Home Blog Page 219

Railway Recruitment 2023 : खेळाडूंसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी!! 10वी/ITI पास/ग्रॅज्युएट असाल तर आजच अर्ज करा

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भर्ती सेल, दक्षिण रेल्वे अंतर्गत (Railway Recruitment 2023) ‘स्पोर्ट्स पर्सन’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 67 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – रेल्वे भर्ती सेल, दक्षिण रेल्वे
भरले जाणारे पद – स्पोर्ट्स पर्सन
पद संख्या – 67 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 18 ते 25 वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2023)

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
स्पोर्ट्स पर्सन
  • For Posts in Level 1 – 10th Pass or ITI or equivalent or NAC granted by NCVT
  • For Posts in Level 2/ 3 – 12th Pass (+2 stage)
  • For Posts in Level 4/ 5 – Graduation

 

मिळणारे वेतन – Rs. 18,000/- ते Rs. 29,200/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (Railway Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
5. मुदती नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारतात सर्वात जास्त खाल्ले जाणारे धान्य कोणते? कोणता प्राणी एकाचवेळी दोन दिशेला बघतो? सामान्य ज्ञानात भर घालणारे प्रश्न

GK Updates 26 Oct.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्‍न 1 – भारतात सर्वात जास्त खाल्ले जाणारे धान्य कोणते?
उत्तर- भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे धान्य तांदूळ आहे.
प्रश्न 2 – भारतातील कोणत्या नदीला एक नव्हे, तर दोन राज्यांची लाईफलाईन म्हणतात?
उत्तर- तिस्ता नदी ही सिक्कीमची सर्वात मोठी नदी आहे. ही नदी सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहते.
प्रश्न 3 – कोणत्या नदीला लंडनची गंगा नदी म्हणतात?
उत्तर- थेम्स नदीला लंडनची गंगा म्हणतात.

प्रश्न 4 – लाल किल्ला बांधायला किती वेळ लागला?
उत्तर- लाल किल्ला बांधायला दहा वर्षं लागली.
प्रश्न 5 – तीन भाषांपासून बनलेले शहर कोणते?
उत्तर- अहमदाबाद हा मूळ शब्द संस्कृतमधून आला आहे. तर ‘दा’ हा शब्द इंग्रजीतून आणि ‘बाद’ हा हिंदीतून आला आहे.
प्रश्‍न 6 – पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
उत्तर- मज्जासंस्था.
प्रश्‍न 7 – असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
उत्तर- सरडा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : IAS होण्याचं स्वप्न अपूर्ण; IPS पदावर मानावं लागलं समाधान; सलग 4 वेळा क्रॅक केली परीक्षा

Success Story of IPS Amrit Jain

करिअरनामा ऑनलाईन । IPS अमृत जैन हे राजस्थानच्या भिलवाडा (Success Story) येथील रहिवासी आहेत. त्यांनी NIT वारंगलमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये B.Tech पूर्ण केलं आणि झेक टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतलं. यानंतर त्यांना हैदराबादमधील एका खासगी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. सर्व काही व्यवस्थित चालले असताना त्यांच्या मनात UPSC ची परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली.

सलग 4 वेळा क्रॅक केली UPSC
परीक्षा पास होवून अधिकारी होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. अनेक उमेदवारांनी आपल्या मेहनतीने हे स्वप्न पूर्ण केलं आहे. यापैकीच एक आहेत IPS अमृत जैन. त्यांनी ही परीक्षा एक-दोनवेळा नाही; तर सलग चार वेळा पास केली आहे. सध्या ते उत्तर प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत.

