करिअरनामा ऑनलाईन Vivekanand College Kolhapur । शिक्षणाची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन आणि काळाची पावले ओळखून कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे विवेकानंद कॉलेजने मोठं पाऊल उचललं आहे. इंडस्ट्रीच्या मागणीनुसार आणि उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नवीन अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये सुरु कऱण्यात आले आहेत. तसेच विवेकानंद कॉलेज अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालय असल्यामुळे, जुन्या अभ्यासक्रमांमध्ये आधुनिक विषयांचा समावेश केला आहे. यात केवळ सैद्धांतिक ज्ञानावर भर न देता, व्यावहारिक कौशल्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पारंपरिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार आणि व्यवसायातल्या विविध संधी मिळवून देण्यासाठी अभ्यासक्रमात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. केवळ पदवी मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगण्यासाठी सक्षम करणे आणि नोकरी किंवा व्यवसाय करून स्वयंपूर्ण बनवणे हेच या बदलांचे मुख्य उद्दिष्ट्य आहे असं संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.
कोणकोणते कोर्सेस उपलब्ध – Vivekanand College Kolhapur
विवेकानंद कॉलेज मध्ये (Vivekanand College Kolhapur) अभ्यासक्रमव्यतिरिक्त महाविद्यालयात करिअर ओरिएंटेड कौशल्य विकास आणि ज्ञानाधिष्ठित असे सर्टिफिकेट आणि व्हॅल्यू अडेड कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्यातून विद्यार्थ्यांना डिग्री व्यतिरिक्त अपेक्षित असणारे ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करता येतात. Bosch BRIDGE Course ज्यामध्ये एम्प्लॉयबिलीटी स्किल्स म्हणजेच नोकरीमध्ये येण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित केली जातात. याव्यतिरिक्त इंग्लिश विभागाचा जॉली फोनिक्स, स्पोकन इंग्लिश, डिजिटल मिडिया, TOEFEL, IELTS च्या तयारीसाठीचे कोर्सेस, हिंदी विभागाचा अनुवाद, मराठी विभागाचा वाणी कौशल्य आणि रंगभूमीची ओळख, इतिहास विभागाचा मोडी लिपी कोर्स, भूगोल विभागाचा जीआयएस, फॉरेन लॅग्वेज विभागातर्फे फ्रेंच, जर्मन आणि कोरियन भाषेचे सर्टिफिकेट कोर्सेस कॉमर्सचे इन्शुरन्स, शेअर मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा वायरिंगचा कोर्स, केमिस्ट्री विभागाचा फिनाइल तयार करण्यासंबंधी कोर्स असे ५० पेक्षा जास्त कोर्सेस विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सुरू आहेत.
त्याचबरोबर कॉलेज रोजगारभिमुख बी. व्होक. अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. यामध्ये ॲनिमेशन, ग्राफिक डिझायनिंग, फाउंड्री टेक्नॉलॉजी, फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी यांचा समावेश आहे. ‘स्पंदन’ हे वार्षिक प्रदर्शन या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या प्रदर्शनाला विविध उद्योगांतील तज्ञ आणि व्यावसायिक (professionals) भेट देतात. ‘स्पंदन’मुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प, कलाकृती आणि कौशल्ये थेट उद्योजकांसमोर सादर करण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
Wipro, Infosys सह 18 राष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार –
विवेकानंद महाविद्यालयाने (Vivekanand College Kolhapur) १८ राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांशी सामंजस्य करार (MoU) केले आहेत. या करारांअंतर्गत, महाविद्यालय नियमितपणे प्लेसमेंट ड्राईव्ह आणि कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. केवळ प्लेसमेंट कॅम्प नाही तर त्यापूर्वी प्रत्यक्ष प्रशिक्षण देखील दिले जाते. यासाठी महाविद्यालय नंदी फॉउंडेशन, पुणे पीआयबीएम, पुणे, एपटेक एव्हिएशन ॲकॅडमी कोल्हापूर आणि आयटीएके (ITAK) यांसारख्या नामांकित संस्था विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. Wipro, Infosys, TCS, Patni Computers, Eton, Reliance Insurance, Federal Bank आणि South Indian Bank यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी देखील मिळाली आहे.
त्याचबरोबर विवेकानंद कॉलेज रोजगारभिमुख बी. व्होक. अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. यामध्ये ॲनिमेशन, ग्राफिक डिझायनिंग, फाउंड्री टेक्नॉलॉजी, फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी यांचा समावेश आहे. ‘स्पंदन’ हे वार्षिक प्रदर्शन या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या प्रदर्शनाला विविध उद्योगांतील तज्ञ आणि व्यावसायिक (professionals) भेट देतात. ‘स्पंदन’मुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प, कलाकृती आणि कौशल्ये थेट उद्योजकांसमोर सादर करण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
स्पर्धा परीक्षांचेही मार्गदर्शन मिळतेय –
महत्वाची बाब म्हणजे प्रशासकीय सेवा किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन केंद्र आहे. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे आणि इतर राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि सराव परीक्षा उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशेने प्रयत्न करण्याची संधी मिळते. विवेकानंद कॉलेजची राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps – NCC) ही देखील विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. NCC मध्ये सहभागी होणारे विद्यार्थी अग्निवीर (Agniveer), एसएसबी (Service Selection Board), आर्मी, (एअरफोर्स, नेव्ही, पॅरामिलिटरी) भरती (Army Recruitment), आणि पोलिस भरती (Police Recruitment) यांसारख्या संरक्षण दलांमधील आणि पोलीस दलातील करिअरसाठी आवश्यक तयारी तयारी करून घेतली जाते. त्यामुळे विवेकानंद कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणे म्हणजे आपल्या यशस्वी करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासारखंच आहे.