Home Blog Page 176

Career Tips : ‘ही’ 3 कौशल्ये तुम्हाला बनवतील अगदी प्रोफेशनल

Career Tips (13)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन जीवन हा आयुष्यातील (Career Tips) महत्वाचा टप्पा आहे. कारण येथूनच आयुष्याच्या एका नवीन आणि व्यावसायिक पर्वाची सुरुवात होते. त्यामुळे व्यावसायिक जीवनाची योग्य तयारी कॉलेज कॅम्पसमधूनच होणे आवश्यक आहे. या मालिकेत आज आम्ही तुम्हाला अशाच काही कौशल्यांची माहिती देणार आहोत जी कौशल्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असताना आत्मसात करु शकतात.

1. संघ कार्य (TEAM WORK)
प्रोफेशनल लाइफची तयारी करताना हे कौशल्य आत्मसात करणे खूप महत्त्वाचे असते आणि ते म्हणजे टीम वर्क. अनेकवेळा अशी परिस्थिती उद्भवते की लोकांना टीममध्ये काम करावे लागते. ठराविक मुदतीत अनेक लोकांसोबत काम करुन प्रकल्प पूर्ण करावा लागतो. अशा परिस्थितीत कॉलेजमधूनच टीमवर्कची भावना विकसित करणे महत्त्वाचे आहे. टीम वर्क केल्याने आपण अनेक मित्रांसह असाइनमेंट अगदी सहज पूर्ण करु शकतो.

2. तंत्रज्ञान (TECHNOLOGY)
आज AI (Artificial Intelligence) च्या युगात जग झपाट्याने बदलत चालले आहे. अशा परिस्थितीत करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची जाणीव ठेवण्याचा (Career Tips) सल्ला दिला जातो. यासोबतच तुम्ही तुमच्या करिअरच्या वाढीसाठी सोशल मीडियाचा अधिक चांगला वापर कसा करू शकता. महाविद्यालयातूनच याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात करा.

3. संवाद (Communication)
बर्‍याच वेळा विद्यार्थी संवाद कौशल्याकडे फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे (Career Tips) अनेक वेळा उमेदवार गटात त्यांचे स्वतःचे मत प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. यामुळे अनेक वेळा चांगले ज्ञान असूनही ते मागे पडतात. अशा परिस्थितीत महाविद्यालयातूनच विद्यार्थ्यांनी या दिशेने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : फक्त 1 वर्ष अभ्यास करुन लघिमा बनली IAS; टॉपर्सच्या मुलाखतींमधून घेतली प्रेरणा

UPSC Success Story of IAS Laghima Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । लघिमाने तिला मिळालेल्या अनपेक्षित यशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तिने परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) उत्तीर्ण होण्याची कल्पनाही केली नव्हती. ती म्हणते; “ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर माझे पालकही भावूक झाले. त्याहीपेक्षा, मी रिलॅक्स झाले आहे कारण मला आता एकामागोमाग एक प्रिलिम्स परीक्षा देण्याची गरज नाही.”
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या लघिमा तिवारीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 19 मिळवून एक उल्लेखनीय कामगिरी केली. ती मूळची राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील आहे पण तिच्या आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे दिल्लीत गेली आहेत.

अभ्यासातील सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली
कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना लघिमा असा सल्ला देते, की “उमेदवारांनी कमी तास अभ्यास केला तरी न चुकता दररोज, सातत्यपूर्ण प्रयत्न केले तरी ते निर्विवादपणे परिक्षेत चांगला निकाल मिळवू शकतात. याउलट, दिवसातून 10-12 तास अभ्यास करणे आणि दुसऱ्या दिवशी अजिबात अभ्यास न करणे हे योग्य नाही. सातत्याने केलेलं कोणतंही काम दीर्घकाळात सकारात्मक परिणाम देतात.”

एक वर्ष केला सखोल अभ्यास (UPSC Success Story)
2021 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लघिमाने यूपीएससीची तयारी सुरू केली. एका वर्षाच्या कालावधीत, तिने सखोल अभ्यास केला आणि YouTube वर टॉपर्सच्या मुलाखतींमधून प्रेरणा घेत तिची रणनीती संकलित केली. ती सांगते; “मला तयारीसाठी एक वर्ष लागले, ज्यामध्ये मी सर्व स्थिर भाग, मूलभूत जीएस आणि चालू घडामोडींच्या अभ्यासाचा समावेश केला आणि त्यामुळे मी आज हे यश मिळवू शकले आहे.”

