक क्षमता –

पुरुष –
उंची – १६५ सें मी (MPSC Recruitment 2023)
छाती न फुगविता : ७९ सें मी
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें मी

महिला – १५७ सें मी

वय मर्यादा – १ मे २०२३ रोजी

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी : ३१ वर्ष
इतर सर्व पदांसाठी : ३८ वर्ष
[मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी –
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/- (MPSC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 1

मुदतवाढ – PDF

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 10 वी पास ते ग्रॅज्युएटसाठी Income Tax Departmentमध्ये भरती सुरु; त्वरा करा

Government Jobs (15)

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या आयकर विभागामध्ये विविध रिक्त (Government Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या 71 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – आयकर विभाग, भारत सरकार

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023

पद संख्या – 71 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरली जाणारी पदे –

  1. आयकर निरीक्षक – 10 पदे
  2. कर सहाय्यक – 32 पदे
  3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 29 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

  • आयकर निरीक्षक – पदवीधर आणि क्रीडा पात्रता असावी.
  • कर सहाय्यक – पदवीधर आणि क्रीडा पात्रता असावी.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10 वी उत्तीर्ण आणि क्रीडा पात्रता असावी.

मिळणारे वेतन –

  1. आयकर निरीक्षक – ₹४४९००/- ते ₹१४२४००/- दरमहा
  2. कर सहाय्यक – ₹२५५००/- ते ₹८११००/- दरमहा
  3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – ₹१८०००/- ते ₹५६९००/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष
जास्तीत जास्त – ३० वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS – ₹१००/-

SC/ST – फि नाही. (Government Jobs)

PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज – 

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता. (Government Jobs)
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

Commissioner of Income Tax (Admin and TPS), O/o Principal Chief Commissioner of Income-Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building, No. I, Queen’s Road, Bengaluru, Karnataka-560001

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Vacancy : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन । औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, (Job Vacancy) औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 49 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद

भरले जाणारे पद – (Job Vacancy)

  1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 16 पदे
  2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 03 पदे
  3. स्टाफ नर्स – 12 पदे
  4. औषधनिर्माता – 07 पदे
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 08 पदे
  6. एसटीएस – 01 पद
  7. फील्ड मॉनिटर 02 पदे

पद संख्या – 49 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

वय मर्यादा –

  1. वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  2. स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर – 65 वर्षे

अर्ज फी – 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/- (Job Vacancy)

अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, महानगरपालिका मुख्य कार्यालय, टाऊन हॉल , औरंगाबाद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS or equivalent degree from an institution recognized by the Medical Council of India Must have completed compulsory rotatory internship
  2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS or equivalent degree from an institution recognized by the Medical Council of India Must have completed compulsory rotatory internship
  3. स्टाफ नर्स – 12th pass with GNM course
  4. औषधनिर्माता – D. Pharm /B.Pharm /M.Pharm
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc. with DMLT (Job Vacancy)
  6. एसटीएस – Any Graduate with typing skill Marathi 30 & Eng 40 WPM with MSCIT
  7. फील्ड मॉनिटर – Any Graduate with typing skill Marathi 30 & Eng 40 WPM with MSCIT

मिळणारे वेतन –

  1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- दरमहा
  2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – Rs. 30,000/- दरमहा
  3. स्टाफ नर्स – Rs. 20,000/- दरमहा
  4. औषधनिर्माता – Rs. 17,000/- दरमहा
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Rs. 17,000/- दरमहा
  6. एसटीएस – Rs. 20,000/- दरमहा
  7. फील्ड मॉनिटर – Rs. 20,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  • सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे
  • तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक ( पहिले वर्ष ते अंतिम वर्ष)
  • पदवी प्रमाणपत्र
  • नोंदणी प्रमाणपत्र (Job Vacancy)
  • जात प्रमाणपत्र
  • वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा म्हणूण ( १० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)
  • नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ड अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील.
    Vacancy Details –

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

Job Notification

 अधिकृत वेबसाईट – www.aurangabadmahapalika.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : 25 प्रश्न आणि एकही उत्तर नाही; अनेक अपयश पचवून अखेर UPSC मध्ये निवड झालीच

