Home Blog Page 26

District Magistrate and Collector : जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात कोणता फरक आहे? कोणाकडे आहे जास्त पॉवर

District Magistrate and Collector

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी (District Magistrate and Collector) ही दोन्ही प्रशासकीय पदे आहेत. या पदावरील व्यक्ती जिल्ह्याचे प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था हाताळतात. बऱ्याचदा ही दोन पदे एकाच व्यक्तीकडे असतात, परंतु त्यांच्या कर्तव्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये काही महत्त्वाचे फरक असतात. जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील फरक तपशीलवार समजून घेवूया…

1. जिल्हाधिकारी (District Magistrate and Collector)
जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य काम हे जिल्ह्यातील महसूल वसुली आणि जमीन प्रशासनाशी संबंधित आहे. हे पद ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे, ज्यावेळी कलेक्टरचे मुख्य काम कर गोळा करणे हे होते.

    जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीच्या जबाबदाऱ्या

    • जमीन प्रशासन
    • महसूल संकलन
    • शासकीय योजनांची अंमलबजावणी
    • कृषी आणि (District Magistrate and Collector) विकास कामांचे पर्यवेक्षण
    • नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदत आणि पुनर्वसन

    2. जिल्हा दंडाधिकारी –

    • जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य काम आहे. त्याला ‘डीएम’ (DM) असेही म्हणतात. हे पद मुख्यतः भारतीय दंड संहिता अंतर्गत कार्य करते.
    • दंडाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या
      जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे
    • न्यायिक कार्ये
    • निवडणूक आयोजित करण्याची जबाबदारी
    • कलम 144 लागू करणे
    • फौजदारी प्रकरणे आणि पोलिस प्रशासनाचे पर्यवेक्षण

    जिल्हाधिकाऱ्यांची शक्ती आणि अधिकार (District Magistrate and Collector) –

      • जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार असे आहेत – जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील जमीन आणि महसुली प्रकरणांमध्ये सर्वाधिक अधिकार आहेत. ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि सरकारी योजना राबवतात.
      • जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे अधिकार असे आहेत – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निर्णायक अधिकार आहे. त्यांच्याकडे पोलिस दलाला निर्देशित करण्याचा अधिकार आहे आणि ते गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकतात.

      कोणाकडे आहे जास्त पॉवर –

      • सामान्यतः, जिल्हा दंडाधिकारी यांना जिल्ह्यात अधिक अधिकार दिले जातात, कारण त्यांचे मुख्य कार्य कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हेगारी प्रकरणांवर नियंत्रण ठेवणे हे आहे; जे जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचे काम आहे.
      • तथापि, प्रशासकीय आणि महसुली बाबींमध्ये जिल्हाधिकारी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांचे पद देखील अत्यंत प्रभावशाली आहे. (District Magistrate and Collector)
      • भारतातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकाच व्यक्तीकडे दोन्ही पदे आहेत; याचा अर्थ असा की ती व्यक्ती दोन्ही भूमिकांमध्ये काम करते आणि दोन्हीच्या अधिकारांचा उपभोग घेते.
      • जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी हे दोघेही जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी आहेत, परंतु जिल्हा दंडाधिकारी हे पद अधिक शक्तिशाली मानले जाते. दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या अनेकदा एकाच व्यक्तीकडून हाताळल्या जातात, त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालते हे निश्चित.

      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Career Success Story : IIT मधून शिक्षण.. टाटा समूहात इंटर्नशिप.. तीन मित्रांनी उभारला स्टार्ट अप; आज आहेत मालामाल

      Career Success Story of Arvind Sanka

      करिअरनामा ऑनलाईन । देश-विदेशात अशी अनेक उदाहरणे (Career Success Story) आहेत ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इतर मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी सुरुवातीला टाटांच्या कंपनीत इंटर्नशीप केली आणि आता त्यांनी आपल्या मित्रांसोबत लोकप्रिय राइड-हेलिंग स्टार्टअप, रॅपिडो, सुरू केला आहे. जाणून घेवूया त्यांची प्रेरणादायी प्रवासविषयी….

