Home Blog Page 173

Indian Post Recruitment 2024 : 10वी पाससाठी आनंदाची बातमी!! पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्यासाठी आहे नोकरी

Indian Post Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय डाक विभागाने नवीन (Indian Post Recruitment 2024) भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्राइवर (साधारण ग्रेड) पदाच्या एकूण 78 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय डाक विभाग
भरले जाणारे पद – ड्राइवर (साधारण ग्रेड)
पद संख्या – 78 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Post Recruitment 2024)
1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. तसेच त्याच्याकडे Driving Licence आणि हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव
वय मर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
परीक्षा फी – 100 रुपये/-
मिळणारे वेतन – 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया –
स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल.
जे उमेदवार स्टेज II च्या (Indian Post Recruitment 2024) प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित रहावे लागेल.
नोकरी करण्याचे ठिकाण – उत्तर प्रदेश
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha Forest Recruitment 2024 : वन विभागात भरतीचा मार्ग खुला; 1256 पदे भरण्याचा शासनाचा मोठा निर्णय!!

Maha Forest Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वनरक्षक होण्याचे तुमचे (Maha Forest Recruitment 2024) स्वप्न पूर्ण होणार आहे; कारण शासनाकडून या भरती प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वन विभागात वनरक्षकांची तब्बल 1256 पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ही भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून खोळंबली होती. मात्र शासनाने यामधून मार्ग काढत उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे.

खोळंबलेल्या भरती प्रक्रियेस चालना मिळणार 
शासनाने 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टिसीएस (TCS) आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या (Maha Forest Recruitment 2024) उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शेवटी यामधून मार्ग निघाला असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

अशी होणार निवड (Maha Forest Recruitment 2024)
1. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे मार्क एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची 25 कि.मी. आणि 16 कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल.
2. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यांच्यामधून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया 17 जानेवारी पासून सुरू करण्यात येणार असून वन वृत्तातील उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
याभरतीमुळे वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : भरघोस पगाराच्या नोकरीसाठी ‘इथे’ करा अर्ज; 1 लाख 25 हजारापर्यंत मिळेल पगार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 93 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे
पद संख्या – 93 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे

भरली जाणारी पदे –
हृदयरोगतज्ज्ञ – 01 पद
नेफ्रोलॉजिस्ट -01 पद
स्त्रीरोगतज्ञ -11 पदे
बालरोगतज्ञ -11 पदे
सर्जन – 06 पदे (Job Alert)
रेडिओलॉजिस्ट -01 पद
भूलतज्ज्ञ -11 पदे
फिजिशियन -09 पदे
ऑर्थोपेडिक -01 पद
ईएनटी (विशेषज्ञ) – 01 पद
नेत्ररोगतज्ज्ञ -01 पद
मानसोपचारतज्ज्ञ – 02 पदे
वैद्यकीय अधिकारी -36 पदे
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) – 01 पद

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षे
परीक्षा फी – (Job Alert)
1. खुल्या प्रवर्गासाठी – रु.३००/-
2. राखीव प्रवर्गासाठी – रु.२००/
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली 274 पदांवर भरती; कोणत्या विभागात किती पदे?

MPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । MPSC कधी भरती जाहीर करते; या बातमीची (MPSC Recruitment 2024) सगळेच तरुण उमेदवार आतुरतेने वाट पाहत असतात. या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या एकूण 274 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
पद संख्या – 274 पदे
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) सामान्य प्रशासन विभाग, राज्य सेवा गट-अ व गट-ब – 205 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी घेतलेली असावी. (MPSC Recruitment 2024)
2) मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब – 26 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
3) महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब – 43 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
वय मर्यादा – (MPSC Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे
2. [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – ₹544/-
2. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – ₹344/-
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक –
1. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 -: दि. 28 एप्रिल 2024
2. राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 -: दि. 14 ते 16 डिसेंबर 2024
3. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 -: दि. 23 नोव्हेंबर 2024
4. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 -: दि. 28 ते 31 डिसेंबर 2024

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी भरती!! ‘या’ पदांसाठी इंजिनियर्स करु शकतात अर्ज

BEL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे (BEL Recruitment 2024) तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
पद संख्या – 115 पदे
भरली जाणारी पदे –
1. यांत्रिक अभियांत्रिकी – 30 पदे
2. संगणक विज्ञान, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी – 15 पदे
3. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, कम्युनिकेशन, दूरसंचार अभियांत्रिकी – 30 पदे
4. स्थापत्य अभियांत्रिकी – 20 पदे
5. मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरीयल प्रॅक्टिस – 20 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
वय मर्यादा – (BEL Recruitment 2024)
सामान्य/EWS उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावी. तथापि, SC/ST/PWD उमेदवारांसाठी वयात 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट दिली जाईल.
परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – दरमहा रु. 8,000/- ते रु. 12,500/-
अशी होणार निवड –
उमेदवाराने  लेखी परीक्षेत मिळवलेल्या (BEL Recruitment 2024) गुणांच्या टक्केवारीच्या गुणवत्तेवर आधारीत निवड केली जाईल.
लेखी परीक्षा तात्पुरती BEL गाझियाबाद येथे फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bel-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : घर विकलं…नोकरीही सोडली.. समोसे विकून झाले मालामाल; कमाई ऐकून थक्क व्हाल!!

