Home Blog Page 110

NHPC Recruitment 2024 : ITI/डिप्लोमा/डिग्रीधारक उमेदवारांसाठी NHPC अंतर्गत नोकरीची संधी; त्वरा करा

NHPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (NHPC Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत आयटीआय ॲप्रेंटिसशिप, डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड
भरले जाणारे पद – आयटीआय ॲप्रेंटिसशिप, डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप
पद संख्या – 57 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NHPC Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – 18 ते 30 वर्षे

भरतीचा तपशील – (NHPC Recruitment 2024)

पदपद संख्या 
आयटीआय ॲप्रेंटिसशिप39
डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप13
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप05

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
आयटीआय ॲप्रेंटिसशिपPassed ITI in relevant discipline from any recognized Institute/Board of Technical Education
डिप्लोमा ॲप्रेंटिसशिपFrom an institute/university recognized by AICTE/ State Board of Technical Education Diploma in Engineering /Technical Education
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिपDegree from a recognized institute/College/University

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NHPC Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा (आयटीआय अप्रेंटिस) – APPLY
ऑनलाईन अर्ज करा (डिप्लोमा, ग्रॅज्युएट शिकाऊ)APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.nhpcindia.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र डेटा एंट्री ऑपरेटर अंतर्गत भरतीची जाहिरात (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसापर्यंत अर्ज करता येणार आहे. 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर…

भरले जाणारे पद – डेटा एंट्री ऑपरेटर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 दिवस
वय मर्यादा – 18 ते 28 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटरMinimum HSC with preferred Typing Speed Min 20
मिळणारे वेतन – INR 13,360 to INR 14,620

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Exam Calendar 2025 : UPSC ने जाहीर केल्या 2025 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UPSC Exam Calendar 2025) महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२५ मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे.

परीक्षेच्या महत्वाच्या तारखा
युपीएससीने Exam Calendar जाहीर करत नागरी सेवा परीक्षा, एनडीए (NDA), सीडीए (CDA), वनसेवा (Forest Service), भूशास्त्रज्ञ (Geologist) अशा विविध परीक्षांच्या तारखा, परीक्षांची नोंदणी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दि. २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत (UPSC Exam Calendar 2025) नागरी सेवा परीक्षा २०२५, भारतीय वनसेवा परीक्षा २०२५ म्हणजेच युपीएससी पूर्व परीक्षा २०२५च्या एकत्रित नोंदणी करू शकतील. ही परीक्षा २५ मे रोजी होणार आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षेतील यशस्वी उमेदवारांसाठी २२ ऑगस्टपासून नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ आयोजित केली जाणार आहे.

नोंदणीसाठी महत्वाच्या तारखा (UPSC Exam Calendar 2025)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (NDA NA) परीक्षा २०२५ आणि समाईक संरक्षण सेवा (CDA) परीक्षा २०२५ साठीची नोंदणी ११ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान करता येणार आहे. त्यानंतर नोंदणीकृत उमेदवारांची परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५साठीची नोंदणी प्रक्रिया १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. ९ फेब्रुवारीला संयुक्त भू-वैज्ञानिक पूर्व परीक्षा २०२५ होणार आहे. त्यासाठी ४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नोंदणी करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Board Exam : बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जाणार; शिक्षण मंत्रालयाचे निर्देश

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक सत्र 2025-26 पासून सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) वर्षातून दोनवेळा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईला तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सेमिस्टर परीक्षा पद्धत सुरू करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती समोर येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ चे अधिकारी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांशी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याबाबत (Board Exam) विचारविनिमय करणार आहेत. CBSE सध्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळापत्रकावर परिणाम न करता शैक्षणिक दिनदर्शिकेत बदल कसा करायचा यावर काम करत आहे.

वर्षातून दोनदा घेतल्या जाणार परीक्षा (Board Exam)
काही महिन्यांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयी घोषणा केली होती. त्यानंतर शिक्षण मंत्रालय आणि CBSE ने त्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शिक्षण मंत्रालय आणि CBSE बोर्डाकडून सेमिस्टर पद्धत लागू करण्याची कोणतीही योजना नाही. विद्यार्थ्यांना (Board Exam) कामगिरी सुधारण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) नुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : लग्न करायचं नव्हतं म्हणून बंड केलं.. आईच्या निधनाचं दुःखही पचवलं; मुलगी बनली कलेक्टर

UPSC Success Story of IAS Shamal Bhagat

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (UPSC Success Story) नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची शामल भगत (Shamal Bhagat IAS) ही तरूणी. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. समोर आलेल्या प्रत्येक संकटांचा न डगमगता सामना करणाऱ्या शामलने नशिबाला झुकवून हवं ते मिळवलं आहे. दहावी झाल्यानंतर लग्नासाठी आलेलं स्थळ नाकारत तिने बंड केलं आणि आता ती थेट आयएएस (IAS) झाली आहे. नुकतंच यूपीएससीचा निकाल लागला असून वयाच्या 24 व्या वर्षी शामल भगत हिने देशात 258 वा क्रमांक पटकावत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

सर्वकाही नशिबावर अवलंबून आहे असं म्हणणाऱ्या तरुण पिढीसाठी शामल भगत एक मोठं उदाहरण आहे. आपण ठरवलं तर काहीही करू शकतो, कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि आपलं नशिब बदलू शकतो हाच संदेश तिने युवक-युवतींना दिला आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवसाविषयी….

