Home Blog Page 174

UPSC Success Story : त्याने रिस्क घेतली… दिवसा ऑफिस आणि रात्री केला अभ्यास; IAS होण्यासाठी सोडली मायक्रोसॉफ्टची नोकरी

UPSC Success Story of IAS Madhav Bharadwaj

करिअरनामा ऑनलाईन । IAS किंवा IPS होण्याचे आकर्षण (UPSC Success Story) असे आहे की, यासाठी तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडतात आणि UPSC मधून अधिकारी होण्यासाठी स्वतःला झोकून देतात. ज्या क्षेत्रात काहीही निश्चिती नाही; अशा ठिकाणी ते मोठी रिस्क घेताना दिसतात. माधव भारद्वाज हा तरुण यापैकीच एक आहे.

लहानपणी ठरवलं होतं इंजिनिअर व्हायचं
माधव हा उत्तराखंडमधील मसुरी येथील रहिवासी आहे. त्याने लहानपणापासून ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA) बद्दल ऐकले आणि पाहिले होते. माधव सांगतो की, त्याचे वडील LBSNAA येथे काम करायचे. त्यामुळे या ऐतिहासिक संकुलाची त्याला लहानपणापासूनच माहिती होती. पण IAS होण्या ऐवजी इंजिनियर होण्याचे स्वप्न त्याने पाहिले आणि 12वी नंतर प्रयागराज येथील MNNIT मध्ये B.Tech Computer Science ला प्रवेश घेतला.
बी.टेक.ची पदवी घेतल्यानंतर माधवने आयआयएम अहमदाबादमधून एमबीए (MBA) केले. यानंतर त्याने मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळवली. 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले आणि लॉकडाऊन लागू झाले तेव्हा त्याला बराच काळ घरी राहून काम करावे लागले.

वर्क फ्रॉम होम करताना वाटू लागलं IAS व्हावं 
घरातून काम करत असताना माधवच्या मनात आयएएस (IAS) होण्याची इच्छा निर्माण झाली. यानंतर त्याने करिअरची दिशा बदलण्याचं ठरवलं आणि UPSC नागरी (UPSC Success Story) सेवा परीक्षेची मनापासून तयारी सुरु केली. त्याने या परीक्षेसाठी अपार मेहनत घेतली. पण परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात केवळ तीन गुण कमी पडल्यामुळे त्याची ही संधी हुकली.

अपयशाने निराश झाला नाही (UPSC Success Story)
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात इतक्या कमी फरकाने अपयश आल्याने त्याला धक्का बसला पण तो निराश झाला नाही. निराश होण्याऐवजी त्याने आत्मविश्वास वाढवला. त्याने पुन्हा आपला मोर्चा पुढच्या परीक्षेकडे वळवला आणि अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.

दिवसा ऑफीस आणि रात्री केला अभ्यास 
माधवने UPSC साठी दुसऱ्यांदा फॉर्म भरला. यावेळी त्याने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेऱ्या सहज पूर्ण केल्या. UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये त्याने संपूर्ण भारतात 536 वी रँक मिळवली. माधव सांगतो की तो दिवसा ऑफिसची कामे करायचा आणि रात्री चार ते पाच तास परीक्षेचा अभ्यास करायचा. जेव्हा ऑफिसच्या कामाला सुट्टी असेल तेव्हा तो 10 ते 12 तास अभ्यास करायचा. एवढयावर न (UPSC Success Story) थांबता परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत त्याने तब्बल 15 ते 16 तास अभ्यास केला आहे. शेवटी त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आणि त्याचे IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तर असा होता माधव याचा B.Tech इंजिनिअर ते भारतातील सर्वोच्च सरकारी अधिकारी पदावर पोहचण्याचा प्रवास. त्याची ही कहाणी तरुण पिढीसाठी निश्चितच आशावादी ठरेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE Board Exam Time Table : 10 वी/12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; पहा महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Exam Time Table) महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

CBSEने दि. ४ मार्च रोजी नियोजित केलेला इयत्ता दहावीचा तिबेटी पेपर आता २३ फेब्रुवारीला होणार आहे. तर रिटेल याविषयीचा पेपर १६ फेब्रुवारी ऐवजी आता दि. 28 फेब्रुवारी 202 रोजी होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची फॅशन स्टडीज विषयाची परीक्षा दि. ११ मार्च ऐवजी दि. २१ मार्च रोजी घेतली जाईल. CBSE च्या इयत्ता दहावीच्या परीक्षा दि. १५ फेब्रुवारी ते दि. १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. तर सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा दि. १५ फेब्रुवारी ते दि. २ एप्रिल २०२४ या कालावधीत होतील. पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहेत.

