Home Blog Page 1062

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

लाइफस्टाइल| 2G, 3G जाऊन आता 4G आले, सगळ जग हातात आले. पुस्तक, बातम्या सगळे इंटरनेट वर मिळू लागले. पुस्तकातून डोकं बाहेर काढून आता डोकं फोन मध्ये दिसू लागले. सगळ काही वेब वर मिळू लागले. अभ्यास करणे जास्त सोप झाले.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सतत अपडेटेड राहण गरजेच असत, आम्ही तुमच्या साठी काही असे ॲप सांगतो कि ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास अजून सोपा होऊन स्पर्धा परीक्षा सोप्या होऊन जातील.
एमपीएससी सिंपलिफाईड
मिशन एमपीएससी
गव्हर्नमेंट अड्डा
एमपीएससी कट्टा
एमपीएससी ट्रिक्स
पीडीएफ फॉर एक्झाम
यूपीएससी मटेरियल
एमपीएससी ॲलर्ट
पॅलेट्सअप डिजिटल मॅक्झिन
युएन कॅडमी ॲप
डीआयएसी ॲप
एमपीएससी ठोकळा
एमपीएससी टॉपर्स
विजन आयएस
सिविल्स डेली ॲप
इतर महत्वाचे – 

सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| सीमा रस्ते संघटना भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारच्या देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख ठेवते. सीमा रस्ते अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सचे  कर्मचारी सीमा रस्ते संघटनेचे पालक कॅडर तयार करतात. सीमा रस्ता संघटने मध्ये मेगा भरती होणार आहे, चालक, मेकेनिकल, इलेक्ट्रिशियन, व्हेईकल मेकेनिक, मल्टी स्कील वर्कर्स (कुक) ह्या पदांसाठी भरती होणार आहे. ७७८ पदांसाठी हि भरती होणार आहे.

एकूण जागा – ७७८

पदाचे नाव – 

  1. ड्रायव्हर मेकेनिकल ट्रान्सपोर्ट (सामान्य ग्रेड) – ३८८
  2. इलेक्ट्रिशिअन – १०१
  3. वेहिकल मेकॅनिक – ९२
  4. मल्टी स्किल्ड वर्कर्स (कुक) – १९७

शैक्षणिक पात्रता – 

  1. पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशिअन)   (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) मोटर वेहिकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता – 

               विभाग                                                 उंची(सेमी)                        छाती(सेमी)                   वजन \

पश्चिम हिमालयी प्रदेश                                            158                          75 Cm + 5 Cm              47.5

पूर्वी हिमालयी प्रदेश                                               152                          75 Cm + 5 Cm              47.5

पश्चिम प्लेन क्षेत्र                                                    162.5                         76 Cm + 5 Cm                50

     पूर्व क्षेत्र                                                             157                          75 Cm + 5 Cm              50

    मध्य क्षेत्र                                                             157                          75 Cm + 5 Cm              50

दक्षिणी क्षेत्र                                                             157                           75 Cm + 5 Cm              50

गोरखास (भारतीय)                                                152                          75 Cm + 5 Cm                47.5

वयाची अट- 16 जुलै  2019 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1- 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2- 18 ते 27 वर्षे
  3. पद क्र.3- 18 ते 27 वर्षे
  4. पद क्र.4- 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

Fee- General/OBC/EWS- ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 16 जुलै 2019

इतर महत्वाचे 

अक्षय इंडीकर -मराठी झेंडा फडकवला जगाच्या नकाशावर !

करीयर मंत्रा|ध्येय वेडा तरून काय करु शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातील अक्षय इंडिकर या तरुणाकडे आपण पाहू शकतो. FTII मधून शिक्षण घेतलेल्या अक्षयने सिनेमा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू पाहतोय. डोह, उदाहरणार्थ नेमाडे अशा यशस्वी प्रयत्ना नंतर त्याने ‘त्रिज्याची’ मोठी झेप घेतली आहे.चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये त्रीज्याला स्थान मिळाले. ‘न्यू एशियन टॅलेंट’सह शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘त्रिज्या’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या स्पर्धात्मक विभागांत निवडण्यात आला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षयने केले आहे तर छायांकन स्वप्नील शेटे याने केले आहे. चित्रकथी निर्मिती, बॉम्बे बर्लिन फिल्म, आणि फिरता सिनेमा यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्रिज्याचे ट्रेलर कान चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले आहे.