Career Success Story of Samosa Singh

करिअरनामा ऑनलाईन ।  शिखर आणि निधी हे दोघे पती-पत्नी; ज्यांनी (Career Success Story) आयुष्यात प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ दिली. या दोघांनी त्यांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वतःच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली आणि यामध्ये यश मिळवलं. पण वाचायला जेवढा सोपा वाटतो तितका यांचा प्रवास सोपा नव्हता. या दोघांनाही सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा कुठे त्यांना त्यांच्या स्टार्टअपमध्ये यशस्वी होता आलं.
आपण पाहतो की, आजकाल देशातील बहुतांश तरुण स्टार्टअपच्या दिशेने झेपावत आहेत. पण काही स्टार्टअप्स जितक्या वेगानं उघडतात तितक्याच वेगानं बंदही होताना दिसतात. पण जर एखाद्याला स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुमचा स्टार्टअप नक्कीच यशस्वी होऊ शकतो; यात शंका नाही.

दोघे आहेत उच्च शिक्षित 
शिखर वीर सिंह आणि निधी सिंह हे दोघे पती-पत्नी आहेत. निधी आणि शिखर यांची पहिली भेट कुरुक्षेत्र विद्यापीठात बी.टेक चे शिक्षण घेताना झाली. या दोघांनी हरियाणातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक केलं आहे. यानंतर निधी (Career Success Story) यांनी गुरुग्राममधील एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. नंतर शिखर यांनी हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसमधून एम.टेक.चं शिक्षण घेतलं. २०१५ मध्ये दोघांनी व्यवसाय करण्याचा विचार केला. यादरम्यान दोघांनीही नोकरी सोडली.

30 लाखाचं पॅकेज सोडलं 
यावेळी शिखर वीर सिंग हे बायोकॉनमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट होते तर निधी यांचा पगार वार्षिक ३० लाख रुपये होता. एक वर्षानंतर, २०१६ मध्ये, त्यांनी बंगळुरूमध्ये आपल्या बचतीतून समोसा सिंग नावाचं स्टार्टअप सुरु केला.

नोकरी सोडली.. घरंही विकलं
‘समोसा सिंग’चे संस्थापक शिखर वीर सिंग आणि निधी सिंग यांनीही असंच काहीसं केलं. त्यांनी त्यांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वतःच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली.सुरवातीला दोघांनाही खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना त्यांचं राहतं घरही विकावं लागलं. एवढं करूनही ते आपल्या कल्पनेवर ठाम राहिले. त्याचाच परिणाम म्हणजे आज या व्यवसायातून ते दररोज लाखो रुपयांची कमाई करत आहे. त्यांनी एवढं मोठं यश कसं मिळवलं ते आपण जाणून घेऊ.

‘समोसा सिंग’ सुरू झालं, पण….
‘समोसा सिंग’ सुरू झालं, पण लवकरच त्यांना मोठ्या किचनची गरज भासू लागली. किचनसाठी जागा खरेदी करण्यासाठी त्यांना पैशाची गरज भासू लागली. हे पैसे उभा करण्यासाठी त्यांनी ८० लाख रुपयांना त्यांचं घर विकलं. या पैशातून दोघांनी बेंगळुरु येथे भाड्यानं फॅक्ट्री घेतली. व्यवसाय वाढवण्यासाठी राहतं घर विकून भाड्यानं फॅक्ट्री घेण्याचा निर्णय अगदी योग्य होता. त्यामुळे व्यवसाय अनेक पटींनी वाढला.

आज आहे इतका टर्न ओव्हर
‘समोसा सिंग’ सुरू करताना दोघांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण दोघांची मेहनत फळाला आली. काही दिवस आणि महिन्यांतच त्यांच्या व्यवसाय झपाट्यानं वाढू लागल्या. आज ते दर महिन्याला सुमारे ३० हजार समोसे विकतात. त्यांची वार्षिक उलाढाल ४५ कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, पती-पत्नी दोघे मिळून दररोज जवळरास १२ लाख रुपये कमवत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Station Master in Railway : रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचं आहे? येथे मिळेल संपूर्ण माहिती 

How to Become Station Master in Railway

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो तरुण रेल्वेत (How to Become Station Master in Railway) नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. रेल्वेतील नोकरीकडे समाजात प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल, तर स्टेशन मास्टरची पोस्ट तुमच्यासाठी चांगली ठरेल. पण या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला रेल्वेने ठरवून दिलेल्या काही पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. या भरतीसाठी घेतलेल्या चाचणी प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची निवड अंतीम केली जाते.

