Home Blog Page 185

Job Notification : सिनिअर/ज्युनिअर ऑफिसर पदावर भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । धनलक्ष्मी बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी/वरिष्ठ अधिकारी (Job Notification) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

बँक – धनलक्ष्मी बँक
भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी/वरिष्ठ अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 21 ते 25 वर्षे
अर्ज फी – Rs. 708/- per candidate (inclusive of GST)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी Any Degree from recognized University.
With minimum 60% & above desirable
वरिष्ठ अधिकारी Any Degree from recognized University with minimum one year banking experience. Minimum 60% & above desirable

असा करा अर्ज –
1. याभरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी आवश्यक (Job Notification) कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.dhanbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! ‘इथे’ करा अर्ज

Job Alert (98)

करिअरनामा ऑनलाईन । प्रेरणा को-ऑप बँक, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, असि.जनरल मॅनेजर, कर्ज अधिकारी, ई.डी.पी इनचार्ज, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAil) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.

बँक – प्रेरणा को-ऑप बँक, पुणे
भरले जाणारे पद – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, असि.जनरल मॅनेजर, कर्ज अधिकारी, ई.डी.पी इनचार्ज, शाखा व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 50 ते 55 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदवीधर /पदव्युत्तर, GDC&A, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य.
असि.जनरल मॅनेजर पदवीधर/पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य.
कर्ज अधिकारी पदवीधर/पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य.
ई.डी.पी इनचार्ज पदवीधर /पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी/पदविका
शाखा व्यवस्थापक पदवीधर /पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य

 

असा करा अर्ज – 
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Job Alert) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://preranabank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत निघाली भरतीची जाहिरात; ‘या’ पदांसाठी आजच पाठवा अर्ज 

BMC Recruitment 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक
पद संख्या – 17 पदे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – ३८ ते ५० वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023

भरतीचा तपशील – (BMC Recruitment 2023)

पद पद संख्या 
अति दक्षता बालरोग तज्ञ 03
मानद बाल हृदयरोग तज्ञ 01
मानद बालरोग शल्यक्रिया 01
मानद भुल तज्ञ 01
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट 01
मानद बीएमटी फिजिशीयन 01
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ) 01
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 01
समुपदशक 01
माहिती तंत्रज्ञ 01
कनिष्ठ लेखा परिक्षक 01
कार्यकारी सहाय्यक 03

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
अति दक्षता बालरोग तज्ञ एमडी/ डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर
मानद बाल हृदयरोग तज्ञ डीएम / डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी/डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी
मानद बालरोग शल्यक्रिया M.CH/DNB इन पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
मानद भुल तज्ञ एमडी/डीएनबी (एनेस्थिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट एमडी/ डीएनबी (एनडोक्रोनोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी/ डीएनबी पेडियाट्रीक विथ फेलोशीप इन पेडियाट्रीक एनडोक्रोनोलॉजी
मानद बीएमटी फिजिशीयन डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा
एमडी/ डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी आणि फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट व ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षांचा अनुभव
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लैंग्वेज पॅथॉलॉजी)
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेला असावा.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) उमेदवाराचे एस.एस.सी समकक्ष परिक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य किंवा कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग मधील पदविका संपादीत केलेली असावी
समुपदशक एमए इन सायकोलॉजी/कोन्सेलिंग किंवा पीजी डिग्री डिप्लोमा इन कोन्सेलिंग
माहिती तंत्रज्ञ बीएससी परीक्षेत माहिती तंत्रज्ञ विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक किंवा माहिती तंत्रज्ञामध्ये डिप्लोमा आणि या क्षेत्रातील हॉस्पीटल मधील 1 वर्ष काम केलेल्याचा अनुभव. तसेच सीसीएनए आणि एमसीएसइ प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल
कनिष्ठ लेखा परिक्षक उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वित्तीय/प्रगत लेखांकन आणि लेखा परिक्षण या विषयासह वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा
कार्यकारी सहाय्यक उमेदवार मान्याप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
अति दक्षता बालरोग तज्ञ 1,50,000
मानद बाल हृदयरोग तज्ञ 22,000/-
मानद बालरोग शल्यक्रिया 22,000/-
मानद भुल तज्ञ 22,000/-
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट 22,000/-
मानद बीएमटी फिजिशीयन 22,000/-
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ) 22,000/-
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. 90,000/1,00,000
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 49,500/-
समुपदशक 35,000/-
माहिती तंत्रज्ञ 33,000/-
कनिष्ठ लेखा परिक्षक 27,500/-
कार्यकारी सहाय्यक 22,000/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (BMC Recruitment 2023) दिलेल्या ओट्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ बँकेत होतेय नवीन भरती

Banking Job (21)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड (Banking Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विधी अधिकारी, संगणक अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

