Home Blog Page 1071

महाराष्ट्र ज्ञान महामंडळात प्रोजेक्ट ट्रेनी पदांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र ज्ञान महामंडळात प्रोजेक्ट पदांसाठी भरती सुरु आहे. शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीची तारीख व अधिक तपशील खाली दिली आहे.

एकूण जागा – ४५

पदाचे नाव – प्रोजेक्ट ट्रेनी

शैक्षणिक पात्रता – बी.इ/बी.टेक./एमसीए/एमसीएस/एमएससी( कॉम्प्यु.सायन्स ) २०१८ किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेद्वार

नोकरी ठिकाण – पुणे

फी – नाही

परीक्षा ऑनलाइन – ०२ जून २०१९ सकाळी १०:०० ते दुपारी ४:००

वैयक्तिक मुलाखत – १७ ते २५ जून २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मे २०१९

ऑनलाईन अर्ज – https://pt2019recruitmentapp.mkcl.org/#/

जर्नालिझम करायचंय तर हे गुण असावे लागतात अंगी..

करिअर मंत्रा | जर्नालिझम हे एक आजचं विस्तारलेलं क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण मोठं नाव करू शकता. या ५ वर्षात या क्षेत्रात तरुणांचा कल वाढायला लागला आहे. अनेक पदवीधर आणि एमबीए मार्केटिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी मंडळी आज पत्रकारितेत येऊन आपलं नशीब आजमवत आहेत. लोकांशी असलेली नाळ जोडण्यात अनेकांना आवडतं परंतु क्षेत्र वेगळं असल्याने अनेकांना थेट सामान्य नागरिकांशी संबंध येत नाही. पत्रकारितेत मात्र थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सोप्प पडतं. या क्षेत्रात तुम्हाला वृत्तपत्र आणि नवोदय वेब पोर्टल्समध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून सुरुवात करू शकता.

राजकीय

महाराष्ट्र राजकारण आणि देशातील राजकारणाच्या घडामोडींवर नजर असायला हवी राजकीय सक्रीयता ही या क्षेत्रात महत्वाची मानली जाते. आणि लोकशाहीला धरून आपण लोकशाहीचा चौथा स्तंंभ म्हणून सदर विषयाला न्याय देण्यास प्रयत्न करायला हवा.

सामाजिक

पत्रकार म्हणून परिपक्व होत असताना सामाजिक अभ्यास सुद्धा असावा लागतो. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास देशाचा सामाजिक विषयांवर आपलं मत असलं पाहिजे आणि त्यावर चर्चा करता आली पाहिजे

मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रातील उदा . बॉलिवूड ची माहिती अभिनेता अभिनेत्रीची नावे, सध्या चर्चेत असणाऱ्या चित्रपटांची नावे, त्यावर थोडं फार लिहिता यायला हवं.

तंत्रज्ञान

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या स्पर्धात्मक क्षेत्रात क्षेत्रात तांत्रिक बाबी हाताळता यायला हव्यात. उदा. ,संगणक ,टायपिंग, बातमी एडिट. मेल वापरायला यायला हवं. बातम्या साठवून ठेवता यायला हव्या.

लिखाण

बातम्या लिहीण्याचा प्रवाह बऱ्यापैकी असायला हवा.
प्रवास वर्णन, ब्लॉग, बातम्या लिहिताना घटनेचं स्थळ कुठे कधी केंव्हा घटनेचं कारण या नमुद असायला हव्यात.

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..

परीक्षा जवळ येते, तसे वेळेचे गणित त्रास द्यायला लागते. ‘माझे पेपर-दोनमध्ये साठच्यावर प्रश्न सुटत नाही किंवा जास्त सोडवण्याच्या नादात चुका जास्त होतात’, हे अगदी साधारणतः सगळयांना भेडसावणारे प्रश्न. या टिप्स नेहमी लक्षात ठेवा..

