Home Blog Page 317

Job Alert : नाशिक महापालिकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

Job Alert (24)

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक महानगरपालिकेअंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेष विधिज्ञ पदाच्या एकूण 3 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
संस्था – नाशिक महानगरपालिका, नाशिक
भरले जाणारे पद – विशेष विधिज्ञ
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी.
2. प्राधान्यशील अर्हता- विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. ( LLM )पदवी धारक असावा.
3. विधींज्ञांचे / वकिलांचे स्वतःचे कार्यालय, दूरध्वनी व सहाय्यक कर्मचारी यासह अद्यावत असले पाहिजे. उमेदवारास कमीत कमी 15 वर्षे वरील तक्त्यात नमूद केलेल्या (Job Alert) न्यायाधिकरणामध्ये किंवा यापैकी जास्तीत जास्त न्यायाधिकरणामध्ये कामकाज केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

वय मर्यादा – किमान 35 वर्षे कमाल 50 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – 422002.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Results 2023 : 12 वी निकालाबाबत महत्वाचं; ‘त्या’ विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्याची शक्यता; कारण…

HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (HSC Results 2023) मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांचा निकाल राखीव राहण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांचे समकक्षता प्रमाणपत्र मंडळाला मिळालेले नाही, त्यांचा निकाल राखीव ठेवणार असल्याची माहिती नाशिक विभागीय मंडळामार्फत देण्यात आली.
नेमके किती आहेत विद्यार्थी
नाशिक विभागातील अशा चौदा विद्यार्थ्यांची नावे राज्य मंडळाने जाहीर केली असून, ही संख्या यापेक्षा जास्त असण्याचीही शक्यता आहे. परराज्यांतून राज्य मंडळाशी संलग्न (HSC Results 2023) कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिल्यानंतर राज्य मंडळांतर्गत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समकक्षता प्रमाणपत्र सादर करावे लागते.

असा आहे नियम
राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेशी समकक्ष असणाऱ्या परीक्षा दिल्याचे हे प्रमाणपत्र अकरावीला प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांनी सादर करण्याचा नियम आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा झाली, तरी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडे हे प्रमाणपत्र जमा केलेले नाही. विद्यार्थ्यांकडून (HSC Results 2023) हे प्रमाणपत्र घेण्याची सूचना मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांना केली होती. परंतु, बारावीचा निकाल तोंडावर आला, तरी अनेक विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे अद्यापही मंडळाला मिळालेली नाहीत. संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत तातडीने समकक्षता प्रमाणपत्र मंडळाकडे जमा करावे लागणार आहे.
वेळेत प्रमाणपत्र सादर करणं सक्तीचं (HSC Results 2023)
अकरावीमध्ये प्रवेश घेतानाच समकक्ष प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना विद्यार्थ्याला दिली जाते. त्याशिवाय बारावीच्या परीक्षेला बसू न देण्याचा नियम आहे. परंतु, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाते. मात्र, तरीही अनेक विद्यार्थी (HSC Results 2023) हे प्रमाणपत्र सादर करीत नाहीत. निकाल जाहीर झाल्यानंतरही या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत दिली जाते. मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर न झाल्यास या विद्यार्थ्यांचा निकाल रद्द केला जातो.

विद्यार्थ्यांकडून समकक्षता प्रमाणपत्र घेऊन ते मंडळाकडे जमा करणे ही कनिष्ठ महाविद्यालयांची जबाबदारी असते. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी सातत्याने यासाठी मुदत दिली जाते. परंतु, मुदतीत प्रमाणपत्र न मिळाल्यास निकाल रोखावा लागतो. त्यामुळे (HSC Results 2023) ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत, त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडून अशी समकक्षता प्रमाणपत्रे मिळवावीत; असं आवाहन नाशिक विभागीय राज्य मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी केलं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Civil Services Guidance : आता प्रत्येक जिल्ह्यात उघडणार स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र

Civil Services Guidance

करिअरनामा ऑनलाईन । बार्टीच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक (Civil Services Guidance) जिल्ह्यात सामाजिक न्याय भावनात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यूपीएससीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील नामवंत संस्था तसेच विविध विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच एखाद्या  विभागाच्या वतीने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येत आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जात असून लवकरच पुण्यात पहिले केंद्र सुरू करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

समाजकल्याण विभाग आणि बार्टीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा केंद्रांसाठी खासगी संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जायचे. मात्र, यामधून शासकीय अनुदान लाटण्यासाठी (Civil Services Guidance) गैरप्रकार होत असल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकालदेखील कमी प्रमाणात येत होते. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीमध्ये परीक्षा केंद्र संचालित केले जाईल. बार्टीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली. बार्टीमार्फत अनुदान तत्त्वावर खासगी संस्थेकडून स्पर्धा परीक्षा केंद्रे चालविली जायची.

