Home Blog Page 175

JEE Mains 2024 : जेईई परीक्षेचे नियम बदलले; आणखी कडक नियमांत द्यावा लागणार पेपर

JEE Mains 2024

करिअरनामा ऑनलाईन। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Mains 2024) महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड अवघड परीक्षा समजली जाते. आता जेईई (JEE) मुख्य परीक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. याधर्तीवर आता परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक नियमावलीनुसार आता शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनाही टॉयलेट ब्रेकनंतर पुन्हा तपासणी आणि बायोमेट्रिक्स करावे लागणार आहे.

जेईई मेन परीक्षा दि. 24 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या वर्षीच्या जेईई मेन परीक्षेत 2024 मध्ये विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत. प्रथमच, JEE Mains साठी अर्जांची संख्या 10 लाखाच्या पुढे गेली आहे. परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी सुमारे 12.3 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. एप्रिलच्या सत्रात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात घेतली जाणारी ही परीक्षा काही दिवसातच होणार आहे. NTA ने JEE Mains परीक्षा 2024 बाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिध्द केले आहेत. यानुसार परीक्षेदरम्यान उमेदवार, शिक्षक, अधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीने टॉयलेट ब्रेक घेतल्यास त्यांना परत येऊन पुन्हा (JEE Mains 2024) तपासणी करावी लागेल. याबरोबर त्यांचे बायोमेट्रिक्सही पुन्हा तपासले जातील. विद्यार्थी, कर्मचारी यांची पुन्हा तपासणी आणि बायोमेट्रिक्स केल्यानंतरच तो परीक्षागृहात प्रवेश करू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Girls Sainik School : इथे सुरु झाली देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा; अशी आहेत शाळेची खास वैशिष्ट्ये

Girls Sainik School

करिअरनामा ऑनलाईन । देशातील पहिली गर्ल्स सैनिक स्कूल (Girls Sainik School) कोठे सुरु झाली; हे जाणून घेण्याबाबत तुम्ही उत्सुक असाल. या लेखामध्ये आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा मथुरामध्ये स्थापन करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतेच या शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे सैन्यात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या मुलींसाठी ही शाळा म्हणजे आशेचा किरण म्हणावी लागेल. सशस्त्र दलात भरती होऊन मातृभूमीची सेवा करण्याची इच्छा असलेल्या मुलींना याशाळेत प्रवेश घेता येणार आहे.

870 विद्यार्थिनींना दिले जाणार प्रशिक्षण
या कंत्राटी गुरुकुलम्  सैनिक शाळेत 870 विद्यार्थिनींना शिक्षण व प्रशिक्षण दिले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानूसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये NGO/खाजगी/राज्य सरकारी शाळांच्या भागीदारीत 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे; त्यापैकी आणखी 42 शाळा स्थापन करायच्या आहेत. या शाळा विद्यमान 33 सैनिक स्‍कूलच्‍या व्यतिरिक्त बांधल्‍या जात आहेत, जे आधीपासून पूर्वीच्‍या पॅटर्न अंतर्गत शैक्षणिक कार्यक्रम चालवत आहेत.

शाळेची वैशिष्ट्ये (Girls Sainik School)
1. देशातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेत इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत शिक्षण दिले जाणार आहे.
2. देशातील माजी लष्कर आणि एनसीसी अधिकारी मुलींना लढाऊ कौशल्याचे प्रशिक्षण देतील.
3. CBSE बोर्डाचे शिक्षणही या शाळेत दिले जणार आहे.
4. येथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच युद्ध धोरणेही शिकवली जाणार आहेत.
5. या शाळेचे पहिले सत्र (Girls Sainik School) एप्रिलपासून सुरु होणार आहे.
6. त्यासाठीची लेखी परीक्षा दि. 21 जानेवारीला होणार आहे.
7. अर्जाची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Patil Bharti 2024 : तरुणांनो ही संधी सोडू नका!! पोलिस पाटील पदावर भरतीसाठी आजच करा अर्ज

Police Patil Bharti 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ (Police Patil Bharti 2024) उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी (ता. कुडाळ व मालवण) यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पोलिस पाटील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 23 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

विभाग – सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी (ता. कुडाळ व मालवण) कार्यक्षेत्र
भरले जाणारे पद – पोलिस पाटील
पद संख्या – 23 पदे (Police Patil Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अधिक माहिती साठी PDF पहा.

असा करा अर्ज – (Police Patil Bharti 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. भरतीसाठी अर्ज उमेदवाराने संबंधित तहसिलदार कार्यालयात स्वतः उपस्थित राहुन सादर करायचा आहे.
3. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sindhudurg.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SET Exam 2024 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार SET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज

SET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SET Exam 2024) वतीने घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा म्हणजेच सेटसाठी (SET) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याच आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेट परीक्षा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा लवकरच संपेल. यासाठी पुढील दोन दिवसातच सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल; अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा (SET Exam 2024)
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे 39 वी सेट परीक्षा येत्या 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा ठरणार असून, त्यासाठी उमेदवारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तर या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येत्या दि. 12 जानेवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. दि. 31 जानेवारीपर्यंत नियमीत शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यास वेळा दिला जाण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. परीक्षेचे हॉल तिकीट व इतर माहिती सेट विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे सेट परीक्षेचा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा लवकरच संपेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले (SET Exam 2024) पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. नेट परीक्षेप्रमाणेच सेट परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.परंतु, विद्यापीठातर्फे एप्रिल महिन्यात होणारी सेट परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यानंतर होणारी 40 वी सेट परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तसेच या परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर आनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे; त्याकडे विद्यार्थ्यांनी वेळोवेळी लक्ष द्यायचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

YCMOU Recruitment 2024 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे ‘या’ पदावर नोकरीची संधी!!

