Home Blog Page 180

IAS Success Story : दररोज 6 ते 8 तास सेल्फ स्टडी; पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC; कोण आहे IAS चंद्रज्योती?

IAS Success Story of Chandrajyoti Sinh

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासासाठी तिने (IAS Success Story) दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले; ही गोष्ट आहे IAS चंद्रज्योती सिंह हिची.
IAS चंद्रज्योती सिंह हिने 2019 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 28 वा क्रमांक मिळवून IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. केवळ एक वर्षाच्या तयारीनंतर पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे. चंद्रज्योती सिंह हिने यूपीएससीच्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंगची मदत न घेता स्वतः रणनीतीने तयार करुन सेल्फ स्टडीच्या बळावर ही परीक्षा पास केली आहे.

अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा (IAS Success Story)
कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आणि केवळ सेल्फ स्टडीच्या बळावर ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होणं हे फार कमी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. पण ही अवघड वाटणारी कामगिरी चंद्रज्योती हिने करुन दाखवली आहे. तिने 2019 मध्ये झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये संपूर्ण देशात 28 वा क्रमांक मिळवून वेगळे स्थान प्राप्त केले. एवढच नव्हे, तर वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने ही परीक्षा पास क्रॅक केली आहे.

लहानपणापासून मनात आहे देशभक्ती 
चंद्रज्योतीचे वडील दलबारा सिंग हे सेवानिवृत्त आर्मी रेडिओलॉजिस्ट आहेत आणि तिची आई मीना सिंह यांनीही सैन्यात सेवा बजावली आहे. घरात सैन्याचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच तिच्यामध्ये देशसेवेची आवड निर्माण झाली त्यामुळे तिने IAS होण्याचे स्वप्न पाहिले.

ग्रॅज्युएशन नंतर घेतला ब्रेक
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर चंद्रज्योती सिंह हिने एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि नंतर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC CS) परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्यामध्ये इतका आत्मविश्वास होता, की अभ्यास करण्यासाठी ती केवळ सेल्फ स्टडीवर अवलंबून राहिली. त्यासाठी तिने कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही.
तुमची रणनीती तुम्हीच तयार करा (IAS Success Story)
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केलेल्या चंद्रज्योती सिंह हिने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना कोणत्याही परीक्षेसाठी रणनीती बनवून त्यानुसार तयारी करण्याचा सल्ला दिला. जर तुम्ही तुमची तयारी सोपी ठेवली आणि तुम्ही बनवलेल्या रणनीतीनुसार अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल; असं ती सांगते.

दररोज 6 ते 8 तास केला अभ्यास
UPSC च्या तयारीसाठी तिने दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर (IAS Success Story) विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Interview Tips : UPSC/MPSC मुलाखत देताना ‘हे’ करु नका; पहा उपयोगी टिप्स

Interview Tips (3)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा (Interview Tips) परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील मुलाखतींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. वेळापत्रकानुसार येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या मुलाखतीचे आयोजन केले जाईल. उमेदवारांनी मुलाखत फेरीत चांगली कामगिरी करावी यासाठी आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. उपयुक्त टिप्ससाठी पुढे वाचत रहा…

छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
मुलाखतीवेळी उत्तर देण्यापुर्वी प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि नंतर साध्या आणि सरळ शब्दात उत्तरे द्या. अनावश्यकपणे उत्तरे देणे टाळा कारण ते तुमच्यातील अनिश्चितता आणि आत्मविश्वासाची कमतरता दर्शवू शकतात. त्यामुळे तुम्हाला उत्तराबाबत जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती द्या. या छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मतभेद व्यक्त करताना नम्रता दाखवा
पॅनेलच्या सदस्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीशी तुम्ही असहमत असल्यास, कृपया त्याबाबत तुम्ही नम्रपणे सांगा. दीर्घकाळ वाद घालणे टाळा. मुलाखत पॅनेल वरील सदस्यांना सन्मान द्या.

कोणत्याही विषयावर नकारात्मक टीका करु नका
खाजगी क्षेत्रातील कोणत्याही किंवा सरकारी, यंत्रणा तसेच इतर कोणत्याही क्षेत्राबाबत तुम्हाला तुमची प्रतिक्रिया विचारण्यात आली तर त्यावर नकारात्मक टिप्पणी (Interview Tips) करु नका. त्यासंबंधित काही सूचना किंवा उपाय सुचवा. थेट टीका तुमच्या प्रतिमेवर परिणाम करु शकते.

