Home Blog Page 166

UPSC Success Story : UPSC Success Story : 12वीत मिळाले जेमतेम मार्क; सलग 3 वेळा दिली UPSC आणि बनले IPS अधिकारी

UPSC Success Story of Umesh Khandabahale

करिअरनामा ऑनलाईन | बारावीत नापास होऊनही कठोर (UPSC Success Story) परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवून आयपीएस पद मिळवणाऱ्या एका अधिकाऱ्याची कहाणी आज आपण वाचणार आहोत. आयुष्यात संघर्ष करायला सज्ज राहण्यासाठी ही कहाणी निश्चितच तुम्हाला प्रेरणा देईल. उमेश गणपत खंडाबहाले यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेत 704 वा क्रमांक मिळविला होता. विशेष म्हणजे ते 12वीत नापास झाले होते; तरीही हार न मानता त्यांनी धडपड केली आणि आपलं ध्येय साध्य केलं आहे.

अधिकारी होण्याचं स्वप्न होतं
उमेश हे महाराष्ट्रातील नाशिकच्या महिरावणी (UPSC Success Story) गावचे रहिवासी आहेत. 2003 मध्ये ते 12वीत नापास झाले होते तेव्हा त्यांना इंग्रजीत केवळ 21 गुण मिळाले. त्यांच्या कुटुंबाला शेतीची पार्श्वभूमी आहे. उमेश यांचा जन्म एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेती करायचे. तसेच त्यांचा डेअरी व्यवसायही होता. उमेश देखील त्यांच्या वडिलांना शेती आणि डेअरी व्यवसायात मदत करायचे. यासोबत त्यांचं शिक्षणही सुरु होतं. कारण उमेश यांना शिक्षण घेवून मोठा अधिकारी व्हायचं ध्येय होतं.

इंग्रजीत नापास तरी इंग्रजी साहित्यात केलं एम.ए. 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रस्त्यावरून उमेश दररोज दूध विक्रीसाठी जात असत. एके दिवशी त्यांच्या मनात काय आले आणि त्यांनी विद्यापीठासमोर थांबून चौकशी सुरू केली. सर्व माहिती घेऊन त्यांनी पुन्हा बारावीची परीक्षा दिली. बारावीनंतर त्यांनी B. Sc. हॉर्टिकल्चरमध्ये प्रवेश घेतला. ज्या विषयात ते बारावीत नापास झाले होते त्यालाच त्यांनी आपले बलस्थान बनवले. त्यांनी केटीएचएम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात एम. ए. केले. ही त्यांची कामगिरी अधोरेखीत करण्यासारखी आहे.

सलग तीनवेळा दिली UPSC
अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेश यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला.  2012 मध्ये त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेचा पहिला (UPSC Success Story) प्रयत्न पार केला. सलग 2 वेळा त्यांना अपयश आले; पण त्यांनी जिद्द सोडली नाही. 2015 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता. यावेळी ते पास झाले आणि त्यांनी संपूर्ण भारतातून AIR 704 ही रॅंक मिळवली; आणि ते IPS अधिकारी झाले.

IPS होणारा गावातील पहिला तरुण (UPSC Success Story)
उमेश हे त्यांच्या गावातील पहिली व्यक्ती आहेत जे केंद्रीय लोकसेवा आयोगच्या माध्यमातून आयपीएस (IPS) अधिकारी झाले आहेत. त्यांच्या कामगिरीने निश्चितच गावच्या नावलौकिकात भर पडली आहे. ते असे मानतात की आयुष्यात अपयश आल्यानंतर स्वतःला रीस्टार्ट करणे महत्वाचे आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा संधी दिली तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. आयपीएस उमेश यांचा हा मंत्र तरुण उमेदवारांना निश्चितच प्रेरणा देईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : सहायक प्राध्यापकांची भरती; कोल्हापूरच्या ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन | RCSM कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

संस्था – RCSM कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, कोल्हापूर
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 02 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन, आरसीएसएम कृषी महाविद्यालय, कोल्हापूर-416004
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Ph.D.in Genetics & Plant Breeding / Plant Physiology / Seed Technology
मिळणारे वेतन – Rs.45,000/- दरमहा
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. आवश्यक कागदपत्रासह भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ackolhapur.edu.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Recruitment 2024 : 10वी पास खेळाडूंसाठी नोकरीची विशेष संधी!! CRPF ने जाहीर केली नवीन भरती

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment 2024) अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 169 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे 10 वी पास तरुण तसेच खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पद संख्या – 169 पदे (CRPF Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
मिळणारे वेतन –  Rs. 21,700 ते 69,100/- दरमहा
असा करा अर्ज – (CRPF Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RITES Recruitment 2024 : ग्रॅज्युएट असाल तर इथे मिळेल नोकरीची संधी; 1,40,000 पर्यंत मिळेल पगार 

RITES Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | RITES लिमिटेड अंतर्गत (RITES Recruitment 2024) सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.

