Home Blog Page 30

UPSC Exam Calendar 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या UPSC परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; पहा सुधारीत तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 परीक्षेसाठी (UPSC Exam Calendar 2025) वार्षिक परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये बदल केले आहेत. या नवीन कॅलेंडरमध्ये अनेक भरती परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारीत तारखेनुसार UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2025 असेल.

परीक्षेच्या सुधारीत तारखा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख (UPSC Exam Calendar 2025) –
1. भारतीय वन सेवा (प्राथमिक) परीक्षा 2025 दि. 25 मे 2025 रोजी होणार आहे.
2. अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2025 दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2024 असेल.

3. संयुक्त भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. यासाठी 4 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची शेवटची (UPSC Exam Calendar 2025) तारीख तारीख 24 सप्टेंबर 2024 असेल.
4. संयुक्त संरक्षण सेवा (CDS) I परीक्षा, 2025 दि. 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. यासाठी 11 डिसेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 असेल.

5. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) I परीक्षा दि. 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि (UPSC Exam Calendar 2025) अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 असेल.
6. UPSC ने निवेदनात असंही स्पष्ट केले आहे की, अधिसूचना, प्रारंभ आणि परीक्षा/भरती चाचणीच्या तारखा परिस्थितीनुसार बदलू शकतात. उमेदवारांना हे बदल वेळोवेळी कळवले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2024 : सेवानिवृत्त शिक्षक पदावर भरती सुरु; अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर ठाण्यात नोकरी (ZP Recruitment 2024) करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘सेवानिवृत्त शिक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर..

संस्था – जिल्हा परिषद, ठाणे
भरले जाणारे पद – सेवानिवृत्त शिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात (PDF पहा)

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Minimum Bachelor’s degree in Technology or Science.
असा करा अर्ज – (ZP Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारले घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://zpthane.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TMC Recruitment 2024 : मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी!! टाटा मेमोरियल सेंटरने काढली भरतीची जाहिरात

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत (TMC Recruitment 2024) नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पॅथॉलॉजी विभागातील ‘तदर्थ वरिष्ठ रहिवासी’ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई
भरले जाणारे पद – पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासी
पद संख्या – 06 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – होमी भाभा ब्लॉक, 13 वा मजला, शैक्षणिक कार्यालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल,परळ, मुंबई
मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा (TMC Recruitment 2024) – 40 वर्षे

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासीMD (Pathology)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाववेतन
पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासीRs.1,21,200/‑ p.m. (Gross Pay)

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या (TMC Recruitment 2024) तारखेला मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. या पद भरतीसाठी मुलाखत 26 ऑगस्ट 2024 या तारखेला घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment 2024 : इस्रो मध्ये नोकरीची मोठी संधी!! ‘ही’ पात्रता आवश्यक

ISRO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी ‘एसडी’ पदाची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थ
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी ‘एसडी’
पद संख्या – 01 पदे (ISRO Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.B.B.S+ MS/DNB in ENT recognized and registered with Medical Council of India/State/ National Medical Commission
मिळणारे वेतन – Rs. 67,700- Rs. 2,08,700/- + NPA @ 20%.
असा करा अर्ज (ISRO Recruitment 2024) –
1. या भरतीकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

NHM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
भरले जाणारे पद – फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
पद संख्या – 20 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत (NHM Recruitment 2024)
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका,
मुलाखतीची तारीख – 05 सप्टेंबर 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
फिजिशियन04
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ04
बालरोगतज्ञ04
नेत्ररोग तज्ञ02
त्वचारोग तज्ञ02
मानसोपचार तज्ञ02
ईएनटी तज्ञ02

आवश्यक शैक्षणिक पात्रता (NHM Recruitment 2024) –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
फिजिशियनMD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञMD/MS Gyn/DGO/ DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञMS Ophthalmologist/ DOMS
त्वचारोग तज्ञMD(Skin/VD) DVD,DNB
मानसोपचार तज्ञMD Pyschiatrist/DPM/DNB
ईएनटी तज्ञMS Ent/DORL/DNB