भरीव शासकीय अनुदान असतानादेखील या संस्था गुणवत्ता आणि दर्जा राखण्यात अपयशी ठरल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्रांचा उत्तम दर्जा राखला जावा, यासाठी (Civil Services Guidance) स्वतंत्र परीक्षा केंद्रे सुरू केली जातील, असे भांगे यांनी सांगितले. बार्टीच्या बैठकीला समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दिनेश इंगळे आदी उपस्थित होते.
दिल्लीतील प्रशिक्षण संस्थांशी होणार करार
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी विभागाच्यावतीने दिल्लीतील नामवंत प्रशिक्षण संस्थांशी करार करण्यात येणार आहे. याशिवाय, जगभरातील (Civil Services Guidance) विषयतज्ज्ञ, परदेशातील विद्यापीठे यांच्याशीदेखील करार केला जाईल. ऑनलाइन पद्धतीने परदेशातील व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! पवन हंस लिमिटेड अंतर्गत नोकरीची उत्तम संधी

Government Jobs (41)

करिअरनामा ऑनलाईन । पवन हंस लिमिटेड येथे पदवीधर शिकाऊ (Government Jobs) उमेदवार पदाच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

संस्था – पवन हंस लिमिटेड (Government Jobs)
भरले जाणारे पद – पदवीधर शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 33 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली/NCR/मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2023 (Government Jobs)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – HOD (HR आणि Admin), पवन हंस लिमिटेड, (भारत सरकारचा उपक्रम), कॉर्पोरेट ऑफिस, C-14, सेक्टर-1, नोएडा – 201 301, (U.P.)
E-Mail ID – [email protected] .

Pawan Hans Limited Bharti 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
पदवीधर शिकाऊ उमेदवार – BA/B.Sc./B.Com./ B.Sc (Aviation)/ B.Tech
मिळणारे वेतन – Rs.15,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
The following documents (in original along with one set of self-attested Photo copies) are to be produced for verification –
1. 10th / 12th passing certificate & mark sheet
2. Qualifying exam passing certificate. Degree & mark sheet
3. Proof of date of birth
4. Valid Caste Certificate, if applicable
5. Passport size photographs (02 nos.)
6. PAN Card (Government Jobs)
7. Aadhar Card
8. Declaration affidavit as per format on plain paper

असा करा अर्ज –

Pawan Hans Limited Bharti 2023काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
उमेदवारांनी NATS पोर्टलवर नाव नोंदणी करायची आहे.

नाव नोंदणीसाठी लिंक – http://portal.mhrdnats.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.pawanhans.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी खुशखबर!! भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 428 जागांवर होणार नवीन भरती

BEL Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध (BEL Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 428 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
पद संख्या – 428 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2023

भरली जाणारी पदे –
1. प्रकल्प अभियंता -327 पदे
2. इलेक्ट्रॉनिक्स – 164 पदे
3. यांत्रिक – 106 पदे ((BEL Recruitment 2023))
4. संगणक विज्ञान – 47 पदे
5. इलेक्ट्रिकल – 07 पदे
6. रासायनिक – 01 पद
एरोस्पेस
7. अभियांत्रिकी – 02 पदे
8. प्रशिक्षणार्थी अभियंता-I- 101 पदे
9. इलेक्ट्रॉनिक्स – 100 पदे
10. एरोस्पेस अभियांत्रिकी – 01 पद
आरक्षणाचा तपशील – (BEL Recruitment 2023)
1. UR साठी – 132 पदे
2. OBC साठी – 88 पदे
3. EWS साठी – 33 पदे
4. SC साठी – 49 पदे
5. ST साठी – 25 पदे