संस्था – RITES लिमिटेड
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2024
वय मर्यादा – 32 वर्षे
अर्ज फी – (RITES Recruitment 2024)
1. General/OBC Candidates – Rs. 600/- plus Taxes as applicable
2. EWS/ SC/ST/ PWD Candidates – Rs. 300/- plus Taxes as applicable
मिळणारे वेतन – Rs. 40,000 ते 1,40,000 दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या (RITES Recruitment 2024) लिंकवरुन थेट अर्ज करु शकतात.
3. इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rites.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC : दीक्षांत समारंभात भारतीय पोषाख घालण्याचं युजीसीनं काढलं फर्मान; आता काळा गाऊन होणार कालबाह्य

UGC (2)

करिअरनामा ऑनलाईन | दीक्षांत समारंभ म्हटलं की (UGC) आपल्या डोळ्यासमोर येतात अंगात सिंथेटिकचे चमकदार गाऊन आणि डोक्यावर हॅट घातलेले विद्यार्थी. पण आता हे चित्र पालटणार आहे. विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभात परिधान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना  विशिष्ट पद्धतीचा ड्रेसकोड ठरवून दिला आहे. त्यानुसार दीक्षांत समारंभात आता विद्यार्थ्यांनी हातमागापासून तयार केलेले भारतीय कपडेच परिधान करावेत, असे निर्देश UGC ने दिले आहेत.

‘…विद्यार्थ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल’ (UGC)
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठे आणि राज्यांच्या कुलगुरूंना पत्र पाठवले आहे. यामध्ये म्हटले आहे; “सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना विनंती आहे की, दीक्षांत समारंभाच्या ड्रेस कोडमध्ये भारतीय हातमाग किंवा हातमागाचा पोशाख समाविष्ट करावा. हातमागाचे कपडे प्रत्येक हंगामात आरामदायक असतात;असे कपडे परिधान केल्याने विद्यार्थ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. याशिवाय ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत.” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आपल्या राज्यांच्या पोशाखांना प्रोत्साहन देण्याच्या आणि दीक्षांत समारंभात त्यांचा समावेश करण्याच्या सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आयआयटी, एनआयटीसह (UGC) अनेक विद्यापीठांनी त्यांच्या राज्यातील पारंपारीक पोशाख परिधान करून पदवी प्रदान करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. याआधी २०१७-२०१८ मध्ये, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शैक्षणिक संस्थांना पारंपारिक काळ्या कोट ऐवजी भारतीय पोशाख परिधान करण्याचे निर्देश दिले होते. या मध्ये पुरुष कुर्ता-पायजमा किंवा धोतर घालू शकतात आणि महिला सूट-सलवार किंवा साडी घालू शकतात, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत झाला ‘हा’ मोठा बदल; होणार मेकर आणि चेकरचा समावेश

SSC HSC Exam (6)

करिअरनामा ऑनलाईन | राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी, 12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंड परीक्षा आणि अंतर्गच मूल्यमापनाचे गुण ओएमआर (OMR) गुणपत्रिकेत पाठवले जात होते. मात्र याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत.

मेकर आणि चेकरचा समावेश
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातच राज्य मंडळांनी ऑनलाईन गुण भरण्याबाबतची कार्यपद्धती दिली आहे. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मू्ल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. यामध्ये मेकर आणि चेकरचा समावेश केला असून शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहेत.

ऑनलाईन प्रणालीविषयी
बोर्डाच्या या संकेतस्थळावरुन www.mahahsscboard.in विद्यार्थ्यांचे गुण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत. त्यासाठी मुख्य लॉगिन आयडीवरुन शाळा, महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल आणि नियुक्त केलेल्या प्रतिनिधीचा मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. यासाठी शाळेमधून एक किंवा (SSC HSC Exam) अधिक वापरकर्ते तयार करणे आवश्यक आहे. यानंतर, संबंधित वापरकर्त्याला विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करणार आहेत. ऑनलाइन प्रवेश केल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य चेकरची भूमिका पार पाडणार आहेत.

‘आउट ऑफ टर्न’ परीक्षा
प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊ न शकलेल्या विद्यार्थांसाठी ‘आउट ऑफ टर्न’ परीक्षा लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळवलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणार आहे. नियमित कालावधीत गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे मीटिंग नंबर संबंधित कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांना ‘आउट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी प्रदान केले जातील. या विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता ऑनलाइन पद्धतीने नोंदवावी लागेल.