कोचिंग क्लासला गेली नाही
इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासात जीवशास्त्र विषयाची पार्श्वभूमी असलेल्या, लघिमाने UPSC मुख्य परीक्षेसाठी तिचा पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्र निवडले. केवळ टेस्ट मालिका आणि स्वयं-अभ्यासावर अवलंबून राहून तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पहिल्याच प्रयत्नात परीक्षेचे सर्व स्तर पार केले.
पालकांना देते यशाचे सर्व श्रेय
लघिमाने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिच्या पालकांना देते. नागरी सेवांमध्ये करिअर करणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे. तिने सुरुवातीपासूनच सकारात्मक मानसिकता ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे तिला परीक्षेच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत झाल्याचे ती सांगते.

विद्यार्थ्यांना सांगते.. अशी ठेवा अभ्यासाची रणनिती
लघिमा सांगते; “UPSC देणाऱ्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच (UPSC Success Story) योग्य रणनिती आखली पाहिजे. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करुन त्याचे सातत्याने पालन करणे महत्त्वाचे आहे. सततचे प्रयत्न आणि उजळणी हीच परीक्षेत यश मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. मॉक टेस्ट द्या आणि त्यामध्ये झालेल्या चुकांमधून शिका. पूर्व परीक्षा झाल्या नंतर  वेळ वाया घालवू नका. तुम्हाला कितीही आत्मविश्वास असला तरी लगेचच मुख्य परीक्षेची तयारी सुरु करा.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mehndi Design Diploma : मेहंदी काढण्याची आवड आहे? ‘हे’ कोर्स करुन सजवा तुमचं करिअर

Mehndi Design Diploma

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्हाला हातावर मेहंदी लावण्याची (Mehndi Design Diploma) आवड असेल तर ही कला पैसे कमावण्याचे उत्तम साधन बनू शकते. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही डिप्लोमा कोर्सेस घेऊन आलो आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता.
कोणताही सण, समारंभ, सोहळा आणि लग्न आले की, स्त्रिया मेहंदीने हात सजवतात. त्याचबरोबर हातावर मेहंदी काढण्यामागे धार्मिक महत्त्वही जोडले गेले आहे. ज्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. सौंदर्यापासून आरोग्यापर्यंतच्या बाबींमध्ये तुम्ही मेहंदी वापरू शकता. पण तुम्हाला माहित आहे का की या मेहंदीचे विविध प्रोफेशनल कोर्स करुन पैसेही कमावता येतात.

आजकाल अनेक मेहंदी डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध झाले आहेत; जे केल्यानंतर चांगले पैसे मिळू शकतात. अनेक महिलांना ही कला न शिकता कळत असली, तरी लग्नसमारंभ, सण-उत्सव यानिमित्त खास डिझाईनसाठी खास बुकिंग केले जाते. यासाठी व्यावसायिक मेहंदी डिझायनरची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्यावसायिकपणे मेहंदी लावू शकत नसाल, तर तुम्ही काही महिन्यांत परिपूर्ण मेहंदी लावायला शिकू शकता. इथे सांगितलेले डिप्लोमा कोर्स तुम्ही करु शकता.

– ट्रेडिशनल मेहंदी आर्ट फॉर्म्स (Mehndi Design Diploma)
हा कोर्स अतिशय स्वस्त आणि व्यावसायिक आहे जो ब्राइडल मेहंदी डिझाइन, इंडो अरेबिक मेहंदी डिझाइन, आफ्रिकन मेहंदी डिझाइनमध्ये करता येतो. अनेक खाजगी विद्यापीठे हा अभ्यासक्रम देतात. हा अभ्यासक्रम 3 महिने, 6 महिने किंवा अगदी एक वर्षाच्या कालावधीत सुध्दा करता येतो. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर, आपण नोकरीसह आपला व्यवसाय सुरु करु शकतो.

