Home Blog Page 222

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांवर भरती; 219 पदे रिक्त

NHM Recruitment 2023 (11)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध (NHM Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मुलाखत 21 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक
पद संख्या – 219 पदे
भरले जाणारे पद –
1) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01 – पद
2) फिजिशियन (अर्धवेळ) 14 पदे
3) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
4) बालरोगतज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
5) नेत्ररोग तज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
6) त्वचारोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
7) मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
8) ENT स्पेशलिस्ट (अर्धवेळ) 14 पदे
9) SNCU वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 01 पद
10) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 14 पदे
11) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 105 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मायक्रोबायोलॉजिस्ट MBBS WITH MD MICROBIOLOGY
फिजिशियन MD MEDICINE/DNB
प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ MD/MS GYN/DGO/DNB
बालरोगतज्ज्ञ MD PAED/DCH/DNB
नेत्ररोगतज्ज्ञ MS OPTHALMOLOGIST/DOMS
त्वचारोगतज्ज्ञ MD (SKIN/VD) , DVD, DNB
मानसोपचारतज्ज्ञ MD PSYCHIATRY/DPM/DNB
ENT स्पेशलिस्ट MS ENT/DORL/DNB
SNCU मेडिकल अधिकारी MBBS WITH DCH
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS


वय मर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी –
150/- रुपये (NHM Recruitment 2023)
[SC/ST – 100/- रुपये]

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 20 ते 31 ऑक्टोबर 2023
मुलाखतीची वेळ – 11:00 AM ते 05:00 PM
मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Oil Recruitment 2023 : इंडियन ऑईलसोबत काम करण्याची संधी!! पात्रता 12वी पास ते इंजिनिअरिंग

Indian Oil Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Recruitment 2023) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1720 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंडियन ऑईल
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 1720 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 18 ते 24 वर्षे (Indian Oil Recruitment 2023)

Trade Name Discipline Name No of Posts
Trade Apprentice (Attendant Operator), Chemical 421
Trade Apprentice (Fitter) Mechanical 189
Trade Apprentice (Boiler) Mechanical 59
Technician Apprentice Chemical 345
Technician Apprentice Mechanical 169
Technician Apprentice Electrical 244
Technician Apprentice Instrumentation 93
Trade Apprentice (Secretarial Assistant) 79
Trade Apprentice (Accountant) 39
Trade Apprentice (DEO) Fresher 49
Trade Apprentice (DEO) Skill Certificate 33

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
12th Pass, B.A/ B.Sc/ B.Com, Diploma in Engineering, ITI in relevant field
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Oil Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.iocl.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MIDHANI Recruitment 2023 : ITI पास Diploma धारकांसाठी ‘या’ पदावर नोकरी; मिश्र धातू निगम अंतर्गत भरती सुरु

MIDHANI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मिश्र धातू निगम लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त (MIDHANI Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 54 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मिश्र धातू निगम लिमिटेड
पद संख्या – 54 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर – 13 पदे
10वी पास, ITI (फिटर)+ NAC
2) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर – 02 पदे
10वी पास, ITI (फिटर)+ NAC
3) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन – 06 पदे
10वी पास, ITI (इलेक्ट्रिशियन)+ NAC

4) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी – 20 पदे
60% गुणांसह मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा
5) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल – 10 पदे
60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
6) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिकल – 03 पदे
60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
वय मर्यादा – (MIDHANI Recruitment 2023)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑक्टोबर 2023 रोजी 29 ते 30 वर्षांपर्यंत
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/₹100/-
[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी करण्याचे ठिकाण – हैद्राबाद
मिळणारे वेतन –
1. ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर – 20,000/- रुपये दरमहा
2. ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर – 20,000/- रुपये दरमहा
3. ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन – 20,000/- रुपये दरमहा
4. सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी – 21,900/- रुपये दरमहा
5. सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल – 21,900/- रुपये दरमहा
6. सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिकल – 21,900/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – midhani-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : एकाचवेळी तिन्ही सैन्यदलात निवड; रोजंदारी करणाऱ्या तरुणाला लागली नोकरीची लॉटरी