कामाचा ताण कमी होणार (SSC HSC Exam)
ऑनलाईन प्रणालीमुळे अंतर्गत गुणांचे शालेय स्तरावर दर्जेदार काम अद्ययावत होणार आहे. यामुळे मंडळावरील कामाचा ताण कमी होईल आणि त्यातून निकाल लवकर लावणे शक्य होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व काही तपासणार असल्याने चुकांची शक्यता नसणार आहे. काळाप्रणाणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बदल करत राहणार आहेत. या अतिरिक्त प्रणालीमुळे वेळेची बचत देखील होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NTPC Recruitment 2024 : NTPC अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; 2 लाखापर्यंत मिळणार पगार

NTPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून GDMO/वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली सन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – GDMO/वैद्यकीय विशेषज्ञ
पद संख्या – 61 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2024
वय मर्यादा – 37 वर्षे

भरतीचा तपशील – (NTPC Recruitment 2024)

पद पद संख्या 
GDMO 20 पदे
वैद्यकीय विशेषज्ञ 41 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
GDMO MBBS
वैद्यकीय विशेषज्ञ MD/DNB

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
GDMO E2 grade/(Rs. 50,000-1,60,000)
वैद्यकीय विशेषज्ञ E4 grade/(Rs. 70,000-2,00,000) & E3 grade/(Rs. 60,000- 1,80,000).

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी (NTPC Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
5. आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : इंजिनिअरिंग नंतर दिली UPSC; IPS वडिलांची मुलगी जिद्दीने बनली IAS

Career Success Story of IAS Anupama Anjali

करिअरनामा ऑनलाईन | UPSC परीक्षा देताना काहीजण (Career Success Story) पहिल्याच प्रयत्नात पास होतात तर काहींना अनेक प्रयत्न करावे लागतात. काही उमेदवार बारावीनंतर लगेच तयारीला सुरुवात करतात तर काही ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर या परीक्षेसाठी धडपड सुरु करतात. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारावर खूप दबाव असतो. शिवाय, जेव्हा यूपीएससी परीक्षेचा प्रश्न येतो तेव्हा हा दबाव दुप्पट होतो. असाच काहीसा प्रकार आयएएस अधिकारी अनुपमा अंजलीच्या बाबतीत घडला. त्यांचे वडील आयपीएस (IPS) अधिकारी आहेत; यामुळे नागरी सेवा उत्तीर्ण होण्यासाठी ती स्वतःवर दबाव आणत होती.

पहिल्या प्रयत्नात अपयश 
2018 बॅचच्या IAS अधिकारी अनुपमा अंजलीने (Career Success Story) अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. अनुपमा अंजली या दिल्लीच्या रहिवासी आहेत. येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरु केली. अनुपमा यांनी सलग दोनवेळा यूपीएससी (UPSC) ची परीक्षा दिली होती.  त्यांना पहिल्याच प्रयत्नात अपयश आले होते. पण हार न मानता दुप्पट मेहनत घेऊन त्यांनी दुसऱ्या प्रयत्नाची तयारी केली.

वडिलांनी अभ्यासात मदत केली (Career Success Story)
अनुपमा अंजली यांचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना सरकारी नोकरीत ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनुपमा यांचे आजोबाही सरकारी कर्मचारी होते. नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, अनुपमा यांनी प्रथम UPSC अभ्यासक्रम समजून घेतला आणि नंतर आवश्यक पुस्तकांची संपूर्ण यादी तयार केली. UPSC परीक्षेची तयारी करताना त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप मदत केली.

अनुपमा अंजली 2017 च्या UPSC परीक्षेत 386 वा क्रमांक घेत IAS अधिकारी बनल्या. यानंतर LBSNAA मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना आंध्र प्रदेश केडर देण्यात आले. त्यांची पहिली पोस्टिंग आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात जॉइंट कलेक्टर म्हणून झाली होती. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांची केडर बदलली.

उत्तर आणि दक्षिण भारतीय रिती रिवाजानुसार केले लग्न
अनुपमा अंजली यांनी 2020 बॅचचे आयएएस अधिकारी हर्षित कुमार यांच्याशी लग्न केले. IAS हर्षित आणि अनुपमा यांनी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार (Career Success Story) लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले गेले. हर्षित हा हरियाणा केडरचा आहे आणि त्यामुळे लग्नानंतर अनुपमालाही हरियाणा के रमध्ये नियुक्ती मिळाली. सध्या ते भिवानी येथे एडीसी पदावर कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Prisha Chakraborty : कोण आहे प्रीशा चक्रवर्ती? जिने झळकवले जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत नांव

Prisha Chakraborty

करिअरनामा ऑनलाईन | प्रीशा चक्रवर्ती या विद्यार्थिनीने 16 हजार (Prisha Chakraborty) विद्यार्थ्यांच्या अभियोग्यता चाचणीत भाग घेतल्यानंतर ‘जगातील सर्वात हुशार’ विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 2023 च्या उन्हाळ्यात दिलेल्या परीक्षेत प्रीशा यशस्वी झाली आणि जवळपास 90 देशांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून तिचे नाव जगातील सर्वात हुशार तरुण मनाच्या यादीत नोंदवले गेले आहे.