– मेहंदी डिझायनिंग कोर्स
मेहंदी डिझायनिंग कोर्स 3 महिने किंवा एक वर्ष कालावधीचा आहे, जो कोणत्याही विद्यापीठातून करता येतो. हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही पात्रतेची गरज नाही, पण जर तुम्हाला (Mehndi Design Diploma) चांगल्या विद्यापीठातून कोर्स करायचा असेल तर तुम्ही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. तुम्ही डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्ही बुकिंग घेण्यास तयार होता. पण यासोबत तुम्हाला सतत सरावही करावा लागेल.
-मेहंदी कोन मेकिंग डिप्लोमा कोर्स
भारतातील अनेक फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये ब्युटी पार्लर कोर्स, मेकअप आर्टिस्ट कोर्स, ब्राइडल मेकओव्हर कोर्स इत्यादी डिप्लोमा कोर्सचा एक भाग म्हणून मेहंदी डिझायनिंग कोर्स ऑफर करतात. जर तुम्ही मेहंदी लावण्यासाठी पूर्णपणे नवीन असाल तर कोन मेकिंग डिप्लोमा कोर्स हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
या कोर्समध्ये तुम्हाला मेंदी शंकू, पातळ मेंदीचा शंकू आणि जाड मेंदीचा शंकू वापरण्याचा योग्य मार्ग दाखवला जाईल. तसेच, जर तुम्ही पूर्णपणे नवीन असाल तर मेहंदी लावण्याची योग्य पद्धत देखील सांगितली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : डिग्री धारकांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत ‘या’ पदावर भरती; लगेच करा APPLY

Government Job (42)

करिअरनामा ऑनलाईन । माहिती व प्रसारण मंत्रालय (Government Job) अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी, अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 05 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Information And Broadcasting)
भरले जाणारे पद – क्षेत्रीय अधिकारी, अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी
पद संख्या – 05 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (चित्रपट), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ‘ए’ विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली-110001
वय मर्यादा – ५६ वर्षे

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
क्षेत्रीय अधिकारी 04
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
क्षेत्रीय अधिकारी Degree of a recognized university or equivalent
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी Degree of a recognized university or equivalent

मिळणारे वेतन – (Government Job)

पदाचे नाव वेतनश्रेणी
क्षेत्रीय अधिकारी (Rs.78800-209200) (Grade Pay-Rs. 7600)
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी (67700-208700) (Grade Pay Rs. 6600)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
4. अपूर्ण अर्ज (Government Job) नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mib.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IB Recruitment 2024 : देशाच्या गुप्तचर विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; तब्बल 226 पदे भरली जाणार

IB Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत (IB Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023 पदांच्या एकूण 226 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

संस्था – इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs)
भरले जाणारे पद – सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023
पद संख्या – 226 पदे
वय मर्यादा – 18-27 वर्षे
अर्ज फी – रु. 100/-
परीक्षा फी – रु. 100/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IB Recruitment 2024)

पद शैक्षणिक पात्रता
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023
  • Candidates must have achieved qualifying cut-off marks in GATE 2021 or 2022 or 2023 in Electronics & Communication (GATE code. EC) or Computer Science & Information Technology (GATE code: CS) along with:
  • B.E or B. Tech in the fields of: Electronics or Electronics & Tele-communication or Electronics & Communication or Electrical & Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science & Engineering; from a Government recognized University/College/Institute. Or
  • Master’s Degree in Science with Electronics or Physics with Electronics or Electronics & Communication or Computer Science; or Master’s Degree in Computer Applications; from a Government recognized University/College/Institute.

मिळणारे वेतन – (IB Recruitment 2024)

पद वेतन
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023 Level-7 (Rs. 44,900-1,42,400) in the pay matrix plus admissible Central Govt. allowances.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. इतर कोणताही मार्गाने आलेले (IB Recruitment 2024) अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत मॅनेजर, ऑफिसर पदावर भरती; थेट द्या मुलाखत!!

Banking Job (22)

करिअरनामा ऑनलाईन । लोकनेते दत्ताजी पाटील (Banking Job) सहकारी बँक लि., नाशिक अंतर्गत पुढील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी दि. 16 जानेवारी 2024 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.

