NABARD मध्ये ७९ पदांसाठी भरती, इथे करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक (गट-अ) पदाच्या ७९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बीई/ बी.टेक/ एम.बी.ए/ पी.जी. डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण असणे आवश्यक आहे.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मे २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारसांठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

हे पण वाचा -
1 of 20

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

पूर्व परीक्षा – १५ किंवा १६ जून २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मे २०१९ आहे.

संकेतस्थळNABARD

Get real time updates directly on you device, subscribe now.