Home Blog Page 33

UPSC Success Story : आधी असिस्टंट कमांडंट.. नंतर इन्कम टॅक्स ऑफिसर आता थेट IPS; लग्नानंतरही सुरु होता स्वप्नांचा पाठलाग

UPSC Success Story of IPS Tanu Shree

करिअरनामा ऑनलाईन । तनू श्रीने यांनी हे दाखवून दिले आहे की (UPSC Success Story) जर तुम्ही तुमचे लक्ष्य हळूहळू वाढवले तर ते कसे कुशलतेने मिळवू शकता. त्यांच्याकडून हे शिकता येते की प्रत्येक यशाबरोबर नवीन उंची गाठण्याची संधी तुम्हाला मिळते. तनु श्री (IPS Tanu Shree) तिच्या ध्येयांबद्दल खूप जागरूक होती. एक ध्येय गाठल्यानंतर त्या थांबल्या नाहीत. मग त्यांनी आपला मोर्चा पुढच्या ध्येयाकडे वळवला. त्यांनी प्रथम केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट, नंतर आयकर अधिकारी आणि नंतर आयपीएस अधिकारी असा प्रवास केला आहे. हा त्यांचा प्रवास कसा होता याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

2014 मध्ये असिस्टंट कमांडंट आणि 2017 मध्ये IPS पद
2014 मध्ये तनु श्री यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट बनून सार्वजनिक सेवेत प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण कामगिरीनंतरही त्यांनी विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:पुढे आणखी आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. यावेळी यूपीएससी (UPSC) परीक्षेत यश मिळवण्याचे लक्ष्य समोर होते. कठोर (UPSC Success Story) तयारी केल्यानंतर त्या २०१६ मध्ये परीक्षेला बसल्या. मे 2017 मध्ये त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. त्या UPSC मध्ये मिळाळलेल्या रॅंक वरुन आयपीएस केडरमध्ये रुजू झाल्या. तनुश्री यांचा IPS प्रवास हैदराबादमधील प्रतिष्ठित पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेऊन सुरू झाला.

लग्नानंतरही सुरु होती तयारी (UPSC Success Story)
तनु श्री आपल्या यशाचे सर्व श्रेय त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाला देते. 2015 मध्ये तनु श्री यांचे लग्न झाले. यानंतरही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी आपले ध्येय साध्य केले. लग्नानंतर घरगुती जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडत असताना त्यांनी आपल्या करिअर मधील प्रगतीला ब्रेक दिला नाही. या त्यांच्या गुणामुळे त्यांचे पालक सुबोध कुमार आणि नीलम प्रसाद यांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. त्यांचे वडील सुबोध कुमार डीआयजी राहिले आहेत. तनुश्रीसाठी आपले वडीलच आदर्श आहेत.

थोरली बहीण आहे सीआरपीएफ कमांडंट
तनु श्री यांचे प्रारंभिक शिक्षण बिहारच्या मोतिहारी (UPSC Success Story) जिल्ह्यात झाले. वडिलांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टिंगच्या काळात त्यांनी अनेक संस्थांना भेटी दिल्या. त्याने डीएव्ही पब्लिक स्कूल, बोकारो येथून 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्या दिल्लीत आल्या. प्रशिक्षणासोबतच त्यांनी सेल्फ स्टडीवरही भर दिला. त्यांची मोठी बहीण मनु श्री देखील सीआरपीएफ कमांडंट आहे. मनू यांनी संपूर्ण प्रवासात धाकट्या बहिणीला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.