जगातील ११५ देशांच्या पाच हजार चित्रपटांमध्ये एखादा मराठी चित्रपट पहिल्या पाचामध्ये स्थान मिळतो हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्रिज्याच्या या यशाची दखल महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी पत्र लिहून घेतली. पत्रांमध्ये त्यांनी त्रिज्या आणि टीमचे कौतूक केले आहे.

इतर महत्वाचे 

यशस्वी होण्यासाठी ‘हे’ वाचा

करीयरमंत्रा| जगातल्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी बनायचं असत. प्रत्येकाकडे स्वतःचे असे अंगभूत गुण असतात त्याला प्रत्येक वेळेस प्रेरणा मिळतेच असे नाही. आम्ही घेऊन आलोय असे काही मुद्दे जे तुम्हाला मदत करतील तुमच्या यशाच्या प्रवासात.

1. बांधिलकी नव्हे, प्रेरणेवर लक्ष केंद्रित करा.
आपण आपल्या ध्येयावर किती वचनबद्ध आहात? हे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी आपण त्याग करण्यास काय तयार आहात? जर आपण स्वतःला पूर्णपणे समर्पित केले तर प्रेरणा मिळेल आणि हीच प्रेरणा तुम्हाला तुमच्या यशाच्या आणखी जवळ घेऊन जाईल.

2. ज्ञाना कडे लक्ष द्या, परिणाम येतात – जातात.

जर तुम्ही शोध,एकस्प्लोरिंग,प्रयोग आणि सुधारणांकडे लक्ष दिलात तर तुम्ही तुमच्या मार्गाच्या एक पाउल सतत पुढे असाल. पण जर तुम्ही होणाऱ्या परिणामाकडे लक्ष देत राहिलात तर तुम्ही एकाच ठीकानो अडकून रहाल. परिणाम सतत बदलत असतात त्यामुळे मूळ प्रेरणेपासून दूर जाऊ नका. तुम्ही कशा प्रकारे शिकत आहात आणि तुम्ही काय सुधारू शकता याबद्दल विचार करत रहा.

3. स्ट्रगलच्या दिवसांचे दुःख करू नका.
स्ट्रगल एक खेळ आहे जो आपण आपल्या आयुष्यासोबत खेळत असतो! ज्या क्षणी तुम्ही त्याला ते गंभीर बनवाल, त्याक्षणी तुमच्यावर मोठ भावनिक भार वाढेल आणि तुम्ही दृष्टीकोन गमावा,  पुन्हा अडखळाल.

5. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरा.
जेव्हा गोष्टी चांगल्या असतात तेव्हा आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा आपल्याला समस्या येत असतात तेव्हा आपल्याला आणखी उत्साही असण्याची आवश्यकता असते. स्वतःच्या कल्पना वापरून तुम्ही तुमचे करीयर, व्यवसाय निवडल्यास यशस्वी होणायची शक्यता अजून जास्त वाढते.

7. स्वतःला विचलित होऊ देऊ नका.

अर्थहीन गोष्टी आणि व्यत्यय नेहमीच तुमच्या मार्गात येत राहतील, विशेषतः आपण काही तरी महत्वाचे करत असताना जर त्या अडथळा बनत असतील तर त्यापासून दूर रहा. सर्वात महत्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा.  ते न करण्यासाठी स्वतःस जबाबदार ठेवा.

8. इतरांवर विश्वास ठेवू नका.
आपण आपल्या भागीदार, मित्र किंवा बॉससह देखील, आपल्यासाठी इतरांनी काही करण्याची अपेक्षा करु नये. . कोणीही तुम्हाला आनंदित करणार नाही किंवा तुमचे ध्येय इतर लोक साध्य करणार नाही, हे सर्व तुमच्यावर आहे.

