Home Blog Page 160

New India Assurance Recruitment 2024 : न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीमध्ये 300 पदांवर निघाली भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

New India Assurance Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी (New India Assurance Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – सहाय्यक
पद संख्या – 300 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
मिळणारे वेतन – Rs.37,000/- दरमहा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (New India Assurance Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यकGraduate from a recognized University / Equivalent. Knowledge of Regional Language of the State / UT for which the candidate is applying is essential.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. येथे दिलेल्या लिंक वरुन उमेदवार अर्ज करु शकतात.
3. अर्ज करण्यापूर्वी (New India Assurance Recruitment 2024) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे. उशीरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaTransco Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! महापारेषण अंतर्गत 130 पदांवर भरती; 1,19,315 एवढा पगार

MahaTransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक अभियंता (संसर्ग) पदांच्या एकूण 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – सहाय्यक अभियंता (संसर्ग)
पद संख्या – 130 पदे (MahaTransco Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 57 वर्षे
परीक्षा फी – (MahaTransco Recruitment 2024)
1. 700/- रुपये
2. राखीव प्रवर्ग / EWS / अनाथ – 350/- रुपये
3. अपंग – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 49,210/- रुपये ते 1,19,315/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2024 : 10वी पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; BECIL मध्ये ‘या’ पदांवर नोकरीची संधी

BECIL Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर, MTS पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – डेटा एंट्री ऑपरेटर, MTS
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – (BECIL Recruitment 2024)
1. डेटा एंट्री ऑपरेटर – 35 वर्षे
2. MTS – 30 वर्षे
अर्ज फी –
1. General/OBC/Women- Rs.885/
2. SC/ST/EWS/PH – Rs.531/-

भरतीचा तपशील –

भरले जाणारे पदपद संख्या 
डेटा एंट्री ऑपरेटर15 पदे
MTS03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटरGraduation in any fieldGood knowledge of computerProficiency in MS ExcelMinimum typing speed (English) of 35 wpm
Experience:- Preference will be given to the experienced candidates
MTSMatriculation from a recognized Board/Institution. (BECIL Recruitment 2024)
Experience:- Preference will be given to the experienced candidates.

मिळणारे वेतन –

पदवेतन
डेटा एंट्री ऑपरेटरRs. 23,082/-
MTSRs. 17,494/-

असा करा अर्ज – (BECIL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

LIDCOM Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी मुंबईमध्ये नोकरीची संधी!! चर्मोद्योग महामंडळ अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

LIDCOM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार (LIDCOM Recruitment 2024) विकास महामंडळ लि. अंतर्गत लेखापाल सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि.
भरले जाणारे पद – लेखापाल सल्लागार (Accounting Consultant)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (LIDCOM Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 25 वर्षे ते 55 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – लेखापाल सल्लागार – C.A.
असा करा अर्ज – (LIDCOM Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडावी.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://lidcom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत विविध पदावर नोकरीची संधी; E-Mail द्वारे करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । यशवंत नागरी सहकारी बँक, लातूर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखाधिकारी, ट्रेनी लेखनिक, वसुली अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर, आय. टी. ऑफिसर पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

संस्था – यशवंत नागरी सहकारी बँक, लातूर
भरले जाणारे पद – शाखाधिकारी, ट्रेनी लेखनिक, वसुली अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर, आय. टी. ऑफिसर
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2024
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण –
लातूर
वय मर्यादा – २५ ते ४० वर्षे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
शाखाधिकारी01
ट्रेनी लेखनिक05
वसुली अधिकारी02
मार्केटिंग ऑफिसर02
आय. टी. ऑफिसर01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
ट्रेनी लेखनिकमान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, बी.सी.एस., बी.बी.ए., बी.सी.ए. इत्यादी पदवी परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक व एम.एस.सी. आय.टी. परीक्षा उत्तीर्ण
वसुली अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी / पदविका व संगणकाचे ज्ञान आवश्यक. (Job Alert)
मार्केटिंग ऑफिसरमान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी / पदविका व संगणकाचे ज्ञान आवश्यक.
आय. टी. ऑफिसरमान्यता प्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटरमधील बी.सी.एस./बी.ई./बी.टेक/एम.सी.एस./एम.सी.ए./एम. सी.एम./एम.बी.ए. (सिस्टीम स्पेशलायझेशन) पदवी.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची (Job Alert) शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
4. आजच अर्ज करा. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://yashwantbanklatur.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरोमध्ये तरुण व्यावसायिक पदावर भरती सुरु; दरमहा 70 हजार पगार

