Home Blog Page 182

Career Success Story : IIT मधील आपयशानंतर प्लॅन ‘B’ निवडला; 13 मुलाखती दिल्यानंतर मिळाला मनासारखा जॉब; आज घेते तगडं पॅकेज

Career Success Story of Riti Kumari

करिअरनामा ऑनलाईन । रितीला आयआयटी करायचे होते; पण यामध्ये (Career Success Story) तिला यश आले नाही. ती शाळेपासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. तिने दहावी आणि बारावीच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवले होते. आयआयटी (IIT) करता न आल्यामुळे ती निराश झाली नाही. तिने ठरवलेल्या Plan B च्या माध्यमातून तिने वाटचाल केली आणि ती सॉफ्टवेअर इंजिनियर झाली. करिअर घडवण्याच्या वाटेवरचा तिचा प्रवास कसा होता ते पाहूया…

आता सर्व संपले असं वाटू लागलं
रीति कुमारी हिने आयआयटी प्रवेशासाठी प्रयत्न केला तेव्हा यामध्ये तीला अपयश आले. त्यामुळे आपण जीवनात आता पुढे जावू शकणार नाही असे तिला वाटले. वडीलांचे पैसे वाचविण्यासाठी तिने सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिला आयआयटी क्रॅक करायची होती. तिने GATE ची तयारी सुरु करण्याचा विचार केला होता. परंतू तो विचार तिने सोडून दिला.

13 मुलाखती दिल्यानंतर मिळाला जॉब (Career Success Story)
रिती कुमारी हीला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही तेव्हा तिला वाटले होते आता सर्व संपले आहे. तिच्या ट्वीटर अकाऊंटवर तशी पोस्ट तिने केली होती. तिला दहावीत 9.6 सीजीपीए आणि बारावीत 91 टक्के मार्क मिळाले होते. त्यामुळे तिने प्रतिष्ठीत आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी JEE परीक्षा दिली. परंतू तिला यश न मिळाल्याने तिने हार मानली नाही. तिने तिचा प्लान बी सुरु केला आणि 13 मुलाखती दिल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वॉलमार्ट कंपनीत तीला नोकरी मिळविली आहे.

असा मिळाला वॉलमार्टमध्ये जॉब
एकदा रीति कुमारी लिंक्डइनवर सर्च करीत असताना तिला कंपन्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची गरज होती अशी माहिती मिळाली. त्यानंतर तिने करीअरचा नवा पर्यायनिवडला. तिचा पहिला इंटरव्यूह एकोलाईटमध्ये झाला. तिने यावेळी एकूण 12 जॉब इंटव्यूह दिले.
रिति कुमारी हीने ट्वीटरवर लिहीले आहे की, “माझी सर्वांना विनंती आहे….लोक अपयश आल्यानंतर धीर सोडतात आणि उदास होतात. आपणापैकी प्रत्येकजण या परिस्थितीतून गेला आहे आणि एक चांगला यशस्वी माणूस म्हणून बाहेर आला आहे. आयआयटीत प्रवेश मिळविण्यात अयशस्वी झाले म्हणून (Career Success Story) माझे काही नुकसान झाले नाही. कारण मी आता जेथे काम करत आहे तेथे केवळ अग्रगण्य कॉलेजातील लोकच काम करतात. त्यामुळे एक संधी गेली तरी दुसरी संधी आपल्यासाठी दार ठोठावते. वेळीच ही संधी ओळखून तुम्हाला त्याचं सोनं करता यायला हवं.” रिती कुमारी हिने वीबीयूच्या युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजीमधून तिचे इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : सार्वजनिक आरोग्य विभागात ‘या’ पदावर भरती सुरु; महिन्याला मिळवा 85 हजार पगार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी गट–अ पदाच्या एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला होणार आहे.

संस्था – सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी गट – अ
पद संख्या – 46 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा अॅलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका परिक्षा उत्तीर्ण केली असावी. पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैध कालावधी असलेले आवश्यक आहे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 58 वर्षापर्यं असावे.
परीक्षा फी – फी नाही (Job Notification)
मिळणारे वेतन – 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, (ओरोस) ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन कोड – 416812

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या मृदा जलसंधारण विभागात होणार तब्बल 670 पदांवर भरती; डिप्लोमाधारक/ इंजिनियर्ससाठी मोठी संधी!!