9. योजना.

प्रत्येक गोष्टची योजना बनवत रहा. तुम्हाला नेहमी तीन पाउल पुढे रहायचे आहे. त्यासाठी तुमचे नियोजन महत्वाचे आहे. तुम्ही जे शिकत आहात, करत आहात त्यचे शेड्युल करणे, त्याचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे.

इतर महत्वाचे 

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 99 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट| कोल इंडिया लिमिटेडच्या आठ सहाय्यक कंपन्यांमध्ये वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड ही एक आहे, जो कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. ९९ पदांसाठी ह्या ठिकाणी भरती निघाली आहे आणि नर्स ह्या पदासाठी हि भरती होणार आहे.

एकूण जागा – ९९

पदाचे नाव –  स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता- (i) 12 वी उत्तीर्ण  (ii) A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयाची अट- 27 जून 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- नागपूर

शुल्क – General/OBC: ₹200/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- General Manager(P/IR), Western Coalfields Limited, Coal Estate, Civil Lines, Nagpur-440001

अधिकृत संकेतस्थळ – http://westerncoal.nic.in/

दूरदर्शन मध्ये काम करण्याची संधी

पोटापाण्याची गोष्ट| प्रसार भारती मंडळ, भारत सरकार द्वारे दूरदर्शन मध्ये भरती करण्यात येणार आहे. एकूण ८९ पदांसाठी हि भरती होणार आहे. अँकर-सह-प्रतिनिधी, कॉपी रायटर, असाइनमेंट समन्वयक, संवाददाता, अतिथी समन्वयक, कॅमेरामन, ब्रॉडकास्ट कार्यकारी आणि पोस्ट प्रॉडक्शन असिस्टंट ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची तारीख  १२ जुलै २०१९ हि आहे.

एकूण जागा – ८९

पदाचे नाव –

  1. अँकर-सह-संवाददाता ग्रेड-I (इंग्रजी)  – 3
  2. अँकर-सह-संवाददाता ग्रेड-II (इंग्रजी) – 3
  3. अँकर-सह-संवाददाता ग्रेड-III (इंग्रजी) -४
  4. कॉपी रायटर ग्रेड -II (इंग्रजी) – ८
  5. असाइनमेंट को-ऑर्डिनेटर – ७
  6. संवाददाता (इंग्रजी) – १६
  7. गेस्ट को-ऑर्डिनेटर ग्रेड-I/II – ४
  8. कॅमेरा पर्सन ग्रेड II – १५
  9. ब्रॉडकास्ट एक्झिक्युटिव्ह ग्रेड-I (इंग्रजी) – १०
  10. पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट ग्रेड-I (इंग्रजी) – १९

 

शैक्षणिक पात्रता –

  1. पद क्र.1-(i) पदवीधर  (ii) पत्रकारिता पदवी / PG डिप्लोमा  (iii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2- (i) पदवीधर  (ii) पत्रकारिता पदवी / PG डिप्लोमा  (iii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3- (i) पदवीधर  (ii) पत्रकारिता पदवी / PG डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4- (i) मास कम्युनिकेशन मध्ये पदवी/ पत्रकारिता PG डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5- (i) मास कम्युनिकेशन मध्ये पदवी/ पत्रकारिता PG डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6- (i) मास कम्युनिकेशन मध्ये पदवी/ पत्रकारिता PG डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7- (i) पदवीधर  (ii) सार्वजनिक संबंध / पत्रकारिता मध्ये डिप्लोमा  (iii) 07/03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8- (i) 12 वी उत्तीर्ण   (ii) सिनेमेटोग्राफी/व्हिडिओग्राफी पदवी/डिप्लोमा   (iii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9- (i) रेडिओ / टीव्ही प्रॉडक्शन मधील व्यावसायिक पदवी / डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10- (i) पदवीधर  (ii) फिल्म व व्हिडीओ एडिटिंग मधील प्रोफेशनल डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव

 

वयाची अट- 01 जुलै 2019 रोजी,

  1. पद क्र.1,2 & 7: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3,4,5,6,8, 9 & 10: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- दूरदर्शन न्यूज, नवी दिल्ली