      टाटांच्या कंपनीत केली इंटर्नशीप (Career Success Story)
      अरविंद सांका (Arvind Sanka) यांनी आयआयटी मधून पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी टाटा कंपनीत इंटर्नशिप सुद्धा केली. इंटर्नशिप नंतर त्यांनी मित्रांसह राइड-हेलिंग स्टार्टअप रॅपिडो सुरू केले. २०१५ मध्ये हैदराबाद येथून या स्टार्टअपची सुरुवात झाली. या कंपनीला नुकतेच १२० दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे १,००० कोटी रुपये गुंतवणूक मिळाली, ज्यामुळे आता रॅपिडो युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहे.

      अरविंद सांका यांचा करिअर ग्राफ असा आहे
      आयआयटी भुवनेश्वर (IIT Bhuvaneshwar) येथून कॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक. ची पदवी घेतल्यानंतर अरविंद सांका यांनी टाटा मोटर्समध्ये इंटर्न म्हणून काम सुरु केले. यानंतर त्यांनी फ्लिपकार्टमध्ये सप्लाय चेन फायनान्स बिझनेस पार्टनर म्हणून काम केले. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी TheCareer ची सह-स्थापना केली तर २१०५ मध्ये पवन गुंटुपल्ली आणि ऋषिकेश एसआर यांच्यासोबत रॅपिडो सुरू केले.
      अरविंद सांका यांचे सहकारी पवन गुंटुपल्ली एक (Career Success Story) आयआयटीयन आहेत तर, ऋषिकेश एसआर PESU चे माजी विद्यार्थी आहेत. आयुष्यात उंच भरारी घेण्यास संकोच करणाऱ्या अनेकांसाठी अरविंद सांका यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.

      रॅपीडो ठरला युनिकॉर्न स्टार्टअप
      यावर्षी युनिकॉर्नचा मान मिळवणारा रॅपीडो तिसरा (Career Success Story) स्टार्टअप ठरला आहे. यापूर्वी, भाविश अग्रवालचे क्रुट्रिम आणि परफिओस युनिकॉर्न घोषित करण्यात आले होते. रॅपिडोचे एकूण मूल्यांकनही एक अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले असून रॅपिडो ही उबर, ओला, नम्मा यात्री या कंपन्यांशी स्पर्धा करत आहे.
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; अर्जासाठी त्वरा करा

      AAI Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (AAI Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 840 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

      संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
      भरली जाणारी पदे –
      1. महाव्यवस्थापक
      2. वरिष्ठ व्यवस्थापक
      3. व्यवस्थापक
      4. सहायक व्यवस्थापक
      5. कनिष्ठ कार्यकारी
      पद संख्या – ८४० पदे

      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकर कळविण्यात येईल
      भरतीचा तपशील – (AAI Recruitment 2024)

      पदपद संख्या 
      महाव्यवस्थापक103 पदे
      वरिष्ठ व्यवस्थापक137 पदे
      व्यवस्थापक 171 पदे
      सहायक व्यवस्थापक214  पदे
      कनिष्ठ कार्यकारी215  पदे

      असा करा अर्ज –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (AAI Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
      3. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
      4. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Mahapareshan Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण अंतर्गत नोकरीची मोठी संधी

      Mahapareshan Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (Mahapareshan Recruitment 2024) कंपनी लिमिटेड, बारामती अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक (इलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.

      संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, बारामती
      भरले जाणारे पद – शिक्षक (इलेक्ट्रीशियन)
      पद संख्या – 32 पदे (Mahapareshan Recruitment 2024)
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2024
      नोकरी करण्याचे ठिकाण – बारामती

      वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
      आवश्यक शैक्षणिक पात्रता –
      1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10 वी) उत्तीर्ण.
      2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
      असा करा अर्ज (Mahapareshan Recruitment 2024 ) –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
      3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
      4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Success Story : दोन्ही हात नसलेली मुलगी झाली तिरंदाज; पॅरालम्पिकमध्ये जिंकले 2 गोल्ड मेडल