वय मर्यादा – 28 ते 32 वर्षे (OBC तीन वर्षे आणि SC-ST ला वयात पाच वर्षांची सूट मिळेल)
परीक्षा फी –
1. प्रकल्प अभियंता – रु. 400 + 18% GST
2. प्रशिक्षणार्थी अभियंता – रु. 150/- + 18% GST (BEL Recruitment 2023)
3. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
मिळणारे वेतन –
प्रकल्प अभियंता
1. पहिले वर्ष – रु 40,000/- दरमहा
2. दुसरे वर्ष – रु 45,000/- दरमहा
3. 3रे वर्ष – रु.50,000/- दरमहा (BEL Recruitment 2023)
4. चौथे वर्ष – रु 55,000/- दरमहा

प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी
1. पहिले वर्ष – रु.30,0000/- दरमहा
2. दुसरे वर्ष – रु 35,000/- दरमहा
3. 3रे वर्ष – रु.40,000/- दरमहा
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा – 85 गुण
2. मुलाखत – 15 गुण
काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ex-Serviceman Degree Course : माजी सैनिकांना ‘या’ विद्यापीठाकडून घेता येणार ‘BA’ ची पदवी

Ex-Serviceman Degree Course

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठात (Ex-Serviceman Degree Course) करार झाला असून, त्याद्वारे माजी सैनिकांना विविध नोकरीच्या संधीस पात्र होण्यासाठी कला शाखेतून BA (HRM) पदवी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. इच्छुक सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
देश रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी सक्षम बनविणे या उद्देशाने केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठात हा करार करण्यात आला. हे पदवी (Ex-Serviceman Degree Course) प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमांच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त असणार आहे. परंतु, त्यास पात्र ठरण्यासाठी माजी सैनिकाने इयत्ता 12वी किंवा समतूल्य शिक्षण घेतलेले असावे.

ही पात्रता आवश्यक
उमेदवाराकडे भारतीय आर्मी, नेव्ही, एअर फोर्सद्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र असायला हवे. माजी सैनिकांची सेवा 15 वर्षांपेक्षा कमी नसावी. 1 जानेवारी 2010 नंतर ते निवृत्त झालेले असावेत.
संबंधित माजी सैनिक 10वी उत्तीर्ण असेल तर त्यांना (Ex-Serviceman Degree Course) पाच वर्षांचा अभ्यासक्रम लागू राहील. या अभ्यासक्रमाची फी 12 हजार 500 रुपये असून, अर्जदाराने आपले अर्ज एप्रिल अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्यातच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन कापले यांनी केले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VSSC Recruitment 2023 : विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात ‘या’ पदावर भरती सुरु; मिळवा 1,42,000 पगार

VSSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र अंतर्गत (VSSC Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 63 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
संस्था – विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र
पद संख्या – 63 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) टेक्निकल असिस्टंट – 60 पदे
इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन/ कॉम्प्युटर सायन्स/ केमिकल/ सिव्हिल/ रेफ. & AC/ऑटोमोबाईल इंजिनिरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा.
2) सायंटिस्ट असिस्टंट – 02 पदे
B.Sc (केमिस्ट्री)
3) लायब्ररी असिस्टंट- A 01 पद (VSSC Recruitment 2023)
पदवीधर, ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी

वय मर्यादा –
16 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – 750/- रुपये
मिळणारे वेतन –
1. टेक्निकल असिस्टंट – 44,900/- ते 1,42,400/- रुपये दरमहा
2. सायंटिस्ट असिस्टंट – 44,900/- ते 1,42,400/- रुपये दरमहा
3. लायब्ररी असिस्टंट-A – 44,900/- ते 1,42,400/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया –
1. लेखी चाचणी (VSSC Recruitment 2023)
2. कौशल्य चाचणी परीक्षा
परीक्षेचे स्वरूप –
1. बहु पर्यायी प्रश्न
2. परीक्षा कालावधी – 90 मिनिटे.
3. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.33 निगेटिव्ह मार्किंग असेल आणि बरोबर उत्तरासाठी 1 मार्क असेल.
4. उत्तीर्ण निकष – यूआर – 32/80 गुणांसाठी.
5. राखीव श्रेणीसाठी – 24/80 गुण (VSSC Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – तिरुवनंतपुरम/संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.vssc.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 How to Prepare for UPSC : 12वीनंतर अशी करा UPSC ची तयारी; कोणती पुस्तके आहेत महत्वाची?