सामान्य कुटुंबातील अमृत (Success Story)
अमृत जैन अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला आले.  2016 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी UPSC देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी अभ्यासाची कोणतीही पूर्व तयारी न करता ही परीक्षा दिली. या परीक्षेविषयी बोलताना अमित सांगतात; “ही परीक्षा देताना माझ्यामध्ये अती आत्मविश्वासात होता. मला असं वाटायचं की यापरीक्षेत केवळ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मी डोळेझाकून परीक्षा दिली; साहजिकच मला अपयशाचा सामना करावा लागला. यानंतर 2017 मध्ये मी पूर्ण मेहनत घेवून अभ्यास केला आणि परीक्षा दिली. मात्र यावेळी केवळ एक गुण कमी मिळाल्याने मला अपयश आले.”

कोचिंग क्लास शिवाय केला अभ्यास
अमृत यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्यांनी यूपीएससीच्या (UPSC) तयारीसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. पूर्व परिक्षेत फक्त एका गुणाने नापास झाल्यास्थिर भागासाठी त्याने आपली रणनीती बदलली. त्यांनी स्टैटिक पोर्शनसाठी अनेक संदर्भ घेतले. याशिवाय त्यांनी 1 ते 1.5 तासांचा कालावधी निश्चित करुन 140 मॉक टेस्ट दिल्या.

मॉक टेस्ट देण्याचा दिला सल्ला
अमृत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मॉक टेस्ट देण्याचा सल्ला देतात. त्यांना आलेल्या अनुभवाप्रमाणे परीक्षेदरम्यान मॉक टेस्ट दिल्या तर या सरावाचा परिक्षेत चांगला स्कोअर (Success Story) करण्यासाठी फायदा होतो. परीक्षेदरम्यान शांत आणि संयमित राहण्यासाठी मदत होते; परिणामी परीक्षेत चांगली कामगिरी करता येते; असं त्यांचं मत आहे. अमित यांनी यूपीएससी परीक्षेसाठी राज्यशास्त्र हा ऐच्छिक विषय ठेवला होता.

IAS होण्याचं स्वप्न अधूरे (Success Story)
अमृत जैन यांनी 2018, 2019, 2020 आणि 2021 मध्ये परीक्षेसाठी अर्ज भरला होता. 2018 मध्ये त्यांचे नाव राखीव यादीत होते. यानंतर त्यांची इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेसमध्ये निवड झाली. तर 2019 मध्ये त्यांना 321 वी रँक मिळाली. 2020 मध्ये 96 वी रँक आणि 2021 मध्ये 179 वी रँक मिळाली. ते चार वेळा यूपीएससी पास झाले पण ते IAS होवू शकले नाहीत. याबाबत अमित म्हणतात की, मी IAS होवू शकलो नाही याची मला खंत नाही. UPSC ची तयारी करणाऱ्या अनेकांचे स्वप्न IAS बनण्याचे असते, परंतु प्रत्येकजण हे स्वप्न करुच शकेल असं नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET 2023 : प्राध्यापक होण्यासाठी वयाची अट नाही; वयाच्या 50 व्या वर्षीही देता येते UGC NET परीक्षा

UGC NET 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ही राष्ट्रीय स्तरावरील (UGC NET 2023) पात्रता परीक्षा आहे. याद्वारे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी पात्रता निश्चित केली जाते. UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. एकदा डिसेंबरमध्ये आणि दुसऱ्यांदा जून महिन्यात ही परीक्षा होते. या परीक्षेच्या पात्रतेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला UGC NET उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक व्हायचे असेल तर त्यासाठी वयाची अट नाही. UGC NET परीक्षा आयुष्यात कधीही देता येते.

अर्ज प्रक्रिया सुरु
UGC NET परीक्षा 2023 च्या डिसेंबर सत्रासाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर आहे. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत क्रेडिट, डेबिट, नेटबँकिंग, UPI द्वारे फी जमा करु शकतात.
आयुष्यात कधीही देता येते परीक्षा (UGC NET 2023)
जर तुम्हाला UGC NET उत्तीर्ण झाल्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो व्हायचे असेल तर यासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. तसेच SC/ST/OBC (नॉन-क्रिमी लेयर)/महिला/ट्रान्सजेंडरसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. याशिवाय एलएलएम करणाऱ्या विद्यार्थ्यांना वयात ३ वर्षांची, माजी सैनिकांना आणि संशोधन करणाऱ्या उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळते. याशिवाय जर एखाद्याला UGC NET उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक व्हायचे असेल तर त्यासाठी वयाची अट नाही. UGC NET परीक्षा आयुष्यात कधीही देता येते.