कुटुंबाने दिलेला अतूट पाठिंबा
सीआरपीएफमधील असिस्टंट कमांडंट ते आयकर विभाग (UPSC Success Story) आणि त्यानंतर आयपीएस अधिकारी या प्रतिष्ठित पदापर्यंतचा तनु श्री यांचा प्रवास शिकण्यासारखा आहे. तनु श्री यांची समर्पण वृत्ती, कठोर परिश्रम हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. तनु श्री आणि त्यांची मोठी बहीण मनु श्री यांना त्यांच्या कुटुंबाने दिलेला अतूट पाठिंबा अनेक पालकांसाठी दिशादर्शक आहे. त्यांचा हा निश्चितच कौतुक आणि आदरास पात्र आहे. तनु श्री सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : 289 पदांवर सरकारी नोकरी!! महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात बंपर भरती

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि (Government Job) मूल्यनिर्धारण विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
पद संख्या – 289 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024

मिळणारे वेतन –
1. रचना सहायक (गट ब) – रु. 38,600/- ते 1,22,800/- दरमहा
2. उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 41,800/- ते 1,32,300/- दरमहा
3. निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 38,600/- ते 1,22,800/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. रचना सहायक (गट ब) – 261 पदे (Government Job)
पात्रता – स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
2. उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – 09 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3. निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – 19 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वय मर्यादा (Government Job) –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय/आ.दु.घ. 05 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – ₹1000/-
2. मागासवर्गीय – ₹900/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NABFID Recruitment 2024 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथे नवीन भरती; पात्रता ग्रॅज्युएट, डिग्री

NABFID Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग (NABFID Recruitment 2024) इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट
भरले जाणारे पद – उपाध्यक्ष
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
25 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 21 ते 32 वर्षे (NABFID Recruitment 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपाध्यक्षGraduate
Postgraduate
Degree

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक माहिती द्या.
4. सर्व आवश्यक पात्रता (NABFID Recruitment 2024) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
6. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nabfid.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : शिक्षकांच्या 539 पदांवर भरती; ‘इथे’ पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 539 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – गडचिरोली जिल्हा परिषद, गडचिरोली
भरली जाणारी पदे –
1. प्राथमिक शिक्षक – 419 पदे
2. पदवीधर प्राथमिक शिक्षक – 120 पदे
पद संख्या – 539 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राथमिक शिक्षक – HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I
2. पदवीधर प्राथमिक शिक्षक – D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT

नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली
वय मर्यादा –
1. 18 ते 40 वर्षे (Job Notification)
2. मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट
मिळणारे वेतन – 20,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

POWERGRID Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 1035 पदांवर भरती; लगेच करा APPLY

POWERGRID Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (POWERGRID Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत शिकाऊ पदाच्या 1035 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – शिकाऊ
पद संख्या – 1035 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2024
वय मर्यादा – 18 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (POWERGRID Recruitment 2024) –

पदशैक्षणिक पात्रता
शिकाऊDegree/ Diploma in Engineering, ITI

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून (POWERGRID Recruitment 2024) आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
प्रथम नोंदणी (Degree/ Diploma in Engineering) – CLICK
प्रथम नोंदणी (Other) – CLICK
अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Satara DCC Bank Recruitment 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 पदांवर भरती; 10 वी पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

Satara DCC Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Satara DCC Bank Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा
भरली जाणारी पदे –
1. कनिष्ठ लिपिक – 263 पदे
2. कनिष्ठ शिपाई – 60 पदे (Satara DCC Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ लिपिक –
१. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. उमेदवार वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्यास प्राधान्य
३. उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
४. उमेदवारास मराठी (Satara DCC Bank Recruitment 2024) आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक.
५. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
६. बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कनिष्ठ शिपाई –
१. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
२. उमेदवारास इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.
३. उमेदवारास संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.
नोकरीचे ठिकाण – सातारा

वय मर्यादा (Satara DCC Bank Recruitment 2024) –
कनिष्ठ लिपिक – २१ ते ३८ वर्षे
कनिष्ठ शिपाई – १८ ते ३८ वर्षे

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना –
1. उमेदवारांना ५९०/- रु. अर्ज शुल्क भरावे लागेल.
2. उमेदवारांनी अर्ज सादर करताना वेळीच हे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी PDF नॉटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
4. अर्ज सादर केल्यानंतर (Satara DCC Bank Recruitment 2024) पुढे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
5. या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र आणि परीक्षेचे वेळापत्रक हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sataradccb.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2024 : ‘या’ जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांवर भरती सुरु; त्वरा करा

