Home Blog Page 165

Railway Loco Pilot Recruitment 2024 : रेल्वेची लोको पायलट पदावर जम्बो भरती!! 10वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वे विभागाने 10 वी (Railway Loco Pilot Recruitment 2024) पास तरुण-तरुणींना आनंदाची बातमी दिली आहे. असिस्टंट लोको पायलट पदांच्या तब्बल 5696 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय रेल्वे
भरले जाणारे पद – असिस्टंट लोको पायलट
पद संख्या – 5696 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2024

वय मर्यादा – 18ते 30 वर्षे
परीक्षा फी –
1. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
2. SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना 250/- रुपये अर्ज शुल्क
मिळणारे वेतन – 19,900/- ते 63, 200/- रुपये दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Matriculation / SSLC plus ITI (१० वी / ITI)
अशी होणार निवड –
1. कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -1 (CBT)
2. कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -2 (CBT)
3. कम्प्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट (CBAT)
4. डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
5. मेडिकल टेस्ट

विभागनिहाय रिक्त जागा –
अहमदाबाद – 238
अजमेर – 228
बेंगळुरू – 473
भोपाळ – 284
भुवनेश्वर – 280
बिलासपूर- 1316
चंदीगड – 66
चेन्नई – 148 (Railway Loco Pilot Recruitment 2024)
गोरखपूर – 43
गुवाहाटी- 62
जम्मू श्रीनगर – 39
कोलकाता – 345
मालदा – 217
मुंबई – 547
मुझफ्फरपूर – 38
पाटणा – 38
प्रयागराज – 652
रांची – 153
सिकंदराबाद – 758
सिलीगुडी – 67
तिरुवनंतपुरम – 70

असा करा अर्ज – (Railway Loco Pilot Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज खालील दिलेल्या लिंक वरुन सादर करायचे आहेत.
4. अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करने अनिवार्य आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Result 2022 : एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोण ठरलं अव्वल??

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Result 2022) राज्य सेवा मुख्य परीक्षा-2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता  यादी जाहीर केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीनुसार विनायक नंदकुमार पाटील हा विद्यार्थी राज्यातून पहिला आला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 चा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केला आहे.

623 उमेदवार शिफारसपात्र
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर 30 नोव्हेंबर 2023 ते 18 जानेवारी, 2024 दरम्यान पार पडल्या. यानंतर अवघ्या काही तासातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदांकरीता 623 उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील.

विनायक पाटील, पूजा वंजारी यांनी मारली बाजी (MPSC Result 2022)
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने 18 जानेवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या सामान्य गुणवत्ता यादीनुसार राज्यात विनायक नंदकुमार पाटील हा पहिल्या स्थानी असून, धनंजय वसंत बांगर हा दुसऱ्या स्थानी तर सौरभ केशवराव गावंडे ह्याने तिसरे स्थान पटकावले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत मुलींमध्ये पूजा अरुण वंजारी या विद्यार्थिनीने पहिले स्थान पटकावले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या यादीत एकूण 1830 विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत जाहीर करण्यात आली आहेत.

आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली गुणवत्ता यादी ही (MPSC Result 2022) तात्पुरत्या स्वरूपाची असून, अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. निकालापूर्वी प्रमाणपत्र पडताळणी झाल्यानंतर काही उमेदवारांच्या गुणवत्ता यादीत बदल होऊ शकतो. जे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत त्यांनी आवडत्या पदासाठी पसंती जाहीर करायची आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 22 जानेवारी 2024 पासून ते 29 जानेवारी 2024 पर्यंत आयोगाच्या वेबसाईटवर आवेदन करता येईल. आयोगातर्फे घेण्यात आलेली ही परीक्षा केवळ 23 विविध पदांसाठी घेण्यात आली होती.
पसंती जाहीर करण्यात विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास आयोगाने जाहीर केलेल्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या फोन क्रमांकावर किंवा आयोगाच्या संकेतस्थळावर [email protected] संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Exam 2024 : मोठी बातमी!! 12 वीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट

HSC Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट सोमवार दि. 22 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे; अशी माहिती मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत हे प्रवेशपत्र मिळणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

हॉल तिकीटची प्रिंट मिळणार
फेब्रुवारी-मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून (HSC Exam 2024) विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी सूचना राज्य मंडळाने केली आहे. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी; अशा स्पष्ट सूचना मंडळाने दिल्या आहेत.