प्रश्नानुसार वेळ

समोरच्या व्यक्तीला जाणल्याशिवाय प्रेमात पडणे जसे व्यर्थ असते; तसेच ९० सेकंदांच्या प्रेमात थेट पडणे महागात पडू शकते. त्यामुळे आधीपासूनच त्या प्रयत्नात पडू नका. आधी तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा सराव करा. त्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून घ्या. याचा अर्थ तुम्ही घड्याळाकडे लक्ष द्यायचे नाही, असे नक्कीच नाही; पण जोपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो, तुमच्याकडून कोणता प्रश्न ९० सेकंदांमध्ये सुटू शकतो, याचा अंदाज तुम्हाला येत नाही, तोपर्यंत वेळेकडे लक्ष देऊ नये, असे मला वाटते. एकदा तुम्हाला समजले, की कोणत्या चेंडूवर एक रन काढायचा आहे आणि कशावर षटकार, की सामन्यात तुम्हीच बाजी मारणार.

काही प्रश्न अवघड असणार हे गृहीत धरून चाला..

यानंतर तुम्हाला ३० सेकंद झाल्यानंतरदेखील त्या प्रश्नाबद्दल काहीच सुचत नसेल, तर तो प्रश्न सोडून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. एकाच प्रश्नाला वेळ जास्त दिल्याने तुम्हाला अचानक उत्तर येईल, असे काही नसते ; आणि तसेही पाच ते दहा प्रश्न तर अवघड असतात हे गृहीत धरून चाललेलं कधीही चांगलं.
तुम्हाला त्या प्रश्नात मार्ग सापडतो आहे, पण उत्तर नाही, अशी परिस्थिती असेल तर थोडा प्रयत्न करा परंतु एक मिनिटानंतरही प्रश्न सुटत नसेल, तर त्याला गोल करून लवकर पुढे जा. पुन्हा नंतर वेळ मिळाला, तर त्याकडे लक्ष द्या.

सोडून दिलेले प्रश्नांवर शेवटी काम करा

शेवटी काही वेळ मिळाला, तर जे प्रश्न वेळेअभावी सोडून दिले होते, त्यांना हात घालायला विसरू नका. पेपर देऊन निघून जाण्यापेक्षा शेवटच्या सेकंदापर्यंत टिच्चून खेळण कधीही चांगलं. सुटसुटीत कच्च्या कामाने नाहक चुका होण्याचे प्रमाणपण आपोआप कमी होतं.

वेळेला जवळचा मित्र बनवा

तुमच्या दैनंदिन आयुष्यात आणि परिक्षेच्या कालावधीत वेळेला महत्व द्या. गणिताचा आणि प्रश्नपत्रिका सोडवताना घडयाळ जवळ बाळगा आणि त्यानुसार प्रश्नाचं नियोजन करा. कोणता प्रश्न सोडवून कोणत्या दिशेने जायचंय ते डोक्यात ठेवा.
उदा. पक्ष्यांच्या डोक्यात जसा दिशादर्शक फिट असतो, तसं आपल्या डोक्यात वेळेचं गणित फिट झाले, की वेळ आपल्या इशाऱ्यावर आपल्या मागे येईल. तुमची वेळेमागे फरफट होणार नाही.

देवळाली केंटोमेन्ट बोर्ड मध्ये शिक्षकांच्या विविध जागा

पोटापाण्याची गोष्ट | देवळाली केंटोमेन्ट नाशिक मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या तारखेच्या आत करू शकता अर्ज.

एकूण जागा – २८

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम : इयत्ता १ ली ते ४ थी) ०६
२) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम : इयत्ता ०५ ते १० वी) ०२
३) सहाय्यक शिक्षक (इंग्रजी माध्यम : इयत्ता ०५ ते १० वी) ०७
४) ड्राइंग शिक्षक ०१
५) संगणक प्रशिक्षक ०४
६) बालवाडी शिक्षक ०८

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.१ : (i) १२ वी उत्तीर्ण (ii) डी. एड ( मराठी )
पद क्र.२ : बीएससी. बीएड ( मॅथ्स आणि सायन्स )

पद क्र.३ : बीएससी/ एमएससी. बीएड ( फीजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स ) किंवा बीए. एमए (इंग्लिश, सोशल सायन्स ) किंवा एमएबीपीएड ( मराठी हिंदी )

पद क्र.४ : एटीडी किंवा एएम

पद क्र.५ : (१) पदवीधर (२) एमएससीआयटी

पद क्र.६ : (१) १० वी उत्तीर्ण (२) मोंटेसरी कोर्स उत्तीर्ण

वयाची अट: ०१एप्रिल २०१९ रोजी ५० वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण – देवळाली, नाशिक

फी – नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०१९

ऑनलाइन अर्ज – www.canttboardrecruit.org

केथॉलिक सिरियन बँकात रिक्त जागा; आजच भरा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | केथॉलिक सिरियन बॅंकेत अनेक पदांसाठी रिक्त जागा आहेत.

