Home Blog Page 31

IRDAI Recruitment 2024 : 89 हजार पगाराच्या नोकरीसाठी ‘इथे’ करा अर्ज; पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी

IRDAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमा नियामक आणि विकास (IRDAI Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर
पद संख्या – 49 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+ ACA / AICWA / ACMA / ACS/CFA किंवा B.E/B.Tech (Electrical / Electronics / Electronics and Communication / Information Technology / Computer Science/ Software Engineering)/किंवा MCA
वय मर्यादा (IRDAI Recruitment 2024) –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS: ₹750/-
2. SC/ST/PWD:₹100/- (IRDAI Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 44,500/- ते 89,150/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://irdai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत डेव्हलपर पदावर नोकरीची संधी; अर्ज करा E-MAIL

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जनता सहकारी बँक, जळगाव (Job Notification) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विकसक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – जनता सहकारी बँक, जळगाव
भरले जाणारे पद – विकसक (Developer)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
05 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Job Notification) –
B.E. / B.Tech / Graduate / Post Graduate
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवशक (Job Notification) कागदपतत्राची प्रत सादर करा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.jjsbl.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन येथे 279 पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

NPCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर पदांच्या एकूण 279 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर
पद संख्या – 279 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2024

वय मर्यादा – १८ ते २४ वर्षे
अर्ज फी – Rs.१००/-
भरतीचा तपशील (NPCIL Recruitment 2024) –

पदपद संख्या 
श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर१५३
श्रेणी-II  स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर१२६

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटरCandidates Should possess HSC (10+2) or ISC in Science stream (with Physics, Chemistry and Mathematics Subjects).
श्रेणी-II  स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर Candidates Should possess SSC (10th) & ITI (Relevant Trade).

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची (NPCIL Recruitment 2024) तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://npcil.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC : UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षे संदर्भात (UPSC) महत्वाची अपडेट आहे. UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. UPSC ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) (2) परीक्षा 2024 आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) (2) दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आज (दि. 23) प्रसिद्ध केले आहे. UPSC ने upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय केली आहे.

UPSC ने यापूर्वी NDA/CDS 2 परीक्षा आयोजित करण्याची तारीख जाहीर केली होती. आयोगाने 2024 सालासाठी जारी केलेल्या सुधारित परीक्षा वेळापत्रकानुसार, दोन्ही लेखी परीक्षा 1 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत.

असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC) –
1. उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in ला भेट द्यायची आहे.
2. आता प्रवेश पत्र विभागात जावा.
3. नंतर या विभागात, उमेदवाराला त्यांच्या परीक्षा प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
4. नवीन पृष्ठावर, तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरा आणि सबमिट करा.
5. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहता येईल, त्याची प्रिंट घ्या.
6. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी (UPSC) त्यावर दिलेले त्यांचे तपशील जसं की नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, फोटो या गोष्टी तपासा. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ताबडतोब आयोगाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधा; अशा सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Apply for a Job : नोकरीसाठी अर्ज करताना ‘या’ 8 सुचनांचे पालन करा… तुमची निवड पक्की समजा

How to Apply for a Job

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही नोकरीसाठी अर्ज (How to Apply for a Job) करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्जामधील माहितीची मांडणी प्रभावीपणे केली असेल तर निवडीची शक्यता अधिक होते. आज आपण जाणून घेणार आहोत; अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी..

नोकरीसाठी अर्ज करताना बऱ्याच वेळा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जातो. काहीवेळा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज केले जातात. तुमचा अर्ज आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे यावरुन तुमची निवड निश्चित होते. त्यामुळे उमेदवाराने अर्ज करताना काही निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

अर्ज करताना कोणत्या सुचनांचे पालन कराल –
1. खोटा दावा करणं टाळा (How to Apply for a Job) –
तुम्ही अर्जात दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असावी. भविष्यात त्रास होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारचा खोटा दावा करणं टाळा.
2. Resume अद्ययावत ठेवा –
शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, आणि कौशल्ये यांची स्पष्ट आणि संक्षिप्त मांडणी करा. रिझ्युमे व्यवस्थित फॉरमॅटेड असावा, ज्यामुळे HR तुमची माहिती पटकन वाचू शकेल.

3. सोशल मीडिया प्रोफाइल अपडेट ठेवा –
– खासकरून LinkedIn प्रोफाइलवर तुमची सर्व माहिती ताजी ठेवा.
– नियोक्ता तुमची प्रोफाइल तपासू शकतो, त्यामुळे ती व्यवस्थित आणि पूर्ण असावी.
4. नोकरीच्या स्वरुपाचा अभ्यास करा –
नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी नोकरीचे स्वरुप (How to Apply for a Job) नीट वाचा आणि त्या स्वरुपानुसार अर्जाची मांडणी करा. आवश्यकतेनुसार तुमच्या कौशल्यांचा आणि अनुभवाचा उल्लेख करा, ज्यामुळे तुम्ही नोकरीसाठी योग्य आहात हे HR ला पटेल.

