Home Blog Page 223

AAICLAS Recruitment 2023 : 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; AAICLAS मध्ये होणार मेगाभरती

AAICLAS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर 12 वी पास असाल आणि (AAICLAS Recruitment 2023) नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीचा उत्तम पर्याय तयार आहे. AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट (सिक्योरिटी) पदाच्या एकूण 436 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.
भरले जाणारे पद – असिस्टंट (सिक्योरिटी)
पद संख्या – 436 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – (AAICLAS Recruitment 2023)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/EWS/महिला: ₹100/-]
मिळणारे वेतन –
पहिले वर्ष – रुपये 21,500/- दरमहा
दुसरे वर्ष – रुपये 22,000/- दरमहा (AAICLAS Recruitment 2023)
तिसरे वर्ष – रुपये 22,500/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.aaiclas.aero
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PGCIL Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 184 पदांवर नवीन भरती सुरु

Powergrid Corporation of India

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (PGCIL Recruitment 2023) रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअर ट्रेनी पदाच्या एकूण 184 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Powergrid Corporation of India)
भरले जाणारे पद – इंजिनिअर ट्रेनी
1. ईलेक्ट्रिकल – 144 पदे
2. सिव्हिल – 28 पदे
3. इलेक्ट्रॉनिक्स – 06 पदे
4. कॉम्प्युटर सायन्स – 06 पदे
पद संख्या – 184 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.E./ B.Tech/B.Sc (Engg.) (ii) GATE 2023
वय मर्यादा – (PGCIL Recruitment 2023)
10 नोव्हेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/₹500/-
[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
मिळणारे वेतन – (PGCIL Recruitment 2023)
उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत रु.40,000/- -3%- 1,40,000 (IDA) वेतन देण्यात येईल. त्यांना मूळ वेतन रु. 40,000/- IDA, HRA आणि लाभांसह प्रशिक्षण कालावधीत मूळ वेतनाच्या 12%.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर (PGCIL Recruitment 2023) आणि नियमित झाल्यावर, उमेदवाराला E2 स्केलमध्ये रु. 50,000/- 3%- 1,60,000/- (IDA). वेतनावर अभियंता म्हणून सामावून घेतले जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.powergrid.in.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Devendra Fadnavis : राज्यातील कंत्राटी भरतीचा GR रद्द… देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा; तरुणांना मोठा दिलासा

Devendra Fadnavis

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला (Devendra Fadnavis) कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. कंत्राटी भरतीचं पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे; हे पाप आपल्या माथी नको असं सांगत फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारने आणलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आजच्या पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सरकारने  कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर, “कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसने केली. आता तेच त्याविरोधात आंदोलन करत आहेत, या संदर्भात यांना लाजा का वाटत नाही. हे पाप त्यांचे आहे. त्यांच्या पापाचे ओझे आपल्या सरकारने का उचलावे?” असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.

2003 मध्ये काढण्यात आला होता GR
यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले; “कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर 13 मार्च 2003 रोजी काढण्यात आला. त्यावेळीच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या सरकारमध्ये कंत्राटी भरती (Contract Recruitment) झाली. नंतर 2010 साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. सहा हजार कंत्राटी पदाचा जीआर (Devendra Fadnavis) काढण्यात आला होता. खरे तर, कंत्राटी भरतीची सुरवातच काँग्रेसने केली होती, आता तेच त्याविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे;” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना दिली.

