Home Blog Page 167

GK Updates : जगातील सर्वात लहान महिला कोणत्या देशात आहे? टीव्हीचा शोध कोणी लावला?

GK Updates 16 Jan.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: कोणत्या देशात फक्त 40 मिनिटे रात्र असते?
प्रश्न 2: त्वचेचा कोरडेपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो?
प्रश्न 3: मुलीचे नाव आणि अलंकार हे दोन्ही म्हणजे काय?
प्रश्न 4: कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे त्वचेवर दाद होतात?

प्रश्न 5: शरीराच्या कोणत्या भागात रक्त नसते?
प्रश्न 6: जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
प्रश्न 7: (GK Updates) जगातील सर्वात लहान महिला कोणत्या देशात आहे?

प्रश्न 8: कोणत्या देशाला सापांचा देश म्हणतात?
प्रश्न 9: सध्या भारतात किती राज्ये आहेत?
प्रश्न 10: भूकंपाच्या वेळी कोणता वायू सोडला जातो?
प्रश्न 11: टीव्हीचा शोध कोणी लावला?

अनुक्रमे उत्तरे –
1. नॉर्वे
2. व्हिटॅमिन-डी
3. पायल
4. व्हिटॅमिन-डी
5. कॉर्निया

6. नाईल, लांबी 6650 किलोमीटर
7. भारत
8. ब्राझील
9. 28 (GK Updates)
10. रेडॉन
11. जे.एल. बेयर्ड
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2024 : UPSC ने जाहीर केली विविध पदांवर भरती; 121 पदे भरली जाणार

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC अंतर्गत भरती होवू इच्छिणाऱ्या (UPSC Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने नवीन भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून सहाय्यक औद्योगिक सल्लागार, वैज्ञानिक-बी, सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग
भरले जणारे पद – सहाय्यक औद्योगिक सल्लागार, वैज्ञानिक-बी, सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 121 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – ३५ वर्षे

भरतीचा तपशील – (UPSC Recruitment 2024)

पद पद संख्या 
सहाय्यक औद्योगिक सल्लागार 01
वैज्ञानिक-बी 01
सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ 07
विशेषज्ञ ग्रेड III 112

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
सहाय्यक औद्योगिक सल्लागार Master’s Degree
वैज्ञानिक-बी Master’s Degree
सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ M.Sc. degree in Zoology from a recognized University.
विशेषज्ञ ग्रेड III Degree

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (UPSC Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://upsconline.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NLC Bharti 2024 : सरकारी मेगाभरती!! इथे होतेय 632 जागांवर भरती; पदवीधर/डिप्लोमा धारक करु शकतात अर्ज

NLC Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC Bharti 2024) लिमिटेडमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 632 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे. ही भरती म्हणजे नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

संस्था – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड
पद संख्या – 632 पदे
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पदवीधर अप्रेंटिस – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन & फार्मसी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात B.E. /B.Tech/B.Pharm
2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – (NLC Bharti 2024)
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन
आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

वय मर्यादा – अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – (NLC Bharti 2024)
1. पदवीधर अप्रेंटिस – 15028/-
2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 12,524/-
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2024
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803.

काही महत्वाच्या लिंक्स – (NLC Bharti 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2024 : आर्किटेक्चर इंजिनियर्ससाठी पुणे महापालिकेत नोकरीची संधी; 113 पदे भरणार

PMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका येथे इंजिनियर्सना (PMC Recruitment 2024) नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका
भरले जाणारे पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer, Architecture)
पद संख्या – 113 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

परीक्षा फी – (PMC Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु. १०००/-
2. मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु ९००/-
वय मर्यादा – 18 ते 55 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
मिळणारे वेतन – ३८,६००/- ते १,२२,८००/- रुपये दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज मुदती अगोदर दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. (PMC Recruitment 2024)
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईलमध्ये 473 जागांवर भरती सुरु; 12 वी पास ते पदवीधारकांना मिळणार नोकरीची संधी

IOCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 473 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 473 पदे (IOCL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 18 वर्षे ते 24 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार इयत्ता बारावी / पदवीधर / डिप्लोमा धारक, संबंधित क्षेत्रातील आय.टी.आय पास असावा.
असा करा अर्ज – (IOCL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : संतापजनक!! फी भरली नाही म्हणून परीक्षा देणाऱ्या मुलांना वर्गाबाहेर काढले

Big News (1)

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी न भरल्यामुळे (Big News) विद्यार्थ्यांना चालू परीक्षेदरम्यान वर्गा बाहेर काढण्यात आल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ठाण्यातील वर्तक नगर भागात असलेल्या लिटल फ्लावर नावाच्या शाळेत घडला. दरम्यान या प्रकारानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

ठाणे शहरातील वर्तकनगर भागात लीटल फ्लावर ही शाळा आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी भरली नाही म्हणून परीक्षा देत असलेल्या विद्यार्थांना वर्गाबाहेर काढण्यात आलं. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांचे पालकांनी ठिय्या मांडत शाळेचा निषेध नोंदवला.