बँक – लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि., नाशिक
भरले जाणारे पद – डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर
पद संख्या – 08 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – बँकेच्या मुख्य कार्यालयात
मुलाखतीची तारीख – 16 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (Banking Job)

पद पद संख्या 
डेप्युटी जनरल मॅनेजर 02 पदे
मॅनेजर 03 पदे
ऑफिसर 03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर किमान वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट)
मॅनेजर किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर (ग्रॅज्युएट)
ऑफिसर किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर (ग्रॅज्युएट)

 

निवड प्रक्रिया –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या (Banking Job) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ldpbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BIS Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी खुषखबर!! भारतीय मानक ब्यूरोमध्ये मिळवा दरमहा 75 हजार पगाराची नोकरी

BIS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मानक ब्यूरोमध्ये विविध (BIS Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज पदाच्या 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय मानक ब्यूरो
भरले जाणारे पद – कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज
पद संख्या – 107 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (BIS Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जानेवारी 2024 रोजी 65 वर्षांपर्यंत

परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 75,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – दिल्ली NCR
काही महत्वाच्या लिंक्स – (BIS Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bis.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : शिक्षण संचालनालय विभागात ‘ही’ पदे रिक्त; महिन्याला 40 हजार पगार मिळवा

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण संचालनालय, दमण येथे (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – शिक्षण संचालनालय, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. MIS समन्वयक (UT स्तर) – 01 पद
पात्रता – संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये पदवीधर पदवी 02) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह बी.ई. (संगणक / आयटी / सीएस)
2. डेटा विश्लेषक – 01 पद
पात्रता – संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये पदवीधर पदवी 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किमान 55% गुणांसह बी.ई. / बी.टेक. (सीटी / सीएस)
3. MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) – 01 पद
पात्रता – बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (BCA) 02) संगणक विज्ञान/आयटी मध्ये बी.एस्सी., बीबीए, बी.ई.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Office of the State Project Director (SS) /Director of Education, Shiksha Sadan, Behind Collectorate, Moti Daman, Daman.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
1. MIS समन्वयक (UT स्तर) -38,000/- रुपये दरमहा
2. डेटा विश्लेषक – 40,000/-रुपये दरमहा
3. MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) – 21,775/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – दमण

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Goa Shipyard Limited Recruitment 2024 : गोवा शिपयार्ड अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा 

Goa Shipyard Limited Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गोवा शिपयार्ड लि. येथे विविध (Goa Shipyard Limited Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

संस्था – गोवा शिपयार्ड लि.
पद संख्या – 02 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य महाव्यवस्थापक- 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर
2. महाव्यवस्थापक – 01 पद (Goa Shipyard Limited Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024
परीक्षा फी –
500/- रुपये
[SC/ST/PwBD/माजी सैनिक – शुल्क नाही]
मिळणारे वेतन –
1. मुख्य महाव्यवस्थापक- 1,20,000/- ते 2,80,000/- रुपये दरमहा
2. महाव्यवस्थापक – 1,00,000/- ते 2,60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा

काही महत्वाच्या लिंक्स – (Goa Shipyard Limited Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.goashipyard.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : 8 हा अंक 8 वेळा लिहून उत्तर 1000 कसे येईल ते सांगा? मुलाखतीत चक्रावून सोडणारे प्रश्न पहा

GK Updates 31 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. (GK Updates) तुम्ही फक्त 2 वापरून 23 कसे लिहू शकता?
उत्तर: 22+2/2
प्रश्न 2. एक टेबलावर, एका प्लेटमध्ये दोन सफरचंद आहेत, 3 लोकांना ते खायचे आहेत, मग ते तिघे कसे खातील?
उत्तरः एक टेबलावर आणि प्लेटमध्ये दोन सफरचंद आहेत, म्हणजे एकूण तीन सफरचंद आहेत. तिन्ही पुरुष प्रत्येकी एक सफरचंद खातील. (GK Updates)
प्रश्न 3. तुमच्या शहरात किती ट्रैफिक लाइट्स आहेत?
उत्तरः हा प्रश्न ऐकणारे बहुतेक लोक त्यांच्या शहरातील वाहतूक सिग्नल मोजू लागतात. तर इथे ट्रॅफिक लाइट्सबद्दल प्रश्न विचारला गेला आहे, जे कुठेही गेला तरी फक्त तीन प्रकारचे लाइट्स असतात. लाल, हिरवा आणि पिवळा.

प्रश्न 4. 8 अंक 8 वेळा लिहून उत्तर 1000 येईल, कसे ते सांगा?
उत्तर: 888+88+8+8 +8= 1000
प्रश्न 5. जर वास्तविक वेळ 12:30 असेल तर अशा स्थितीत प्रतिबिंबात किती वेळ दिसेल.
उत्तर: 11:30
प्रश्न 6. असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर नेहमी बदलत असते?
उत्तर: ‘किती वाजले?’ (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com