असं डाउनलोड करा CBSEचे सुधारीत वेळापत्रक (CBSE Board Exam Time Table)
1. www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होमपेजवर इयत्ता दहावी , बारावीच्या डेट शीट लिंकवर क्लिक करा.
3. डेटशीट स्क्रीनवर दिसेल.
4. परीक्षेचे वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा.
5. पुढील वापरासाठी प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : कोल्हापूर महानगरपालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; दर सोमवारी होणार मुलाखत

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका (Job Notification) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. उमेदवारांची मुलाखत प्रत्येक सोमवारी घेण्यात येणार आहे.

संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
भरले जाणारे पद – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ
पद संख्या – 59 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कोल्हापूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कोल्हापूर
मुलाखतीची तारीख – प्रत्येक सोमवारी

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
पेडियाट्रिशियन 06
गायनॅकलॉजिस्ट 04
वैद्यकीय अधिकारी 24
वैद्य (औषध) 02
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ 03
बालरोगतज्ञ 03
नेत्ररोग तज्ज्ञ 03
त्वचारोगतज्ज्ञ 05
मानसोपचारतज्ज्ञ 05
ENT विशेषज्ञ 04

 

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी  निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (Job Notification) मुलाखतीकरिता वर दिलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहावे.
4. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहायचे आहे.
5. प्रत्येक सोमवारी मुलाखत घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://web.kolhapurcorporation.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 10 वी पास ते ग्रॅज्युएट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी!! उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे मिळेल नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2024 निश्चित करण्यात आली आहे.

बँक – उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
भरली जाणारी पदे – प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ, अमरावती, वर्धा, सतना, रेवा, रायपूर
वय मर्यादा – 28 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 06 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (जाहिरात पहा)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी 10+2
क्रेडिट अधिकारी 10+2
सहाय्यक. शाखा व्यवस्थापक Graduate
शाखा व्यवस्थापक Graduate

 

अशी होईल निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2024 आहे. (Job Notification)
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.utkarsh.bank/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MGNREGA Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! NREGA अंतर्गत 100 पदावर भरती सुरु

MGNREGA Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पालघर (MGNREGA Bharti 2024) अंतर्गत साधन व्यक्ती पदांच्या एकूण 100 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पालघर
भरले जाणारे पद – साधन व्यक्ती
पद संख्या – 100 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर
वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे (MGNREGA Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रूम न.१११, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (MGNREGA Bharti 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahaegs.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : ‘या’ विषयातील पदवीधारकांना राज्यातील नामांकित बँकेत नोकरीची संधी

Banking Job (23)

करिअरनामा ऑनलाईन । पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक, अमरावती (Banking Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य व्यवस्थापक (I.T. and Compliance) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

बँक – पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक, अमरावती
भरले जाणारे पद – मुख्य व्यवस्थापक (I.T. and Compliance)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

पद शैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक (I.T. and Compliance)
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स) / बी.ई. (आय.टी.)/ बी.ई. (ईलेक्ट्रॉनिक्स् ) / एम.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स) / एम.सी.ए. पदवी.
  • संगणक क्षेत्रातील कामकाजाचा किमान 5 वर्षांचा अनुभव.
  • बँकींग क्षेत्रातील कामकाजाच्या अनुभवास प्राधान्य देण्यात येईल.