हॉल तिकीट गहाळ झाल्यास पुन्हा मिळणार (HSC Exam 2024)
प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे; अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी ताबडतोब करा अर्ज; पहा कोणाला मिळणार याचा लाभ?

Education (14)

करिअरनामा ऑनलाईन । साधना साप्ताहिकाच्यावतीने तांबे-रायमाने (Education) युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ असून विविध विषयावरील संशोधनासाठी ही अभ्यासवृत्ती देण्यात येणार आहे.

कोणाला, कशासाठी आणि किती रकमेची मिळणार अभ्यासवृत्ती ?
२९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी ज्यांचे वय ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे ते तरुण या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. एकूण पाच तरुण-तरुणींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची (Education) अभ्यासवृत्ती दिली जाणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांत एका विशिष्ट विषयावर अभ्यास करून तो अभ्यास लिखित वा ऑडिओ, व्हिडिओ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.

अभ्यासवृत्तीतून झालेले अभ्यास कुठे प्रसिद्ध होणार?
लिखित स्वरूपात असेल तर ५ ते १० हजार शब्दांचा मजकूर आणि दृकश्राव्य असेल तर अर्धा एक तासाच्या कालावधीचे ऑडिओ/ व्हिडिओ, या अभ्यासवृत्तीतून सादर करणे अपेक्षित आहे. हे सर्व अभ्यास त्या-त्या विषयांचे स्वरूप लक्षात घेऊन साधना साप्ताहिकात किंवा कर्तव्य साधना डिजिटल पोर्टलवरून प्रसिद्ध केले जातील.

कोणत्या विषयावरील संशोधनासाठी अभ्यासवृत्ती मिळणार?
शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्त्री-पुरुष विषमता, भटके-विमुक्त, आदिवासी, मुस्लिम समाज सुधारणा, सामाजिक चळवळी व आंदोलने, बदलते ग्रामीण वास्तव, रोजगार, शेती आणि शेतकरी, शासकीय योजनांची अंमलबजावणी इत्यादी विषयांतील कोणतेही एक लहान युनिट घेऊन अभ्यास व फिल्ड व्हिजीट यांवर आधारित रिपोर्ताज वा दीर्घ लेख तयार करणे अपेक्षित आहे. अर्थातच, हे लेखन व सादरीकरण उत्तम दर्जाचे असणे अपेक्षित आहे, कारण मोठ्या समूहाला ते उपलब्ध करून द्यायचे आहे.

अशी होणार अभ्यासवृत्तीची कार्यवाही (Education)
२९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आलेल्या अर्जांची छाननी करून त्यातील उत्तम असतील ते अर्ज त्यासोबतच्या टिपणांसह त्या-त्या विषयांच्या तज्ज्ञांकडे पाठवले जातील. गरज वाटल्यास अंतिम फेरीतील अर्जदारांच्या मुलाखती प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन घेतल्या जातील. अंतिम निवड झालेल्या पाच तरुण-तरुणींची नावे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जातील आणि अभ्यासवृत्तीचा पाहिला हप्ता दिला जाईल. त्यानंतर प्रत्येक महिन्यात झालेल्या अभ्यासाचा आढावा घेऊन पुढील हप्ता दिला जाईल. जानेवारी २०२५ मध्ये ते अभ्यास-संशोधन साधनात किंवा कर्तव्यवरून प्रसिद्ध होतील.