दरम्यान, राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरु केल्यामुळे त्याला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. तसेच, या मुद्द्यावरून राज्यातील अनेक (Devendra Fadnavis) भागात आंदोलन देखील करण्यात आली आहेत. मात्र तरी देखील राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा वेग धरला होता. अखेर आज सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. ज्यामुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : डेंटिस्ट ते IAS ऑफिसर… असा आहे नेहा जैनचा UPSCचा प्रवास

UPSC Success Story of IAS Neha Jain

करिअरनामा ऑनलाईन । अनेक लोक UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC Success Story) उत्तीर्ण होण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात. पण काही असाधारण लोक आहेत जे पहिल्याच प्रयत्नात UPSC पास होवून IAS किंवा IPS बनतात. नेहा जैन अशी IAS अधिकारी आहे; जी या क्षेत्रात येण्यापूर्वी डेंटिस्ट होती. जाणून घेऊया तिची यशोगाथा…
डॉ. नेहा जैन जी डेंटिस्ट आहे तिने 2017 मध्ये UPSC परीक्षा पास केली आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात ती पास झाली आहे. तिचा जन्म दिल्लीत झाला. तिची आई मंजुलता जैन आणि वडील पी. के. जैन एका विमा कंपनीत काम करतात. तर तिचा धाकटा भाऊही डॉक्टर आहे.

12वी नंतर केलं BDS
नेहाला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. बारावीनंतर तीने BDS ची डिग्री घेतली आणि ती डेंटिस्ट झाली. तिने मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसमधून BDS ची डिग्री घेतली आहे. यानंतर तिने काही काल दंत सल्लागार म्हणून काम सुरू केले. पण आपण समाजात काहीतरी बदल घडवून आणू शकू असे काम तिला करायचे होते. शेवटी तिने IAS होण्याचा निर्णय घेतला.

दिवसातील 4 ते 5 तास केला अभ्यास
नेहाने UPSC च्या तयारीसाठी कोचिंग क्लासला प्रवेश घेतला. तिने (UPSC Success Story) चालू घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रित केले. तसेच परीक्षेसाठी अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार केले होते. परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातील चार ते पाच तास अभ्यासासाठी दिले तर ते पुरेसे आहेत; असे नेहाचे मत आहे.

वर्तमानपत्रे वाचनावर दिला भर
नेहा सांगते की; “माझी UPSC ची सुरुवात अगदी मुळापासून झाली. लेखन कौशल्य सुधारण्यासाठी मी दररोज वर्तमानपत्रातील संपादकीय कॉलम वाचत असे. वर्तमानपत्रे वाचून चालू घडामोडीही अपडेट व्हायला मदत होत होती. मी अनेक मॉक टेस्टही दिल्या. मॉक टेस्टच्या निकालावरून मी माझ्यातील कमकुवतपणा ओळखला आणि त्यावर कठोर परिश्रम घेतले.”

विद्यार्थ्यांना दिला हा सल्ला
डॉ. नेहा सांगते, की UPSC सारख्या अनिश्चित परीक्षेत योग्य विचार, उत्तम रणनीती, अधिक उजळणी, उत्तर लेखनाचा सराव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे असते. या सर्वांना सोबत घेऊन तयारी केली तर यश नक्कीच मिळते. परीक्षेच्या मुख्य तयारीसाठी उत्तर (UPSC Success Story) लिहिण्याचा भरपूर सराव करण्याचा सल्ला ती देते. नेहाने 2017 मध्ये झालेल्या UPSC परिक्षेत संपूर्ण भारतात 14 वा क्रमांक मिळवला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Exam 2024 : मार्च 2024 मध्ये होणाऱ्या 10वीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

SSC Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (SSC Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी शालान्त परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज, शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. सरल डाटाबेसवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

MSBSHSE (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे. आता शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन दि. 20 ऑक्टोबरपासून भरायला सुरुवात करावी. ही आवेदनपत्रे नियमित शुल्कासह पुढील महिनाभर भरता येणार असल्याचे त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे अचूक भरुन सबमिट (SSC Exam 2024) केल्यानंतर आवेदनपत्रे भरण्याच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांना त्यांच्या Login मधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे.
मार्च २०२४ शालान्त परीक्षेचे अर्ज आणि या प्रक्रिये संदर्भातील महत्त्वाची माहिती https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : औरंगाबाद शहर किती दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? स्पर्धा परीक्षेत विचारले जातात असे प्रश्न

GK Updates 19 Oct.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1)तापी नदीचा उगम कोठे झाला?