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Government Jobs) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील तब्बल 670 रिक्त पदे भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

संस्था – मृद व जलसंधारण विभाग
भरले जाणारे पद – जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
पद संख्या – 670 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024

वय मर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
दिव्यांग उमेदवारांसाठी – ४५ वर्षा पर्यंत
पात्र खेळाडुंसाठी – ४३ वर्षा पर्यंत
अनाथ उमेदवारांसाठी – ४३ वर्षा पर्यंत
अर्ज फी – (Government Jobs)
अमागास – रु.१०००/-
मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग – रु./-९००
(सूचना – उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील. तसेच परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.)

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
1. जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता प्राप्त केली असावी.
मिळणारे वेतन – ४१, ८००/- ते १,३२,३००/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
2. वयाचा पुरावा (Government Jobs)
3. शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
5. आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
6. वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Government Jobs)
7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
8. खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
9. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10. विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
11. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

काही महत्वाच्या तारखा –
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Content Writer : तुम्हाला लेखनाची आवड असेल तर बनू शकता कंटेंट रायटर; पहा कसे….

How to Become Content Writer

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून (How to Become Content Writer) आपण छोटीशी गोष्ट जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करतो, आपल्या डोक्यातील प्रश्नाचे उत्तर सर्च इंजिनवर उपलब्ध लाखो वेबसाइट्स देतात. अशा परिस्थितीत, या वेबसाइट्ससाठी सामग्री लेखन कार्य करणाऱ्या व्यावसायिकांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. एका सर्वेनुसार, येत्या काळात भारतात ऑनलाइन लेखनाची मागणी बरीच वाढणार आहे. त्यामुळे तुम्हीही या क्षेत्रात तुमचे भविष्य घडवू शकता. जर तुम्ही पत्रकारितेचा अभ्यास केला असेल आणि तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर कंटेंट रायटिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून वाट पाहत आहे.

1. तांत्रिक लेखन
तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रमाच्या क्षेत्रात गुंतलेल्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांबद्दल आणि त्यांच्या कार्यांबद्दल ग्राहकांना सतत अपडेट करावे लागते. तांत्रिक लेखक त्यांच्या लिखानाच्या कौशल्यातून हे अवघड वाटणारे काम सोपे करतात. तांत्रिक लेखकाला तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर लेखन करावे लागते.
2. वेब सामग्री लेखक (How to Become Content Writer)
प्रिंट मध्यमापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमात लिहिणे अधिक कठीण मानले जाते. हे करताना वेब लेखकाचे लेखन सोप्या भाषेत असावे आणि त्यांनी लिखान करताना गुणांचा जास्तीत जास्त वापर करावा.
विशिष्ट वेबसाइटच्या जाहिरातीसाठी लिहिलेली सामग्री या अंतर्गत येते. उदाहरणार्थ, सामग्री लेखक म्हणून, तुम्हाला एक कीवर्ड दिला जातो, म्हणजे एक विषय दिला जातो; ज्यामध्ये तुम्हाला त्या विषयावर मर्यादित किंवा निश्चित शब्दांमध्ये लिखान करायचे असते. सामग्री लेखन अनेक प्रकारचे असू शकते.

3. विज्ञान लेखन
संशोधन आणि विकास कार्यात वाढ झाल्यामुळे विज्ञान लेखकांची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषत: विज्ञान लेखक शास्त्रज्ञ आणि संशोधकांना त्यांचे शोधनिबंध (How to Become Content Writer) तयार करणे, विज्ञान जर्नल्ससाठी लेख लिहिणे, शोधनिबंध तयार करणे इत्यादींमध्ये मदत करतात. विज्ञान लेखक होण्यासाठी तुमची संबंधित विषयांवर चांगली पकड असणे आवश्यक आहे.

कंटेंट रायटर होण्यासाठी कोणती पात्रता आहे आवश्यक?
मास कम्युनिकेशनची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कंटेंट रायटिंगमध्ये अधिक महत्त्व दिले जाते. तांत्रिक विषयांव्यतिरिक्त, तांत्रिक लेखनासाठी तुमच्याकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
कशा आहेत जॉबच्या संधी?
आयटी क्षेत्राच्या वाढत्या प्रभावामुळे आज जगभरात वेबसाईट्सचा पूर आला आहे, त्यामुळे सर्वाधिक रोजगाराच्या संधी वेबसाईट डेव्हलपमेंटशी संबंधित कंपन्यांमध्ये आहेत. याशिवाय, आयटी, पर्यटन आणि इतर क्षेत्रांशी संबंधित प्रकाशन संस्था आणि कंपन्यांमध्ये सामग्री लेखकांची आवश्यकता आहे.