      Success Story of Shital Devi

      करिअरनामा ऑनलाईन । 16 वर्षांच्या शीतल देवीला दोन्ही हात (Success Story) नाहीत तरीही तिने हिंमत गमावली नाही. हातांशिवाय स्पर्धा खेळणारी शीतल देवी (Shital Devi) ही जगातील पहिली आणि एकमेव सक्रिय महिला तिरंदाज आहे. अलीकडेच, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या पात्रता फेरीत तिने एक नवा विश्वविक्रम केला आहे, त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हात नसलेली ही मुलगी तिरंदाजीच्या जगात कशी खेळाडू बनली ते आपण जाणून घेऊया…

      सर्व सामान्य कुटुंबातील आहे शीतल
      शीतल देवी यांचा जन्म 10 जानेवारी 2007 रोजी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड या छोट्याशा गावात झाला. शीतल देवीचे वडील शेतकरी आहेत तर तिची आई शेळ्या चरायला नेते. शीतल देवीला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. असे म्हटले जाते की, तिला फोकोमेलिया नावाचा जन्मजात आजार आहे, परंतु त्यानंतरही तिने हार मानली नाही आणि धनुर्विद्येच्या जगात तिने असे स्थान मिळवले जे फार कमी लोक मिळवू शकतात.

      पायाने करते तिरंदाजी (Success Story)
      शीतल देवीदोन्ही हात नाहीत म्हणून थांबली नाही. हात नसले तरी ती फक्त पायाने तिरंदाजी करते. खुर्चीवर बसून शीतल देवी उजव्या पायाने धनुष्य उचलते आणि नंतर उजव्या खांद्यावरून तार ओढते. ती तिच्या जबड्याच्या जोरावर बाण सोडते. तिचे कौशल्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले की एक मुलगी अशी तिरंदाजी कशी करू शकते. शीतल देवीने जगाला दाखवून दिले आहे की, उंच उडणे पंखांनी नाही तर धैर्याने होते.

      15 वर्षाची होईपर्यंत शितलने धनुष्यबाण नव्हता
      सामान्य शेतकरी कुटुंबात शीतलचा जन्म झाला आहे. तिने वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत धनुष्यबाणही पाहिलेला नव्हता. जेव्हा ती हात नसताना झाडावर चढताना दिसली तेव्हा लोकांना (Success Story) तिची प्रतिभा कळली. 2022 मध्ये कोणाच्यातरी सांगण्यावरून ती जम्मूच्या कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचली. वास्तविक हे तिच्यासाठी इतके सोपे नव्हते. हे क्रीडा संकुलही तिच्या घरापासून 200 किमी अंतरावर होते. तेथे तिने अभिलाषा चौधरी आणि प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांची भेट घेतली. येथूनच शीतलदेवीचे आयुष्य बदलले. या दोन्ही प्रशिक्षकांनी शीतलला तिरंदाजीची ओळख तर करून दिलीच पण तिचे प्रशिक्षणही सुरू केले. ती कटरा येथील प्रशिक्षण शिबिरासाठी गेली होती. त्यानंतर, ती तिच्या करिअरमध्ये सतत नवीन उंची गाठत राहिली.

      पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्ण पदके जिंकली (Success Story)
      आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये शीतल देवीने चांगली कामगिरी केली होती. चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके जिंकली होती. एकाच सत्रात दोन सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या कामगिरीबद्दल शीतलला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      On Job Training : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता मिळणार ‘ऑन-जॉब ट्रेनिंग’

      On Job Training

      करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ट्रेनिंग (On Job Training) सोबतच प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळावा या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पदवीधर, डिप्लोमा विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रमाणपत्र धारकांना ‘ऑन-जॉब ट्रेनिंग’ची संधी देण्यात येणार आहे. OJT चा कालावधी सहा महिने ते एक वर्ष असणार आहे.

      केंद्र सरकारच्या नॅशनल फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत तरुणांना विविध विषयांमध्ये कौशल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने NATS कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. NATS 2.0 पोर्टलचा उच्च शिक्षण संस्थांना (HEIs) फायदा होईल. कारण ते त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिकांशी जोडेल आणि संबंधित कौशल्ये आणि व्यावहारिक अनुभवाद्वारे त्यांची रोजगारक्षमता वाढवेल.