YCMOU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र (YCMOU Recruitment 2024) मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर) पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

संस्था – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
भरले जाणारे पद – शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर)
पद संख्या – 63 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (YCMOU Recruitment 2024)

पद शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर) Academic Coordinator B. E. / B. Tech. / B. S. and M. E. / M. Tech. / M. S. or Integrated M. Tech. in relevant branch
with first class or equivalent in any one of the degrees


मिळणारे वेतन – Rs. 57,700/- per month (Consolidated)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी आवश्यक (YCMOU Recruitment 2024) पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. भरतीविषयी अधिक माहिती उमेदवारांनी ycmou.ac.in या संकेतस्थळावरुन घ्यायची आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ycmou.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RPF Recruitment 2024 : 10 वी पास आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! RPF अंतर्गत तब्बल 2250 पदांवर होणार भरती 

RPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे संरक्षण दल अंतर्गत (RPF Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे देशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.  RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.) पदांच्या एकूण 2250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

संस्था – रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force)
भरले जाणारे पद – RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.)
पद संख्या – 2250 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
कॉन्स्टेबल (Exe.)

उपनिरीक्षक (Sub-Inspector)

2000 पदे
250 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कॉन्स्टेबल (Exe.) – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
2. उपनिरीक्षक (Sub-Inspector) To be eligible for RPF Constable & SI recruitment 2024, candidates must not exceed the upper age limit of 25 years. However, the minimum age limit for the Constable position is 18 years and 20 years for the Sub-Inspector position. Age relaxation is permissible for candidates belonging to reserved categories. Additionally, candidates must fulfil the educational qualification requirements.

आवश्यक कागदपत्रे – (RPF Recruitment 2024)
1. वयाचा पुरावा म्हणून मॅट्रिकचे प्रमाणपत्र,
2. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/मॅट्रिक प्रमाणपत्र.
3. जातीचे प्रमाणपत्र (SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी) केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीसाठी विहित नमुन्यात
माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र.
4. स्व-साक्षांकित रंगीत छायाचित्राच्या दोन प्रती.
5. सरकारची सेवा करत असल्यास सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) कर्मचारी.
6. जेथे लागू असेल तेथे अधिवास प्रमाणपत्र.
7. केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीसाठी विहित नमुन्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील प्रमाणपत्र.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (RPF Recruitment 2024) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. या भरतीकरिता अधिक माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.

अशी होणार निवड –
1. Computer Based Test (CBT)
2. Physical Efficiency Test (PET)
3. Physical Measurement Test (PMT)
4. Document Verification.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BAVMC Recruitment 2024 : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत; अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे भरती सुरु

BAVMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (BAVMC Recruitment 2024) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 आणि 09 जानेवारी 2024 आहे.

संस्था – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
पद संख्या – 44 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 04 आणि 09 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – (BAVMC Recruitment 2024)
1. सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष
2. वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष
3. कनिष्ठ निवासी खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 14 पदे
वरिष्ठ निवासी 19 पदे
कनिष्ठ निवासी 11 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक MD/MS/DNB in the concerned subject.
वरिष्ठ निवासी
  • Registered to pursue DM/Mch in concerned subject OR
  • MD/MS/DNB qualified post graduates in concerned broad specialty.
  • This post of senior resident is tenured position not exceeding 03 years.
  • The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment.
कनिष्ठ निवासी Medical graduates (MBBS) from recognized / permitted medical college

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
सहाय्यक प्राध्यापक रु.१,००,०००/-
वरिष्ठ निवासी रु. ८०,२५०/-
कनिष्ठ निवासी रु. ६४,५५१/-

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी (BAVMC Recruitment 2024) जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर दिलेल्या तारखेला हजर राहावे.
4. मुलाखत 04 आणि 09 जानेवारी 2024 ला घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bavmcpune.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ‘इथे’ मिळवा सरकारी नोकरी!! अर्जासाठी काही दिवसच शिल्लक…

Government Job (43)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको असते? आपण (Government Job) पाहतो अनेकजण सरकारी नोकरीसाठी धडपडत असतात. पण अनेकवेळा प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळत नाही. पण आता सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कसं? ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.

ही भरती प्रक्रिया दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डकडून राबवली जात आहे. या माध्यमातून थेट 108 पदे भरली जातील. भरती प्रक्रिया सुरु असून सेक्शन अधिकारी (उद्यान)साठी ही भरती होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 7 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यासाठी (Government Job) अवघे काही दिवस शिल्लक असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी dsssb.delhi.gov.in. या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जदार उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान विषयात पदवी घेतलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 27 पर्यंत उमेदवाराचे वय असावे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ बँकेत व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी; संधीचं सोनं करा!!