एकूण जागा –  १२३

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

१) क्लस्टर हेड क्रेडिट (ऍग्री ) ०२
२) ॲग्री ऑपरेशन ऑफिसर ०५
३) ॲग्री क्रेडिट ऑफिसर ०१
४) रिलेशनशिप मॅनेजर (ऍग्री ) ०६
५) रीजनल ऑपरेशन्स मॅनेजर (टू व्हीलर लोन्स ) ०१
६) चीफ मॅनेजर/सिनिअर मॅनेजर (क्रेडिट Credit) ०१
७) सिनिअर मॅनेजर/मॅनेजर ( क्रेडिट ) ०१
८) सेल्स मॅनेजर ( टू व्हीलर लोन्स ) ०५
९) रिलेशनशिप एक्झिक्युटिव/रिलेशनशिप मॅनेजर ०२
१०) एरिया सेल्स मॅनेजर ( टू व्हीलर लोन्स )
०१
११) प्रोडक्ट मॅनेजर (रिटेल असेट्स
०१
१२) क्रेडिट मॅनेजर ( रिटेल असेट्स )
०२
१३) क्लस्टर सेल्स मॅनेजर (गोल्ड लोन)
०१
१४) असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर/सिनिअर मॅनेजर (रिस्क ) ०१
१५) रिलेशनशिप मॅनेजर (टीएएससी आणि इन्स्टिट्युशनल बिसनेस ) ०३
१६) बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव (गोल्ड लोन ) ४०
१७) बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव (सीएएसए ) ५०

शैक्षणिक पात्रता – (१) पदवीधर/पदव्युत्तर पदवी (२) ०६ महिने ते १२ वर्षाचा अनुभव

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०१९ (अंदाजे)

ऑनलाइन अर्ज –  http:// online.csb.co.in

देहूरोड केंन्टोमेंट मध्ये नोकरीची संधी

पोटापाण्याची गोष्ट | देहूरोड केंन्टोमेन्ट मध्ये शिक्षक आणि आयांच्या जागा रिक्त आहेत. विशेष करून महिलांसाठी या जागा उपयुक्त आहेत.

एकूण जागा – १२

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) बालवाडी शिक्षक ०७
२) बालवाडी आया ०५

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.१: (१)१० वी उत्तीर्ण (२) बालवाडी कोर्स (३) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.२ (१)१० वी उत्तीर्ण (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट – किमान १८ वर्षे

नोकरी ठिकाण – देहू रोड

थेट मुलाखत –

०७ जून २०१९  (स. ०९ :०० )

मुलाखतीचे ठिकाण –

एम.बी. केंम्प शाळा (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ), देहू रोड, पुणे ४१२१०१

अधिकृत वेबसाईट –

http://www.cbdehuroad.org/

भाभा अणुसंशोधन केंद्रात वैदयकीय अधिकारी पदाची भरती

पोटापाण्याची गोष्ट भारतीय अणुसंशोधन ही एक सरकारी संशोधन संस्था आहे. अनेक संशोधक या संस्थेत शिकून वैज्ञानिक घडतात. भारतीय संशोधन क्षेत्रात या संस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. मोठमोठ्या पदांकरीता जागा रिक्त होत असतात.