      विद्यार्थ्यांना होणारे फायदे असे आहेत (On Job Training)
      – NATS 2.0 पोर्टल उमेदवारांना प्रशिक्षणार्थी संधींसाठी योग्य कंपनी शोधण्यात मदत करेल.
      – यासोबतच हे उमेदवारांना प्रशिक्षणार्थीशी संबंधित नोंदणी आणि अर्ज, नोकरीची जाहिरात, करार तयार करणे, प्रमाणपत्र आणि स्टायपेंड वितरण आदी सर्व उपक्रमांसाठी सर्वसमावेशक उपाय देखील प्रदान करेल.
      – शिष्यवृत्तीसाठी स्टायपेंड नियमांनुसार लागू होईल आणि पोर्टलद्वारे थेट लाभ हस्तांतरण डिबीटीद्वारे (DBT) वितरित केले जाईल.
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँकेत 300 पदांवर भरती!! ग्रॅज्युएट उमेदवार करु शकतात अर्ज

      Indian Bank Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर पदवीधर असाल तर (Indian Bank Recruitment 2024) तुमच्यासाठी नोकरी संदर्भात महत्वाची अपडेट आहे. पदवी पास असलेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. इंडियन बँकेने ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदाच्या एकूण 300 जागांवर भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या अर्ज आणि भरती प्रक्रियेविषयी सविस्तर..

      बँक – इंडियन बँक
      भरले जाणारे पद – स्थानिक बँक अधिकारी
      पद संख्या – 300 पदे (Indian Bank Recruitment 2024)
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024

      आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
      वय मर्यादा –
      1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
      2. SC/ST – 05 वर्षे सूट
      3. OBC – 03 वर्षे सूट

      परीक्षा फी (Indian Bank Recruitment 2024) –
      1. जनरल/ओबीसी/EWS – ₹1000/-
      2. SC/ST/PWD – ₹175/-
      मिळणारे वेतन – 48,480/- ते 85,920/- रुपये दरमहा
      नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र/तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश/ तेलंगणा/गुजरात

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल किचन सर्व्हिस’ पदाच्या 819 जागांवर भरती; अर्जासाठी काही दिवस शिल्लक

      ITBP Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP Recruitment 2024) रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

      संस्था – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
      भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) (ITBP Constable Kitchen Service)
      पद संख्या – 819 पदे (ITBP Recruitment 2024)
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 02 सप्टेंबर 2024
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024
      वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

      आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th passed and NSQF Level – 1 Course in Food Production / Kitchen.
      मिळणारे वेतन – Rs. 21,700/– Rs. 69,100/- दरमहा
      असा करा अर्ज (ITBP Recruitment 2024) –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
      3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
      4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
      4. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
      5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट –
      https://www.itbpolice.nic.in/
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Indian Overseas Bank Recruitment 2024 : ग्रॅज्युएट तरुणांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत 550 पदांवर भरती

      Indian Overseas Bank Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची (Indian Overseas Bank Recruitment 2024) इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. शिकाऊ पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.

      बँक – इंडियन ओव्हरसीज बँक
      भरले जाणारे पद – शिकाऊ
      पद संख्या – 550 पदे
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2024
      आवश्यक शैक्षणिक पात्रता – A Degree (Graduation)

      वय मर्यादा – 20 ते 28 वर्षे
      अर्ज फी (Indian Overseas Bank Recruitment 2024) –
      1. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी – रु. ९४४/-
      2. एससी, एसटी आणि महिलांसाठी – रु. ७०८/-
      3. PWD उमेदवारांसाठी – रु. ४७२/-

      असा करा अर्ज –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
      3. अर्ज करण्याची (Indian Overseas Bank Recruitment 2024) शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
      4. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट –
      https://www.iob.in/
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने जाहीर केली नवीन भरती; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका

      NTPC Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment 2024) लिमिटेड म्हणजेच NTPC अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी पदांच्या 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

      संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)
      भरले जाणारे पद – सहयोगी
      पद संख्या – 42 पदे
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख –04 सप्टेंबर 2024

      वय मर्यादा (NTPC Recruitment 2024) – 62 वर्षे
      आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Tech/BE from any discipline.
      असा करा अर्ज –
      1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
      3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या
      4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
      5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट –
      https://ntpc.co.in/
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com