अशी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
MA, M.Sc, M.Com, M.Tech, MBA असे अभ्यासक्रम (UGC NET 2023) करणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्टर्समध्ये किमान 50 टक्के गुण असावेत. मास्टर्सच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील UGC NET परीक्षेला बसू शकतात. UGC NET 2023 च्या पात्रता निकषांनुसार, ज्या पीएचडी धारकांनी 19 सप्टेंबर 1991 पूर्वी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे त्यांना 5 टक्के गुणांची सूट दिली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBM Recruitment 2023 : भारतीय खाण ब्युरो मध्ये निघाली भरतीची जाहिरात; त्वरा करा

IBM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाण ब्युरो, नागपूर अंतर्गत उप (IBM Recruitment 2023) खनिज अर्थशास्त्रज्ञ पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय खाण ब्युरो, नागपूर
भरले जाणारे पद – उप खनिज अर्थशास्त्रज्ञ
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाण नियंत्रक [आर अँड सी), दुसरा मजला इंडियन ब्युरो ऑफ माइन्स इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४००१

नोकरीचे ठिकाण – नागपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IBM Recruitment 2023)
Candidate should have completed Masters Degree from any of the recognized boards or Universities.
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (IBM Recruitment 2023) अगोदर वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ibm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! AIIMS अंतर्गत नवीन भरती सुरु

AIIMS Recruitment 2023 (9)

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एसोसिएट प्रोफेसर, सहायक प्रोफेसर पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर
भरले जाणारे पद — एसोसिएट प्रोफेसर, सहायक प्रोफेसर
पद संख्या – 90 पदे
अर्ज करण्याची पद्धत — ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख — 20 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण — नागपूर

अर्ज फी – (AIIMS Recruitment 2023)
1. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 1000/-
2. SC/ST श्रेणी – रु. 800/-
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
एसोसिएट प्रोफेसर 20 पदे
सहायक प्रोफेसर 70 पदे


मिळणारे वेतन –

पदाचे नाव  मिळणारे वेतन 
एसोसिएट प्रोफेसर Level- 13 A1+ (138300 – 209200) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
सहायक प्रोफेसर Level- 12 (101500 – 167400) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
एसोसिएट प्रोफेसर Post Graduation
सहायक प्रोफेसर Post  Graduation

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (AIIMS Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्यातील ‘या’ बँकेत नोकरीची उत्तम संधी; ताबडतोब करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । सन्मित्र सहकारी बँक लि. अंतर्गत रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट जनरल मॅनेजर, ट्रेझरी ऑफिसर, ऑडिटर, वसुली अधिकारी, ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – सन्मित्र सहकारी बँक लि. हडपसर पुणे
भरले जाणारे पद – असिस्टंट जनरल मॅनेजर, ट्रेझरी ऑफिसर, ऑडिटर, वसुली अधिकारी, ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर
पद संख्या – 06 पदे
नोकरीचे ठिकाण – हडपसर, पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय मुख्य कार्यालय, सर्व्हे नं. १५६ / २अ / २अ, वैभव सिनेमासमोर, पुणे- सोलापूर रोड, हडपसर, पुणे ४११०२८
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
असिस्टंट जनरल मॅनेजर 01
ट्रेझरी ऑफिसर 01
ऑडिटर 01
वसुली अधिकारी 01
ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर 02


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
असिस्टंट जनरल मॅनेजर CA, ICWA, CS. CAIIB, MBA (Finance) अथवा तत्सम
ट्रेझरी ऑफिसर द्विपदवीधर, CAIIB अथवा तत्सम
ऑडिटर CA, CAIIB अथवा तत्सम
वसुली अधिकारी LL.B., LL.M. अथवा तत्सम
ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर B.E. (Computer), MCA, MCM