शाळा व्यवस्थापनाच्या चुकीमुळे आगाऊ फी भरून देखील काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याने देखील पालक वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे (Big News) पालक आक्रमक झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांकडून पालकांना शांत राहण्याचे आव्हान करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : दोन वेळचं जेवणही नीट मिळत नव्हतं; 12 वीत नापास झालेला तरुण जिद्दीने बनला IAS अधिकारी

Career Success Story of IAS Narayan Konwar

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्‍ही तुम्‍हाला 12वी नापास (Career Success Story) झालेल्या तरुणाबद्दल सांगणार आहोत, जो बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला तरीही UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IAS अधिकारी बनला आहे. आम्ही बोलत आहोत IAS अधिकारी नारायण कोंवर यांच्या विषयी. ज्यांची कहाणी जिद्द आणि मेहनतीचे उदाहरण घेवून समोर आली आहे.

दोन वेळचं जेवणही नीट मिळत नव्हतं
नारायण कोंवर यांचा जन्म आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील फारसे पैसे कमावत नव्हते, पण ते व्यवसायाने शिक्षक होते.आर्थिक आव्हानांमुळे कोंवर यांना अभ्यास करणे खूप अवघड होते. नारायण यांचं जीवन अत्यंत हलाखीत गेलं. त्यांच्या कुटुंबाला गरिबीने ग्रासलं होतं. त्यांना दोन वेळचं जेवणही नीट मिळत नव्हतं. नारायण कोंवर यांनी करिअर घडवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना केला आहे.
नारायण यांनी लहान वयातच वडिलांना गमावलं ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या आईला खूप संघर्ष करावा लागला. नारायण यांची आई रोजंदारीवर काम करु लागली आणि भाजीपालाही विकू लागली. नारायणही आईला भाजी विकण्यात मदत करत असे.

जिद्द, चिकाटी आणि त्यागाची कहाणी (Career Success Story)
कोंवर सांगतात; “मी ज्या ठिकाणचा आहे ते उल्फाच्या तळांपैकी एक होते. आम्ही दररोज उल्फा सदस्यांना शस्त्रांसह पाहिले आहे. मी देखील या गटात सामील होण्याचा अनेकदा विचार केला. खरं तर, माझा एक वर्गमित्रही उल्फामध्ये सामील झाला होता.”
लहानपणी ULFA सदस्यांना गावात पाहण्यापासून ते आसाम सचिवालयात सचिव-स्तरीय अधिकारी होण्यापर्यंतची नारायण यांची कहाणी चिकाटी, त्याग आणि सर्व अडचणींना न जुमानता शिक्षणासाठी पुढे जाण्याची प्रेरणा देणारी आहे.

संपूर्ण भारतातून 119 वा क्रमांक
नारायण यांनी कसेबसे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपली पदव्युत्तर पदवी विशिष्टतेसह प्राप्त केली आणि शेवटी 2010 मध्ये यूपीएससी (UPSC) देण्यासाठी परीक्षेचा फॉर्म भरला. या परीक्षेचा त्यांनी कसून अभ्यास केला. त्यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि या परीक्षेत त्यांनी (Career Success Story) संपूर्ण भारतातून 119 वा क्रमांक मिळवला.
नारायण कोंवर यांचा हा त्यांच्यातील निर्धाराचा पुरावा आहे. जिथे गरिबी स्वप्नांच्या मार्गात येते अशा परिस्थितीत नारायण कोंवर यांचा प्रशासकीय अधिकारी बनण्याचा प्रवास एक उल्लेखनीय कथा म्हणून उदयास आला आहे. त्यांची कथा आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी कहाणी बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : शिक्षक, लिपिक ते एअर फोर्स…. विविध पदांवर सरकारी भरती; यादी पाहून करा अर्ज

Government Job (47)

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार सरकारी नोकरी (Government Job) मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.  उमेदवार येथे दिलेल्या या आठवड्यातील सर्वोच्च सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेची तयारी करून सरकारी नोकरी मिळवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होवू शकते. शासनाच्या विविध विभागात भरती निघाली आहे. त्याविषयी आम्ही येथे माहिती देत आहोत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार वेळेत अर्ज करायचा आहे.