Career Success Story of Pravin

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल जे स्वप्न पाहिलं (Career Success Story) आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितकं झोकून देवून काम कराल तेवढ्या वेगाने तुमचे ध्येय तुमच्या जवळ येईल. असाच एक ध्येयवेडा तरुण आहे पश्चिम राजस्थानमधील बारमेर या छोट्याशा गावातील. भाचभर येथील रहिवासी असलेल्या प्रवीणने गुजरातमधील मोरबी येथे ७ महिने रोजंदारी कामगार म्हणून काम केले आणि आता त्याची भारताच्या तिन्ही सैन्य दलात एकाचवेळी निवड झाली आहे.

प्रसंगी रोजंदारी केली
प्रवीणच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. कुटुंबाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्याने गुजरातमधील मोरबी येथे अनेक महिने रोजंदारी मजूर म्हणून काम केले आहे. किती दिवस रोजंदारी करणार? यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून आयुष्यभर घर खर्च भागू शकत नाही. यासाठी नोकरी मिळणं गरजेचं आहे. यासाठी मोल-मजुरी करत असताना त्याचा अभ्यासही सुरु होता.

एकाचवेळी तिन्ही सैन्य दलात निवड (Career Success Story)
सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याने मोठ्या हिमतीने सैन्य भरतीसाठी अर्ज केला. सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा पास व्हायही होती. त्याने अभ्यासासाठी कठोर परिश्रम घेतले. परीक्षा दिली.. निकाल जाहीर झाला तेव्हा प्रवीणला लॉटरी लागली होती. त्याची भारताच्या तिन्ही सैन्य दलात एकाच वेळी निवड झाली. बाडमेरच्या भाचभर या छोट्याशा गावात राहणाऱ्या प्रवीणच्या या अतुलनीय यशामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य खूप आनंदी झाला.

भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न 
प्रवीण सांगतो की, त्याचे वडील रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाले आहेत. घरात चार बहिणींच्या लग्नात खर्च झाल्याने त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कोलमडले. अशा परिस्थितीत हायस्कूलच्या शिक्षणानंतर तो गुजरातमधील मोरबी येथे मजूर म्हणून काम करु लागला. त्याच्या मनात भारतीय सैन्यात (Career Success Story) भरती होण्याची इच्छा होती.
प्रवीणचे प्रयत्न सुरु होते. त्याने देशाच्या तिन्ही दलात सहभागी होण्यासाठी अर्ज भरला होता. विशेष म्हणजे त्याची एकाचवेळी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये निवड झाली. आता तो सैन्यात भरती होणार आहे. त्याच्या प्रवासाबाबत त्याला त्याचे वडील देवराम पोतालिया आणि आई लक्ष्मीदेवी यांनी साथ दिली.
लष्करात वरिष्ठ अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे प्रवीणचे स्वप्न आहे. परिस्थिती पुढे जे हार मानतात त्यांच्यासाठी प्रवीण म्हणतो की, “पहिले अपयश कधीच शेवटचे नसते. प्रत्येक यश हे केवळ मेहनतीमुळेच मिळते.” एकेकाळी घरासाठी आणि शिक्षणासाठी रोजंदारी करायला भाग पडलेल्या प्रवीणने मिळवळेले यश तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ATM चा फुल फॉर्म सांगू शकाल का? त्याचा शोध कोणी लावला? सरकारी परिक्षेत विचारला जातो हा प्रश्न

GK Updates 21 Oct.

