Home Blog Page 158

How to Become a Supreme Court Law Clerk : सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर कशी मिळवाल सरकारी नोकरी?

How to Become a Supreme Court Law Clerk

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (How to Become a Supreme Court Law Clerk) कायदा लिपिकाच्या रिक्त पदांसाठी भरती होत असते. जर तुम्हालाही सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर सरकारी नोकरी मिळवायची असेल,तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लिपीक पदावर नोकरी मिळवण्यासाठी कोणते पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे याविषयी…
सर्वोच्च न्यायालयात काम करणे करिअरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जाते. सर्वोच्च न्यायालयात अनेक पदे असली तरी ‘विधी लिपिक’ हे पद सर्वोत्तम मानले जाते. सुप्रीम कोर्टात वेळोवेळी या पदासाठी रिक्त जागेच्या जाहिराती सोडल्या जातात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे, ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळू शकते.

कायदा लिपिक (Law Clerk) पदांसाठी आवश्यक पात्रता –
सर्वोच्च न्यायालयात कायदा लिपिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्यातील पदवी घेतली असणे आवश्यक आहे. या पदासाठी (How to Become a Supreme Court Law Clerk) अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार विहित वर्षांच्या संख्येनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाते.

अशी होते निवड (How to Become a Supreme Court Law Clerk)
सुप्रीम कोर्टात लॉ क्लर्क पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यातील प्रक्रियेतून जावे लागेल.
1. पहिल्या टप्यात उमेदवारांना कायदा आणि त्याची समज यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
2. जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी होतील त्यांना भाग २ च्या परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. विषयवार लेखी परीक्षा भाग २ मध्ये घेतली जाईल.
3. दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना शेवटी भाग 3 टप्प्यात (मुलाखत प्रक्रिया) सहभागी व्हावे लागेल.
सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल आणि त्यांना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : राज्यातील ‘या’ विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात मिळणार संपूर्ण फी माफी; मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Education (15)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुलींसाठी एक आनंदाची (Education) बातमी आहे. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार संबंधीत शैक्षणिक संस्थांना या खर्चाची परतफेड करणार आहे.

मंत्री चंद्रकात पाटील यांनी कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत या (Education) निर्णयाची घोषणा केली. सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात ५० टक्के शुल्क माफी होती. आता ही शुक्लमाफी १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिकण्याची तळमळ असणाऱ्या होतकरु विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे. त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कुलगुरुंच्या बैठकीला राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. यावेळी (Education) त्यांनी वेळेवर निकाला लावण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष चुकू नये किंवा नोकरीची संधी हातची जाऊ नये यासाठी वेळेवर निकाल लागणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Big Decision : एम. फिल करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; ‘या’ अभ्यासक्रमांसाठी नियम शिथील

UGC Big Decision

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्वाची (UGC Big Decision) बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी एम. फिलचे प्रवेश तातडीने थांबवण्याचे आदेश UGC ने दिले होते. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. UGC ने क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये एम. फिलची (M. Phil) वैधता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात UGC ने अधिकृत परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे आता इच्छुक विद्यार्थी क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये एम. फिल अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2025-26 पर्यंत प्रवेश घेऊ शकतात.

पूर्वीच्या नियमांमध्ये अंशत: शिथिलता देऊन, मानसिक आरोग्य सेवा प्रदान करण्यात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि मानसोपचार सामाजिक कार्यकर्त्यांनी (Clinical Psychology and Psychiatric Social Work) बजावलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, या दोन अभ्यासक्रमामध्ये आता एम.फिल. साठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

युजीसीने नोव्हेंबर २०२२ मध्ये पीएचडी पदवी देण्यासाठी किमान मानके आणि (UGC Big Decision) प्रवेश प्रक्रिया अधिनियम २०२२ प्रसिद्ध केले होते. या नियमावलीत नियम १४ नुसार उच्च शिक्षण संस्थांनी एम.फिल. अभ्यासक्रम न राबवण्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यानुसार एमफिलचे प्रवेश तातडीने थांबविण्याच्या सूचना यूजीसीने देशातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिल्या होत्या.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : महावितरण अंतर्गत शिकाऊ अभियंता पदांवर भरती सुरु; लगेच करा APPLY

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2024) लिमिटेड, लातूर अंतर्गत शिकाऊ अभियंता पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर
भरले जाणारे पद – शिकाऊ अभियंता
पद संख्या – 26 पदे (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
नोकरीचे ठिकाण – लातूर
वय मर्यादा – 16 ते 18 वर्षे

भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2024)

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ अभियंताDegree Holders: 13Diploma Holders :- 13

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ अभियंताFor Degree Holders:
Degree in Engineering / Technology in Electricals from Recognized University. (Year of Passing 2019 & thereafter)For Diploma Holders: (Mahavitaran Recruitment 2024)
Diploma in Engineering/ Technology in Electricals from Board of Education of Maharashtra State. (Year of Passing 2019 & thereafter)

मिळणारे वेतन –

पदवेतन
शिकाऊ अभियंताFor Degree Holders Rs.9000/-p.m.,
For Diploma Holders Rs. 8000/-p.m.


काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment Board : सर्वात मोठी बातमी!! रेल्वे भरती बोर्डाने जारी केली 9 हजार पदांवर भरतीची जाहिरात

Railway Recruitment Board

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या देशातील (Railway Recruitment Board) तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत तंत्रज्ञ पदांच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अधिसूचना फेब्रुवारीमध्ये प्रकाशित केली जाईल आणि ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल.

संस्था – रेल्वे भर्ती बोर्ड, मुंबई
भरले जाणारे पद – तंत्रज्ञ (Railway Recruitment Board)
पद संख्या – 9000 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल

कसा करायचा अर्ज – (Railway Recruitment Board)
1. या भारतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. या भरतीकरिता अधिसूचना फेब्रुवारीमध्ये प्रकाशित केली जाईल.
3. ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Arogya Vibhag Bharati 2024 : राज्याच्या आरोग्य विभागात 1,729 पदांवर मेगाभरती जाहीर!! ऑनलाईन करा अर्ज

Arogya Vibhag Bharati 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने (Arogya Vibhag Bharati 2024) मेगाभरती जाहीर केली आहे. या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

विभाग – सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी गट-अ
पद संख्या – 1729 पदे (Arogya Vibhag Bharati 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस
मिळणारे वेतन – रु. ५६, १००/- ते १,७७,५००/- रुपये दरमहा
असा करा अर्ज – (Arogya Vibhag Bharati 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Arogya Vibhag Bharati 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Educational Budget 2024 : देशात नवीन मेडिकल कॉलेज सुरु करणार; आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांना ‘आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार

Educational Budget 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन (Educational Budget 2024) यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. देशातील वैद्यकीय व्यवस्थेबाबत अर्थसंकल्पात म्हटले होते की, देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. यासाठी समिती स्थापन करणार आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुविधा वाढतील. याशिवाय सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुविधा पुरविल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या की, NEP परिवर्तनात्मक सुधारणा सुरू करत आहे. पीएम श्री शाळा दर्जेदार शिक्षण देत आहे. स्किल इंडियाने 1.8 कोटी तरुणांना प्रशिक्षित केले आहे, 54 लाख तरुणांना प्रगत आणि री-स्किल केले आहे आणि 3,000 नवीन ITI स्थापन केले आहेत. मोठ्या संख्येने HEIs, म्हणजे 7 IITs, 16 IIITs, 7 IIMs, 16 AIIMS आणि 390 विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत.

2047 पर्यंत देश विकसित करणार
आमचे सरकार 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे. अर्थमंत्री म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत आर्थिक विकास झपाट्याने झाला आहे. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. मत्स्य संपदा योजनेमुळे 55 लाख लोकांना नवीन रोजगार उपलब्ध झाला आहे. (Educational Budget 2024)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणेसोबत आणखी एक नारा जोडला आहे आणि तो म्हणजे जय संशोधन. म्हणजे जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन. त्यासाठी देशात संशोधनाला चालना दिली जाणार आहे. 1 लाख कोटी रुपयांचा निधी 50 वर्षांसाठी बिनव्याजी दिला जाईल. त्याचा उद्देश संशोधनाला चालना देणे हा आहे. खासगी क्षेत्राला चालना मिळेल. संरक्षणावर भर असेल.

उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढला (Educational Budget 2024)
सितारमन पुढे म्हणाल्या; उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग 10 वर्षात 28 टक्क्यांनी वाढला आहे. STEM अभ्यासक्रमांमध्ये मुली आणि महिलांची नोंदणी 43 टक्के आहे, जी जगातील सर्वाधिक टक्केवारी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : वडील गावोगावी फिरुन कपडे विकायचे; मुलाने कमाल केली… आधी IIT अन् नंतर बनला IAS

IAS Success Story of Anil Basak

करिअरनामा ऑनलाईन । कठोर परिश्रम करून, अडचणी आणि (IAS Success Story) अपयशाशी झुंज दिल्यानंतर जे हाती येतं ते यश अनमोल असतं. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे IAS अधिकारी अनिल बसाक यांची, ज्यांनी जिद्द आणि समर्पणाने यशाचे शिखर गाठले आहे. ही कथा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एका मुलाची; जो इतर मुलांना मिळणाऱ्या आरामदायी सोयी-सुविधांपासून वंचित होता; तरीही तो आपल्या ध्येयापासून मागे हटला नाही.

वडील सायकलवरून कपडे विकायचे
अनिल यांचे वडील बिनोद बसाक हे मूळचे बिहारमधील किशनगंजचे रहिवासी आहेत. त्यांनी जेमतेम चौथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते, परंतु त्यांनी आपल्या चारही मुलांना स्वतःला मिळू न शकलेले उत्तम शिक्षण दिले. ते सायकलवरून गावोगावी फिरुन कपडे विकायचे. त्याआधी ते राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर येथे एका व्यावसायिकाकडे हाऊस हेल्पर म्हणून काम करत होते. यावरुन तुमच्या लक्षात येईल की त्यांना किती बिकट आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे याविषयी.