1. IAF अग्निवीर वायु भर्ती 2024
भारतीय हवाई दल (Indian Air Force) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर हवाई निवड चाचणीसाठी ३,५०० अविवाहित भारतीय पुरुष आणि महिलांची भरती करत आहे. यासाठी 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. यासाठी उमेदवारांना तीन-स्तरीय निवड प्रक्रियेतून जावे लागेल, ज्यामध्ये संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि तिसरा टप्पा, ज्यामध्ये दोन कंडिशनिंग चाचण्या आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.

2. यूपी पोलिस अंतर्गत उपनिरीक्षक पदांसाठी भरती
उत्तर प्रदेश पोलीस भर्ती आणि पदोन्नती मंडळ (UPPRPB) सध्या उपनिरीक्षक (SI) पदासाठी अर्ज मागवत आहे. उमेदवार 28 जानेवारी 2024 पर्यंत uppbpb.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे, UPPRPB विभागातील एकूण 921 उपनिरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षक पदे भरली जाणार आहेत. निवडीसाठी उमेदवारांची 400 गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल.

3. SSB ओडिशा शिक्षक भरती (Government Job)
स्टेट सिलेक्शन बोर्ड (SSB), ओडिशा, विभागातील TGT-Arts, TGT-CBZ, TGT-PCM, संस्कृत, हिंदी, उर्दू शिक्षक अशा विविध पदाच्या 2,064 शिक्षक पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. पीईटी नोंदणी विंडो ७ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असेल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 21 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे. SC, ST, SEBC, महिला आणि माजी सैनिक यांसारख्या विशिष्ट गटांसाठी 5 वर्षांपर्यंतच्या उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

4. GSSSB लिपिक भरती-2024
गुजरात सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (GSSSB) ने कनिष्ठ लिपिक, जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, कार्यालय सहाय्यक, मुद्रांक निरीक्षक आणि विभागातील इतर पदांवर भरती जाहीर केली आहे.पत्रतेचे निकष पूर्ण करणारे उमेदवार gsssb.gujarat.gov.in द्वारे ३१ जानेवारी २०२४ पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये, तर SC, ST, PWD श्रेणी आणि महिला उमेदवारांना 400 रुपये भरावे लागतील.

5. BPSC अंतर्गत 1,051 ब्लॉक कृषी अधिकारी पदांवर भरती
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ब्लॉक कृषी अधिकारी (Government Job) आणि इतर पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामध्ये 15 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. उमेदवार bpsc.bih.nic.in द्वारे भरतीसाठी अर्ज करु शकतात. यामाध्यमातून विविध पदांच्या 1,051 पदे भरण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे. 400 गुणांच्या लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत थेट द्या मुलाखत; पहा कोणाला मिळू शकते नोकरी?

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.  या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी 11 वाजता अयोजित केल्या आहेत.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
पद संख्या – 65 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८
मुलाखतीची तारीख – आठवडयातील दर बुधवारी

भरतीचा तपशील – (PCMC Recruitment 2024)

पद पद संख्या 
फिजिशियन 09
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 09
बालरोग तज्ञ 09
नेत्ररोग तज्ञ 09
त्वचारोग तज्ञ 09
मानसोपचार तज्ञ 10
ईएनटी तज्ञ 10

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
फिजिशियन MD Medicine / DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोग तज्ञ MD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ MS Ophthalmologist /DOMS
त्वचारोग तज्ञ MD (Skin/VD), DVD,DNB
मानसोपचार तज्ञ MD Psychiatry/DPM /DNB
ईएनटी तज्ञ MS ENT/DORL/DNB

 

असा करा अर्ज –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. इच्छुक आणि पात्र (PCMC Recruitment 2024) उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
4. मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी ११.०० वाजता होणार आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ‘ही’ पदे रिक्त; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; मिळेल 1,42,400 रुपये पगार 

IB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक मोठी (IB Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत लेखाधिकारी, लेखापाल पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – इंटेलिजन्स ब्युरो
भरले जाणारे पद – लेखाधिकारी, लेखापाल
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021

भरतीचा तपशील – (IB Recruitment 2024)

पद पद संख्या 
लेखाधिकारी 02 पदे
लेखापाल 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
लेखाधिकारी
  • A pass in Subordinate Accounts Service or Section Officers Grade or Junior Accounts Officer Grade examination conducted by the Central Government. OR
  • Training in Cash and Accounts work in the Institute of Secretariat Training and Management and experience in cash, accounts and budget work
लेखापाल
  • A pass in Subordinate Accounts Service or equivalent examination conducted by the organized Accounts department of the Central Government.
  • Training in Cash and Accounts work in the Institute of Secretariat Training and Management and three years’ experience in cash, accounts and budget work.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
लेखाधिकारी Rs. 44,900-1,42,400 as per 7th CPC
लेखापाल Rs. 35,400-1,12,400 as per 7th CPC

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये संपूर्ण (IB Recruitment 2024) माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com