आत्मविश्वास ठेवा (Interview Tips)
कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातील आत्मविश्वास. तुम्हाला तुमच्या तयारीबद्दल पूर्ण विश्वास असायला हवा, कारण अनेकदा असे घडते की उमेदवारांच्या तयारीत कोणताही दोष नसतो, पण विचारातील अस्वस्थतेमुळे चुकीची उत्तरे दिली जावू शकतात. त्यामुळे घाबरणे टाळा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : पहिलीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘शेतीचे’ धडे; शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

Education (12)

करिअरनामा ऑनलाईन । नव्या शैक्षणिक वर्षापासून (Education) शिक्षण क्षेत्रात नवे बदल केले जाणार आहेत. या धर्तीवर इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे; अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.
पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना आता शेतीचे धडे मिळणार आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना मंत्री केसरकर यांनी ही घोषणा केली. कृषी शिक्षण काळाजी गरज झाली आहे. त्याचबरोबर भविष्यातील गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषी विषयाचे धडे दिले जाणार आहेत, असं मंत्री केसरकर म्हणाले.

शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार (Education)
केसरकर म्हणाले की, निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार आहेत. मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषी शिक्षणाला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय अनिवार्य केला जाणार आहे.
केसरकर यांनी सांगितलं की, आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून कृषी शिक्षण सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी शिक्षणासाठी शिक्षण विभागाने नवा मसुदा तयार (Education) केला आहे. या नव्या विषयाचा अभ्याक्रमात समावेश करण्यापूर्वी शिक्षकांना देखील याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. अनेक शिक्षकांनी कृषी विषयाचं शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील कृषी विषयाचं प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मुलाखतीत विचारले जाणारे ‘हे’ प्रश्न तुम्हाला भंडावून सोडतील

GK Updates 24 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. ‘तोता-ए-हिंद’ या टोपणनावाने ओळखले जाते?
उत्तर : अमीर खुसरो
सवाल 2. दुनिया का सबसे युवा देश कौन सा है?
जवाब: दक्षिण सूडान
प्रश्न 3. Alphabet मध्ये  किती अक्षरे आहेत?
उत्तर: 8 (GK Updates)

प्रश्न 4. शरीराच्या कोणत्या भागाला घाम येत नाही?
उत्तरः ओठांवर
प्रश्न 5. कोणत्या प्राण्याला स्पर्श होताच मरतो?
उत्तर: टिटोनी पक्षी
प्रश्न 6. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: दिनांक १ मे
प्रश्न 7. गिरनार टेकड्या कोठे आहेत?
उत्तर (GK Updates) : गुजरात
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : शिक्षण सेवक, पर्यवेक्षक पदावर भरती; राज्याच्या ‘या’ विद्यालयात होतेय नवीन भरती

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सरस्वती विद्यालय, नागपूर अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून शिक्षण सेवक, पर्यवेक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

संस्था – सरस्वती विद्यालय, नागपूर
भरले जाणारे पद – शिक्षण सेवक, पर्यवेक्षक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सरस्वती विद्यालय 1984 मध्ये स्थापित, REG.NO – F 411 (N) (एक तमिळ भाषिक अल्पसंख्याक संस्था) शंकर नगर, नागपूर -440010
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
शिक्षण सेवक 05
पर्यवेक्षक 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिक्षण सेवक HSC/D.Ed/ B.Ed/B.sc/TET & CET (Compulsory)
पर्यवेक्षक Graduate with Montessori/ ECCE with min 10 years experience

 

असा करा अर्ज –
1. या भतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Job Alert) अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
4. दिलेल्या मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://saraswatividyalayanagpur.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय तांत्रिक संशोधन (Job Notification) संस्थेमध्ये सायंटिस्ट ‘B’ पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून एकूण 74 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organisation)
भरले जाणारे पद – सायंटिस्ट ‘B’
पद संख्या – 74 पदे (Job Notification))
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024 (05:30 PM)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्प्युटर सायन्स / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ भौतिकशास्त्र & इलेक्ट्रॉनिक्स/गणित/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/B.Tech इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग)
वय मर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (Job Notification)
जनरल/ओबीसी/EWS: ₹250/-
SC/ST/महिला: फी नाही
मिळणारे वेतन – रु. 56,100/- ते 1,77,500/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – nielit.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GIC Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांसाठी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरु

GIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (GIC Recruitment 2024) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) पदाच्या 85 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

संस्था – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I)
पद संख्या – 85 पदे (GIC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/ B.E/B.Tech [SC/ST: 55% गुण]

वय मर्यादा – (GIC Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/₹1000/-
SC/ST/PWD/महिला – फी नाही]
मिळणारे वेतन – Rs. 50,925/- ते 96,765/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.gicre.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

LIC HFL Recruitment 2023 : कोणत्याही शाखेतील पदवीधारकांसाठी LIC हाउसिंग फायनान्समध्ये नोकरीची संधी

LIC HFL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC HFL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदावर 250 उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 250 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे असावे.