परीक्षेत पहिला क्रमांक कधीच सोडला नाही (UPSC Success Story)
शामलच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची. तिचे इयत्ता 4 थी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर शेजारच्या निरनिमगावात माध्यमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच हुशार असलेली शामलने दहावीत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे झालं. तिथेही तिने पहिला नंबर सोडला नाही. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयातून तिने B.Sc. Agri पदवी पूर्ण केली. त्यावेळी तिने विद्यापीठातून सुवर्ण पदकही पटकावलं होतं.

लग्नासाठी आलेलं स्थळ धुडकावलं
विशेष म्हणजे दहावी झाल्यानंतर शामलपुढे तिच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पण शामलने लग्नाला विरोध करत शिक्षण पूर्ण करण्याचा पवित्रा घेतला. थोडक्यात शामलने बंड करुन लग्न करणे नाकारले आणि आपला मोर्चा अभ्यासाकडे वळवला.

दुसऱ्या प्रयत्नात पास केली परीक्षा
शिक्षणामध्ये हुशार असलेल्या शामलने पहिल्यापासूनच उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा निर्धार केला होता. पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश मिळालं नाही. मग दुसऱ्यावेळी तिने (UPSC Success Story) प्रचंड मेहनत घेतली. पहिल्या वेळी अपयश का आलं याची कारणं शोधून त्यावर तिने काम केलं आणि दुसऱ्याच प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली.

आईचं कर्करोगानं निधन
शामलच्या UPSC मुलाखतीच्या तारखा समोर असताना आईचं कर्करोगानं निधन झालं. ज्या आईने आपली मुलगी कलेक्टर व्हावी असं स्वप्न पाहिलं होतं, तीच आता अशी अर्ध्या वाटेवर (UPSC Success Story) सोडून गेल्याने शामलच्या डोळ्यापुढे काळोख निर्माण झाला. पण आलेल्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्याची शामलची लहानपणापासूनची सवय तिला उपयोगी ठरली त्यामुळे शामल या दुःखातूनही सावरली आणि हिंमतीने मुलाखतीला सामोरी गेली.

विना कोचिंग घेता क्रॅक केली परीक्षा (UPSC Success Story)
यूपीएससीचा (UPSC) निकाल लागला आणि शामल संपूर्ण देशात 258 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शामलने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, आपल्या गावाचं नाव देशभरात उंचावलं. तिच्या यशात कुटुंबीय आणि भावंडांचा मोठा हातभार आहे. ग्रामीण भागातली मुलगी, कोणताही क्लास न लावता यूपीएससीसारखी परीक्षा यशस्वी झाली आहे; त्यामुळे शामलचं हे यश अधोरेखीत झालं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IT Jobs : फ्रेशर्ससाठी मोठी बातमी!! टेक महिंद्रा देणार तब्बल 6 हजार नोकऱ्या

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी (IT Jobs) टेक महिंद्राने फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी कंपनी तब्बल 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू असून नवीन भरतीची शक्यता मावळली आहे; तर दुसरीकडे टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे (IT Jobs) ज्यामध्ये या वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यापूर्वी, कंपनीने आर्थिक वर्ष 2018 मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली होती. टेक महिंद्रा व्यतिरिक्त, आत्तापर्यंत फक्त TCS ने सांगितले आहे की ते आर्थिक वर्ष 2025 मध्ये सुमारे 40,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत आहेत.

टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ (IT Jobs) मोहित जोशी म्हणाले; “कर्मचाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. आम्ही सतत नवीन पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नियुक्त करत आहोत.” ते पुढे म्हणाले; “आम्ही नवीन चीफ लर्निंग ऑफिसर अंतर्गत या नवीन लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक कार्यक्रम देखील तयार करत आहोत. आम्ही नवीन फ्रेशर्सची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत.”

‘या’ कंपन्यांमध्ये झाली कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट (IT Jobs)
आर्थिक वर्ष 2024 मध्ये, TCS, Infosys आणि Wipro या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण झाली आहे. TCS आणि इन्फोसिसमध्ये गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात TCS मध्ये 13,249 कर्मचारी, Infosys मध्ये 25,994 आणि Wipro मध्ये 24,516 कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC CAPF Recruitment 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता…

UPSC CAPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UPSC CAPF Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट (गट अ) पदांच्या एकूण 506 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 15 मे 2024 पासून सुरु होणार आहे; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे. सहाय्यक कमांडंट (गट अ) पदावर निवड होण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे बॅचलर्स डिग्री असणे आवश्यक आहे. देशातील तरुण उमेदवारांना UPSC च्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर…

संस्था – UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
भरले जाणारे पद – सहाय्यक कमांडंट (गट अ)
पद संख्या – 506 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (UPSC CAPF Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 15 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2024
वयो मर्यादा – 20 ते 25 वर्षे
अर्ज फी – Rs.200/-