सुरुवातीला किती मिळतो पगार?
कंटेंट रायटर म्हणून तुम्ही सुरुवातीला 15 ते 20 हजार रुपये दरमहा कमवू शकता. याशिवाय तुम्ही फ्रीलांसिंग करून किंवा अर्धवेळ काम करून प्रति लेख 200 ते 1000 रुपये कमवू शकता.
नोकरी कशी मिळवायची?
एचआर, मीडिया, मार्केटिंग, मॅनेजमेंट, अॅडमिन, ग्राफिक आणि डेटाशी संबंधित अनेक फील्ड आहेत, जिथे तुम्हाला कंटेंट रायटिंगसाठी नोकरी मिळेल. याशिवाय कंटेंट रायटिंगच्या मदतीने इतर क्षेत्रातही नोकऱ्या मिळवणे सोपे होते.

या संस्थेतून करु शकता कोर्स (How to Become Content Writer)
1. सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई
2. आरके फिल्म्स अँड मीडिया अकादमी, नवी दिल्ली
3. TWB संस्था, बेंगळुरू
4. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे
5. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
6. IIMM, नवी दिल्ली
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! सेंट्रल बँक ऑफ इंडियाने काढली भरतीची जाहिरात

Central Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या शोधात (Central Bank of India Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 484 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ
पद संख्या – 484 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024
मिळणारे वेतन – रुपये 28,000/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Bank of India Recruitment 2024)
उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याच्याकडे स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट (Central Bank of India Recruitment 2024)
3. OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/ ₹850/-
SC/ST/PWD/ExSM/महिला – ₹175/-]

काही महत्वाच्या लिंक्स – (Central Bank of India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : मोठी बातमी!! राज्य शासनाच्या नोकरीत सामील होण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ त्वरीत करा APPLY 

Government Job (38)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न (Government Job) असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. तुमचे महाराष्ट्राच्या सरकारी सेवेत सामील होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आता थेट महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी संधीचा फायदा करुन घ्यावा.

शासनाच्या पुरवठा निरीक्षक आणि लिपिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. मेगा भरतीला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. ही भरती प्रक्रिया तब्बल 345 पदांसाठी होत आहे. ही भरती अन्न, नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून राबवली जात आहे. यामुळे उमेदवारांनी त्वरित अर्ज करायचे आहेत.
31 डिसेंबर 2023 ही या भरती प्रक्रियेसाठी (Government Job) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेत सामील व्हायचे आहे. तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्ही पुढील लिंकचा वापर करु शकता. भरती प्रक्रिया सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2023 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; मिळवा भरघोस पगाराची नोकरी

NHM Recruitment 2023 (14)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
भरली जाणारी पदे – वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
पद संख्या – 56 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई ४०००१२
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 65 ते 70 वर्षे

भरतीचा तपशील – (NHM Recruitment 2023)

पद पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 09
वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी 02
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ 05
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक 01
सांख्यिकी सहाय्यक 03
टी. बी. हेल्थ व्हीजीटर 13
औषधनिर्माता 05
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
पी.पी.ए म. समन्वयक 03
समुपदेशक 01
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 06
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी MBBS
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ
  • MD Microbiology/Ph. D Medical Microbiology
  • M.Sc. Medical Microbiology
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक Graduate
सांख्यिकी सहाय्यक Graduate
टी. बी. हेल्थ व्हीजीटर Graduate in science
औषधनिर्माता Degree/ Diploma in Pharmacy form recognized University
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Intermediate (10+2) and Diploma or certified course in Medical Laboratory
Technology or equivalent
पी.पी.ए म. समन्वयक Post Graduate
समुपदेशक Bachelor’s Degree in Social Work/ Sociology/Psychology
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक Bachelor’s Degree, Recognized Sanitary Inspector’s Course.
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ M.Sc. medical Microbiology/ Applied Microbiology/ General Microbiology/ Biotechnology/ Biochemistry with or without DMLT.
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक Graduate or Diploma in Medical Laboratory technology or equivalent form Govt recognized institution.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
वैद्यकीय अधिकारी 60,000
वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी 60,000
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ 75,000
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक 20,000
सांख्यिकी सहाय्यक 17,000
टी. बी. हेल्थ व्हीजीटर 15,000 + 1500
औषधनिर्माता (NHM Recruitment 2023) 17,000
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 17,000
पी.पी.ए म. समन्वयक 20,000
समुपदेशक 17,000
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 20,000
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 25,000
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक 20,000