अभ्यासवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज व प्रस्ताव कसा पाठवायचा?
अर्जदाराने स्वतःचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता (इ-मेल व फोन नंबरसह), शिक्षण, जन्मतारीख, नोकरी/व्यवसाय करीत असल्यास कुठे व कधीपासून, यापूर्वी केलेले अभ्यास/संशोधन/लेखन हे सर्व (Education) तपशील एक ते दोन पानांत बसतील अशा पद्धतीने टाईप करून घ्यावेत. सोबत, कोणत्या एका लहान घटकावर, का व कसा अभ्यास करण्याची इच्छा आहे, हे सांगणारा पाचशे ते हजार शब्दांपर्यतचा प्रस्ताव जोडावा. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज आणि त्यासोबतचा प्रस्ताव मेलद्वारे वा पोस्टाने साधना साप्ताहिकाच्या कार्यालयीन पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठवण्यासाठी साप्ताहिकाच्या कार्यालयीन पत्ता –
संपादक, साधना साप्ताहिक, 431, शनिवार पेठ, पुणे 411030
अधिक माहितीसाठी संपर्क – 7028257757
अधिकृत वेबसाईट – https://weeklysadhana.in/
अर्ज पाठवण्यासाठी E-Mail ID – weeklysadhana@gmail
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : कोणत्या जीवाची हाडे सर्वात जास्त मजबूत असतात? भारतातील सर्वात महागडी ट्रेन कोणती?

GK Update 18 Jan.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1- कोणत्या जीवाची हाडे सर्वात मजबूत असतात?
उत्तर- वाघाची हाडे सर्वात मजबूत असतात. (GK Update)
प्रश्न 2- अशी कोणती गोष्ट आहे की कापल्यानंतर लोक आनंदी होतात
उत्तर- केक कापल्यानंतर लोक आनंदी होतात. केक कापणे हे आनंदाचे प्रतीक मानले जाते.
प्रश्न 3- अशी कोणती गोष्ट आहे जी जळत नाही आणि बुडत नाही?
उत्तर- बर्फ ही अशी वस्तू आहे जी आगीत जळत नाही आणि पाण्यात बुडत नाही.

प्रश्न 4- (GK Update) शिव आणि शंकर दोघे एकच आहेत का? की वेगवेगळे आहेत
उत्तर- शिव म्हणजेच शंकर आहे. असे मानले जाते की त्यांच्या जीवन आणि मृत्यूचा कोणताही उल्लेख नाही. शिव शंकर हे अमर्याद शक्तीचा देव समजले जातात.
प्रश्न 5- महिलांचा बुद्ध्यांक कमी असतो का?
उत्तर- सेफेलिक इंडेक्सनुसार महिलांचा बुद्ध्यांक कमी नसतो. महिलांचे वर्षानुवर्षे शोषण झाले त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ किंवा संधी दिली गेली नाही. महिलांचा बुद्ध्यांक कमी आहे असे म्हणणे योग्य नाही.
प्रश्न 6- भारतातील सर्वात महागडी ट्रेन कोणती आहे?
उत्तर- महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : चार्टर्ड अकौंटंट पदावर सरकारी नोकरीची संधी; अर्जासाठी त्वरा करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (Job Alert) हमी योजना, सिंधुदुर्ग अंतर्गत सनदी लेखापाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, सिंधुदुर्ग
भरले जाणारे पद – सनदी लेखापाल (Chartered Accountant)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – PDF पहा (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडा.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahaegs.maharashtra.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHAI Recruitment 2024 : सिव्हिल इंजिनियर्ससाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची उत्तम संधी!!