एकूण – 28 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या व पात्रता
१) अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी ऑर्थोडोंटिक्स – ०२

पात्रता – (१)एमडीएस ( ऑर्थोडोंटीक्स ) (२) ०२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा – ५० पर्यंत

२) पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – १२
पात्रता – (१) एमएस/ एमडी /डीएनबी, पदवी/डिप्लोमा (२) ०२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा – वय ४० पर्यंत

३) कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर ०७
पात्रता – एमबीबीएस
वयोमर्यादा – ४० पर्यंत

४) निवासी वैद्यकीय अधिकारी ( आयसीसीयु / मेड ) ०२
पात्रता – एमबीबीएस
वयोमर्यादा – ४० पर्यंत

५) निवासी वैद्यकीय अधिकारी ( कॅसुल्टी / डिस्प् ) – ०१
पात्रता – एमबीबीएस
वयोमर्यादा – ४० पर्यंत

6 ) जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर – ०४
पात्रता – (१) एमबीबीएस (२) ०१ वर्ष अनुभव
वयोमर्यादा – ५० पर्यंत

नोकरी ठिकाण – मुंबई

फी – नाही

अधिकृत वेबसाईट – barc.gov.in

मुलाखतीचे ठिकाण – कॉन्फरन्स रूम क्र.१ तळमजला बार्क हॉस्पिटल, अनुशक्ती नगर मुंबई ४०० ०९४

पद क्र. ,थेट मुलाखत आणि तारीख

१) अर्ध – वेळ वैद्यकीय अधिकारी – २० मे २०१९

२) पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – २१ मे २०१९
३) कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर – २१मे
४) निवासी वैद्यकीय अधिकारी – २१ मे
५) निवासी वैद्यकीय अधिकारी – २१ मे६) जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर पाहा – २२ मे २०१९

NABARD मध्ये ७९ पदांसाठी भरती, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक (गट-अ) पदाच्या ७९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बीई/ बी.टेक/ एम.बी.ए/ पी.जी. डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण असणे आवश्यक आहे.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मे २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारसांठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

पूर्व परीक्षा – १५ किंवा १६ जून २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मे २०१९ आहे.

संकेतस्थळNABARD

स्टाफ सिलेक्शन कमिशन ची मेगा भरती लगेच करा अर्ज..

पोटापाण्याची गोष्ट | स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या परिक्षेसाठी तूर्तास संख्या निश्चिती करण्यात आली नसली तरी मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल या पदासाठी ही परीक्षा होणार आहे.

परीक्षेचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ परीक्षा २०१९

एकूण पद संख्या तूर्तास निर्दिष्ट करण्यात आली नाही.

पदाचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयाची अट – ०१ ऑगस्ट २०१९रोजी १८ ते २५ वर्षे १८ ते २७ वर्षे अनुसूचित जाती / जमाती ०५ वर्षे सूट
( ओबीसी ०३ वर्षे सूट )

 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

फी – जनरल/ ओबीसी – १०० रु.
अनुसूचित जाती / जमाती/ पीडब्लूडी/ महिला/ माजी सैनिक – फी नाही.

परीक्षा – टायर १ ( सीबीटी )- ०२ ऑगस्ट ते ०६ सप्टें.२०१९
टायर २ ( वर्णनात्मक पेपर ) १७ नोव्हें. २०१९

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मे २०१९ (सायं ०५.०० )

इथे कराल अर्ज – https :// ssc.nic.in.

भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी..

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय स्टेट बँकेत विविध पदांकरिता जागा सोडण्यात आल्यात. विशेषतः कॉमर्स शाखेसंंबधी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी महत्वाची आहे.

पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे

१) जनरल मॅनेजर ( IT – Strategy, Architecture & Planning) – ०१

२) डेप्युटी जनरल मॅनेजर (Asset Liability Management) – ०१

३) डेप्युटी जनरल मॅनेजर (Enterprise & Technology Architecture) – ०१

४) असिस्टंट जनरल मॅनेजर (Enterprise & Technology Architecture) – ०१

५) चीफ मॅनेजर (Infrastructure Architect) – ०१

६) चीफ मॅनेजर (Application Architect) ०१

७) चीफ मॅनेजर (Business Architect) : ०२

८) मॅनेजर (Security Architect) : ०१

९) मॅनेजर (Technology Architect) : ०२

१०) मॅनेजर (Application Architect) : ०२

११) सिनिअर कंसल्टंट एनालिस्ट : ०१

१२) डेटा ट्रांसलेटर : ०२

१३) डेटा आर्किटेक्ट : ०२

१४) डेटा ट्रेनर : ०१

नोकरी ठिकाण – मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत – दि. ०२ जून २०१९

ऑनलाईन अर्ज –  https://bank.sbi/careers/ongoing-recruitment.html