How to Prepare for UPSC

करिअरनामा ऑनलाईन । देशातील प्रत्येक तरुणाला IAS अधिकारी (How to Prepare for UPSC) होण्याची इच्छा असते. पण जे अपार मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द ठेवतात असेच लोक IAS होतात. आपल्या देशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत IAS होण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा देण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. खूपच कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळते. UPSC ही आपल्या देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो तरुण केवळ काही जागांसाठी या परीक्षेची तयारी करतात.
12 वीत असतानाच घ्या निर्णय (How to Prepare for UPSC)
या परीक्षेत पास होण्याची टक्केवारी खूपच कमी आहे. सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही त्याचा निर्णय 12वी मध्ये शिकत असतानाच घ्या म्हणजे 12वी नंतर पदवीचे शिक्षण घेताना तीन वर्ष तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल. NCERTच्या पुस्तकांचा अभ्यास करून या परीक्षेची तयारी सुरू करा. त्याशिवाय सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे ठेवा आणि त्यानुसार तयारी करा.

विषयाची निवड महत्वाची
बहुतेक विद्यार्थी त्यांच्या पदवीच्या कोणत्याही एका विषयातून परीक्षेच्या मुख्य टप्प्यासाठी विषय निवडतात. हे आपल्याला सोपे ठरते कारण आपण संपूर्ण तीन वर्ष पदवीसह (How to Prepare for UPSC) या विषयाचा अभ्यास करतो. याशिवाय इतर निवडक विषयांसाठी तुम्ही स्टडी मटेरियल निवडू शकता किंवा तुम्हाला तज्ञांचा सल्ला मिळू शकेल. चालू घडामोडींच्या तयारीसाठी तुम्ही वर्तमानपत्र वाचनासह आणि नियमीतपणे बातम्या बघितल्या पाहिजेत.
NCERT आणि NIOS ची पुस्तके वाचा
तुम्ही NCERT आणि NIOS ची पुस्तके वाचू शकता. ही पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत या विषयाचा अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे आहे, म्हणूनच हा विषय निवडताना तुम्हाला त्या विषयात रस आहे की नाही हे लक्षात ठेवा. जरी कोणत्याही विषयाचा अभ्यास (How to Prepare for UPSC) करणे अशक्य नाही, परंतु तरीही ज्या विषयात आपल्याला रस आहे त्या विषयांची निवड करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. UPSC परीक्षेच्या मोठ्या अभ्यासक्रमामुळे वर्षभर अभ्यास करावा लागतो. म्हणून, वेळापत्रक तयार करून वर्षभर अभ्यास करणे आवश्यक आहे.

त्यागाची तयारी ठेवा (How to Prepare for UPSC)
यूपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही बँकिंग किंवा एसएससी परीक्षा नसते ज्यात यश लगेचच मिळते. तर या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, त्याशिवाय या परीक्षेत तुम्ही यश मिळू शकत नाहीत. यूपीएससी परीक्षेली तुम्हाला दोन ते तीन वर्षे द्यायची आहेत. या वर्षांमध्ये आपल्याला दररोज नियमित अभ्यास करावा लागतो.
घरी बसूनही करु शकता तयारी
बरेच लोक म्हणतात की, UPSC परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जाणे आवश्यक आहे; मात्र हे खरंच गरजेचं आहे का हे आपण बघणार आहोत. UPSC परीक्षेची तयारी आपण घरी बसूनही करु शकतो. फक्त आपल्याला जीवनात काही बदल करावे लागतील. अभ्यासाच्या काटेकोर नियोजनासह (How to Prepare for UPSC) आणि योग्य स्टडी मटेरियलसह घरातूनही तुम्ही सिव्हील सर्व्हिसेसची परीक्षा पास करू शकता. तुम्ही आपल्या शहरात किंवा गावात राहून देखील यूपीएससीचा अभ्यास करू शकता. आज केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर अनेक उमेदवार UPSC परीक्षा पास झालेले आपण बघतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही फक्त घरी बसून अभ्यास करुन परीक्षेची पूर्ण तयारी करू शकत नाही; तर मग तुम्ही कोचिंग क्लास लावू शकता.

