Home Blog Page 248

Government Job : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत होणार नवीन भरती; महिन्याचा 80,000 पगार 

Government Job (9)

करिअरनामा ऑनलाईन । महिला व बाल विकास विभाग, मुंबई अंतर्गत (Government Job) प्रशासकीय अधिकारी, परिविक्षा अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महिला व बाल विकास विभाग, मुंबई
भरले जाणारे पद – प्रशासकीय अधिकारी, परिविक्षा अधिकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
1. प्रशासकीय अधिकारी – MBBS
2. परिविक्षा अधिकारी – MBBS/BAMS
मिळणारे वेतन – 

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रशासकीय अधिकारी स्तर S २३. ६७७०० २०८७०० किंवा स्तर S-१७. ४७६००-१५११००
परिविक्षा अधिकारी स्तर १४, ३८६००- १२२८००


असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी (Government Job) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर येणा-या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/App_ErrorPage/AppError
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारतात सापाच्या तेलाची भाजी कोठे बनवली जाते? पहा तुमचं जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न 

GK Updates 16 Sep. (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?
उत्तर : २३८ सदस्य
प्रश्न 2 : भारताचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न 3 : बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : डॉ. नीलम रेड्डी (१९७७-१९८२)

प्रश्न 4 : पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
उत्तर : राज्य सूचीमध्ये
प्रश्न 5 : भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत?
उत्तर : ५४५ सदस्य
प्रश्न 6 : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे?
उत्तर : औरंगाबाद (GK Updates)
प्रश्न 7 : भारतातील कोणत्या राज्यात सापाच्या तेलाची भाजी बनवली जाते?
उत्तर : सिक्कीम
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Successful Entrepreneur : उद्योजक बनायचं आहे? ‘या’ टिप्स फॉलो करा; नक्कीच होईल इफेक्ट

How to Become Successful Entrepreneur

करिअरनामा ऑनलाईन । बदलत्या काळानुसार आज (How to Become Successful Entrepreneur) लोक नवीन कल्पनांसह उद्योजकतेमध्ये नशीब आजमावत आहेत. देश-विदेशातून या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या पदवीधारकांनी मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून या उद्योगाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यांना यामध्ये यशही मिळालं आहे. आता तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल आणि तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही उपयुक्त टिप्स देणार आहोत. या अशा काही टिप्स असतील, ज्या तुम्हाला उद्योजक होण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील, चला तर मग पाहूया…

खूप संशोधन करा (Do a Lot of Research)
ज्या विषयाची तुम्हाला संपूर्ण माहिती आहे तेच काम हाती घ्या. ज्ञानाशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसते. उद्योजकता क्षेत्र देखील समान आहे. या दिशेनेही यशस्वी होण्यासाठी तुम्हाला बाजाराचे पूर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमचा व्यवसाय सुरु करणार आहात, तुम्हाला त्यासंबंधीचे A to Z ज्ञान तुमच्याकडे असले पाहिजे. कोणतीही मोठी किंवा छोटी गोष्ट तुमच्या नजरेतून सुटता कामा नये.
अनोखी कल्पना (Unique Imagination)
यशस्वी उद्योजक होण्याचा मार्ग एका अनोख्या कल्पनेने सुरू होतो. तुमच्याकडे अनोखी कल्पना नसेल, तर या क्षेत्रात स्वत:ला प्रस्थापित करणे तुम्हाला शक्य होणार नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला मार्केट रिसर्च दरम्यानच कळतील. म्हणून, आपण ज्या दिशेने काम करण्याची योजना आखत आहात त्याच्याशी संबंधित एक चांगली कल्पना ठेवण्याचा प्रयत्न करा.