बँक – पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड
भरली जाणारी पदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विधी अधिकारी, संगणक अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 35 ते 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी As per fit and proper criteria of R.B.I. Circular, Graduate with CAIIB, DBF, DCBM / or C.A./ICWA or Post Graduate in any discipline with minimum 15 years of banking experience, out of which minimum 8 years experience at the middle/senior level management
महाव्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA/CAIIB/ICWA. Minimum Experience of 10 years as Dy. General Manager /Assistant General Manager in a Cooperative or Nationalized Bank
मुख्य कायदा अधिकारी Graduate/Post Graduate in Law (LLB/LLM). He should have particle experience of court attendance and should have presented and argued the cases for about 15 years.
उपमहाव्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA/CAIIB. Minimum Experience of 7 years as an Assistant General Manager in a Co-operative or Nationalized Bank. Experience of working in maximum/all departments of the Bank is necessary
सहायक महाव्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA/CAIIB. Minimum Experience of 7 years at higher level position in Head Office of Co-operative or Nationalized Bank. Experience of working in maximum/all departments of the Bank is necessary
शाखा व्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA/CAIIB. Minimum Experience of 7 years as a Branch Manager / Senior Officer in a Co-operative or Nationalized Bank
विधी अधिकारी Graduate/Post Graduate in Law (LLB/LLM). At least 10 years experience as a practicing Advocate/ worked as an Executive in any Bank /any financial institution handling Legal portfolio related to recovery matters
संगणक अधिकारी Graduate/Post Graduate in Computers BE/BCA/MCA/BCS/MCS. Minimum Experience of 5 years in any Bank /any financial institution. Knowledge of handling Software/ Hardware portfolio

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये आवश्यक माहिती (Banking Job) सविस्तर द्या; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करावेत; अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
5. वरील तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाच्या नमुन्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – https://www.punepeoplesbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : महत्वाची बातमी!! ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ बदलणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Education (11)

करिअरनामा ऑनलाईन । शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Education) एक महत्वाची अपडेट आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरु करण्यात येईल; अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी; यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती.
सध्या आयुष्य खूप धकाधकीचं होत चाललं आहे. सकाळी लवकर शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा; असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते.

राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने (Education) याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू होईल; असेही ते म्हणाले. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ 7 ऐवजी 9पर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल; आणि त्यांच्या आकलन क्षमतेवर चांगला परिणाम होईल; असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

आणखी काही महत्वाचे निर्णय (Education) –
बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Artificial Intelligence : नवीन अभ्यासक्रमात AIचा समावेश होणार? 

Artificial Intelligence (2)

करिअरनामा ऑनलाईन । कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विधान परिषदेत पहिल्यांदाच वाचा फुटली. सध्या हा विषय जगभरातील विविध क्षेत्रांत ज्ञान आणि माहितीसाठी चर्चा आणि आव्हानाचा विषय ठरला आहे.
हा विषय नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिला जात आहे. त्यासाठी मागणीही असून या विषयात पदवी घेणारे १४ हजार २७७ विद्यार्थी आहेत; तर पदवी देणारी २२० महाविद्यालये आणि पदविका देणाऱ्या ४१ संस्थांमध्ये एक हजार ९४७ विद्यार्थी एआयचा (AI)अभ्यास करत आहेत. त्यांना पदवी मिळणार असल्याचे सांगत नवीन शैक्षणिक धोरणातही एआयसारखा विषय देता येईल; असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भारती यांनी राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या २३ लाख विद्यार्थ्यांना एआयच्या विषयावर सर्वंकष विचार करून रोडमॅप तयार करावा लागेल; अशी मागणी केली. तसेच एआयचा उपयोग रोजगारवाढीसाठी होतोय का, याचा विचार होण्याची गरज आहे; असं मत त्यांनी व्यक्त केलं. विधान परिषदेचे (Artificial Intelligence) सदस्य श्रीकांत भारती यांनी एआय विषयावर लक्षवेधी सूचना मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. यासाठी विविध क्षेत्रांत निर्माण होणारी आव्हाने आणि त्यावरील काही पर्याय आत्ताच विचारात‍ घेऊन त्यावर उपाय करण्याच्या सूचना त्यांनी मांडल्या. यासाठी विविध अभ्यासक्रम आणि शाखांची आवश्यकता असल्याने उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांना यावर प्रभावी उत्तर देता आले नाही. त्यांनी केवळ सर्व सूचना मान्य असल्याचे सांगितले. अशा कुठल्याही विषयात सरकार मागे राहणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

दुरुपयोग टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला सामावून घ्यावे लागेल (Artificial Intelligence)
AIचा दुरुपयोग टाळायचा असेल तर यामध्ये शालेय शिक्षण विभागालाही सामावून घ्यावे लागेल. संयुक्तरीत्या कार्यक्रम राबवणार का, असा सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी केला. त्यावर पाटील यांनी एकत्र बसून सूचना दिल्या जातील; असे आश्वासन दिले.
सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात जे अपडेट आहेत, त्याची माहिती सदस्यांना देण्याच्या सूचना दिल्या. यावर आयआयटीसारख्या (IIT) संस्थांशी काही करार करता येतील का? यावर विचार करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कोवळ्या वयात आले अंधत्व; तिने जिद्द सोडली नाही, कसून अभ्यास केला अन् बनली IAS