UPSC Success Story Vatsalya Kumar IAS

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या (UPSC Success Story) स्वतःच्या वेगळ्या कथा असतात. एखाद्या उमेदवाराची वेगवेगळ्या पदांसाठी 10 वेळा निवड होते तर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पसंतीचे पद मिळत नाही. एका उमेदवाराने 10 वेळा UPSC ची परीक्षा दिली, 3 वेळा मुलाखत दिली, तरीही त्याची निवड झाली नाही; अशावेळी संयमाने काम घेणं आवश्यक असतं. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका उमेदवाराची गोष्ट सांगणार आहोत, ज्याची UPSC मधून निवड झाली, पण याबद्दल त्याला स्वतःलाही आश्‍चर्य वाटत आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील रहिवासी

आम्ही बोलत आहोत वात्सल्य कुमारबद्दल. वात्सल्य हा UPSC 2014 बॅचचा अधिकारी आहे. UPSC परीक्षा पास केल्यानंतर, त्याला सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा (AFHQCS) मध्ये पोस्टिंग मिळाले. वात्सल्यचा जन्म उत्तर प्रदेशातील हाथरसमधील चमन पुरा या छोट्याशा (UPSC Success Story) गावात झाला. वात्सल्यने छबिलदास पब्लिक स्कूलमधून 10वी आणि 12वी आणि AKG अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. पूर्ण केले. यानंतर त्याने UPSC ची तयारी केली आणि 2014 मध्ये त्याने UPSC परीक्षा पास केली. त्याला आर्म्ड फोर्सेस हेड क्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस पोस्ट मिळाली.

विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स

वात्सल्यचा विश्वास आहे की; जर तुम्ही नकारात्मक निकाल आल्यानंतर खचून न जाता पुन्हा परीक्षा देण्याचा  निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही अयशस्वी का झाल ते जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे का घडले? यावर विचार मंथन व्हायला हवे. माझे ज्ञान (UPSC Success Story) कमी होते, सर्व प्रश्न नीट वाचले नाहीत. आणखी छोट्या चुका केल्या. घाईत काहीतरी चुकले. प्रश्नांची उत्तरे अधिक चुकीची झाल्याने निगेटिव्ह मार्किंगमध्ये गुण वजा करण्यात आले. या गोष्टींचा बारकाईने विचार व्हायला हवा. सर्वप्रथम, तुम्ही शक्य तितक्या मॉक इंटरव्ह्यू द्यायला हव्यात. इतक्या मॉक टेस्ट सोडवा की तुमच्या मनात एक ब्ल्यू प्रिंट तयार होईल आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना त्याचा फायदा होईल. लक्ष केंद्रित करा. लक्ष केंद्रित करून मागील वर्षांचे पेपर सोडवा. स्पर्धा परीक्षा देताना जुने पेपर सोडवणे नेहमी फायद्याचे ठरते; असा सल्ला वात्सल्यने दिला आहे.

वडील आहेत इन्स्पेक्टर

वात्सल्यचे वडील रवींद्र कुमार गौतम उत्तर प्रदेश पोलिसात इन्स्पेक्टर आहेत, तर आई मुन्नीदेवी या गृहिणी आहेत. वात्सल्यने यशाचे श्रेय राजस्थानमधील पाली येथील (UPSC Success Story) काका मुकेश कुमार गौतम आणि मोठा भाऊ के. पी. गौतम यांना दिले आहे. यासोबतच ते पीसीएस अधिकारी नितीन तिवारी आणि आयएएस मित्र विक्रम यांना त्यांच्या यशाचे भागीदार मानतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Exam : 10वी, 12वी ची प्रश्नपत्रिका किती वाजता हाती पडणार? गैरप्रकार रोखण्यासाठी ‘हा’ निर्णय रद्द

SSC HSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC HSC Exam) यंदापासून दहावी, बारावी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे वितरण 10 मिनिटे अगोदर करण्याचा निर्णय रद्द केला आहे. परीक्षा दालनात सकाळच्या सत्रात ११ आणि दुपारच्या सत्रात 3 वाजता प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतील. पेपरफुटी, सोशल मीडियावर होणार गैरवापर अशा घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन बदल करण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

या अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर दिली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी प्रश्न समजण्यास मदत होत असे. परंतु अनेकदा प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याच्या घटना समोर आल्या. अशा घटनांचा (SSC HSC Exam) विचार करून यंदापासून नियमात बदल करण्याचा मंडळाने निर्णय घेतला. फेब्रुवारी – मार्च २०२३ परीक्षेत आता निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर मिळणारी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती निर्धारित वेळेप्रमाणेच मिळणार आहे.