करिअरनामा ऑनलाईन । एटीएमचा शोध लागला आणि बॅंकांमधून (GK Updates) पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभं रहाण्याच्या समस्येपासून सगळ्यांचीच सुटका झाली. आता पैसे काढण्यासाठी बॅंकेत मोठी रांग लावावी लागत नाही. जवळपासच्या कोणत्याही एटीएममध्ये जाऊन आपण पैसे अगदी सहजपणे काढू शकतो. मात्र, रोजच्या वापरात वापरलं जाणारं हे एटीएम (ATM) याशब्दाचा फुल फॉर्म नेमका काय आहे हे तुम्हाला माहित आहे का?माहिती घेण्यासाठी पुढे वाचा…

काय आहे ATM चा फुल फॉर्म?
अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये ATM चा फुल फॉर्म काय आहे? असा (GK Updates) प्रश्न  विचारला जातो. हा प्रश्न समोर आल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडतो. ‘Any time Money’ असाच ATM चा फुल फॉर्म अनेकांना माहित आहे. मात्र हे चुकीचे आहे. खरे पाहता ATM चा फुल फॉर्म ‘Automated Teller machine’ असा आहे.
A – Automated
T – Teller
M – Machine

कोणी लावला ATM चा शोध? (GK Updates)
एटीएम मशीनचा शोध 1969 साली लागला. स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी हा शोध लावला. त्यांचा जन्म भारताच्या ईशान्य भागात असलेल्या शिलाँग शहरात झाला होता. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावलेल्या या शोधामुळे लोकांचा व्यवहार अधिक सोयीचा झाला आहे.

ATM काय असतं?
ATM म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मशीन आहे ज्याचा उपयोग हा पैसे काढणे, पैसे जमा करणे अशा अनेक प्रकारच्या पैशांच्या व्यवहारांमध्ये होतो. ATM च्या मशीन (GK Updates) शहराच्या विविध भागांत, ठिकठिकाणी दिसतात. ATM मशीन आल्यापासून बँकेचे व्यवहार करणे अधिक सोपे आणि जलद झाले आहेत.

जगात ATM ची विविध नावे
जगाच्या इतर भागांमध्ये ATM वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कॅनडामध्ये, एटीएमला ‘ABM’ स्वयंचलित बँकिंग मशीन (Automatic Banking Machine) असेही म्हणतात. इतर देशांमध्ये, कॅश पॉइंट, कॅश मशीन, मिनी बँक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ajit Pawar : राज्यात होणार 1,50,000 नोकरभरती; अजितदादांनी दिली माहिती

Ajit Pawar (3)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यभर कंत्राटी भरतीचा मुद्दा (Ajit Pawar) चांगलाच गाजत आहे. या भरतीला राज्यातील तरुणांनी देखील तीव्र विरोध केला आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही चांगलच घेरलं. अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात आला आहे. ‘कंत्राटी भरतीचा निर्णय आणि धोरण आमचं नव्हतं. ते मागच्या सरकारचं होतं,’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

कंत्राटी भरतीवरुन राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण (Ajit Pawar) कंत्राटी भरतीचं पाप आमचं नव्हतं ते पाप तर काँग्रेस सरकारचं होतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर आज भाष्य केलं. तसेच विरोधकांनी केवळ अपप्रचार केल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यात दीड लाख नोकर भरती होणार (Ajit Pawar)
अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले; “कंत्राटी भरतीवर विरोधकांकडून अपप्रचार करण्यात येत असून तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातील असं सांगितलं गेलं. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. कॅबिनेटमध्ये हा विषय आला होता. तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानुसार त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. आपण दीड लाख नोकर भरती करत आहोत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ‘आता कोणी माफी मागायची आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे,’ असा टोलाही अजितदादांनी विरोधकांना लगावला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CET Cell Exam Schedule 2024 : CET Cell कडून संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या दिवशी होणार परीक्षा

CET Cell Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील विविध पदवी (CET Cell Exam Schedule 2024) आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell ) जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे २०२४ दरम्यान होणार आहे. तसेच विधी, एमबीए, नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य कालावधी सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा झाल्यानंतर अभियांत्रिकी, विधी यांसह विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे आयोजन सीईटी सेलच्या वतीने करण्यात येते.

२० व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार (CET Cell Exam Schedule 2024)
यंदा ‘सीईटी सेलकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील जवळपास २० व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो. या प्रवेश परीक्षेसह संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबविण्यात येते. सीईटी सेलने प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आधीच जाहीर केल्यामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज करतात. त्याखालोखाल एमबीए, विधी, एमसीए अशा अभ्यासक्रमांना अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.