UPSC Success Story of IAS Purna Sunthari

करिअरनामा ऑनलाईन । आपण असे अनेक लोक (UPSC Success Story) पाहतो जे छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या नशिबाला दोष देत असतात. पण खरे पाहता माणसाने ठरवले तर स्वतःचे नशीब तो स्वतः लिहू शकतो. तमिळनाडूतील मदुराई येथील रहिवासी असलेल्या पूर्णा संथ्री हे याचे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पूर्णाने आपली दृष्टी गमावली, पण तिने हार मानली नाही आणि IAS अधिकारी बनून ती सर्वांसाठी प्रेरणा बनली.

वडील करायचे सेल्स एक्झिक्युटिव्हचे काम 
पूर्णाने 2019 मध्ये UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून 286 वा क्रमांक मिळवला आहे. तिने तिच्या कर्तबगारीने हे सिद्ध केले आहे; की एखादी व्यक्ती तिच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कठोर (UPSC Success Story) परिश्रमाने काहीही करू शकते. पूर्णाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरखर्च चालवण्यासाठी वडील एका खाजगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचे. पूर्णाच्या जन्मानंतर ते खूप आनंदी होते. त्यांना आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची होती आणि तिला खूप शिकवायचे होते.

वयाच्या पाचव्यावर्षी गेली दृष्टी (UPSC Success Story)
पूर्णा लहान होती. ती 5 वर्षाची असताना तिची दृष्टी गेली. तिच्या कुटुंबीयांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. पण पूर्णाने ठरवलं होतं की ती तिच्या वडिलांना अभिमान वाटेल; असे काहीतरी करुन दाखवेल. मदुराई येथील पिल्लिमर संगम उच्च माध्यमिक विद्यालयातून तिने प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर फातिमा कॉलेज, मदुराई येथून तिने इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

IAS बनून स्वतःच स्वतःचं नशीब बदललं
पूर्णा दृष्टिहीन होती; त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तिच्या या प्रवासात प्रत्येक पावलावर तिला तिच्या आई-वडिलांनी साथ दिली. यूपीएससीच्या (UPSC) तयारीदरम्यान, असे अनेक प्रसंग आले जेव्हा काही अभ्यास साहित्य ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत पूर्णाच्या आई-वडिलांनी तिच्या काही मैत्रिणींसह अनेक पुस्तकांचे ऑडिओ स्वरूपात रूपांतर करण्याचे काम केले. पूर्णाच्या मेहनतीला फळ मिळाले आणि तिने IAS होऊन स्वतःचं नशीब पालटलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : WiFi पेक्षा वेगवान गोष्ट कोणती? कोणता प्राणी माणसासारखा विचार करतो? पहा काही ट्रिकी प्रश्न 

GK Updates 18 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: कोणाचे नेटवर्किंग तंत्रज्ञान WiFi पेक्षा वेगवान आहे?
उत्तर: Li-Fi (GK Updates)
प्रश्न 2: भारतात ईडन गार्डन स्टेडियम कोठे आहे?
उत्तर: कोलकाता
प्रश्न 3: कोणत्या देशात मध्यरात्री सूर्यप्रकाश पडतो?
उत्तर: नॉर्वे

प्रश्न 4: (GK Updates) तारुण्यात हिरवी आणि म्हातारपणात लाल रंगाची गोष्ट कोणती?
उत्तर: मिरची
प्रश्न 5: नवजात मुलाच्या शरीरात किती रक्त असते?
उत्तर: 270 M.L.
प्रश्न 6: कोणता प्राणी माणसासारखा विचार करतो?
उत्तर: डॉल्फिन
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नवीन भरती सुरु; E-MAIL व्दारे करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट (Job Notification) ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत पुढील पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (Job Notification)
भरली जाणारी पदे – प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज – (Job Notification)
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
4. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे; अपूर्ण आणि उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिकृत वेबसाईट – https://www.engg.dypvp.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHB Recruitment 2024 : महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त पगाराची नोकरी!! राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत भरती सुरु

NHB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब) पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (National Horticulture Board)
भरले जाणारे पद – वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब)
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024
वय मर्यादा – 30 वर्षे

अर्ज फी – (NHB Recruitment 2024)
1. SC/ST – Rs. 500/-
2. General/ OBC/EWS – Rs. 1000/-
3. PWD – Nil
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
The candidate must be Graduate in Agriculture/ Horticulture/ Food Technology/Post-harvest
Technology/ Agriculture Economics/ Agriculture Engineering /Food Sciences from a recognized
University preferably Master Degree in the same field.

मिळणारे वेतन – Rs.35,400/- ते 1,12,400/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (NHB Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nhb.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com