कधी काळी शिकवण्या घेऊन सुरु केला होता ‘हा’ बिझनेस, संचारबंदीमध्ये झाला आहे हिट 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात गुगल प्ले स्टोअर मधून सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या ऍप मध्ये बायजूझ (Byju’s Learning App) ऍप चे नाव आहे. सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या १० ऍपच्या यादीत याचे नाव आले आहे. सेन्सर टॉवरनी (Sensor Tower Report 2020) एप्रिल २०२० साठी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद झाल्यानंतर या ऍपकडून मोफत शिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यानंतर या ऍपला ६० लाख विद्यार्थी जोडले गेले. एप्रिल मध्ये जवळपास ७५ लाख विद्यार्थी याच्याशी जोडले गेले आहेत.  संचारबंदीच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला वेगाने प्रतिसाद मिळतो आहे.

Byju’s च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, मृणाल मोहित यांनी सांगितले, ‘आम्ही नशीबवान आहोत की या संकटकाळातही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. आमच्या शिक्षण कार्क्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ पट वाढली आहे.’ शाळकरी मुलांसाठी २०१५ साली हे ऍप लॉन्च करण्यात आले होते. बायजू रवींद्रन यांनी हे ऍप सुरु केले होते. या ऍप मध्ये CAT, सिव्हिल सर्व्हिस परीक्षा, JEE, NEET पासून प्रबंधन एडमिशन टेस्ट पर्यंत शिकता येऊ शकते. व्हेंचर कॅपिटल फंड सिकोया कॅपिटल आणि बेल्जियम च्या गुंतवणूक कंपन्यांनी या ऍप मध्ये गुंतवणूक केली आहे. जवळपास ७५ लाख डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. बाकीही काही कंपन्यांनी यात गुंतवणूक केली आहे.

मागच्या वर्षीच्या फोर्ब्स मॅगझीन च्या १०० सर्वात श्रीमंत भारतीय यादीत  (Forbes Richest Indians 2019) नवीन सहा नावे समाविष्ट झाली होती. यातील एक नाव बायजुझ यांचे होते. बायजुझ- द लर्निंग ऍप (Byju’s – The Learning App) चे ३८ वर्षाचे संस्थापक बायजू रविंद्रन यांचे नाव या यादीत होते. बायजुझ देशातील त्या स्टार्टअप मधील आहे. ज्यांनी सतत तीन वर्षांसाठी १००% वाढ केली आहे. २०१९ मधील विकास वाढून आता २००% झाला आहे. २०१९ ला कंपनीचा रिव्हेन्यू १,४३० कोटी रुपये होता. या ऍपमध्ये व्हिडीओ, अनिमेशन गेमिफिकेशन यांचा वापर करण्यात आला आहे. जे विद्यार्थ्यांना खूप आवडते.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com