वेळापत्रक पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –

https://cetcell.mahacet.org

असे आहे सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक – शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील प्रवेशाकरिता २०२४मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक असे असेल…
अभ्यासक्रम : प्रवेश परीक्षेचा संभाव्य कालावधी
1. बी.एड एम.एड (तीन वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रम)/एम.एड – २ मार्च २०२४
2. एम.पी.एड : ९ ते ११ मार्च
3. एलएलबी (तीन वर्ष) : ११ ते १३ मार्च
4. बी.पी.एड : १५ ते १८ मार्च
5. बी.एड (जनरल, स्पेशल) बी.एड ईएलसीटी : १८ ते २१ मार्च
6. एमबीए/एमएमएस : २३ आणि २४ मार्च
7. एमसीए : ३० मार्च (CET Cell Exam Schedule 2024)
8. बी. डिझाइन : ६ एप्रिल
9. एम.आर्च/एम. एचएमसीटी : ७ एप्रिल
10. बी.एचएमसीटी/बी. प्लॅनिंग : १३ एप्रिल
11. एमएचटी-सीईटी : १६ एप्रिल ते २ मे
12. बी.ए/बी.एस्सी/बी.एड (चार वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रम) : ६ मे
13. एलएलबी (पाच वर्ष) : ७ आणि ८ मे
14. बी.एस्सी नर्सिंग/एएनएम-जीएनएम : ९ आणि १० मे
15. एएसी/पीजीपी/पीजीओ/ एम.एस्सी (ए ॲण्ड एसएलपी)/एम.एस्सी (पी ॲण्ड ओ) : १२ मे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : सातारच्या ‘या’ बँकेत नोकरीची संधी; लगेच करा APPLY

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जनता अर्बन को ऑप बँक, सातारा (Job Notification) अंतर्गत आयटी अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3o ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – जनता अर्बन को ऑप बँक, सातारा
भरले जाणारे पद – आयटी अधिकारी (IT Officer)
पद संख्या – 01 पद
नोकरी करणण्याचे ठिकाण – सातारा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3o ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
E-Mail ID – [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारी
  • B.E./B.TECH. IT.
  • B.E. Computer Sciences/M.C.M./M.C.A.
  • M.SC. COM. /सायबर M.S.C.COM. सेक्युरिटी कोर्स/ हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग कोर्स किंवा डिप्लोमा.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक (Job Notification) कागदपत्रे जोडावी.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.jucbwai.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AFMS Recruitment 2023 : देशसेवेची मोठी संधी!! सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत 650 पदांवर मेगाभरती सुरु 

AFMS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS Recruitment 2023) अंतर्गत 650 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 650 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2023.

संस्था – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 650 पदे
अर्ज करण्याची पद्धत (AFMS Recruitment 2023) ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS
मिळणारे वेतन – As Per AFMS Norms
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अन्य कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी (AFMS Recruitment 2023) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
5. नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.amcsscentry.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MERC Recruitment 2023 : मुंबईत नोकरी!! महाराष्ट्र वीज नियामक आयोग अंतर्गत ‘या’ पदावर निघाली भरतीची जाहिरात

MERC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई अंतर्गत (MERC Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अध्यक्ष, अपक्ष सदस्य पदाच्या 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई
भरले जाणारे पद – अध्यक्ष, अपक्ष सदस्य
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, 13 वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेंटर नंबर-1, कफ परेड, मुंबई-400005
नोकरीचे ठिकाण – मुंबई
भरतीचा तपशील – (MERC Recruitment 2023)

पद पद संख्या 
अध्यक्ष 14 पद
अपक्ष सदस्य 02 पद

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
नियामक अधिकारी  40,000/- to 50,000/-
नियामक अधिकारी 35,000/- to 40,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
3. अर्ज करण्यापुर्वी (MERC Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (MERC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाच्या नमुन्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.merc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com