5. कागदपत्रांचे फॉर्मेट आणि साइज दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सबमीट करा.
6. स्पेलिंग मधील चुका टाळा –
अर्ज करताना स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका टाळा. अर्ज स्वच्छ, सुबक, आणि वाचण्यास सोपा असावा; याची काळजी घ्या.

7. दिलेल्या मुदतीत अर्ज करा –
दिलेल्या वेळेत अर्ज पोहचेल याची काळजी घ्या आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडा.
8. वेगवेगळे अर्ज करा –
प्रत्येक नोकरीसाठी वेगळे अर्ज तयार करा. एकाच (How to Apply for a Job) अर्जाचा उपयोग अनेक ठिकाणी करू नका, कारण प्रत्येक नोकरीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक असतात.
जर तुम्ही या सर्व मुद्द्यांची काळजी घेतली तर तुमचा अर्ज अधिक प्रभावी आणि HR च्या दृष्टीने आकर्षक होईल, ज्यामुळे तुमची नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : कोण आहेत मीरा कुलकर्णी? ज्यांनी मेणबत्ती व्यवसायातून मिळवलं श्रीमंतांच्या यादीत स्थान

Business Success Story of Meera Kulkarni

करिअरनामा ऑनलाईन । उद्योजकतेच्या क्षेत्रात काही व्यक्ती (Business Success Story) सर्व अडथळे पार करून यशाच्या मार्गावर पुढे जात राहतात. मीरा कुलकर्णी या ‘फॉरेस्ट एसेंशियलच्या’ दूरदर्शी संस्थापक आणि सीएमडी आहेत. हे उत्पादन भारतातील एक प्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे. मीरा यांचा प्रतिकूलतेपासून विजयापर्यंतचा उल्लेखनीय प्रवास जगभरातील महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी प्रेरणा देणारा आहे.

मीरा कुलकर्णी (Meera Kulkarni) यांनी आपल्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी मेणबत्त्या आणि हाताने साबण बनवण्याचा छंद जोपासला; जो छंद पुढे जाऊन एक मोठा उद्योग बनला. २४ वर्षांपूर्वी मीरा यांनी फॉरेस्ट एसेन्शियल्स या कंपनीचा पाया घातला. मीरा यांनी आयुष्यातील सर्व अडथळ्यांवर मात करून स्वतःची दृढनिश्चयी स्त्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.

कोण आहेत मीरा कुलकर्णी? (Business Success Story)
फॉरेस्ट एसेंशियलच्या संस्थापक आणि सीएमडी मीरा यांना यशाच्या प्रवासात अनेक अडथळे आले पण, त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. वयाच्या २८व्या वर्षी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. मीरा कुलकर्णी यांनी दोन लाख रुपयांचा व्यवसाय सुरू केला ज्याचे मूल्यांकन आता १०,००० कोटी रुपये झाले आहे. फॉर्च्यून मासिकात ‘भारतातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली महिला’ म्हणून मीरा यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पतीच्या व्यसनाधीनतेमुळे लग्न मोडलं
अगदी कमी वयात मीरा यांचं लग्न झालं. त्यांच्या (Business Success Story) नवऱ्याला व्यवसायातील नुकसानीमुळे दारूचे व्यसन लागले. परिणामी दोघांचे लग्न मोडले. त्यानंतर मीरा आपल्या दोन मुलांसह आईच्या घरी परतल्या पण संकटांनी मीरा यांची पाठ सोडली नाही. त्या २८ वर्षाच्या असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. वय कमी पण पदरात दोन मुले होती. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी मीरा एकट्या लढत होत्या. त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक आव्हानाला त्या धैर्याने तोंड देत होत्या.

छोट्या गॅरेजमधून सुरु केली कंपनी
मीरा यांच्या मुलीचं लग्न झालं त्यावेळी त्या 45 वर्षाच्या होत्या. मुलीच्या लग्नानंतर मीरा यांनी मेणबत्त्या आणि हाताने बनवलेला साबण बनवण्याचा छंद लागला. या छंदाचे नंतर व्यवसायात रूपांतर झाले. त्यांनी फॉरेस्ट एसेंशियलची स्थापना केली. फक्त दोन लाख रुपये गुंतवणूक आणि एका छोट्या गॅरेजमध्ये (Business Success Story) दोन कर्मचाऱ्यांसह त्यांनी व्यवसायाला सुरुवात करून मीरा यांनी नैसर्गिक घटकांवर लक्ष केंद्रित केले. आयुर्वेदाचा वापर करून त्यांनी बनवलेली उत्पादने लोकांच्या पसंतीस उतरली. मीरा यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि व्यवसायात भरभराट झाली. आज फॉरेस्ट इसेन्शियल्सचा व्यवसाय देशभरातील २८ शहरांमध्ये पसरला आहे. मीरा या व्यवसायाचे कौशल्यतेने नेतृत्व करत आहेत.
2 लाख रुपयांची माफक गुंतवणूक आणि फक्त दोन कर्मचाऱ्यांच्या टीमसह मीरा यांनी गॅरेजमधील छोटेखानी कामाचे रूपांतर एका भरभराटीच्या उपक्रमात केले. आयुर्वेदाच्या समृद्ध वारशातून प्रेरणा घेऊन त्या टिहरी गढवाल प्रदेशातील स्वदेशी घटक काळजीपूर्वक तयार करतात आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये निसर्गाच्या भेटवस्तूंचे सार घालतात.

भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक महिला
अनेक वर्षांपासून फॉर्च्यून मासिकाने ‘भारतातील (Business Success Story) व्यवसायातील सर्वात शक्तिशाली महिला’ ही पदवी देवून मीरा यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेतली आहे. शिवाय कोटक वेल्थ हुरून – अग्रगण्य श्रीमंत महिला 2020 च्या अहवालानुसार त्यांना 1,290 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे.
२००८ मध्ये मीरा यांनी द एस्टी लॉडर कंपन्यांनी फॉरेस्ट एसेन्शियल्समधील भाग भांडवल विकत घेऊन महत्त्वपूर्ण भागीदारी केली तर ग्रँड हयात आणि ताज यासारख्या प्रतिष्ठित हॉटेल्सच्या सहकार्याने ब्रँडची प्रतिष्ठा आणखी वाढवली. कोटक वेल्थ हुरूनच्या २०२० नुसार मीरा यांची एकूण संपत्ती १,२९० कोटी रुपये आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Bank Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! इंडियन बँकेत होणार 300 पदांवर भरती

Indian Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. (Indian Bank Recruitment 2024) पदवी पास असलेल्या तरुणांसाठी इंडिययन बँकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. इंडियन बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदाच्या एकूण 300 जागांवर भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

बँक – इंडियन बँक
भरले जाणारे पद – स्थानिक बँक अधिकारी
पद संख्या – 300 पदे (Indian Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट

परीक्षा फी (Indian Bank Recruitment 2024) –
1. जनरल/ओबीसी/EWS – ₹1000/-
2. SC/ST/PWD – ₹175/-
मिळणारे वेतन – 48,480/- ते 85,920/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र/तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश/ तेलंगणा/गुजरात

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : या चालू घडामोडी लक्षात ठेवाच.. सरकारी भरती परीक्षेत होईल मोठी मदत

GK Update 22 Aug

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1- पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरी टेनिसमध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले?
उत्तर- नोव्हाक जोकोविच
2- यामिनी कृष्णमूर्ती यांनी कोणत्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवली?
उत्तर- शास्त्रीय नृत्य (GK Update)
3 – पर्यटन विकास निर्देशांक 2024 अहवालात भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर – ३९ वा

4- केंद्र सरकारने किती राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे?
उत्तर – 8 प्रकल्पांना
5 – राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- १ ऑगस्ट

6- नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर – क्रिकेट
7 – कोणत्या व्याघ्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी विंड टर्बाइन बसविण्यात आले आहे?
उत्तर- पेरियार व्याघ्र प्रकल्प
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Raigad DCC Bank Recruitment 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लिपिक’ पदावर मोठी भरती; पात्रता ग्रॅज्युएट

Raigad DCC Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Raigad DCC Bank Recruitment 2024) अंतर्गत लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरले जाणारे पद – लिपिक
पद संख्या – 200 पदे (Raigad DCC Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२४

वय मर्यादा –
1. किमान – २१ वर्ष
2. कमाल – ४२ वर्षे
अर्ज फी – रु. ५९० शुल्क

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असावी.
2. उमेदवाराकडे MSCIT किंवा (Raigad DCC Bank Recruitment 2024) शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र असावे. (संगणक पदवी असल्यास अट शिथिल)
मिळणारे वेतन – अंदाजे एकत्रित वेतन रु. २५००० दरमहा

असा करा अर्ज (Raigad DCC Bank Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२४ आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rdccbank.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EIL Recruitment 2024 : इंजीनियर्स इंडिया लिमिटेड येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; इथे आहे अर्जाची लिंक

EIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत (EIL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता/अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी/वास्तुविशारद, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड
भरली जाणारी पदे – अभियंता/अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी/वास्तुविशारद, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
पद संख्या – 77 पदे (EIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2024

भरतीचा तपशील (EIL Recruitment 2024) –

पदाचे नावपद संख्या 
Scientific Officer/ Architect/Manager/ Senior Manager10
Engineer/Deputy Manager05
Deputy Manager/ Manager50
Senior Manager08
Officer01
Dy. General Manager02
Manager01

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (EIL Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com