परीक्षा फी – (LIC HFL Recruitment 2023)
जनरल/ओबीसी/₹944/-
SC/ST: ₹708/-
PWD: ₹472/-
परीक्षेची तारीख – 06 जानेवारी 2024
मिळणारे वेतन – 9000/- ते 15000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (LIC HFL Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.lichousing.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Income Tax Department Recruitment 2024 : 10 वी/12 वी पास तसेच ग्रॅज्युएट असाल तर आयकर विभागात आजच करा अर्ज; भरघोस मिळवा पगार!!

Income Tax Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग, मुंबई (Income Tax Department Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA) पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – आयकर विभाग, मुंबई
भरले जाणारे पद – इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA)
पद संख्या – 291 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (Income Tax Department Recruitment 2024)
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) – 18 – 30 वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) – 18 – 27 वर्षे
कर सहाय्यक (TA) – 18 – 27 वर्षे
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 18 – 25 वर्षे
कॅन्टीन अटेंडंट (CA) – 18 – 25 वर्षे
अर्ज फी – Rs.200/-

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) 14
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) 18
कर सहाय्यक (TA) 119
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 137
कॅन्टीन अटेंडंट (CA) 03

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) A Degree from recognized University or equivalent qualification
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) 12h class pass or equivalent from a recognized Board or University
कर सहाय्यक (TA) A Degree of a recognized University or equivalent qualification
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) Matriculation or Equivalent pass
कॅन्टीन अटेंडंट (CA) Malriculation or Equivalent

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) Level 7 (Rs.44,900-1,42,400)
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) Level 4 (Rs.25,500-81,100)
कर सहाय्यक (TA) Level 4 (Rs.25,500-81,100)
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) Level 1 (Rs.18,000-56,900)
कॅन्टीन अटेंडंट (CA) Level 1 (Rs.18,000-56,900)

वय मर्यादा –

Name of the Post Age Limit (as on 01.01.2023)
1 Inspector of Income-tax (ITI) Between 18 – 30 years
2 Stenographer Grade-II (Steno) Between 18 – 27 years
3 Tax Assistant (TA) Between 18 – 27 years
4 Multi-Tasking Staff (MTS) Between 18 – 25 years
5 Canteen Attendant (CA) Between 18 – 25 years

 

आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/SSC or equivalent certificate/Birth Certificate/Aadhar Card/Passport for proof of age
2. Educational Qualification Certificates
3. Caste/Community Certificate (in support of claim)
4. Sports/Games Certificates. (Income Tax Department Recruitment 2024)
5. Certificates on Eligibility for Recruitnnent of Sportsperson (Form- 1,2,3,4 and 5 as applicable)
Certificate of PwBD (Persons with Benchmark Disabilities), if applicable, NOC from the present employer, if applicable
6. Copy of Aadhar Card
7. Copy of recent passport-size photograplh

असा करा अर्ज –
1.इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – vvww.incometaxmumbai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mumbai University : शिका ‘मंदिर व्यवस्थापन’; मुंबई विद्यापीठ लवकरच सुरु करणार अभ्यासक्रम 

Mumbai University

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना इच्छा आहे त्यांना (Mumbai University) आता मुंबई विद्यापीठातून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यास करता येणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजच्या सहकार्याने अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑक्सफर्ड सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे; असं विद्यापीठाने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे जारी केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा कोर्स डिप्लोमा आणि सर्टिफिकेट स्तरावर घेतला जाईल. या अंतर्गत अभ्यास ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो.

हिंदू तत्त्वज्ञानाच्या अभ्यासावर भर दिला जाणार (Mumbai University)
विद्यापीठाचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांची आवड आणि रोजगाराच्या संधींवर अवलंबून, विद्यापीठ नंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा एमबीए स्तरावर देखील अभ्यासक्रम सुरु करु शकते. या अभ्यासक्रमांतर्गत हिंदू तत्त्वज्ञानाच्या अभ्यासावर भर दिला जाणार आहे.
‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्‍टीडीज’ हे हिंदू धर्माशी संबंधित अभ्यासासाठी जगातील आघाडीच्या संशोधन केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे, हिंदू धर्माशी संबंधित व्याख्याने ऑनलाइन मोडमध्ये देखील विनामूल्य ऐकता येतात. तर मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठ आहे. सध्या विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये 5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com