करिअरनामा ऑनलाईन । 2035 सालापर्यंत 70 लाख कुशल (Opportunity Card Germany) कामगारांची गरज लक्षात घेऊन जर्मनी सरकारने ‘अपॉर्च्युनिटी कार्ड’ ‘सुरू केले आहे. भारतीयांसह विविध आशियाई देशांसाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. हे कार्ड प्राप्त करण्यासाठी एखाद्याने व्यावसायिक प्रशिक्षण किंवा 2 वर्षांच्या कालावधीची पदवी उत्तीर्ण केली असणे गरजेचे आहे. जर्मन सरकारने ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ लॉन्च केले आहे, जे युरोपबाहेरील देशांतील नागरिकांना जर्मनीमध्ये राहण्याची आणि एक वर्षासाठी नोकरी शोधण्याची संधी देते.
‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ ही भारतीयांसह विविध आशियाई देशांसाठी उत्तम संधी मानली जात आहे कारण भारतातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. या बाबतीत भारताने 2023 पर्यंत आघाडीवर असलेल्या चीनला मागे टाकले आहे. ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’मुळे केवळ जर्मनीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर इतर भारतीय व्यावसायिकांनाही नोकरी मिळू शकते.
‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ सुरू करण्यामागचे मुख्य कारण काय?
जर्मन सरकारने ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ सुरू करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कुशल कामगारांची कमतरता. अहवालानुसार, 2035 पर्यंत जर्मनीला 7 दशलक्ष कुशल कामगारांची आवश्यकता असेल. उद्योग क्षेत्राबद्दल बोलायचे तर जर्मनीमध्ये नर्सिंग, फूड अँड बेव्हरेजेस कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल (Opportunity Card Germany) कामगारांची विशेष कमतरता आहे.
जर्मनीच्या फेडरल एम्प्लॉयमेंट एजन्सीच्या अहवालानुसार, एप्रिल 2024 पर्यंत 7 लाखांहून अधिक सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत. अशा परिस्थितीत कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेवर ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’च्या माध्यमातून मात करण्याचे उद्दिष्ट जर्मन सरकारने ठेवले आहे.
‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड‘साठी ही पात्रता आवश्यक
जर्मनी सरकारने दिलेले ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ मिळवण्यासाठी उमेदवारांनी किमान 2 वर्षे कालावधीचे व्यावसायिक प्रशिक्षण किंवा व्यावसायिक पदवी उत्तीर्ण केली असावी. उमेदवाराचे (Opportunity Card Germany) जर्मन किंवा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. तसेच जर्मन भाषेचे मूलभूत ज्ञान (स्तर A2) असणे आवश्यक आहे. याशिवाय, जर्मनीमध्ये एक वर्ष राहण्यासाठी 12 हजार युरो (सुमारे 10 लाख रुपये) असणे आवश्यक आहे.
‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’चे फायदे कोणते?
जर्मन सरकारने दिलेले ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ मिळाल्यानंतर, व्यावसायिकांना आता तेथे वाढीव कालावधीसाठी – 24 महिने राहता येईल. काही विशेष परिस्थितीत हा कालावधी आणखी 2 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत एक वर्ष नोकरी शोधल्यानंतर तुम्ही तिथे जास्तीत जास्त 3 वर्षे राहू शकता.
जर्मन सरकारने ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ योजनेअंतर्गत अर्धवेळ नोकरीची मर्यादा 10 तासांवरून 20 तासांपर्यंत वाढवली आहे. यामुळे व्यावसायिकांना नोकऱ्या शोधणे सोपे होणार आहे. हे कार्ड देताना 40 वर्षांखालील तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.
‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ मिळवण्यासाठी असा करा अर्ज
अर्जाची प्रक्रिया आणि ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ मिळविण्यासाठी (Opportunity Card Germany) आवश्यक कागदपत्रांबद्दल माहितीसाठी, तुम्ही जर्मन दूतावासाच्या india.diplo.de या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
तसेच ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ मिळवण्यासाठी येथे CLIK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com