लेखन आणि वाचनाचा सराव वाढवा
आपल्याला लेखनाबरोबरच वाचनाचा सराव करावा लागेल कारण पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे. सुमारे 200 शब्दांत कोणत्याही विषयावर थोडक्यात (How to Prepare for UPSC) लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण जितके अधिक लिहायचा प्रयत्न कराल तितकी आपली लेखन शैली सुधारेल आणि व्याकरणात कमी चुका होतील.
करंट अफेयर्स महत्त्वाचे
UPSC परीक्षेत करंट अफेयर्सची माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा. त्यात येणारा संपादकीय स्तंभ तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. वर्तमान पत्र आणि लेख वाचन वगळून कोणीही UPSC पास होवू शकत नाही. दररोज वर्तमान पत्र आणि लेख (How to Prepare for UPSC) वाचन केल्याने UPSC ची 80 % हून अधिक तयारी होते. म्हणून दररोज वर्तमान पत्र आणि लेख वाचनसाठी दोन ते तीन तास देणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही एक राष्ट्रीय स्तरावरील आणि एक स्थानिक स्तरावरील वर्तमान पत्र वाचन केले पाहिजे. यामुळे तुमची मुलाखतीची तयारी होण्यास निश्चित मदत होईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment : Indian Navy अंतर्गत ‘या’ पदावर भरती; मिळवा महिन्याचा 35,400 पगार

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलाने चार्जमन पदाच्या (Indian Navy Recruitment) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 372 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)
पद संख्या – 372 पदे
भरले जाणारे पद – चार्जमन II
भरतीचा तपशील –
1. इलेक्ट्रिकल ग्रुप – 42 पदे
2. वेपन ग्रुप – 59 पदे
3. इंजिनिअरिंग ग्रुप – 141 पदे
4. कंस्ट्रक्शन & मेंटेनेंस ग्रुप – 118 पदे
5. प्रोडक्शन प्लानिंग & कंट्रोल ग्रुप – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 15 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment)
उमेदवाराने अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा विज्ञानातील भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांपैकी एक विषय म्हणून बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
1. किमान वय – 18 वर्षे (Indian Navy Recruitment)
2. कमाल वय – 25 वर्षे असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 278/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]
मिळणारे वेतन – रु. 35,400/- दरमहा (भारतीय नौदलाच्या नियम आणि नियमांनुसार विविध भत्ते मिळतील.)
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा (Indian Navy Recruitment)
2. संगणक आधारित चाचणी
3. व्यापार चाचणी / कौशल्य चाचणी
4. मुलाखत
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अशी होईल परीक्षा –
सर्व निवडलेल्या/पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या कॉम्प्युटरवर  आधारित परीक्षा द्यावी लागेल.
गुण विभाजन –
1. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 10 गुण
2. परिमाणात्मक योग्यता – 10 गुण
3. सामान्य इंग्रजी – 10 गुण (Indian Navy Recruitment)
4. सामान्य जागरूकता – 20 गुण
5. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम – 50 गुण
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : रेल्वेने जाहीर केली 3190 जागांवर मेगाभरती; पात्रता फक्त 10वी/12 वी पास

Railway Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था (Railway Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी पदांच्या एकूण 3190 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
संस्था – रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था
भरली जाणारी पदे – (Railway Recruitment 2023)
1. कनिष्ठ वेळ रक्षक – 1676 पदे
2. कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
3. कल्याण अधिकारी – 606 पदे
पद संख्या – 3190 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023

अर्ज फी –
1. PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/
2. मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/-
3. इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-
काही महत्वाच्या तारखा –

Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ वेळ रक्षक – किमान 10 वी पास आवश्यक. (Railway Recruitment 2023)
2. कनिष्ठ सहाय्यक किमान – 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3. कल्याण अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
मिळणारे वेतन –
1. कनिष्ठ वेळ रक्षक – Rs.28,000/- per month
2. कनिष्ठ सहाय्यक – Rs.34,000/- per month (Railway Recruitment 2023)
3. कल्याण अधिकारी – Rs.40,000/- per month
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
3. उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rmgs.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.

निवड प्रक्रिया –
1. Computer Based Test CBT
2. Document Verification
3. Medical Examination (Railway Recruitment 2023)
4. For more information please see the given PDF advertisement.

अर्ज फी तपशील – (Railway Recruitment 2023)
Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Bharti 2023काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – rmgs.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com