BIS Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची (BIS Recruitment 2024) आहे त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत तरुण व्यावसायिक पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय मानक ब्यूरो
भरले जाणारे पद – तरुण व्यावसायीक
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान / अभियांत्रिकी / बी.ई. / बी.टेक कोणत्याही शाखेतील नियमित पदवी घेतली असावी.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही (BIS Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 70,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (BIS Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : सर्वांशी भांडून आईने मुलीला शिकवलं; अनेक आव्हानं पेलत किर्ती झाली डेप्युटी जेलर

Success Story of Kirti Sagar Deputy Jailor

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेश लोकसेवा (Success Story) आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या PCS-2023 परीक्षेच्या निकालात शाहबादच्या किर्ती सागरनेही यश मिळविले आहे. किर्ती हीची डेप्युटी जेलर पदासाठी निवड झाली आहे. तिला या परिक्षेत 67 वे स्थान मिळाले आहे. किर्तीने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई गीता राणी यांना दिले आहे. कीर्तीच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

पतीच्या निधनानंतर मुलींची जबाबदारी आईच्या खांद्यावर (Success Story)
शाहबादच्या मोतीपुरा गावात राहणाऱ्या गीता राणी या शिक्षिका आहेत. त्यांचे पती सुभाष सिंह यांचे २००५ मध्ये निधन झाले. त्यानंतर कीर्ती आणि संजना या दोन मुलींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. वडिलांच्या निधनाच्या वेळी कीर्ती चौथ्या इयत्तेत शिकत होती. आईने आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. 2008 मध्ये त्यांची शिक्षामित्र पदासाठी निवड झाली. नंतर 2015 मध्ये गीता राणी सहाय्यक शिक्षिका झाल्या. त्यांनी आपल्या मुलींना नेहमी अभ्यासासाठीप्रोत्साहन दिले.

वडिलांच्या निधनानंतर आईने आत्मविश्वास तुटू दिला नाही
कीर्तीच्या वडिलांचे 2005 मध्ये आजारपणामुळे निधन झाले. वडील सुभाष सिंह यांच्या निधनानंतर आई गीता राणी यांनी कीर्तीची हिंमत खचू दिली नाही आणि आपल्या दोन्ही मुलींची (Success Story) जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. गीता राणी यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आहे. वडील अचानक सोडून गेले असले तरी त्यांनी आपल्या मुलींचा आत्मविश्वास तुटू दिला नाही.

उच्च शिक्षित कीर्ती अशी झाली डेप्युटी जेलर
कीर्ती सागर सांगते की, “मला खूप बरे वाटत आहे. माझी डेप्युटी जेलर (Deputy Jailor) पदासाठी निवड झाली आहे; यावर विश्वास बसत नाही.” कीर्ती सागरने शाहबाद शहरातील कमला इडन गार्डनमधून इयत्ता दहावी पास केली. त्यानंतर खरसोलच्या एस. के. कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. एवढयावच ती थांबली नाही. तिने आयएफटीएममधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक (B.Tech) केले. यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला. कीर्तीने दोनदा पीसीएसची (PCS) परीक्षा दिली होती. तिसऱ्या प्रयत्नात तिची डेप्युटी जेलर पदासाठी निवड झाली आणि तिचे ध्येय पूर्ण झाले.

“सर्वांशी भांडून आईने मला शिकवले”
कीर्तीने दहावीची परीक्षा पास केली. तिला पुढे शिकायचे होते. पण कुटुंबातील सदस्यांना हे मान्य नव्हते. कीर्तीचे संपूर्ण कुटुंब तिच्या शिक्षणाच्या विरोधात असताना तिच्या आईने (Success Story) सर्वांच्या विरोधात जाऊन सर्व आर्थिक अडचणींचा सामना करत आपल्या मुलीला शिक्षण दिले. कीर्ती तिच्या या यशाचे सर्व श्रेय तिच्या आईला देते. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने अनेक आव्हानांचा सामना केला. तिने मिळवलेल्या यशाने तीचे सहकारी आणि गावातील लोक खूप आनंदी आहेत. मित्र, शेजारी आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Board Exam 2024 : 10 वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट; 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा

SSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC Board Exam 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता 10वी बोर्डाच्या परिक्षेचे घेतली प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उद्या दि. 31 (बुधवार) पासून मिळणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार 10वीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांना पाठवली जातील.
बुधवारपासून, सर्व माध्यमिक शाळांना बोर्डाची अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ येथे ‘स्कूल लॉगिन’ विभागातून मार्च 2024 ची प्रवेशपत्रे डाउनलोड करता येतील. तांत्रिक समस्या उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा; असं आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी बोर्डाची परीक्षा दि. १ ते २६ मार्च 2024 दरम्यान होत आहे. तसेच, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत (SSC Board Exam 2024) मूल्यमापन परीक्षा दि. १० फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रवेश पत्राविषयी महत्वाचे….
सर्व विभागीय मंडळांमधील सर्व माध्यमिक शाळांना दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्रे छापणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ऑनलाइन छापताना त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये. मुख्याध्यापकानी शिक्का वापरून, संबंधित प्रवेशपत्राच्या प्रिंटआउटवर (SSC Board Exam 2024) स्वाक्षरी करावी; अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावरील विषय किंवा माध्यम बदलल्यास, विभागीय मंडळाशी संपर्क साधून आवश्यक सुधारणा करण्याची जबाबदारी माध्यमिक शाळांची आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या स्तरावरील माध्यमिक शाळांनी प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी, नाव, जन्मतारीख, जन्मतारीख यामध्ये आवश्यक ते बदल करावेत आणि पूर्ण झालेल्या कामाची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी.

फोटो सदोष असल्यास (SSC Board Exam 2024) त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून संबंधित प्राचार्याची स्वाक्षरी करावी लागेल. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र गहाळ झाल्यास, माध्यमिक शाळांनी ते पुनर्मुद्रण करून प्रवेशपत्राची विद्यार्थ्यांना दुसरी प्रत म्हणून लाल शाईने टिप्पण्या देऊन द्यायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti : शिवाजी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदावर भरती सुरु; मिळवा भरघोस पगार

Shikshak Bharti

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावती अंतर्गत (Shikshak Bharti) शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 216 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावती
भरले जाणारे पद – शिक्षक
पद संख्या – 216 पदे (Shikshak Bharti)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Post Graduation

मिळणारे वेतन –

पदवेतन
शिक्षकS-16: 44900- 142400High Sec (20000)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Shikshak Bharti)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssesa.org/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IT Job : IT इंजिनिअर्स रांगेत ताटकळत उभे; 100 जागांसाठी आले 3 हजार पेक्षा जास्त उमेदवार

IT Job

करिअरनामा ऑनलाईन । पुणे शहर IT क्षेत्राचे माहेरघर म्हणून ओळखले (IT Job) जाते. पुणे शहर आणि परिसरात अनेक दिग्गज आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. IT क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील एक गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलाखतीसाठी लागणारी भली मोठी रांग या व्हिडिओत दिसत आहे. ही रांग सरकारी नोकरीसाठी नाही तर खासगी नोकरीसाठी आहे. रांग लावलेले युवक फक्त पदवीधर नाहीत तर ते चक्क आयटी इंजिनिअर आहेत.

पुण्याजवळील हिंजवडी येथील एका नामांकित IT कंपनीमध्ये वॉक-इन इंटरव्यू घेण्यात आले. ज्युनिअर डेव्हलपर पदाच्या केवळ 100 जागा भरण्यासाठी या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यासाठी तब्बल 3 हजार अभियंते आपले नशीब आजमावण्यासाठी आले होते. यापैकी अनेक जण फ्रेशर्स होते. 2,900 पेक्षा जास्त बायोडाटा या मुलाखतीत जमा झाले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओची चर्चा (IT Job)
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यानंतर 100 पदांसाठी झालेली ही गर्दी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पुणे शहरात आयटी कंपन्यांची संख्या मोठी असताना इतके युवक मुलाखतीसाठी आले. यामुळे अनेक आयटी अभियंते रोजगाराच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.

अशा आहेत युजर्सच्या कॉमेंट
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक (IT Job) युजर्सकडून वेगवेगळ्या कॉमेंट व्यक्त करण्यात आल्या आहेत. एका युजर्सने म्हटले आहे की, एक कंपनी एनालॉग पद्धतीने अभियंत्याचे बॉयोडाटा जमा करत आहे, ही खेदाची बाब आहे. एकाने लिहिले, की “कोणी दिला होता इंजिनिअर होण्याचा सल्ला, त्याला शोधून काढा.” तर एकाने इंजिनियर्सना गावाकडे जाऊन शेती करण्याचा सल्ला दिला आहे. स्पर्धेच्या युगात सध्या नोकरी मिळवणे किती अवघड झाले आहे हे पुन्हा एकदा या व्हीडिओमुळे समोर आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com