बजेटचे नियोजन (How to Become Successful Entrepreneur)
तुम्ही बजेटचे संपूर्ण नियोजन करणे गरजेचे आहे. तुमच्याकडे किती पैसे आहेत? नातेवाईक, मित्र आणि बाजारातून किती पैसे घ्यावे लागतील; याचा अभ्यास करा. यासोबतच तुम्ही स्वतःसाठीही बचत करणं गरजेचं आहे. अती उत्साहाने तुम्ही तुमची बचत पूर्णपणे नष्ट करू नका. यानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.
नेतृत्व गुण (Leadership Qualities)
तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय स्थापन करायचा असेल, तर (How to Become Successful Entrepreneur) तुमच्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या समूहाचे व्यवस्थापन कसे करावे हे आपल्याला माहित असले पाहिजे. सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्याचं कौशल्य तुमच्या जवळ असायला हवं; कारण संघाशिवाय आपले ध्येय साध्य करणे आपल्यासाठी कठीण होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RBI Recruitment 2023 : RBI ने जाहीर केली मोठी भरती!! 450 पदे रिक्त; पगारही उत्तम

RBI Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई (RBI Recruitment 2023) अंतर्गत सहाय्यक पदांच्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.

बँक – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक
पद संख्या – 450 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 20 ते 28 वर्षे

अर्ज फी – (RBI Recruitment 2023)
1. जनरल/ OBC/ EWS उमेदवार – Rs. 450/-
2. SC/ST/PwD उमेदवार – Rs. 50/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2023

काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 13/09/2023 09:00 AM
Closure of registration of application 04/10/2023
Closure for editing application details 04/10/2023
Last date for printing your application 19/10/2023
Online Fee Payment 13/09/2023 09:00 AM to 04/10/2023

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक – At least a Bachelor’s Degree in any discipline with a minimum of 50% marksm
मिळणारे वेतन – RS. 20,750/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
3. ऑनलाईन अर्ज नोंदणी (RBI Recruitment 2023) करण्यासाठी आणि फी/ सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत खुली ठेवण्यात येईल.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

भरतीचा तपशील –
RBI Assistant Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (RBI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPS Success Story : पहिल्याच झटक्यात UPSC पास; 13 वर्षांत 21 बदल्या, हे आहेत बेधडक IPS प्रभाकर चौधरी

IPS Success Story of Prabhakar Chaudhary

करिअरनामा ऑनलाईन । पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण (IPS Success Story) होणे खूप अवघड आहे. तरीही असे अनेक उमेदवार आहेत जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाले आहेत. यापैकीच एक आहेत IPS अधिकारी प्रभाकर चौधरी…ते असे आयपीएस अधिकारी आहेत, जे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली परीक्षा
IPS प्रभाकर चौधरी हे उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील रहिवासी आहेत. अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc पूर्ण केल्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. 2010 मध्ये ते पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसले आणि पहिल्याच प्रयत्नात ते  पासही झाले. नोएडामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी कानपूर, बनारस, बलिया, बुलंदशहर आणि मेरठच्या पोलीस दलातही काम केले.

बेधडक IPS अधिकारी (IPS Success Story)
आयपीएस प्रभाकर चौधरी हे पोलिस दलातील नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी ओळखले जातात. याशिवाय त्यांच्या बदल्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांची 13 वर्षांत 21 वेळा बदली झाली आहे. प्रभाकर चौधरी हे बेधडक आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.
‘या’ कारणांमुळे नेहमी राहतात चर्चेत
IPS प्रभाकर चौधरी यांची 2016 मध्ये कानपूर देहाटचे SP म्हणून नियुक्ती झाली होती. एसपी झाल्यानंतर ते सरकारी वाहनांचा वापर करण्याऐवजी स्टेट रोड बस आणि टेम्पोने कार्यालयात जात होते. याशिवाय रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी त्यांनी स्वत: वाहन चालवले आहे. 2017 मध्ये मेरठमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी माफियांवर कारवाई केली आणि चोरीच्या अनेक घटनांचा पर्दाफाश केला.
दुसरी घटना म्हणजे, NSG कमांडोना प्रशिक्षण दिलेले प्रभाकर चौधरी आपल्या फिटनेसची पुरेपूर काळजी घेतात. सपा सरकारने ऑक्टोबर 2016 मध्ये प्रभाकर चौधरी यांना (IPS Success Story) कानपूर देहाटचे SP बनवले तेव्हा ते जड बॅग घेऊन विद्यार्थ्यासारखे सामील झाले. तक्रारदार म्हणून त्यांनी पोलीस ठाणे गाठून सायकल चोरीचा एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि एकही पोलीस त्यांना ओळखू शकला नाही.

