ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल.

ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. AIAPGET परीक्षा आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, यूनानी आदींच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

AIAPGET 2020 निकालाच्या आधारे उमेदवारांना २०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठी पदव्युत्तर पदवी आयुष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. AIAPGET 2020 परीक्षेत मिळालेले गुण एक वर्षापर्यंत वैध राहतील. निकाल जाहीर करण्याआधी एनटीएने ३ नोव्हेंबर रोजी अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे.

असा पहा निकाल – 

सर्वात आधी थेट लिंक वर जा किंवा अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन तेथून निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.

आता सर्व माहिती सबमिट करा.

आता तुम्ही तुमचा AIAPGET 2020 निकाल पाहू शकता.

येथे निकाल पहा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com