शुल्क – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता-Deputy Director (HR), Room No. 413, 41 h Floor, DD News, Doordarshan Bhawan, Tower-B, Copernicus Marg, New Delhi- 110001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 12 जुलै 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – http://ddnews.gov.in/

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1mK9xk_2HjipFN6jul0LGaKFQxuL5cQqf/view?usp=sharing

 

एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये ‘थेट’ मुलाखतीद्वारे भरती

इंजिनियरना खुशखबर- इंडियन ओईल मध्ये नोकरी

दूरदर्शन मध्ये काम करण्याची संधी

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 99 जागांसाठी भरती

देवास येथील बँक नोट प्रेसमध्ये भरती

आठवी,दहावी,ITI पास? माझगाव डॉक मध्ये नोकरीची संधी

खादी व ग्रामोद्योग महामंडळात 119 जागांसाठी भरती

देवास येथील बँक नोट प्रेसमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट| सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल) च्या अंतर्गत बँक नोट प्रेस, देवास (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या ५८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०१९ आहे.

एकूण पद – ५८

पदांचे नाव- 

  1. सुपरवायझर (प्रिंटींग आणि प्लेटमेकिंग)
  2. सुपरवायझर (एयर कंडीशनिंग)
  3. सुपरवायझर (इंक फेक्टरी)
  4. ज्युनिअर टेक्निशियन(इंक फेक्टरी)
  5. ज्युनिअर टेक्निशियन(प्रिंटींग आणि प्लेटमेकिंग)

पात्रता –

  1. सुपरवायझर (प्रिंटींग आणि प्लेटमेकिंग)-st class Diploma in Printing Technology from AICTE approved Institute.DESIRABLE: B.Tech./B.E. in Printing Technology.

      2.सुपरवायझर (एयर कंडीशनिंग)- st class Diploma in Air-Conditioning/Refrigeration                                Engineering from AICTE approved Institute.DESIRABLE: B.Tech./B.E. in Air-                           Conditioning/Refrigeration Engineering.

      3.सुपरवायझर (इंक फेक्टरी) – ESSENTIAL: (i) 1st class Diploma in dyestuff technology/ paint technology/ surface coating technology/ printing ink
technology/ printing technology from AICTE approved Institute.

शेवटची तारीख –   02.08.2019 (upto 23:59 hrs)
अधिकृत संकेतस्थळ – \https://bnpdewas.spmcil.com/Interface/Home.aspx

एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये ‘थेट’ मुलाखतीद्वारे भरती

एअर इंडिया एक्स्प्रेस ची पूर्ण एअर इंडिया कडे आहे. एअर इंडिया हि स्वस्त प्रवासाठी प्रसिद्ध आहे. केरल मध्ये ह्मुया कंपनीचे  मुख्यालय आहे. एअरलाइन्स प्रत्येक वर्षी सुमारे 4.3 दशलक्ष प्रवाश्यांना घेते आणि 140 शहर जोड्या त्यांच्या किंमती प्रभावी आणि विश्वासार्ह उड्डाण सेवांसह जोडते. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये भरती निघाली आहे. केबिन कृ ह्या पदासाठी हि भरती असणार आहे. एकूण ५१ पदे ह्या भरतीद्वारे भरली जाणार आहेत.

एकूण जागा – ५१

पदाचे नाव- केबिन क्रू (महिला)

शैक्षणिक पात्रता- (i) 12 वी उत्तीर्ण   (ii) B737 NG/ MAX Fleet मध्ये 01 वर्षे अनुभव   (iii) SEP

शारीरिक पात्रता- उंची:157.5 cms (5’2”), BMI: 18-22

वयाची अट- 01 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क – General/OBC: ₹500/-   [SC/ST/ExSM: फी नाही]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

थेट मुलाखत- 09 जुलै 2019  (09.00 AM ते 12.00 PM)

मुलाखतीचे ठिकाण- The Gateway Hotel, Calicut, Pt Usha road, Calicut, Pin-673032.