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पालघर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदे (ZP Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक (कंत्राटी), पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदाच्या तब्बल 1891 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची अधिसूचना जारी झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – पालघर जिल्हा परिषद, पालघर
भरले जाणारे पद –
1. प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
2. पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
पद संख्या – 1891 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (ZP Recruitment 2024)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) – HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
2. पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) – D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

मिळणारे वेतन – रु. 20,000/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जासाठी येथे CLICK करा – Application Form
अधिकृत वेबसाईट – www.zppalghar.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CET Exam 2024 : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आता CET Cell ने पाच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी दि. 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार (CET Exam 2024)
सीईटी सेलकडून, फिजिओथेरपी, ॲक्युप्रेशर थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो, स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी, ऑडियोलॉजी या पाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mahacet.org वर जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याने महाराष्ट्रातील महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

23 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज
वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत सीईटीच्या संकेतस्थळावरून अर्ज व परीक्षा शुल्क भरता येईल. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना २८ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

1 सप्टेंबरला होणार परीक्षा
या पाचही अभ्यासक्रमाची परीक्षा १ सप्टेंबर रोजी (CET Exam 2024) सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ९ ते १०:३० या वेळेत परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. १०:३० नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष आणि सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भातील माहिती पुस्तिका http://www.mahacet.org च्या सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2024 : डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती!! राज्यात 7500 तर मुंबईत 1200 पदे भरली जाणार

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस भरती संदर्भात महत्वाची (Police Bharti 2024) आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिस दलात तरुणांसाठी भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा पोलिस भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात काही जिल्ह्यात नुकतीच पोलिस भरती राबावण्यात आली. या माध्यमातून तब्बल ३५ हजार पदे भरण्यात आली होती. या भरतीत ज्यांना अपयश आले अशा तरुणांना आता पुन्हा पोलिस दलात भरती होण्याची दुसरी संधी मिळणार आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात तब्बल साडे 7 हजार तर मुंबईसाठी 1200 पोलिसांची पदे भरली जाणार आहेत.

राज्य सरकारने २०२२ मध्ये पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर २०२३ मध्ये राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबावण्यात आली. आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती होणार असून (Police Bharti 2024) या भरती प्रक्रियेतून साडे 7 हजार पदे भरली जाणार आहेत. तर मुंबई पोलिस दलासाठी 1200 पदे भरली जाणार आहेत. कोरोना काळात राज्यात पोलिस भरती रखडली होती. अनेकजण निवृत झाल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त झाली होती. पोलिस विभागात मनुष्यबळ कमी झाल्याने २ वर्षात राज्यात १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती झाली. मात्र या भरतीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे.

पोलिस प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणार (Police Bharti 2024)
सध्या राज्यात २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही भरती पूर्ण झाल्यावर राज्यात नवी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या सोबतच राज्यात असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्राची देखील क्षमता वाढवली जाणार आहे; अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली आहे.

मुंबईत पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार
मुंबईत पोलिस भरतीच्या मध्यमातून 1200 पदे भरली जाणार आहेत त्यामुळे मुंबई पोलिसांची क्षमता वाढणार आहे. गेल्या वर्षी 8 हजार पदांची भरती राबावण्यात आली होती. यातील काही जणांचे प्रशिक्षण होऊन सप्टेंबरमध्ये ते मुंबई पोलिस दलात रुजू होणार आहेत. मुंबईत 4230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी 2 हजार 572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

महिला पोलीस भरतीसाठी तब्बल पावणे तीन लाख अर्ज दाखल
महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी राज्यातून (Police Bharti 2024) तब्बल पावणे तीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबई विभागाला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : आधी कॉलेज लाइफ एन्जॉय केली; नंतर सुरु केली UPSC ची तयारी; 1 वर्षाच्या ब्रेक नंतर मिळवलं IAS पद