दहावी, बारावीची परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येते. ज्यामध्ये सकाळच्या सत्रातील परीक्षा 11 वाजता तर दुपारच्या सत्रातील परीक्षा 3 वाजता सुरु होते. आता सकाळच्या सत्रातील (SSC HSC Exam) विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका परीक्षा दालनात 11 वाजता, तर दुपारच्या सत्रात 3 वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण होईल. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च पासून घेण्यात येणार आहे.

परीक्षा कॉपीमुक्त वातारवणात होण्यासाठी राज्य मंडळ विविध उपाययोजना करीत आहे. हा निर्णय त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. मंडळाने म्हटले आहे, दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी (SSC HSC Exam) करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच ते सहा वर्षांपासून देण्यात येत होती. परंतु यामुळे प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांना आळा घालून परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे, बोर्डाने सांगितले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Old Pension Scheme : राज्यातील 17 लाख कर्मचारी ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर; जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा भडकला

Old Pension Scheme

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात एक (Old Pension Scheme) मोठी बातमी आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी; या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एकूण 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू झाली आहे.

ही योजना शेअर बाजारावर आधारित असल्याने या योजनेत पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप असून ही योजना रद्दबातल करून पुन्हा एकदा नव्याने जुनी पेन्शन योजना सरसकट राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना बहाल केली पाहिजे; अशी मागणी कर्मचारी करत आहेत.

याच मागणीसाठी आता राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 14 मार्च 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. राज्य (Old Pension Scheme) सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांच्या नाशिक येथील बैठकीत ओपीएस योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी संपाबाबत हा निर्णय झाला आहे.

याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रशांत जामोद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल, प्रदेश झारखंड या पाच राज्यात ओपीएस (Old Pension Scheme) म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. मग (Old Pension Scheme) महाराष्ट्र या राज्यांच्या तुलनेत अधिक सधन असूनही कर्मचाऱ्यांना ओपीएस योजना बहाल का करू शकत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

निश्चितच, हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरू झालेलं हे ओपीएस योजनेचे वादंग अजून मिटलेलं नसून या राज्यव्यापी संपामुळे सरकार अडचणीत सापडू शकते असं देखील (Old Pension Scheme) काही जाणकार लोक सांगत आहेत. दरम्यान, आता राज्य कर्मचारी आक्रमक भूमिकेत असून ओपीएस योजनेवर आता काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10 वी ते इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! राज्याच्या ‘या’ कृषी विद्यापीठात भरती सुरु

Job Alert (14)

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक, ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन) पदांच्या एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी

भरले जाणारे पद –

  1. तांत्रिक सहाय्यक
  2. मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक
  3. ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन)

पद संख्या – 03 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी

वय मर्यादा – 38 वर्षांपेक्षा जास्त नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी कार्यालय, अग्रील. नॉलेज मॅनेजमेंट युनिट, डॉ. बी.एस. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

  1. तांत्रिक सहाय्यक – B. Tech (Agril. Engg.)
  2. मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक – ITI Diesel Mechanic/ motor mechanic/ Equivalent
  3. ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन) – SSC Pass, Driving Licenses (Tractor, LMV-TT and LMV-TR)

मिळणारे वेतन –

  1. तांत्रिक सहाय्यक – Rs. 15,500/- दरमहा
  2. मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक – Rs. 12,000/- दरमहा (Job Alert)
  3. ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन) – Rs. 10,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. (Job Alert)
  2. मुलाखतीची तारीख निवडलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवली जाईल.
  3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – dbskkv.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ठाणे महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

Job Notification (26)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय तज्ञ पदाच्या एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – ठाणे महानगरपालिका

भरले जाणारे पद – वैद्यकीय तज्ञ / Medical Specialists

पद संख्या – 18 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS/MD

परीक्षा फी – फी नाही (Job Notification)

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com