मिळणारे वेतन –

पदवेतन
फिजिशियनRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
बालरोगतज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
नेत्ररोग तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
त्वचारोग तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
मानसोपचार तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
ईएनटी तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड लाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (NHM Recruitment 2024) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. या पदांकरिता मुलाखती 05 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदावर भरती सुरु; 25 ऑगस्टला होणार मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पीआरटी (प्राथमिक शिक्षक), टीजीटी (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव
भरली जाणारी पदे –
1. पीआरटी (प्राथमिक शिक्षक)
2. टीजीटी (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)
पद संख्या – 06 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – विद्या इंग्लिश मिडियम स्कूल, डी मार्ट जवळ, शिवाजी पार्क रोड, मेहरून, जळगाव.
मुलाखतीची तारीख – 25 ऑगस्ट 2024

भरतीचा तपशील (Job Alert ) –

पदपद संख्या 
पीआरटी (प्राथमिक शिक्षक) 02
टीजीटी (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)04

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. उमेदवाराने आवश्यक (Job Alert) कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
3. मुलाखत 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
3. उमेदवाराने मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://vidyaschool.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SATHEE Portal : इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर परीक्षांची SATHEE पोर्टलवरून फ्रीमध्ये करा तयारी; असं करा रजिस्ट्रेशन

SATHEE Portal

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR ची (SATHEE Portal) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत SATHEE पोर्टल चालवले जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR या सर्व परीक्षांची मोफत तयारी करू शकता. परीक्षेची तयारी आयआयटी प्राध्यापक/विषय तज्ञांकडून केली जाईल. यासोबतच, लाइव्ह क्लासेस, NCERT व्हिडिओ सोल्यूशन्स, AI आधारित मूल्यांकन प्लॅटफॉर्म, प्राध्यापकांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इत्यादी देखील तुमच्यासाठी या पोर्टलवर उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही तुमची अभ्यासाची तयारी सुधारू शकता.

या भरती परीक्षांचाही होतो समावेश (SATHEE Portal)
विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसोबतच आता SATHEE पोर्टलवर भरतीची तयारी करण्यात येत आहे. तुम्ही बँकिंग संबंधित भरतीसाठी येथे मोफत तयारी करू शकता. याशिवाय एसएससीची तयारीही या पोर्टलवर मोफत केली जाते.
यापैकी कोणत्याही तयारीसाठी, तुम्ही SATHEE पोर्टलला भेट देऊन विनामूल्य नोंदणी करू शकता आणि तुमची तयारी पूर्ण करू शकता.
अहवालानुसार, भविष्यात, CUET, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) इत्यादी देखील या पोर्टलवर जोडल्या जातील जेणेकरून या विभागातील विद्यार्थ्यांना देखील विनामूल्य तयारीचा लाभ मिळू शकेल.

SATHEE पोर्टलवर नोंदणी कशी करायची?
1. SATHEE पोर्टलवर नावनोंदणी करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम sathee.prutor.ai या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
2. यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला जे काही (SATHEE Portal) तयार करायचे आहे त्याच्या पुढे Start Learning वर क्लिक करा.
3. आता अभ्यासक्रम/भरती निवडा आणि Enroll Now लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : घरचे म्हणाले “भारतात जावू नको”; पण तिने रिस्क घेतली.. पतीसोबत उभारली 8 हजार कोटीची कंपनी

Career Success Story of Upasana Taku

करिअरनामा ऑनलाईन । फॅशनपासून ते तंत्रज्ञानापर्यंत, महिलांनी (Career Success Story) जवळपास सर्वच क्षेत्रे काबीज केली आहेत. या यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचेही (Upasana Taku) नाव येते. ‘फिनटेक मार्केट’चे नेतृत्व करणाऱ्या काही महिला उद्योजकांपैकी उपासना ही एक आहे. त्या ‘Mobikwik च्या’ CEO आहेत. त्यांनी आपल्या पतीसोबत ही कंपनी सुरू केली. उपासना इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी आहे. पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. यानंतर उपासनाने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंट सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. लाखो महिलांसाठी ती प्रेरणास्थान आहे; यामागचं कारण काय.. जाणून घेवूया…

अमेरिकेतून भारतात परत आली (Career Success Story)
उपासना यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अमेरिकन पेमेंट फर्म PayPal साठी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांनी एचएसबीसीमध्येही काम केले. त्या आधी अमेरिकेत राहत होत्या. पण नंतर ती 2008 मध्ये भारतात परतली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 17 वर्षांहून अधिक काळ त्यांनी या संबंधित क्षेत्रात काम केले आहे.