जिद्द आणि मेहनतीने IPSची खुर्ची मिळवली
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले प्रभाकर चौधरी आज आपल्या कष्टाने ज्या स्थानावर पोहोचले आहेत ते गाठणे सोपे नाही. पाच बहिणींमध्ये प्रेम आणि आपुलकीने वाढलेल्या प्रभाकर चौधरीबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या बहिणींच्या प्रेमामुळेच त्यांना आयपीएस पदापर्यंत पोहोचवले आहे.

वडील शेतकरी, आई गृहिणी, अत्यंत साधे कुटुंब
प्रभाकर चौधरी हे एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नव्हते. प्रभाकरचं कामाचं आयुष्य जेवढं धमाल आहे, तितकंच ते त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितक्याच साधेपणानं जगतात. IPS प्रभाकर चौधरी हे आंबेडकरनगर जिल्ह्यातील हंसवार पोलीस स्टेशन हद्दीतील मेधी सुलेम गावातील पूर्वा महमूद पुरचे रहिवासी आहेत. पारसनाथ चौधरी असे त्यांच्या वडिलांचे नाव असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई आणि काका राम नरेश चौधरी यांचा समावेश आहे. ते शेतीची कामेही करतात.

बरेली येथे झाली बदली
आयपीएस प्रभाकर चौधरी यांची या वर्षी मार्चमध्ये बरेली येथे (IPS Success Story) बदली झाली होती. त्यांनी 14 मार्च रोजी बरेली येथे पदभार स्वीकारला. बरेलीतील कावड यात्रेदरम्यान कंवरियांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी आयपीएस प्रभाकर चौधरी यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता त्यांना 32 व्या पीएसी लखनऊमध्ये पाठवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी महावितरणमध्ये नवीन भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (Mahavitaran Recruitment 2023) कंपनी लिमिटेडने प्रशिक्षणार्थी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
पद संख्या – 53 पदे
भरले जाणारे पद – (Mahavitaran Recruitment 2023)

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
अप्रेंटिस वीजतंत्री 43
तारतंत्री 10
कोपा 06


आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 10 वी पास तसेच संबंधित विषयात ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.


नोकरी करण्याचे ठिकाण –
भंडारा
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
काही महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 14 सप्टेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Google Internship 2024 : गुगलमध्ये इंटर्नशीप करा आणि नोकरी मिळवा!! पहा पात्रता आणि अर्जाविषयी सविस्तर

Google Internship 2024

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची (Google Internship 2024) सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. गुगलकडून हिवाळी इंटर्नशीपसाठी (Google Winter Internship Program 2024) अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशीपसाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 80,000 रुपयांपर्यंत मोबदला (Stipend) मिळेल. त्यामुळे गुगलसारख्या आघाडीच्या कंपनीसोबत इंटर्नशीप आणि त्यासोबतच दर महिन्याला चांगला पगार मिळवण्याची ही संधी सोडण्याची चूक करू नका. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. ‘गुगल विंटर इंटर्नशीप प्रोगाम’साठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2023 आहे.

कोण करु शकतं अर्ज?
कंम्प्यूटर क्षेत्रासंबंधित पदवीधर विद्यार्थी, मास्टर्स किंवा डिग्री प्रोगामच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी या इंटर्नशीपसाठी अर्ज करु शकतात. या इंटर्नशीपमध्ये तुमची सॉफ्टवेअर इंटर्न या पदावर भरती करण्यात येईल.
कधीपासून सुरु होणार इंटर्नशीप? (Google Internship 2024)
सॉफ्टवेअर इंटर्नसाठी विंटर इंटर्नशीप प्रोगाम जानेवारी 2024 पासून सुरु होईल, मात्र त्यासाठी आता अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ही इंटर्नशीप 22 ते 24 आठवड्यांची असेल. यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुगलच्या हैदराबाद किंवा बंगळुरु येथील ऑफिसमध्ये रुजू केले जाईल.

