आता बारावीच्या विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती नाही ! कारण…

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे.  आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा पुसला जाणार आहे. तसेच  या नापास  विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पुन:परिक्षेसाठी पात्र किंवा कौशल्यविकासासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती आहे. त्यांना आता घाबरायचं कारण नाही.

10 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरचा नापास हा शेरा यापूर्वीच काढून टाकण्यात आला आहे. कौशल्य विकास विभागाने 10 वी आणि 12 वी तल्या कौशल्य विकासासाठी पात्र असा शेरा मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य सेतू’ योजना आखली आहे. त्यामुळे आता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर देखील सुधारित शेरे पाहायला मिळतील.

हे पण वाचा -
1 of 218

जे विद्यार्थी दहावी बारावीच्या पुनर्परीक्षेत यशस्वी होणार नाहीत त्यांना नापास न ठरवता कौशल्यविकासासाठी थेट प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे आयुष्यभर 12 वी नापास असा शिक्का बसण्यापासून आता राज्यातील विद्यार्थ्यांची कायमची सुटका झाली आहे.

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता मोबाईल अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: