Home Blog Page 321

Success Story : IIT इंजिनिअर… UPSC क्रॅक ते दिल्लीचे मुख्यमंत्री; अशी आहे अरविंद केजरीवाल यांची वाटचाल

Success Story of Arvind Kejrival

करिअरनामा ऑनलाईन । अरविंद केजरीवाल (Success Story) हे दिल्लीचे 7 वे मुख्यमंत्री आहेत. ते देशातील प्रसिध्द भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. केजरीवाल हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्यासोबत जनलोकपाल विधेयकानंतर प्रसिद्ध झाले. राजकारणात येण्यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी टाटा स्टीलमध्ये काम केले आणि नवी दिल्ली येथे आयकर विभागाचे सह-आयुक्त म्हणूनही आपली सेवा दिली आहे. आज आपण त्यांची शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया.

Success Story of Arvind Kejrival

इथे घेतले शालेय शिक्षण (Success Story)
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणातील सिवानी येथे एका उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबात गोविंद राम केजरीवाल आणि गीता देवी यांच्या पोटी झाला. केजरीवाल यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. केजरीवाल यांचे शिक्षण हिसार येथील कॅम्पस स्कूल आणि सोनीपत येथील होली चाइल्ड स्कूलमध्ये झाले.

 

Success Story of Arvind Kejrival

IIT मधून इंजिनिअरिंग 
1985 मध्ये, केजरीवाल यांनी IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण केली आणि 563 वी ऑल इंडिया रँक पटकावली. त्यांनी IIT खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त (Success Story) केली आहे. 1989 मध्ये केजरीवाल जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलमध्ये रुजू झाले, परंतु 1992 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचे कारण देत नोकरीचा राजीनामा दिला.

 

Success Story of Arvind Kejrival

अखेर भारतीय महसूल सेवेत सामील झाले
1995 मध्ये, अरविंद केजरीवाल नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय महसूल सेवेत (IRS) रुजू झाले. त्यांनी आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून (Success Story) काम केले. त्यांनी त्यांच्या 1993 बॅचच्या IRS अधिकारी सुनीता यांच्याशी लग्न केले. बनावट रेशन कार्ड घोटाळा उघड करण्यासाठी त्यांनी 1999 मध्ये परिवर्तन नावाची चळवळ सुरू केली आणि दिल्लीतील नागरिकांना आयकर, वीज आणि अन्नधान्य रेशनशी संबंधित बाबींमध्ये मदत केली तेव्हा त्यांचे सामाजिक जीवन बहरले.

Success Story of Arvind Kejrival

सामाजिक कार्याचा ध्यास
सामाजिक प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी, त्यांनी 2006 मध्ये IRS पदाचा राजीनामा दिला आणि ‘पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना केली. केजरीवाल 2010 मध्ये लोकप्रिय झाले जेव्हा त्यांनी 2010 च्या दशकाच्या सुरुवातीस जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी प्रचार करताना (Success Story) प्रख्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासह सामाजिक कार्याला सुरुवात केली. लोकप्रिय इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीचे राजकारण करायचे की नाही याबाबत अण्णा हजारे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर, त्यांनी आम आदमी पार्टी (आप) नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला.

 

Success Story of Arvind Kejrival

आम आदमी पार्टीतून राजकीय प्रवास सुरु (Success Story)
केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप पक्षाने 2013 सालच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पदार्पण केले. या निवडणुकीत त्यांनी 70 पैकी 28 जागा जिंकल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आप ला ओळख मिळाली. कोणत्याही पक्षाला एकूण बहुमत न मिळाल्याने, AAP ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सशर्त समर्थनासह अल्पमतात सरकार स्थापन केले. अरविंद केजरीवाल यांनी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. केजरीवाल फेब्रुवारी 2014 मध्ये पदाचा राजीनामा देईपर्यंत ते 49 दिवस सत्तेत होते.

Success Story of Arvind Kejrival

पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली टक्कर
2014 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी 16 व्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली (Success Story) आणि सुमारे 3,70,000 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत AAP पक्षाचे नेतृत्व केले आणि 14 फेब्रुवारी 2015 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! महिला व बाल विकास विभागात ‘या’ पदावर भरती सुरु

Job Alert (22)

करिअरनामा ऑनलाईन । महिला व बाल विकास विभाग (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे.
विभाग – महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक- 04 पदे
उमेदवार बी.पी.एड. असणे आवश्यक.
2. मदतनीस तथा पहारेकरी- 02 पदे
उमेदवार 10वी पास असणे आवश्यक.
3. स्वच्छता कर्मचारी – 04 पदे (Job Alert)
उमेदवार 10वी पास असणे आवश्यक.
4. समुपदेशक – 01 पद
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाज कार्य/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ सार्वजनिक आरोग्य/ समुपदेशन या विषयात पदव्युत्तर पदवी तसेच MS-CIT पूर्ण केलं असणं आवश्यक.
5. स्वयंपाकी- 02 पदे
उमेदवार 10वी पास असणे आवश्यक.
6. काळजी वाहक – 01 पद
उमेदवार 10वी पास असणे आवश्यक. (Job Alert)

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (Job Alert)
मिळणारे वेतन – 7944/- रुपये ते 23,170/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक, मनमाड, मालेगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक – 422011.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.womenchild.maharashtra.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : 1 लिटर पाण्यात किती थेंब असतात? UPSC मुलाखतीत विचारले जातात असे कल्पनेपलीकडील प्रश्न 

GK Updates 26 Apr.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. प्रश्न – जे बाहेर फुकट आणि दवाखान्यात पैसे देऊन मिळते ते काय आहे?
उत्तर – ऑक्सिजन. (GK Updates)
2. प्रश्न – 01 लिटर पाण्यात किती थेंब असतात?
उत्तर – सुमारे 20 हजार थेंब
3. प्रश्न – चित्रकाराला हिंदीत काय म्हणतात?
उत्तर – चित्रकार.

4. प्रश्न – सोन्याचे एटीएम कोणत्या देशात आहे?
उत्तर – दुबईमध्ये
5. प्रश्न – (GK Updates) कन्याकुमारी ते जम्मू हे रेल्वेने किती अंतर आहे?
उत्तर – 3711 किमी.
6. प्रश्न – काचेचा रंग कोणता?
उत्तर – पांढरा. (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career After 10th : 10वीनंतर करा ‘या’ पर्यायांचा विचार…लाईफ होईल सेट!!

Career After 10th (1)

करिअरनामा ऑनलाईन । 10वीच्या निकालाची तारीख जवळ येवून (Career After 10th) ठेपली आहे. परीक्षा झाल्यानंतर सुट्टीचा आनंद घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की, निकाल लागल्यानंतर करिअरसाठी नक्की कोणता पर्याय निवडायचा? कारण या निर्णयावर तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. 10वीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करु शकतात. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहे. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात.
बऱ्याचदा असं पहायला मिळतं, की बहुतांश विद्यार्थी नेहमी एकाच लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यामधील अनेक मुळे बेरोजगारच राहतात. याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजी, मेटलर्जीसारख्या विषयातून (Career After 10th) राज्याभरातून अवघी 120 मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते. काही वेळा या कोर्ससाठी हुशार मुलं प्रवेशही घेत नसल्याने अवघ्या 40 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो आणि त्यांना नोकरीचीही संधी चालून येते. तेव्हा तुम्ही नीट विचार करुनच योग्य पर्याय निवडा….

1. सायन्स (Career After 10th)
पीसीएमबी – बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी असे विषय निवडता येतात.
पीसीएम – या विषयांनुसार आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.
पीसीबी – मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अॅण्ड अॅनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस, अॅग्रीकल्चर सायन्स अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो.

एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात पदवी अभ्यासक्रम करता येतो. (Career After 10th)
हे सर्व कोर्स चार ते पाच वर्षांचे असून त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

2. ​ITI अभ्यासक्रम
​आयटीआय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार निवडू शकतात. यामधील काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे –
1. आयटीआय टर्नर
2. आयटीआय मेकॅनिक
3. आयटीआय वेल्डर (Career After 10th)
4. आयटीआय प्लंबर
5. आयटीआय इलेक्ट्रीशियन
6. डिप्लोमा

3. इंजिनिअरिंग डिप्लोमा
दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात, त्यासाठी दहावीत गणित व विज्ञान विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असावेत. हे डिप्लोमा कोर्स 3 वर्षांचे असतात. आम्ही अशा काही डिप्लोमा अभ्यासक्रमांची नावे पुढे देत आहोत.
1. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग
2. डिप्लोमा इन टेक्सटाइल इंजीनियरिंग
3. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग
4. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
5. डिप्लोमा इन सिविल इंजिनीअरिंग (Career After 10th)
6. डिप्लोमा इन आयसी इंजिनीअरिंग
7. डिप्लोमा इन ईसी इंजिनीअरिंग
8. डिप्लोमा इन माइनिंग इंजिनीअरिंग
या डिप्लोमा अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना थेट इंजिनीअरिंगच्या पदवीला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.

4. ​फाइन आर्ट्स/परफॉर्मिंग आर्ट्स
आर्ट अॅण्ड क्राफ्ट, सिरॅमिक अॅण्ड पॉटरी, डान्स, ड्रॉइंग, फर्निचर अॅण्ड इंटेरिअर डिझाइन, म्युझिक, स्कल्प्चर अशा कलेशी संबंधित विषयांमध्येही करिअर (Career After 10th) होऊ शकतं. मात्र त्यासाठी विषयाची आवड आणि कौशल्य लागतं. लहानपणापासून या विषयांचा अभ्यास केला तर त्यात करिअरसाठी उत्तम संधी आहेत.
5. बॅचलर इन डिझायनिंग
काळानुरुप प्रत्येक वस्तूचं डिझाइन बदलत राहतं. प्रत्येक वस्तू वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते. हे डिझाइन करण्यासाठी प्रोडक्ट डिझाइन, फर्निचर अॅण्ड इंटिरिअर डिझाइन, सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र यासाठी केवळ चित्रकला पुरेशी नसून कल्पनाशक्तीची गरज असते.

उद्योजक व्हा! (Career After 10th)
करिअरसाठी तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. मनात कायम जिज्ञासा ठेवली, झोकून काम केलं, चिकाटी, प्रामाणिकता, गणिती वृत्ती ठेवली तर व्यवसायातही यश मिळू शकतं. चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार आणि (Career After 10th) व्यवहारी वृत्ती ठेवली पाहिजे. तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल, या हेतूने शासनाने पॉलिटेक्निक कोर्स सुरू केले. मात्र शासकीय तसंच खाजगी संस्थांमधून बाहेर पडणारी मुले केवळ नोकरीचाच विचार करतात, स्वतः उद्योग सुरू करून इतरांना नोकरी देत नाहीत, त्यामुळे नोकऱ्यांचा तुटवडा निर्माण होतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVS Recruitment : शिक्षकांसाठी खुषखबर!! लोणावळ्याच्या केंद्रीय विद्यालयात ‘या’ पदांसाठी थेट द्या मुलाखत 

KVS Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय विद्यालय, लोणावळा अंतर्गत (KVS Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, कला आणि हस्तकला, विशेष शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  मुलाखतीस्थी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
संस्था – केंद्रीय विद्यालय, लोणावळा
भरले जाणारे पद – (KVS Recruitment)
1. PGT
2. TGT
3. PRT
4. क्रीडा प्रशिक्षक
5. योग शिक्षक
6. कला आणि हस्तकला विशेष शिक्षक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार आहे. (PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – लोणावळा, जि. पुणे (KVS Recruitment)
मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, आय. एन. एस शिवाजी, लोणावळा
मुलाखतीचा तारीख – 28 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित रहायचे आहे.
3. विद्यालयात मुलाखतीच्या दिवशी 11:00 वाजेपर्यंत नाव नोंदणी केली जाईल. (KVS Recruitment)
4. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या lonavala.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
5. मुलाखतीला उमेदवारांनी मूळ आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रतीचा एक संच आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे.
6. वरील पदांकरीता (KVS Recruitment) मुलाखत 28 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
7. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

मुलाखतीचे वेळापत्रक –

KVS Lonavla Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – lonavala.kvs.ac.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Apple Career : Appleचा भारतात झगमगाट!! कर्मचाऱ्यांना मिळतं ‘इतकं’ पॅकेज; त्यांचं शिक्षण ऐकून व्हाल थक्क!!

Apple Career

करिअरनामा ऑनलाईन । मोबाईल जगातील सर्वात मौल्यवान (Apple Career) कंपनी Apple ने नुकतेच भारतात त्यांचे 2 नवीन स्टोअर उघडले आहेत त्यामुळे ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2025 पर्यंत प्रत्येक 100 पैकी 25 आयफोन भारतात बनवले जातील; असं या कंपनीचं उद्दिष्टय आहे. अशा परिस्थितीत आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला Apple स्टोअरच्या कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे आणि त्यांचे शिक्षण काय आहे हे सांगणार आहोत. यासोबतच देशात अॅपलचे स्टोअर कुठे सुरू आहेत आणि त्यासाठी किती भाडे द्यावे लागेल हे देखील सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेवूया भारतात सुरु झालेल्या Apple स्टोअरविषयी…

 

Apple Career

इतकं मिळतं वार्षिक पॅकेज
Apple ज्या पद्धतीने महागडे आयफोन बनवते आणि विकते त्याचप्रकारे, ही कंपनी तिच्या कर्मचार्‍यांना मोठा मोबदला देते. कंपनीने आपल्या कोणत्याही कर्मचार्‍यांच्या पगाराचा (Apple Career) खुलासा केलेला नसला तरी, मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी भारतातील स्टोअरमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दरमहा किमान 1 लाख रुपये पगार देते. म्हणजेच जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना किमान 12 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळते. विशेष म्हणजे तंत्रज्ञानासोबतच या कर्मचाऱ्यांचे अनेक भाषांवरही प्रभुत्व आहे.

Apple Career

एवढं आहे कर्मचाऱ्यांचं शिक्षण (Apple Career)
अॅपलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पात्रताही खूप जास्त आहे. या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स अशा पदव्या आहेत. यातील अनेक कर्मचारी असे आहेत ज्यांनी परदेशी विद्यापीठांमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपल स्टोअरमध्ये काम करणार्‍या बहुतेक कर्मचाऱ्यांना 15 पेक्षा जास्त भाषा येतात.

Apple Career

भारतात दोन सेंटर्स सुरु
अलीकडेच देशात मुंबई आणि दिल्ली (Apple Career) येथे अॅपलचे दोन स्टोअर सुरू झाले आहेत. मुंबईचे अॅपल स्टोअर जिओ वर्ल्ड मॉलमध्ये तर दिल्लीचे साकेतमध्ये उघडले आहे. मुंबईतील स्टोअरचे भाडे 42 लाख रुपये आहे आणि दिल्लीतील स्टोअरचे भाडे 40 लाख रुपये दरमहा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : टायपिंग येणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी; राज्याच्या कृषि विभागात ‘या’ पदांवर मोठी भरती

Job Notification (43)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या कृषी विभागाने विविध (Job Notification) रिक्त पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) पदाच्या एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
संस्था – कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
पद संख्या – 60 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. लघुटंकलेखक / Short Typist – 28 पदे
उमेदवार HSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. टायपिंग स्पीड किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग स्पीड किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी (Job Notification) टायपिंग स्पीड किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.
2. घुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) – 29 पदे
उमेदवार माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. टायपिंग स्पीड किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग स्पीड किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग स्पीड किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.
3. लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) – 03 पदे
उमेदवार माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. टायपिंग स्पीड किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग स्पीड किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा (Job Notification) मराठी टायपिंग स्पीड किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – 720/- रुपये. (मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-रुपये)
मिळणारे वेतन – (Job Notification)
1. लघुटंकलेखक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
2. लघुलेखक (निम्न श्रेणी) -38600-122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
3. लघुलेखक (उच्च श्रेणी)- 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (Job Notification)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.krishi.maharashtra.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC News : MPSCच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक?? काय आहे आयोगाचं म्हणणं

MPSC News (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC News) घेण्यात येणाऱ्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ परीक्षेतील उमेदवारांच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक झाल्याचा दावा एमपीएससीकडून पुन्हा एकदा खोडून काढण्यात आला आहे. एमपीएससीकडून उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ हॅकरने हॅक केले होते. मात्र, या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या पीडीएफ स्वरूपातील प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य माहिती लीक झाली नसल्याचे एमपीएससीने जाहीर केले आहे.
एमपीएससीकडून 30 एप्रिलला घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे 4 लाख 66 हजार विद्यार्थी बसले आहेत. सर्व्हरवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी अन्य संकेतस्थळाद्वारे (MPSC News) एमपीएससीने या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून दिली होती. यातील मुख्य संकेतस्थळावरील बाह्यलिंक वेबपेजच्या कोडमध्ये छेडछाड करून हॅकरने उमेदवारांची प्रवेशपत्रे टेलिग्राम चॅनेलवर मिळवली.
ही बाब समोर आल्यानंतर एमपीएससीने प्रवेशपत्रांची बाह्यलिंक बंद केली. उमेदवारांची प्रवेशपत्रे मिळणे बंद झाल्यावर हॅकरने अन्य माहिती आणि प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा केला. मात्र एमपीएससीने हा दावा खोडून काढला आहे.

एमपीएससीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन नाहीत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने प्रश्नपत्रिका मिळविणे शक्य नाही, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे; तसेच हॅकरने हॅक केलेल्या बाह्यलिंकवर उमेदवारांच्या प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य माहिती नाही. त्यामुळे (MPSC News) ही माहितीही लीक झाली नाही, असेही एमपीएससीने नमूद केले आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील सी. बी. डी. बेलापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ परीक्षेतील उमेदवारांची प्रवेशपत्रे लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एमपीएससीकडून 30 एप्रिलला घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी बसलेल्या सुमारे 90 हजारपेक्षा अधिक उमेदवारांची माहिती लीक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या प्रकरणी एमपीएससीने टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

विद्यार्थी संभ्रमात (MPSC News)
एमपीएससीने जानेवारी महिन्यात ‘गट ब’ आणि ‘गट क’ या पदाच्या 8 हजार 139 जागांसाठी जाहिरात काढली होती. या भरतीसाठी राज्यभरातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सुमारे 4 लाख 60 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. एमपीएससीने येत्या 30 एप्रिलला त्यांच्या पूर्व परीक्षेचे आयोजन (MPSC News) केले आहे. मात्र, या उमेदवारांची प्रवेशपत्रे टेलिग्राम चॅनेलवरून प्रसारित करण्यात आली आहेत; तसेच प्रवेशपत्रांबरोबरच प्रश्नपत्रिका आणि अन्य माहितीही लीक केल्याचा संदेश या चॅनेलवरून पाठविण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : रोजची उपासमार..नवऱ्याचा बेदम मार…अंडरवेअरमध्ये चपात्या लपवून भूक भागवली; अखेर ऑफिसर बनून पतीला धडा शिकवलाच!

Success Story Savita Pradhan

करिअरनामा ऑनलाईन । आज सविता प्रधान यांची गणना अत्यंत (Success Story) तडफदार अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांची कारकीर्द मध्य प्रदेश सरकारच्या नागरी सेवक पदावरून सुरू झाली. त्या ग्वाल्हेर विभागात सहसंचालक आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातून अधिकारी होण्याचा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. एकेकाळी सासरच्या घरात तिला इतका त्रास व्हायचा की त्या अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची आणि बाथरुममध्ये जावून खायची. नवरा तिला बेदम मारहाण करायचा. सासू, जाऊ यांची वागणूकही खूप वाईट होती. सासरच्या अत्याचाराला कंटाळून ती आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. मात्र, त्याच क्षणी असे काही घडले की, या लोकांसाठी मी जीव का द्यायचा, असा विचार तिच्या मनात आला. मग तिने सर्व काही सोडून करिअर करण्याकडे लक्ष वळवले. नागरी सेवेत रुजू होण्याचा उद्देशही केवळ चांगला पगार हा होता. ती पल्या दोन मुलांसह सासरच्या घरातून निघून गेली. यानंतर ती स्वतःसाठी आणि मुलांसाठी काहीही करायला तयार झाली. मधल्या काळात तिने पार्लरमध्ये कामही केले. पुढे अधिकारी होऊन तिने पतीला चांगलाच धडा शिकवला.

Success Story Savita Pradhan

बेधडक अधिकारी (Success Story)
सविता प्रधान या मध्य प्रदेशच्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. त्या अनेकदा बेधडक कामांमुळे चर्चेत असतात. 2021 मध्ये त्या खांडवा महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या. मंदसौरच्या सीएमओ असताना त्यांनी अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांनी येथील माफियांविरुद्ध मोहीम राबवून अफू तस्करांवर कारवाई केली होती. यादरम्यान त्यांच्या आदेशानुसार कोट्यवधींचे बेकायदेशीर बंगले जमीनदोस्त करण्यात आले.

 

 

Success Story Savita Pradhan

हायस्कूल परीक्षा पास होणारी गावातील पहिली मुलगी
अधिकारी होण्याआधीची सविता यांची कहाणी खूप वेदनादायी आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मंडी नावाच्या गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात खूप गरिबी होती. ती तिच्या आई-वडिलांचे तिसरे आपत्य. गावात 10 वीपर्यंत शाळा होती. बहुतांश मुलींना शाळेत पाठवले जात नसे. पण सविता त्या भाग्यवान (Success Story) मुलींपैकी एक होती ज्यांना शाळेत जाण्याची संधी मिळाली.
ती शाळेत जाण्यामागे पालकांना 150-200 रुपयांची शिष्यवृत्ती मिळायची हाही उद्देश होता. दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेली ती तिच्या गावातील एकमेव मुलगी होती. त्या दिवशी तिचे वडील खूप खुश होते. यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे नाव 7 किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या सरकारी शाळेत घातले.

 

 

Success Story Savita Pradhan

16व्या वर्षी मनाविरुध्द ठरलं लग्न
11वी आणि 12वी मध्ये जीवशास्त्र विषयाची निवड केली. या दरम्यान तिचा विवाह जुळून आला. योगायोगाने हे नाते फार मोठ्या घरचे होते. सविताच्या वडिलांचा विश्वासच बसत (Success Story) नव्हता की हे नाते त्यांच्या मुलीला कसे आले. मुलाने लग्न ठरताना  सविताला पुढचं शिक्षण मिळवून देणार असल्याचं वचन दिलं. दुसऱ्याच दिवशी तिचा साखरपुडा झाला. सविताची मर्जी यावेळी कुणी विचारात घेतली नाही. त्यावेळी ती अवघी 16-17 वर्षांची होती.

Success Story Savita Pradhan

अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची
घरच्यांच्या बळजबरीमुळे महिनाभरातच सवीताचे तिच्या मर्जीविरुध्द लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसातच तिला घरात  नोकरांसारखी वागणूक मिळाली. सासरच्या घरी ती काबाडकष्ट करू लागली. तिच्यावर अनेक बंधने होती. तिला डायनिंग टेबलवर सगळ्यांसोबत बसता येत नव्हते. मोकळेपणाने (Success Story) हसता येत नव्हते. तिला घरात सगळ्यांच्या शेवटी जेवायला सांगितले होते. अन्न संपले तर ती पुन्हा शिजवू शकत नव्हती. मारहाण आणि शिवीगाळ होण्याच्या भीतीने ती आपल्या अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची. मग ती बाथरूम मध्ये जावून मध्येच जेवायची. नवरा तिला सतत मारहाण करायचा. यावेळी तिला कोणाचा पाठिंबा मिळाला नाही.

Success Story Savita Pradhan

सासुरवास सुरुच होता
सासरच्यांचा अत्याचार सहन करत सविता सतत आजारी पडू लागली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा  ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर सविताच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या माहेरी आणले. सविताने सासरच्या घरी परत जायचे नसल्याचे सांगताच घरच्यांनी पुन्हा पतीसोबतच (Success Story) राहण्याचा हट्ट धरला. सविताला समजले होते की हा मार्ग तिच्यासाठी सोपा नाही. मुलं वगैरे झाल्यावर सगळं ठीक होईल असंही तिला समजावून सांगितलं. एका मुलानंतर तिला  दुसरे अपत्यही झाले. पण परिस्थिती बदलली नाही. नवऱ्याची मारहाण सुरूच होती.

Success Story Savita Pradhan

अभ्यासाला शस्त्र बनवले (Success Story)
सविता अत्याचाराला कंटाळली होती. तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिचे एक मूल दीड ते दोन वर्षांचे होते. तर, दुसरा 3-4 महिन्यांचा. ती पंख्याला गळफास लावून घेण्याच्या तयारीत असताना तिला सासू दिसली. योगायोगाने खिडकी उघडी राहिली. पण, सविताला वाचवण्यासाठी तिने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सर्व काही पाहून सासू पुढे गेली. तेव्हा सविताच्या लक्षात आले की ती अशा लोकांसाठी आपला जीव का देत आहे. मग तिने ठरवलं की आपण काहीही करायचं. पण, त्या घरात रहायचं नाही. सासरचे घर सोडल्यानंतर तिने आपले शिक्षण सुरू ठेवले. यादरम्यान तिने कमाईसाठी काही काल पार्लरमध्ये कामही केले. इंदूर विद्यापीठातून तिने लोक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पहिल्याच प्रयत्नात तिने नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.

 

Success Story Savita Pradhan

पतीला शिकवला धडा
सविताची पहिली पोस्टिंग मुख्य पालिका अधिकारी म्हणून झाली होती. तिची करिअरमधील प्रगती पाहून तिचा नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात आला. यानंतरही त्याने सविताला मारहाण केली. गाडी घेण्यासाठी पैसे घेतले. सुरुवातीला सविताने तिला होत असलेला घरगुती अत्याचार लपविला. पण, एके दिवशी तिने दुःखी मनाने आपल्या वरिष्ठांना याबद्दल सांगितले. वरिष्ठांनी सविताला प्रोत्साहन दिले. यावेळी जर तिचा (Success Story) नवरा तिच्याकडे परत आला तर तिने वरिष्ठांना फोन करावा, असेही सांगितले. एके दिवशी नवरा पुन्हा आला. तो आपल्यावर हल्ला करणार हे सविताला आधीच कळले होते. तिने वरिष्ठांना  कळवताच काही क्षणात पोलिस घरी आले. पोलिसांनी तिच्या नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवली. पुढे सविताचा पतीपासून घटस्फोट झाला. ती आपल्या दोन मुलांसह आता सुखाने राहू लागली आहे. तसेच एक तडफदार प्रशासकीय अधिकारी म्हणून तिची ओळख कायम आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : परराष्ट्र मंत्रालयात तब्बल 10 लाख पगाराची नोकरी; पात्रता फक्त ग्रॅज्युएशन

Government Jobs (37)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. मंत्रालयाने कन्सल्टंट पदावरील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.
संस्था – परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
भरले जाणारे पद – कन्सल्टंट
पद संख्या –  1 पद
वय मर्यादा – उमेदवाराचे वय 11 मे 2023 रोजी 25 ते 40 वर्षे असावे.
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023

आवश्यक पात्रता आणि अनुभव – (Government Jobs)
1. उमेदवार भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक.
2. विशेष डोमेन नॉलेज, ओरिजनल थिंकिंग, एव्हिडन्स ऑफ कंटेंट रायटिंग, रिव्ह्यूड पब्लिकेशन्स, जर्नल्स, वर्तमानपत्रे, माध्यमं, रिपोर्ट्स याबद्दल ज्ञान असावं, प्रतिष्ठित विद्यापीठातील कामाचा अनुभव, आंतरराष्ट्रीय घडामोडी, सार्वजनिक धोरणांमध्ये रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा (Government Jobs) थिंक-टँकचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल.
3. लेखन आणि प्रेझेंटेशन स्कील्समध्ये विस्तृत अनुभवाचा पुरावा.
4. मंत्रालयातील कामाचा पूर्वानुभव
5. फॉरेन लँग्वेजची माहिती
6. International Relation मध्ये मास्टर्स डिग्री आणि नामांकित शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय थिंक टँक/संस्थांमध्ये कामाचा अनुभव.
7. पब्लिक पॉलिसी, इंटरनॅशनल पब्लिक पॉलिसी, मानवी हक्क, डेमॉक्रसी इत्यादी विषयांतील मास्टर्स डिग्रीसह प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय थिंक टँक, संस्थांमध्ये कामाचा अनुभव.

मिळणारे वेतन – 10 लाख रुपये वार्षिक
नोकरीचा कार्यकाळ –
संबंधित पदावर 1 वर्षाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. परंतु आवश्यकता आणि कार्यक्षमतेनुसार कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. (Government Jobs)
नोकरी करण्याचे ठिकाण – परराष्ट्र मंत्रालय (साउथ ब्लॉक/जवाहरलाल नेहरू भवन/सुषमा स्वराज भवन/पटियाला हाउस/ISIL बिल्डिंग/अकबर भवन), नवी दिल्ली
असा करा अर्ज – इच्छुक उमेदवारांनी अधिकृत PDFमधून अर्ज डाउनलोड करुन व्यवस्थित भरुन आवश्यक कागदपत्रांसह पाठवावे.

अर्ज करण्याचा पत्ता –
अंडर सेक्रेटरी (PF&PG), मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, रूम नंबर4071, जवाहरलाल नेहरू भवन, 23-डी, जनपथ, नवी दिल्ली-110011 (Government Jobs)
सूचना – अर्जदारांची माहिती असलेल्या लिफाफ्यावर ‘Application for the position of Consultant in PP&R Division of Ministry of External Affairs’ असा उल्लेख असणं अनिवार्य आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.india.gov.in/website-ministry-external-affairs
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com