व्यवसायासाठी भारत योग्य वाटला पण मायदेशी परत येण्यास कुटुंबीयांचा विरोध
एका मुलाखतीत उपासना म्हणाली होती की, “भारतात जितक्या समस्या आहेत तितक्याच संधी आहेत. या दोन्ही गोष्टींनी भारत परिपूर्ण आहे. मला ज्या प्रकारचा व्यवसाय करायचा होता (Career Success Story) त्यासाठी भारत हे योग्य ठिकाण होते. पण भारतात परतण्याच्या माझ्या योजनेला कुटुंबीयांनी विरोध केला. हा निर्णय जोखमीचा ठरेल असे, कुटुंबातील सदस्यांना वाटत होते. पण मी मागे हटले नाही; रिस्क घेतली.” उपासनाचे आई-वडील आफ्रिकेत राहत होते. वडील इरिट्रियामधील अस्मारा विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते; तर आई संगीतकार.

NGO साठी योगदान दिलं
2008 मध्ये भारतात परत आल्यानंतर उपासनाने PayPal मधील नोकरी सोडली. तिला तिच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी करायचं होतं. उपासनाने आयुष्यात (Career Success Story) सर्व सुखसोयींचा उपभोग घेतला होता. तिच्याकडे मोठं घर, गाडी आणि इतर अनेक सुविधा होत्या. भारतात आल्यानंतर तिने दृष्टी या मायक्रोफायनान्स एनजीओसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात काम करण्यास सुरुवात केली.

2008 मध्ये जोडीदाराची भेट झाली (Career Success Story)
उपासना तिचे पती बिपीन प्रीत सिंग यांना एका नाटकाच्या शो दरम्यान पहिल्यांदा भेटली. ते वर्ष होते 2008. नंतर 2011 मध्ये त्यांचे लग्न झाले. 2008 मध्ये MobiKwik ची सह-स्थापना करणाऱ्या सिंह यांनी प्लॅटफॉर्मची संकल्पना विकसित केली. बिपीन आधी करत असलेली नोकरी सोडू शकला नाही कारण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर होती. उपासनाने त्यांना नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करण्याचे बळ दिले आणि दोघांनी 2009 मध्ये व्यवसाय सुरू केला.

यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचे नाव
उपासना टाकूने सुद्धा अशीच काहीसी मेहनत करत यश मिळवले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपासनाने सुमारे १७ वर्षे परदेशात अनेक कंपन्यांमध्ये नोकरी केली. उपासना (Career Success Story) यांचे खूप आधी पासूनचे स्वपन होते की त्यांना एक व्यवसाय करायचा होता आणि त्यादिशेने पाऊल उचलत त्यांनी भारत गाठले. सुरुवातीला उपासना यांच्या या निर्यणायला घरच्यांनाचा पाठिंबा नव्हता तरीसुद्धा त्या निर्णयावर ठाम राहिल्या. आज यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचे यांचेसुद्धा नाव येते.

कंपनीची उलाढाल सुमारे 8 हजार कोटी
2008 मध्ये भारतात परतल्यानंतर उपासना यांची भेट बिपीनप्रीत सिंगसोबत झाली आणि त्यानंतर काही वर्षातच ते विवाहबद्ध झाले. नंतर २००९ मध्ये दोघांनी एकत्र मिळून व्यवसाय सुरू केला. बिपीनने मोबिक्विक अशी व्यवसाय संकल्पना तयार केली होती, पण ते सुद्धा नोकरी करत असल्याने ही संकल्पना तशीच राहिली होती, त्यानंतर उपासनाने बिपीनप्रीतला सपोर्ट केला आणि दोघांनी मिळून २००९ मध्ये व्यवसाय सुरू केला. मोबिक्विक नावाची छोट्या कंपनीने आज फिनटेक उद्योगात मोठे नाव बनवले आहे. काही अहवालानुसार, कंपनीची उलाढाल सुमारे आठ हजार कोटी रुपये आहे.