UPSC Success Story of IAS Tripti Kalhans

करिअरनामा ऑनलाईन । आपण मोठेपणी सरकारी (UPSC Success Story) अधिकारी व्हायचं हे तृप्ती यांनी शाळेत शिकत असतानाच ठरवलं होतं. पण हे स्वप्न पाहत असताना आपला प्रवास किती खडतर असेल याची तिला कल्पनाही आली नव्हती. UPSC परीक्षा देणारे अनेक इच्छुक उमेदवार एक-दोनदा अपयश आल्यानंतर परीक्षेतून माघार घेतात. पण तृप्ती कऱ्हांस यांनी UPSC पास होण्याचा ध्यासच घेतला होता. UPSC पलिकडे त्या कशाचाही विचार करत नव्हत्या. तृप्ती कल्हांस या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी आहेत. आज आपण त्यांच्या करिअरमधील चढ उताराविषयी जाणून घेणार आहोत….

एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द, इच्छा किंवा तळमळ असेल तर ती मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. तृप्ती कल्हांसच्या बाबतीतही असेच घडले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारीच व्हायचं असं तिनं ठरवलं होतं. यासाठी ती कठोर परिश्रम घेण्यास तयार होती. तिचा प्रवास सोपा नव्हता पण ती अडचणींना घाबरत नव्हती. तिने प्रत्येक आव्हानाला तोंड देत अखेर आपले गंतव्यस्थान गाठले. IAS तृप्ती कल्हांसची UPSC यशोगाथा वाचा…

कॉलेज लाइफ एन्जॉय केल्यानंतर सुरु केली UPSC ची तयारी
तृप्ती कल्हांस यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथील शाळेतून शिक्षण घेतलं आहे. शालेय जीवनापासून त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. 3 वर्षांची कॉलेज लाइफ (UPSC Success Story) एन्जॉय केल्यानंतर त्यांनी UPSC CSE परीक्षेची तयारी सुरु केली. महाविद्यालयीन जीवन आयुष्यात एकदाच येते यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळेच यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा ताण त्यांना इतक्यात घ्यायचा नव्हता.

स्वप्नांचा चुराडा होताना पाहिलं (UPSC Success Story)
12 वी पास झाल्यानंतर तृप्ती कल्हांस दिल्लीत आल्या. 2017 मध्ये, त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कमला नेहरू कॉलेजमधून बी.कॉम ऑनर्स पदवी घेतली. यानंतर त्यांनी सेल्फ स्टडी करून UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांना पहिल्या तीन प्रयत्नात UPSC प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. यामुळे उदासिनता आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. आपल्या बालपणीच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचा गंभीर अनुभव त्यांना येत होता.

अभ्यासातून घेतला 1 वर्षाचा ब्रेक
सलग तीन वर्षे कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी करणे ही गोष्ट खरंतर खूप मोठी होती. पूर्व परीक्षा पास करू न शकल्याने तृप्ती यांना आत्मसंशयाने घेरले होते. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनीही त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या तयारीवर पूर्वीपेक्षा जास्त परिणाम होत होता. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये परीक्षेच्या चक्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता.

वर्षातच आयुष्य बदललं
एका वर्षाच्या या ब्रेकमध्ये तृप्ती यांना त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळाला. या एक वर्षात UPSC परीक्षा समजून घेण्यासाठी त्यांना वेळ मिळाला आणि शेवटी त्यांना मेहनतीचे (UPSC Success Story) आणि त्यागाचे फळ मिळाले. त्या UPSC CSE 2023 परीक्षेत ऑल इंडिया रँक 199 मिळवून यशस्वी झाल्या. तृप्ती आपले विचार व्यक्त करताना सांगतात; “आयुष्यात जेव्हा चांगले दिवस येतात, तेव्हा समजते की देवाने आपल्याला इतका त्रास का दिला.मी सर्व UPSC इच्छुकांना सांगू इच्छिते की, सर्वांनी UPSC ची किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची शांतपणे आणि आत्मविश्वासाने तयारी करावी; यश मिळतं हे नक्की.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com