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
सहाय्यक कमांडंट (गट अ)506

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (UPSC CAPF Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक कमांडंट (गट अ)Bachelor’s degree

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर केल्यानंतर (UPSC CAPF Recruitment 2024) अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
5. अर्ज प्रक्रिया 15 मे 2024 पासून सुरु होणार आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मीमध्ये ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी!! ऑनलाईन करा अर्ज

Indian Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदे (Indian Army Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 06 मे 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे. जाणून घेवूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – आर्मी डेंटल कॉर्प्स
भरले जाणारे पद – शॉर्ट सर्व्हिस कमिशन
पद संख्या – 30 पदे (Indian Army Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 06 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2024
वय मर्यादा – 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शॉर्ट सर्व्हिस कमिशनGraduated

मिळणारे वेतन – (Indian Army Recruitment 2024)

पदवेतन
शॉर्ट सर्व्हिस कमिशनLevel 10 B (Rs 61,300-1,20,900)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या (Indian Army Recruitment 2024) लिंकवरून अर्ज सादर करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 06 मे 2024 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Army Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://indianarmy.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NLC India Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी NLC अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 1 लाख पगार

NLC India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । NLC इंडिया लिमिटेडमध्ये अंतर्गत विविध (NLC India Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स, एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

संस्था – NLC इंडिया लिमिटेड
पद संख्या – 36 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स – 24 पदे
पात्रता – Degree in Chemical/C&I/E&I/ECE/Electrical/EEE/Mechanical Engineering
2. एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स – 12 पदे (NLC India Recruitment 2024)
पात्रता – Degree in Civil/Chemical/C&I/E&I/ECE/Electrical/EEE/Mechanical Engineering

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 29 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 37 ते 42 वर्षे
परीक्षा फी – जनरल/ओबीसी/₹ 500+354 [SC/ST/महिला: 354]
मिळणारे वेतन – (NLC India Recruitment 2024)
1. एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स – 70,000/- ते 1,00,000/- रुपये दरमहा
2. एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स – 70,000/- ते 1,00,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.nlcindia.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Toppers : गेल्या 10 वर्षातील UPSC टॉपर्स; पहा सध्या ते काय करतात

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने नागरी (UPSC Toppers) सेवा 2023 परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात आदित्य श्रीवास्तवने AIR 1 सह, अनिमेश प्रधानने AIR 2 आणि अनन्या रेड्डी ने AIR 3 सह संपूर्ण देशात बाजी मारली आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये यावर्षी एकूण 1,016 उमेदवारांनी यश मिळवले आहे. आज आपण गेल्या 10 वर्षातील UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील टॉपर्स उमेदवार आणि ते सध्या कुठे कार्यरत आहेत याविषयी माहिती घेणार आहोत.

1. इशिता किशोर – 1094 गुणांसह UPSC CSE 2022 मध्ये टॉप केले होते. त्या सध्या त्यांच्या मूळ राज्य उत्तर प्रदेशमध्ये तैनात आहेत.
2. श्रुती शर्मा – 2021 मध्ये 1105 गुणांसह परीक्षेत अव्वल ठरली. श्रुती सध्या उत्तर प्रदेशमध्ये तैनात आहे.
3. शुभम गुप्ता – 2020 मध्ये यांनी 1072 गुणांसह ऑल इंडिया रँक 1 मिळवला. ते त्यांच्या गृहराज्य बिहारमध्ये तैनात आहेत.

4. प्रदीप सिंग – हरियाणातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि मोठा झालेला तरुण. यांनी 2019 मध्ये 1072 गुणांसह परीक्षेत अव्वल ठरले होते (UPSC Toppers)
5. कनिष्क कटारिया – हे व्यवसायाने डेटा सायंटिस्ट होते. ज्यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षेत सर्वाधिक 1121 गुण मिळवले होते. ते सध्या राजस्थानमध्ये तैनात आहेत.
6. अनुदीप दुरीशेट्टी – सलग पाच प्रयत्नांनंतर अखेर 2017 मध्ये अनुदीप दुरीशेट्टी 1126 गुणांसह परीक्षेत अव्वल ठरले. सुरुवातीला त्यांची नियुक्ती मणिपूरमध्ये होती, नंतर त्यांची बिहारमध्ये बदली झाली.

7. अनमोल शेरसिंग बेदी – यांनी २०१६ च्या नागरी सेवा परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली आहे. (UPSC Toppers)
8. टीना दाबी – यांनी 2015 मध्ये 1063 गुण मिळवत परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या त्या राजस्थानमध्ये तैनात आहेत.
9. इरा सिंघल (UPSC Toppers) – मणक्याच्या समस्येने ग्रासले असताना त्यांनी हिंमतीने परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्या टॉपर ठरल्या. अनेकांसाठी प्रेरणा बनून इराने 2014 मध्ये झालेल्या परीक्षेत 1082 गुण मिळवले. त्यांनी AGMUT केडर निवडले. सध्या त्या दिल्ली सरकारमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com