उच्च शिक्षण आणि नोकरी (Career Success Story)
उपासना हिने पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले तर त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंट सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पेपल कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे. तर याशिवाय एचएसबीसी कंपनीतही काम केले आहे. २००८मध्ये उपासना भारतात परतल्या आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले; आणि इथूनपूढे त्यांच्या प्रगतीचा आलेख नेहमी चढताच राहिला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : धक्कादायक!! 10 वी, 12वीत तब्बल 65 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नापास; आकडेवारी काय सांगते…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या (Big News) अहवालामधून असं स्पष्ट झालं आहे की, मोठ्या संख्येने 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरले आहेत. हा अहवाल सादर करताना राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये 65 लाखांहून अधिक विद्यार्थी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.

हाती आलेल्या अहवालानुसार,या विश्लेषणामध्ये (Big News) ज्या मंडळांचे इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामध्ये 59 स्कूल बोर्ड, 56 राज्य मंडळे आणि 3 राष्ट्रीय मंडळे यांच्याशी संलग्न शाळांचा समावेश आहे. याच अहवालात गेल्या वर्षी ६५ लाखांहून अधिक मुले बोर्डाच्या परीक्षेत अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही (Big News)
मीडिया रीपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या अहवालाच्या माहितीनुसार,या अहवालात दहावीचे सुमारे 33.5 लाख विद्यार्थी पुढील वर्गात पोहोचू शकले नाहीत,तर 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही तर 28 लाख विद्यार्थी नापास झाले. तसेच सुमारे 32.4 लाख विद्यार्थी 12 वीची परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत. यासह 5.2 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि 27.2 लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

आकडेवारी काय सांगते
इयत्ता 10 वीमध्ये सर्वाधिक मुले एमपी बोर्डातून नापास झाली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर बिहार बोर्ड आणि तिसऱ्या क्रमांकावर यूपी बोर्ड आहे. बारावीत उत्तर प्रदेश बोर्डात (Big News) सर्वाधिक मुले नापास झाली आणि त्यानंतर मध्य प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतो. राष्ट्रीय बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाचे अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय बोर्डाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६ टक्के होती, तर राज्य मंडळाचे १६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

7 th Pay Commission : मोठी बातमी!! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार; नक्की किती होणार वाढ?

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात (7 th Pay Commission) भर घालणारी बातमी हाती आली आहे. देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट लवकरच हाती मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी हे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत होते. आता पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होण्याची घोषणा होऊ शकते. तसेच या कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी देखील मिळू शकते.

पगार किती वाढणार? (7 th Pay Commission)
सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये जर 3 टक्क्यांची वाढ झाली तर त्यांचा डीए 53 टक्क्यांवर पोहोचेल. उदाहरण देवून सांगायचे झाल्यास जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मुख्य वेतन हे 30 हजार रुपये असेल; तर सध्या 50% डीएनुसार त्याला 15,000 रुपये महागाई भत्ता मिळतो. परंतु जर हा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला, तर त्याच्या पगारातील डीए हा 16900 रुपयांनी वाढेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दर महिन्याला एकूण 900 रुपयांची वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते देखील वाढणार आहेत. देशातील बहुतांश केंद्रीय कर्मचारी महागाई भात्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत.

कधी आणि किती वाढणार DA?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबद्दल अजून कोणत्याही प्रकारची (7 th Pay Commission) घोषणा करण्यात आली नसली तरी दरवर्षीप्रमाणे केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्याची सुधारित माहिती देत असते. त्यामुळे हा महागाई भत्ता येत्या एक महिन्यात कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी या महागाई भत्ताच्या वाढीची वाट पाहत होते. परंतु त्यांना हा महागाई भत्ता लवकरच मिळणार आहे. यावेळी केंद्र सरकार महागाई भत्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ करू शकत असल्याची देखील चर्चा होत आहे. यावर्षी जर महागाई भात्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्क्यांनी वाढ केली, तर हा महागाई भत्ता 53 टक्क्यांवर पोहोचेल. या गोष्टीला जरी उशीर होत असला तरी लवकरच सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com