 

आवश्यक कागदपत्रे –
1. पुर्ण माहिती भरलेल्या गुगल फॉर्मची प्रिंट
2. वयाचा पुरावा
3. पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
4. गुणपत्रिका (NHM Recruitment 2023)
5. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable)
6. शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
7. जात वैधता प्रमाणपत्र इ छायांकित प्रतींसह
8. महाराष्ट्र राज्याचा अधिवास
9. प्रमाणपत्र (Domicile Certificate)
10. आधारकार्ड
11. पॅनकार्ड
12. सध्याचा फोटो
13. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
14. वाहन चालविण्याचा परवाना
15. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
16. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaRera Recruitment 2024 : महारेरा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; महिन्याला 50 हजार एवढा मिळेल पगार 

MahaRera Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक (MahaRera Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून ‘महारेरा फेलोशिप’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण
भरले जाणारे पद – महारेरा फेलोशिप
पद संख्या – 04 पदे (MahaRera Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA Degree or equivalent with 60% marks. Preference may be given to candidates with law background.
मिळणारे वेतन – Rs. 50,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या (MahaRera Recruitment 2024) सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (MahaRera Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JSPM Pune Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी गुड न्यूज!! JSPM विद्यापीठ अंतर्गत नवीन भरती सुरु

JSPM Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जेएसपीएम विद्यापीठ, पुणे अंतर्गत (JSPM Pune Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, सहाय्यक भौतिक संचालक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – जेएसपीएम विद्यापीठ, पुणे
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, सहाय्यक. भौतिक संचालक
पद संख्या – 62 पदे
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
E-Mail ID – [email protected]

भरतीचा तपशील – (JSPM Pune Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्राध्यापक 08
सहयोगी प्राध्यापक 14
सहायक प्राध्यापक 21
भौतिक संचालक 01
सहाय्यक. भौतिक संचालक 01

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या मुदतीअगोदर करायचा आहे.
3. अर्जासोबत आवश्यक (JSPM Pune Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://jspmuni.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education Loan : एज्युकेशन लोन घ्यायचंय? जाणून घ्या… काय असते पात्रता; कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

Education Loan

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण घेताना अनेक वेळा अशी (Education Loan) परिस्थिती उद्भवते की उच्च शिक्षण घेण्याच्या मार्गात आर्थिक समस्या निर्माण होतात. अनेकांमध्ये शिकण्याची जिद्द असते; पण भरमसाठ फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेळी कधीकधी त्यांना स्वप्नांचा बळी द्यावा लागतो. या परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेणे खूप उपयुक्त ठरते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…

वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यासह इतर अभ्यासक्रमांसाठी बँकेकडून मिळालेल्या या कर्जामुळे फी भरण्याच्या समस्येपासून विद्यार्थ्यांना बऱ्याच अंशी दिलासा मिळतो. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नही या मदतीने साकार होऊ शकते. आता तुम्हीही या दिशेने विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्हाला शैक्षणिक कर्ज (Education Loan) घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील याविषयी…

एज्युकेशन लोनसाठी ‘ही’ कागदपत्रे आहेत महत्वाची
1. 10वी, 12वीची मार्कशीट
2. बँक पासबुक
3. उत्पन्नाचा दाखला (Education Loan)
4. ओळखीचा पुरावा (पासपोर्ट/ड्रायव्हिंग/मतदार आयडी)
5. प्रवेश परीक्षेचा निकाल
6. ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा पास झाली आहे त्याचा पुरावा
7. वयाचा पुरावा
8. विद्यार्थी आणि पालक दोघांच्या आधार कार्डसह इतर कागदपत्रे आवश्यक
(यासोबतच अर्जदाराने पूर्वीचे कर्ज घेतले आहे का, हेही तपासले जाते.)

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता (Education Loan)
1. शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारे उमेदवार देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा.
3. अर्जदार ज्या कोर्ससाठी अर्ज करू इच्छितो त्याची रोजगारक्षमता, टक्केवारी किती आहे; या बाबी आणि इतर अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर विद्यार्थी या कर्जासाठी पात्र ठरतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com