महागडे कोचिंग क्लास अन् सुविधांची गरज भासली नाही (IAS Success Story)
अनेकांना असे वाटते की UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महागडे कोचिंग क्लास, प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आणि चांगल्या सुविधा आवश्यक आहेत. पण समाजात असेही अनेक IAS/IPS अधिकारी आहेत; ज्यांनी कोणत्याही विशेष सुविधांशिवाय स्वतःचा करिअरचा मार्ग भक्कमपणे तयार केला आहे. त्यापैकीच एक आहेत IAS अनिल बसाक. यांची कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल.

IIT इंजिनिअर आहेत अनिल
अनिल बसाक यांचा जन्म २ ऑगस्ट १९९५ रोजी बिहारमध्ये झाला. त्यांनी ओरिएंटल पब्लिक स्कूल, किशनगंज येथून आठवीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर 10 वी अररिया पब्लिक स्कूलमधून पूर्ण केली. 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनिल बसाक यांनी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा कल सरकारी नोकरीकडे झुकू (IAS Success Story) लागला. त्यामुळे त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2 वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2018 मध्ये UPSC प्रिलिम्सची परीक्षा दिली पण यामध्ये ते नापास झाले.

नोकरीतून रजा घेवून केला अभ्यास
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर अनिल यांनी दुसऱ्यांदा परीक्षेचा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी 616 वी रॅंक मिळवली आणि त्यांना IRS पद मिळाले. ते सरकारी नोकरीत रुजू झाले खरे; पण यावर ते समाधानी नव्हते. त्यांनी 1 वर्षाची रजा घेतली आणि 2020 मध्ये पुन्हा UPSC च्या परीक्षेचा फॉर्म भरला. पहिल्या दोन परीक्षांचा अनुभव पाठीशी होताच त्यामुळे यावेळी त्यांनी निकालात कमालच केली. अनिल यांनी या परिक्षेत संपूर्ण भारतातून 45 वा क्रमांक मिळवला आणि IAS पदावर आपलं नाव कोरलं. सध्या ते नालंदामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Police Bharti : राज्यात पोलिसांची तब्बल 17,471 पदे भरली जाणार

Maharashtra Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणारे राज्यातील (Maharashtra Police Bharti) तरुण-तरुणी पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. आहे. यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तर इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कोण कोणती पदे भरली जाणार (Maharashtra Police Bharti)
पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस शिपाई,बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशा पदांच्या एकूण 17,471 जागा भरल्या जाणार आहेत.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करणार
पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यामध्ये अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म (Maharashtra Police Bharti) तयार करण्यात येणार असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
CCTV संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

पोलीस भरती 100 टक्के करण्यास वित्त विभागाची परवानगी
मधल्या काळामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळी, रमजान नवरात्र उत्सव अशा सणावारांच्या काळामध्ये मुंबई पोलिसांवर कामाचा जास्त भर येतो. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी पोलिसांची कंत्राटी भरती करण्यात यावी; असा सरकारने निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार होती. या भरती प्रक्रियेत राज्य सुरक्षा महामंडळाच्या (Maharashtra Police Bharti) जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा विचार गृहखात्याने केला होता.
भरती करण्यात येणाऱ्या जवानांना मुंबई पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊन त्यांना 11 महिन्यांसाठी पोलीस विभागात घेण्यात येणार होते. पण या निर्णयाला विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र विरोध केला. मुंबई सारख्या शहरांची जबाबदारी कंत्राटी पोलिसांवर देणे योग्य आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारमध्ये कंत्राटी भरती प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता वित्त विभागाने पोलीस भरती 100 टक्के करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी मेगाभरती करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे भेट द्या…
राज्यातील तरुणांना पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल; अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 12वी पास ते पदवीधरांसाठी 6,244 पदांवर मेगाभरती, पहा कुठे करायचा अर्ज…

Government Jobs (55)

करिअरनामा ऑनलाईन । 12वी पास आणि पदवीधर तरुणांसाठी एक (Government Jobs) आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तामिळनाडू लोकसेवा आयोगाने (TNPSC) अनेक पदांवर भरती जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये गट 4 च्या रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट tnpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील
या भरतीतून एकूण 6,244 पदे भरली जाणार आहेत. ग्राम प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक यासह अनेक पदांवर नोकऱ्या मिळविण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे.
आवश्यकता पात्रता
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत भरती अधिसूचना तपासावी लागेल.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
या अर्ज प्रक्रियेसाठी ३० जानेवारीपासून अर्ज भरण्याची (Government Jobs) प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर, 4 ते 6 मार्च दरम्यान दुरुस्ती विंडो उघडली जाईल.
आवश्यक वय मर्यादा
TNPSC गट 4 भरती अंतर्गत, प्रशासकीय अधिकारी, वनरक्षक, वाहन चालविण्याचा परवाना असलेले वनरक्षक, वनरक्षक, वन निरीक्षक (आदिवासी उमेदवार) व्यतिरिक्त इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे 1 जुलै 2024 रोजी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

अशी होणार परीक्षा (Government Jobs)
TNPSC च्या गट 4 भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत, उमेदवारांना फक्त एकच पेपर द्यावा लागेल, ज्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न इयत्ता 10 वी वर आधारित असतील. या पेपरचे दोन भाग करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com