 

 

इंजिनियरना खुशखबर- इंडियन ओईल मध्ये नोकरी

पोटापाण्याची गोष्ट| इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, सामान्यत: इंडियन ऑइल म्हणून ओळखली जाणारी एक भारतीय राज्य मालकीची तेल आणि गॅस कंपनी आहे आणि मुंबई येथे नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्यत्वे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक तेल कंपनी आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. मध्ये  १२९ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक  आणि कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

एकूण जागा – १२९

पदाचे नाव

  1. ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – ७४
  2. ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) –  २६
  3. ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल) / जुनिअर टेक्निकल असिस्टंट IV – 3
  4. ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल) / जुनिअर टेक्निकल असिस्टंट IV3 – १७
  5. ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रुमेंटेशन)/ जुनिअर टेक्निकल असिस्टंट IV – 3
  6. ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट- IV – 3 
  7. ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (फायर & सेफ्टी) – ४ 

 

शैक्षणिक पात्रता – [General/OBC/EWS: 50% गुण, SC/ST/PwBD: 45% गुण]

  1. पद क्र.1- (i) केमिकल / रिफायनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Maths, Physics, Chemistry /Industrial Chemistry)  (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2- (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर)  किंवा समतुल्य  (ii) बॉयलर प्रमाणपत्र  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4- (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर)  (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5- (i) इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6- (i) B.Sc (Physics, Chemistry/Industrial Chemistry & & Mathematics)   (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7- (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) उप अधिकारी कोर्स  (iii) अवजड वाहन परवाना  (iv) 01 वर्ष अनुभव

 

वयाची अट- 30 जून 2019 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- हल्दिया रिफायनरी (पश्चिम बंगाल)

Fee: General/OBC/EWS: ₹150/-   [SC/ST/PwBD: फी नाही]

लेखी परीक्षा- 04 ऑगस्ट 2019

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 जुलै 2019

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख-04 ऑगस्ट 2019

 

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – Advertiser Indian Oil Corporation Limited, Haldia Refinery P.O. Box No. 1, P.O. Haldia Oil Refinery District: Purba Medinipur, West Bengal, PIN:721606.

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1FojamTHBwQVuRcYzM-6XP6wOw8opcIye/view?usp=sharing

अर्ज करा – https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main.aspx?adv=68

एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये ‘थेट’ मुलाखतीद्वारे भरती

इंजिनियरना खुशखबर- इंडियन ओईल मध्ये नोकरी

दूरदर्शन मध्ये काम करण्याची संधी

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 99 जागांसाठी भरती

देवास येथील बँक नोट प्रेसमध्ये भरती

आठवी,दहावी,ITI पास? माझगाव डॉक मध्ये नोकरीची संधी

खादी व ग्रामोद्योग महामंडळात 119 जागांसाठी भरती

आठवी,दहावी,ITI पास? माझगाव डॉक मध्ये नोकरीची संधी

पोटापाण्याची गोष्ट|माझगाव डॉक येथे ३६६ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड, मुंबई, आयएसओ 9001: 2008 कंपनी भारतातील अग्रगण्य शिपबिल्डिंग यार्डमधील एक आहे. माझॅगॉनमध्ये एक लहान कोरडे डॉक बांधण्यात आले तेव्हा माझगॉन डॉकचा इतिहास 1774 पर्यंत कालबाह्य झाला. गेल्या काही वर्षांमध्ये एमडीएलने दर्जेदार कामासाठी प्रतिष्ठा मिळविली आहे आणि सर्वसाधारणपणे नौदल आणि भारतीय नौसेना व तटरक्षकांना कुशल आणि संसाधन सेवा प्रदान केली आहे.

एकूण जागा –  ३६६

पदाचे नाव आणि तपशील – 

१) रिग्गर्स – २१७

2) इलेक्ट्रिशिअन  – १४९

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1- (i) 08वी उत्तीर्ण  (ii) ITI (रिग्गर)
  2. पद क्र.2- (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)

 

वयाची अट- 01 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

Fee- General/OBC- ₹100/-   [SC/ST/PWD- फी नाही]