NHAI Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत (NHAI Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरले जाणारे पद – उपव्यवस्थापक (तांत्रिक)
पद संख्या – 60 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी

वय मर्यादा – (NHAI Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट (NHAI Recruitment 2024)
मिळणारे वेतन – दरमहा 15,600/- ते 39,100/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DBSKKV Recruitment 2024 : महिन्याचा 92,135 एवढा पगार; कोंकण कृषी विद्यापीठात ‘या’ पदावर होणार भरती

DBSKKV Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी (DBSKKV Recruitment 2024) विद्यापीठात भरती निघाली आहे. या माध्यमातून सहाय्यक बीजोत्पादन अधिकारी पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

संस्था – डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ
भरले जाणारे पद – सहाय्यक बीजोत्पादन अधिकारी
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (DBSKKV Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of Director of Research, Dr. B. S. Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात (Agril. Botany) पीएच.डी. सह राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) किंवा एम.एस्सी. (कृषी. वनस्पतिशास्त्र) सह राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET)

वय मर्यादा – (DBSKKV Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे
2. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 05 वर्षे सूट
मिळणारे वेतन – दरमहा 92,135/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – दापोली, जि. रत्नागिरी (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.dbskkv.org

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAR Recruitment 2024 : इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर किंवा डिप्लोमाधरक असणाऱ्यांसाठी विना परीक्षा थेट मुलाखत

ICAR Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन | सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन (ICAR Recruitment 2024) कॉटन टेक्नॉलॉजी अंतर्गत मुंबई येथे भरती निघाली आहे.  या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल-I पदांच्या 6 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 08 फेब्रुवारी 2024 यादिवशी होणार आहे.

संस्था – सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी
भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल-I
पद संख्या – 06 पदे (ICAR Recruitment 2024)
वय मर्यादा –
1. 21 वर्षे ते 45 वर्षे (http://www.circot.res.in/)
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर/डिप्लोमा धारक/ पदवी/ बी.टेक. पदवीधारक असावा.
मिळणारे वेतन – दरमहा 30,000/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 8 फेब्रुवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण – ICAR-CIRCOT, Adenwala Road, Mumbai – 400019.

काही महत्वाच्या लिंक्स – (ICAR Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.circot.res.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Employment

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच ४२ हजार ८२५ कोटींचे करार होणार आहेत. यामुळे राज्यात ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक होणार आहे; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीमुळे राज्यात २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे; त्यामुळे ही बातमी राज्यातील तरुणांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

दावोस परिषदेत ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या (Employment) गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. यामाध्यमातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. १८ जानेवारी रोजी ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच विविध उद्योगांनी १ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले आहे. यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

उद्योगांची माहिती, गुंतवणूक आणि रोजगार संख्या अशी आहे – (Employment)
1. आयनॉक्स एअर प्रोडक्ट – २५ हजार कोटी – ५ हजार रोजगार
2. बी. सी. जिंदाल -४१ हजार कोटी- ५ हजार रोजगार
3. जेएसडब्ल्यू स्टील -२५ हजार कोटी- १५ हजार रोजगार
4. एबी इन बेव्ह -६०० कोटी- १५० रोजगार
5. गोदरेज एग्रोव्हेट – १००० कोटी-६५० रोजगार
6. अमेरिका स्थित डेटा कंपनी – १० हजार कोटी – २०० रोजगार
7. अदानी ग्रुप – ५० हजार कोटी -५०० रोजगार
8. स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स – ११५८ कोटी – ५०० रोजगार
9. इंडियन ज्वेलरी पार्क – ५० हजार कोटी – १ लाख रोजगार
10. वेब वर्क्स – ५ह्जार कोटी – १०० रोजगार (Employment)
11. लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस, इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून – ३५०० कोटी – १५ हजार रोजगार)
12. नैसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी – २० हजार कोटी – ४ हजार रोजगार
13. सुरजागड इस्पात – १० हजार कोटी – ५ हजार रोजगार
14. कालिका स्टील – ९०० कोटी – ८०० रोजगार
15. मिलियन स्टील – २५० कोटी – ३०० रोजगार
16. ह्युंदाई मोटर्स – ७ हजार कोटी – ४ हजार रोजगार
17. कतारची एएलयु टेक समवेत – २०७५ कोटी-४०० रोजगार
18. सीटीआरएल एस – ८६०० कोटी – २५०० रोजगार
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com