असा करा अर्ज –
1. भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवश्यक (Banking Job) कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://pducbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Clerk Prelims Exam Date 2024 : SBIची लिपिक भरती पूर्व परीक्षा उद्यापासून; ‘या’ नियमांचं करा पालन

SBI Clerk Prelims Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI Clerk Prelims Exam Date 2024) लिपिक भरती पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. दि. ५, ६, ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले गेले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

या परीक्षेत सहभागी होणार्‍या उमेदवारांनी परीक्षेसाठी ठरवून दिलेल्या काही मार्गदर्शक तत्त्वांची आणि महत्त्वाच्या नियमांची माहिती तपासणे आवश्यक आहे. यामुळे ऐन परीक्षेच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

1. प्रवेशपत्र, वैध ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र बाळगणे अनिवार्य आहे.
2. SBI लिपिक प्रीलिम परीक्षेला बसणार असलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यांपैकी एक परीक्षा केंद्रात सोबत नेणे आवश्यक आहे. कारण, ओळखपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. शिवाय, अशा उमेदवारांना परीक्षा देण्यास मनाई केली जाऊ शकते.
3. यासोबतच उमेदवाराने परीक्षा केंद्रावर अर्ज भरताना त्याने अपलोड केलेल्या छायाचित्राच्या किमान 8 प्रती सोबत घ्याव्यात, जेणेकरून त्याला त्याच्या पडताळणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.
4. उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेच्या किमान एक तास आधी त्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारे उशिरा येण्यास परीक्षा केंद्र जबाबदार राहणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत पोहचण्याची जबाबदारी घ्यावी.
5. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
6. इलेक्ट्रॉनिक गॅझेट केंद्रावर नेण्यास परवानगी दिली जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी मोबाईल, स्मार्ट वॉच इत्यादी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत घेऊ नये.

असं आहे परीक्षेचे स्वरुप – (SBI Clerk Prelims Exam Date 2024)
1. एसबीआय लिपिक प्रीलिम परीक्षेत उमेदवारांकडून एकूण 100 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
2. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल.
3. प्रश्नपत्रिकेत इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे 35 प्रश्न आणि तर्क क्षमता विषयातून 35 प्रश्न विचारले जातील. 4. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उमेदवारांना 1 तासाचा कालावधी देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : विना परीक्षा थेट मुलाखत; इथे मिळेल 80 हजारापर्यंत पगार; कोण करु शकतं अर्ज?

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा रुग्णालय, गोंदिया अंतर्गत (Job Alert) वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.

संस्था – जिल्हा रुग्णालय, गोंदिया
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 06 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 17 जानेवारी 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:30 वा.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया
नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया
वय मर्यादा – 58 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS
मिळणारे वेतन – (Job Alert)
वैद्यकीय अधिकारी
1. MBBS – रु.८०,०००/- दरमहा
2. BAMS – रु.४५,०००/- दरमहा

अशी होईल निवड –
1. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
3. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Job Alert) मुलाखतीकरिता दिलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
4. मुलाखतीला येण्यासाठी उमेदवारांना स्वखर्चाने यायचे आहे; यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MRSAC Nagpur Recruitment 2024 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर येथे विविध पदांवर भरती; थेट द्या मुलाखत

MRSAC Nagpur Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग (MRSAC Nagpur Recruitment 2024) अप्लीकेशन सेंटर, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सीनियर प्रोग्रामर, ज्युनियर प्रोग्रामर, असिस्टंट प्रोग्रामर पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. येथे भरती होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर
भरले जाणारे पद – सीनियर प्रोग्रामर, ज्युनियर प्रोग्रामर, असिस्टंट प्रोग्रामर
पद संख्या – 13 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – ४५ वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 10 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर, नागपूर

भरतीचा तपशील – (MRSAC Nagpur Recruitment 2024)

पद पद संख्या 
सीनियर प्रोग्रामर 02 पदे
ज्युनियर प्रोग्रामर 04 पदे
असिस्टंट प्रोग्रामर 07 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
सीनियर प्रोग्रामर BE/ B.Tech. in relevant field OR MCA/MCM course with graduation in BCA / BSc. OR MTech. in Remote Sensing with programming background.
ज्युनियर प्रोग्रामर BE/ B.Tech. in relevant field OR MCA/MCM course with graduation in BCA / BSc. OR MTech. in Remote Sensing with programming background.
असिस्टंट प्रोग्रामर BE/ B.Tech. in relevant field OR MCA/MCM course with graduation in BCA / BSc. OR MTech. in Remote Sensing with programming background.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
सीनियर प्रोग्रामर 1,00,000 /-
ज्युनियर प्रोग्रामर 60,000 /-
असिस्टंट प्रोग्रामर 27,000 /-

अशी होणार निवड –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे. (MRSAC Nagpur Recruitment 2024)
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
4. मुलाखत 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mrsac.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : “फक्त UPSC.. बाकी काही नाही!!” IPS होण्यासाठी 35 लाखाच्या नोकरीचा त्याग; कोण आहे हा तरुण?