प्रीशा ही फ्रॅमोंट, कॅलिफोर्निया येथील वॉर्म स्प्रिंग एलिमेंटरी स्कूलमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिकत आहे. तिने गेल्या वर्षी अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ (JH-CTY) या सर्वात कठीण परीक्षेत भाग घेतला. या परिक्षेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली. CTY मुल्यांकनाचा भाग म्हणून तिला स्कॉलॅस्टिक असेसमेंट टेस्ट (SAT), अमेरिकन कॉलेज टेस्टिंग (ACT), आणि शाळा आणि महाविद्यालयीन क्षमता चाचण्यांवरील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले गेले.
प्रीशाने CTY च्या शाब्दिक आणि परिमाणात्मक विभागात 99 टक्के गुणांसह उत्कृष्ट कामगिरी केली, जे प्रगत ग्रेड 5 स्तरावर आधारित होते. यासाठी तिला ग्रॅंड ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रीशा मेन्सा फाउंडेशनची आजीवन सदस्य देखील आहे, जे जगातील सर्वात जुनी उच्च-आयक्यू सोसायटी आहे. फाऊंडेशनचे सदस्यत्व फक्त त्यांच्यासाठी खुले (Prisha Chakraborty) आहे जे प्रमाणित, पर्यवेक्षित IQ किंवा इतर मान्यताप्राप्त बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 98 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवतात.
तिने वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील NNAT (Naglieri Nonverbal Aability Test) मध्ये 99 टक्के गुण मिळवून हे यश संपादन केले, जे प्रतिभावान कार्यक्रमांसाठी K-12 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करते. प्रीशाला अभ्यासाव्यतिरिक्त प्रवास आणि गिर्यारोहणाची आवड आहे आणि तिला मार्शल आर्ट्सची देखील आवड आहे.

अशी झाली CTY ची स्थापना (Prisha Chakraborty)
1979 मध्ये प्रगत शिक्षणासाठी चाचणी, प्रोग्रामिंग आणि इतर समर्थनावरील परिणामांद्वारे प्रतिभाशाली शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी एक नवोपक्रम केंद्र म्हणून करण्यात आली आहे. तिचे कार्यकारी संचालक, एमी शेल्टन यांच्या मते, परीक्षेचे निकाल हे केवळ विद्यार्थ्याच्या शैक्षणिक क्षमतेची ओळख देत नाहीत, तर ते त्यांच्या कुतूहल आणि शिकण्याच्या क्षमतेचा पुरावा देखील आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti : तलाठी भरती प्रक्रियेत वाद… विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव

Talathi Bharti (5)

करिअरनामा ऑनलाईन । या ना त्या कारणामुळे (Talathi Bharti) तलाठी भरती परीक्षा नेहमीच वादात सापडली आहे. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्‍नपत्रिकेमधील गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत होती. भरतीच्या निकालानंतर सामान्यीकरणाच्या (नॉर्मलायजेशन) नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे. सामान्यीकरण ही प्रक्रियाच चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे.

सामान्यीकरणाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
राज्यातील विविध संवर्गातील परीक्षा ‘टीसीएस’ या संस्थेमार्फत घेतली जात आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर) विभागांतर्गत परिचारिका पदासाठी (Talathi Bharti) घेतलेल्या परीक्षेची मूळ गुणवत्तेनुसार यादी जाहीर न करता विद्यार्थ्यांना सामान्यीकरणाच्या नावाखाली ३० ते ३५ अधिकेच गुण दिले.
त्यामुळे कमी गुण असलेले विद्यार्थी हे अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे निघून गेले. या विरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.

भरती प्रक्रियेची सद्यस्थिती (Talathi Bharti)
राज्यभरात ही परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी झाली होती. छाननीनंतर चार हजार ४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ अर्ज आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर अशी ही परीक्षा घेतली होती.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यापैकी हिंगोली येथे परीक्षेचे केंद्र नव्हते, तर नांदेडला परीक्षाच झाली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या १५४ जागांसाठी १६ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. जालना येथील १२२ जागांसाठी १७ हजार ८८६ उमेदवारांनी, परभणी येथे ९५ जागांसाठी २१ हजार ४३३ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. बीड येथे १९० जागांसाठी ४८ हजार उमेदवारांनी तर लातूर येथील ५९ जागांसाठी ८०३७ उमेदवार परीक्षेला बसले होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com