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । श्री छत्रपती राजर्षी शाहू (Job Notification) अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड येथे रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक सरव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.

बँक – श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड
भरले जाणारे पद – सहाय्यक. सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – बीड

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
सहाय्यक. सरव्यवस्थापक 01
शाखा व्यवस्थापक 02
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक. सरव्यवस्थापक C.A. (Chartered Accountant)
शाखा व्यवस्थापक एम. कॉम प्रथम स श्रेणी उत्तीर्ण, GDC&A

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. या पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.
3. इच्छुक उमेदवारांनी आपला (Job Notification) अर्ज मुदती अगोदर सादर करावा.
4. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रत व अनुभव प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्राची एक प्रत (Hard Copy) बँकेच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष जमा करणे अथवा बँकेच्या शाखेच्या ठिकाणी देणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://shahubank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : 25 वर्षाचा तरुण सांभाळणार जिल्ह्याचा कारभार; कष्टकरी बापाचं पोर बनलं डेप्युटी कलेक्टर

Career Success Story of Deputy Collector Samadhan Ghutukade

करिअरनामा ऑनलाईन । “सरकारी अधिकारी होण्याचं (Career Success Story) आकर्षण मला लहानपणापासूनच खुणावत होतं. म्हणून मी जिद्दीने अभ्यास केला. MPSC आयोगाच्या वेगवेगळ्या भरती परीक्षा दिल्या. हाती आलेलं यश थोडक्यासाठी हुकत होतं. वारंवार पदरी निराशा पडत होती. मागे झालेल्या चुकांमधून शिकत पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी तो दिवस उगवला आणि मी अधिकारी झालो.” ही कहाणी आहे समाधान घुटुकडे या तरुणाची. सर्व सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने उपजिल्हाधिकारी पदावर बाजी कशी मारली; हे आपण पाहणार आहोत. त्याची ही कहाणी निश्चित मरगळलेल्या तरुणांना प्रेरणा देईल.

वडील आहेत माथाडी कामगार
समाधान घुटुकडे याचं बालपण महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील घेरडी या दुष्काळग्रस्त भागात गेलं. या भागात  उदरनिर्वाहाच्या साधनांची कमतरता असल्याने समाधानचे आई–वडील आपल्या कुटुंबाला घेऊन नोकरीच्या शोधात मुंबईला गेले. त्यानंतर ते माथाडी कामगार म्हणून चेंबूर येथे काम करू लागले. त्यातून मिळालेल्या तुटपुंज्या उत्पन्नातून ते  घर चालवत होते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते कष्ट घेत होते. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि कर्तुत्व गाजवावे अशी त्यांची अपेक्षा होती. मुलाने देखील वडिलांची अपेक्षा पूर्ण केली आणि जिद्दीने एमपीएससी (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवत थेट उपजिल्हाधिकारी पदावर वर्णी लावली.

लहानपणापासून अधिकारी होण्याचं आकर्षण (Career Success Story)
समाधान याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मानखुर्द (मुंबई) येथे झाले. तर मोहिते पाटील विद्यालय येथे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. नंतर त्याने मेकॅनिकल हा अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्याने त्याला स्पर्धा परीक्षेचेही आकर्षण होते. त्याने पदवीच्या पहिल्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा व परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

इंजिनिअरिंगसह केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास
एकीकडे अभियांत्रिकीचा अभ्यास तर दुसरीकडे या अभ्यासातून वेळ मिळाला की एमपीएससीचा अभ्यास असा दिनक्रम सुरु होता. हातात कोणतीही पदवी नव्हती, परंतू त्याने अनुभव घेण्यासाठी एमपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. कारणही तसंच होतं. त्याने गावाकडची परिस्थिती (Career Success Story) जवळून बघितली होती. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयाशी त्याचा संबंध यायचा. त्यावेळी एकेक कागद काढण्यासाठी दिवस जायचा. छोट्या कामासाठी लोकांची होणारी तारांबळ दिसायची. सरकार दरबारी काम न झाल्याने हताश झालेले लोक पाहून, समाजातील या लोकांसाठी आपण काहीतरी करावे; अशी त्याची इच्छा होती. या कारणामुळे त्याला महसूल खात्यात अधिकारी व्हायचे होते.

संपूर्ण राज्यात पटकावला 11 वा क्रमांक
समाधानने जिद्दीने अभ्यास केला. अभ्यासाच्या जोरावर त्याने कर निरीक्षक, वनसेवा, राज्यसेवा अशा विविध परीक्षा दिल्या. या सर्व परीक्षांत अगदी थोडक्या गुणांनी त्याला अपयशास सामोरे जावे लागले. त्याने पहिल्या परिक्षेत झालेल्या चूकातून वाट काढत परीक्षेची तयारी केली. इतकेच नव्हे तर MPSC च्या परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून तो 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यास उपजिल्हाधिकारी पद मिळाले आहे. या पदावर काम करताना त्याला सर्वसामान्यांची सेवा करायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com