आज आम्ही तुमच्या सोयीसाठी स्टेशन मास्तर पदासाठी निवड होण्यासाठीच्या पात्रतेपासून ते निवडीपर्यंतची संपूर्ण माहिती येथे देत आहोत, ही माहिती तुम्हाला तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.

अशी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

अशी होते निवड (How to Become Station Master in Railway)
स्टेशन मास्टर पदासाठी भरती झाल्यानंतर, तुम्हाला त्यात सामील होण्यासाठी अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पहिल्या टप्प्यात संगणक चाचणी (CBT) मध्ये भाग घ्यावा लागेल. CBT परीक्षेत उमेदवारांना गणित, सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य इंग्रजी विषयांचे प्रश्न विचारले जातात.

असे असतात परीक्षेचे टप्पे 
पहिल्या टप्प्याच्या परीक्षेत विहित कटऑफ गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्य परीक्षेला बसावे लागते. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या (How to Become Station Master in Railway) उमेदवारांना शेवटी कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीस बसावे लागते. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांची स्टेशन मास्टरच्या रिक्त जागांवर नियुक्ती केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! ‘या’ पदांसाठी अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले महत्वाचे बदल; जाणून घ्या….

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agniveer Recruitment) करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तसेच लवकरच बंपर भरती देखील सुरु केली जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल.

भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. हा बदल 2024 -25 च्या भरती प्रक्रियेसाठी लागू होणार आहे. नुकतीच यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा नवा नियम लिपिक आणि स्टोअरकीपर पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे.

कोणत्या पदासाठी बदलले नियम (Agniveer Recruitment)
विशेष म्हणजे हा नियम इतर भरती प्रक्रियेसाठी लागू नसेल. केवळ सेना लिपिक आणि स्टोअरकीपर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी हा नियम असेल. यामध्ये या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागणार आहे. अगोदरच्या नियमानुसार टायपिंग चाचणी देण्याची गरज नव्हती. मात्र आता त्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे.

असे आहेत नवे बदल
या टायपिंग चाचणीमध्ये उमेदवाराला हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिटप्रमाणे ही चाचणी द्यायची आहे. काही सेना अधिकाऱ्यांनी याबद्दलची पुष्टी (Agniveer Recruitment) देखील केली आहे. मात्र, अजून या टायपिंग चाचणीचे मानक ठरवण्यात आले नाहीत. याबद्दलचे सुधारीत बदल लवकरच जाहीर केले जातील.
या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. सतत भरती प्रक्रियेबद्दल बदल हे केले जात आहेत. यासाठी आधी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल. टायपिंग चाचणीचा देखील यामध्ये समावेश होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ नामांकित महाविद्यालयात तुमच्यासाठी नोकरीची संधी!!

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर (Job Alert) अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. या माध्यमातून असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, क्लिनिकल इंस्ट्रक्टर पदांच्या एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. वरील पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

संस्था – दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर
भरले जाणारे पद – असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, क्लिनिकल इंस्ट्रक्टर
पद संख्या – 38 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 13 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – NYSS, आत्रे लेआउट, प्रताप नगर, नागपूर
नोकरीचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
असोसिएट प्रोफेसर 03
असिस्टंट प्रोफेसर 06
प्रोफेसर 03
क्लिनिकल इंस्ट्रक्टर 25

 

अशी होणार निवड –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Job Alert) दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
4. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणावीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dmconursing.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICMR Recruitment 2024 : मुंबईत नोकरी!! थेट द्या मुलाखत; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत ‘या’ पदावर भरती

ICMR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई (ICMR Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II या पदाच्या 5 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे. मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई
भरले जाणारे पद – प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II
पद संख्या – 05 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 30 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण – ICMR-National Institute of Virology, Mumbai Unit Haffkine Institute Compound, Acharya Donde Marg, Parel, Mumbai – 400012 Land Mark: Opp. TATA Hospital / KEM Hospital. (ICMR Recruitment 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12वी विज्ञान + डिप्लोमा (एमएलटी/डीएमएलटी/अभियांत्रिकी) + संबंधित विषय/क्षेत्रातील अनुभव
वय मर्यादा – (ICMR Recruitment 2024)
30 वर्षे
SC – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 18,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.niv.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com