1) मुलताई

2) तपोवन

3) बागेश्वर

4) जानापाव
उत्तर: 1) मुलताई (GK Updates)

2) औरंगाबाद शहर…………दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

1) बुलंद

2) बावन्न

3) सात

4) अकरा

उत्तर:2) बावन्न

3) 95 वे अभा. मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते?

1) नाशिक

2) परभणी

3) मुंबई

4) उदगीर

उत्तर:4) उदगीर

4)अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती?

1) आरडीएक्स

2) जिलेटिन

3) पीईटिएन (GK Updates)

4) टिएनटी

उत्तर:2) जिलेटिन
5) राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

1) द्रोणाचार्य खेलरत्न अवॉर्ड

2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड

3) राष्ट्रीय खेल पुरस्कार

4) यापैकी नाही

उत्तर: 2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड
6)महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?

1) पुणे

2) नाशिक

3) मुंबई

4) नागपूर

उत्तर:4) नागपूर

7)महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?

1) हरिद्वार

2) पंढरपूर

3) नाशिक

4) घृष्णेश्वर

उत्तर: 3) नाशिक
8) सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

1) न्यायमूर्ती रानडे

2) स्वातंत्र्यवीर सावरकर

3) अॅलन ह्युम

4) ग.वा. जोशी.

उत्तर:1) न्यायमूर्ती रानडे
9) घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे?

1) केशवराव जेधे

2) भास्करराव जाधव

3) गोपाळ हरि देशमुख

4) यापैकी नाही

उत्तर:2) भास्करराव जाधव
10) सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) जळगाव

2) ठाणे (GK Updates)

3) यवतमाळ

4) अमरावती

उत्तर: 4) अमरावती

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत बालवाडी मदतनीस भरती सुरु; त्वरीत करा APPLY

Job Alert (75)

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) बालवाडी मदतनीस पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – जळगाव महानगरपालिका, जळगाव
भरले जाणारे पद – बालवाडी मदतनीस (Kindergarten Helper)
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
अर्ज करण्याची पद्धत – (Job Alert) ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (जाहिरात पहा)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 288 पदे रिक्त; ताबडतोब करा अर्ज

PMC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना पुण्यात नोकरी करायची इच्छा (PMC Recruitment 2023) आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.  पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 288 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
पद संख्या – 288 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत असावे.

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) वैद्यकीय अधिकारी – 96 पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असणे आवश्यक
2) स्टाफ नर्स – 96 पदे (PMC Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार GNM/B.Sc. (नर्सिंग) असणे आवश्यक.
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – 96 पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी (विज्ञान) उत्तीर्ण तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक.

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – (PMC Recruitment 2023)
1. वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
2. स्टाफ नर्स – 20,000/- रुपये दरमहा
3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – 18,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Exim Bank Recruitment 2023 : ग्रॅज्युएट ते इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! भारतीय निर्यात-आयात बँकेत नवीन भरती सुरु

Exim Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध (Exim Bank Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक  – भारतीय निर्यात-आयात बँक
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 45 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Exim Bank Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए-फायनान्स किंवा सीए किंवा अभियांत्रिकी पदवी (बी.टेक./बी.ई.) किंवा बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
वय मर्यादा –
उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 वर्षे ते 25 वर्षापर्यंत असावे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – 600/- रुपये [SC/ST/PwBD/EWS – 100/- रुपये]
मिळणारे वेतन – 36,000/- रुपये ते 63,840/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Exim Bank Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.eximbankindia.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : 10वी/12 वी पाससाठी मुंबई महापालिकेत परिचारीका पदावर नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत (BMC Recruitment 2023) परिचारीका पदांच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – परिचारीका
पद संख्या – 07 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – खा. ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प.)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी / १२ वी पास असणे आवश्यक (जाहिरात पहा)

मिळणारे वेतन – रु. 30,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (BMC Recruitment 2023) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
BMC Recruitment 2023

 

काही महत्वाच्या लिंक्स – (BMC Recruitment 2023)
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com