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. रिक्त पदाची सूचना व इतर माहिती https://www.sanmitrabankhadapsar.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. (Job Notification)
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sanmitrabankhadapsar.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Territorial Army Recruitment 2023 : देशाच्या टेरिटोरियल आर्मीमध्ये ‘ऑफिसर’ पदावर भरती सुरु; पात्रता ग्रॅज्युएट

Territorial Army Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवा करण्याची इच्छा (Territorial Army Recruitment 2023) असणाऱ्या तरुणांसाठी मोठी अपडेट आहे. इंडियन टेरिटोरियल आर्मीने (प्रादेशिक आर्मी) ऑफिसर पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंडियन टेरिटोरियल आर्मी (भारतीय प्रादेशिक सेना)
भरले जाणारे पद – प्रादेशिक सेना अधिकारी
पद संख्या – 19 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Territorial Army Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असावी.
वय मर्यादा – 18 ते 42 वर्षे
अर्ज फी – 200/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Territorial Army Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.jointerritorialarmy.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी!! BARC अंतर्गत नवीन भरती सुरु

BARC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक (BARC Recruitment 2023) विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी), एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी) पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई
भरले जाणारे पद – एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी), एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी)
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 35 वर्षे
भरतीचा तपशील – (BARC Recruitment 2023)

पद पद संख्या 
एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी) 20
एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी) 20

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी) B.Sc. in any discipline with Chemistry as one of the subjects and Physics, Chemistry and Mathematics / Biology as subjects in the H.S.C. level. OR B.Pharm. from a university recognised by UGC. Candidates should have scored a minimum of 60% marks in aggregate in Science Subjects at B.Sc. / B.Pharm level.
एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी) Graduation from a university recognised by UGC with minimum 60% marks in
aggregate in any of the following subjects. Correspondence course will not be (BARC Recruitment 2023)
considered.
B.Sc. in Nuclear Medicine from AERB recognised institute OR B.Sc. in Physics, Chemistry, Mathematics, Zoology, Microbiology, Biochemistry,
Bioinformatics, Biotechnology with Physics or Chemistry as one of the subjects in
B.Sc.
B.Sc. with above mentioned subjects only can apply.


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स – (BARC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCERT : सर्व शालेय पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार; INDIA नाही आता भारतच; NCERT चा मोठा निर्णय

NCERT (1)

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पॅनेलने (NCERT) महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता NCERTच्या पुस्तकांमध्ये नवा ऐतिहासिक बदल होणार आहे. या बदलानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी (India) भारत (Bharat) हा शब्द शिकवला जाणार आहे. एनसीईआरटीच्या पॅनलने सर्व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये India हे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत केला आहे. देशातील विरोधी आघाडीने त्यांचे नाव बदलून I.N.D.I.A. ठेवल्यानंतर यावरुन जोरदार चर्चा होत होती. आता अशातच एनसीईआरटीने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये INDIA (India) या शब्दाऐवजी भारत हा शब्द सर्वत्र वापरला जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव एनसीईआरटीच्या पॅनेलसमोर मांडण्यात आला आणि तो एकमताने स्वीकारण्यात आला.

नव्या पुस्तकांमध्ये दिसेल बदल (NCERT)
हा बदल एनसीईआरटी पुस्तकांच्या पुढील संचामध्ये दिसून येईल. सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी  हा प्रस्ताव  ठेवण्यात आला होता. पण आता त्याला औपचारिक पाठिंबा मिळाला आहे. NCERT नं पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमली होती. NCERT च्या पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आता NCERT ची नवी पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे. त्यासोबतच प्राचीन इतिहास (Asian History) या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास (Classic History) हा शब्द वापरण्यात येणार आहे. आता NCERT च्या या निर्णयानंतर भारतातील इतर बोर्ड देखील हा निर्णय घेतील का? हे आता पहावं लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com