UPSC Success Story of IPS Archit Chandak

करिअरनामा ऑनलाईन । त्याने 2012 मध्ये जेईई परीक्षा (UPSC Success Story) उत्तीर्ण केली आणि आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला.  B.Tech पूर्ण केल्यानंतर त्याला एका जपानी कंपनीकडून वार्षिक 35 लाख रुपये पगाराच्या तगड्या पगाराची ऑफर मिळाली. पण त्याने ही ऑफर नाकारली आणि यूपीएससीची (UPSC) तयारी केली. कॉलेजमध्ये असतानाच त्याने आयएएस किंवा आयपीएस व्हायचं ठरवलं होतं. ही कथा आहे आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांची. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

नागपूरमध्ये जन्म आणि तिथेच झाले शिक्षण
अर्चित चांडक हे शंकर नगर, नागपूरचे रहिवासी आहेत. बी. पी. विद्या मंदिर, भवन येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. 2012 मधील जेईई परीक्षेत अर्चित टॉपर ठरले होते.

35 लाखाची ऑफर धुडकावली (UPSC Success Story)
बी.टेक. करत असताना इंजिनिअर होण्याऐवजी प्रशासकीय सेवेत रुजू होऊन देशसेवा करण्यात अर्चित यांना रस वाटू लागला. ते सांगतात त्यांच्या इंटर्नशिपदरम्यान एका जपानी (UPSC Success Story) कंपनीने त्यांना 35 लाखांच्या पगाराच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली. पण त्यांनी ही ऑफर नाकारली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
अर्चित यांनी 2016 मध्ये आयआयटी दिल्लीतून बी.टेक पदवी मिळवली. यानंतर 2018 मध्ये ते प्रथमच UPSC नागरी सेवा परीक्षेस बसले. या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी संपूर्ण भारतातून 184 वा क्रमांक मिळवला आणि ते IPS झाले. सध्या ते नागपूर पोलिस विभागात डीसीपी म्हणून कार्यरत आहेत.
व्यायाम आणि खेळासाठी देतात वेळ 
अर्चित चांडक यांना खेळ आणि व्यायामाची विशेष आवड आहे. त्यांना बुद्धिबळ खेळायला आवडते. त्यांचे FIDE रेटिंग 1820 आहे. ते फिटनेस फ्रीक म्हणून ओळखले जातात. त्यांनी 42 किलोमीटरची मुंबई मॅरेथॉनही पूर्ण केली आहे. याशिवाय ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ते आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. इंस्टाग्रामवर टयांचे 92 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पत्नीही आहे IAS अधिकारी
IPS अर्चित यांनी त्यांची बॅचमेट सौम्या शर्मासोबत लग्न केले आहे. त्या देखील IAS अधिकारी आहेत. सध्या त्या नागपूर जिल्हा परिषद येथे CEO पदाचा कारभार सांभाळत आहेत. सौम्या शर्मा यांनी UPSC परिक्षेत संपूर्ण भारतात 9वा क्रमांक पटकावून त्या या परिक्षेत टॉपर ठरल्या होत्या. सौम्या यांच्या (UPSC Success Story) बाबतची एक गोष्ट म्हणजे त्यांना श्रवणशक्ती कमी आहे. त्यांना ऐकू येत नाही. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांची ऐकण्याची क्षमता गेली. तरीही त्यांनी आपल्या शारीरिक दुर्बलतेवर मात करत अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांना ऐकू येत नाही हे माहित असताना अर्चित यांनी सौम्या यांचा स्वीकार केला आणि त्यांच्याशी लग्नगाठ बांधली. आज दोघेही अधिकारी पदावर जाबाबदरीने काम करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com