इंटर्नशीपसाठी पात्रता
या इंटर्नशीपसाठी अर्ज करणारा विद्यार्थी कम्प्यूटर क्षेत्राशी संबंधित असावा. त्यासोबतच त्याला तांत्रिक बाबींची माहिती हवी. C, C++, जावा, जावास्क्रिप्ट, पायथन यासारख्या बेसिक कोडींग लँग्वेजचं ज्ञान असावं. तसेच संबंधित विद्यार्थ्याला डेटा स्ट्रक्चर्स आणि एल्गॉर्थिज्म याबाबतही माहिती असावी.

इंटर्नशीपसाठी असा करा अर्ज –
1. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी careers.google.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. येथे Internship Applicaiton या पर्यायावर क्लिक करा.
3. आता समोर एक पेज उघडेल यामध्ये Resume सेक्शनमध्ये जा आणि तुमचा CV जोडा. यामध्ये तुमच्या कोडिंग संदर्भातील ज्ञानाचा उल्लेख आवर्जून करा.
4. त्यानंतर Higher Education सेक्शनमध्ये जा आणि आवश्यक माहिती भरा. त्यानंतर Degree Status मध्ये Now Attending पर्याय निवडा.
5. आता तुमचा वर्तमान अधिकृत किंवा (Google Internship 2024) अनधिकृत इंग्रजी ट्रांसक्रिप्ट अपलोड करा.
6. तुम्हाला सोयीस्कर लोकेशन देखील भरा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cochin Shipyard Recruitment 2023 : 8वी पाससाठी खुषखबर!! कोचीन शिपयार्ड देणार ‘या’ पदावर नोकरी

Cochin Shipyard Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन ।  कोचीन शिपयार्ड लि. मध्ये भरतीची (Cochin Shipyard Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सामान्य कामगार (कॅन्टीन) पदाच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – कोचीन शिपयार्ड लि.
भरले जाणारे पद – सामान्य कामगार (कॅन्टीन)
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – मनोरंजन क्लब, कोचीन शिपयार्ड लिमिटेड, थेवरा गेट, कोची – 682 015
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – (Cochin Shipyard Recruitment 2023)
28 जुलै 2023 रोजी कमाल 30 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
मिळणारे वेतन – 17,300/- रुपये ते 18,400/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – कोची

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cochinshipyard.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापक, ग्रंथपालांची राज्याच्या ‘या’ विद्यापीठात होणार नवीन भरती

Job Notification (85)

करिअरनामा ऑनलाईन । संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Job Notification) अंतर्गत सुदाम शिक्षण प्रसारक मंडळाचे यवतमाळ येथे प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत करायचा आहे.

संस्था – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सुदाम शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ
भरले जाणारे पद –
1. प्राचार्य – 01 पद
2. सहायक प्राध्यापक 25 पदे
3. ग्रंथपाल 01 पद
4. शारीरिक शिक्षण संचालक – 01 पद
पद संख्या – २८ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष/सचिव, सुदाम शिक्षण प्रसारक मंडळ, मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभुळगाव, जिल्हा-यवतमाळ 445101

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. पात्रता, /अनुभव/पे स्केल आणि इतर तपशील / शर्तींसाठी विद्यापीठाच्या वेबसाइट www.sgbau.ac.in
जे पात्र उमेदवार आधीच सेवेत (Job Notification) आहेत त्यांनी योग्य चॅनेलद्वारे अर्ज सादर करावा.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

भरतीचा तपशील –
SGBAU Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IDBI Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी मेगाभरती!! IDBI बँक 600 पदे भरणार; पगारही भरघोस

IDBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँक येथे (IDBI Recruitment 2023) कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम (ग्रेड ओ) पदांच्या एकूण 600 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

बँक – IDBI बँक
भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम (ग्रेड ‘ओ’)
पद संख्या – 600 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याची ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी – (IDBI Recruitment 2023)
राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 200/-
खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
वय मर्यादा – २० ते २५ वर्षे
काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 15/09/2023
Closure of registration of application 30/09/2023
Closure for editing application details 30/09/2023
Last date for printing your application 15/10/2023
Online Fee Payment 15/09/2023 to 30/09/2023

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’)
  • Candidates should be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or an equivalent qualification recognized by Government of India. Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
  • Candidates are expected to have proficiency in computers.
  • Proficiency in regional language will be preferred.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो (IDBI Recruitment 2023) आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
5. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com